Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २०

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 25/01/2018 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले. १) आजतक - कार्वी सर्वेक्षण हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील. म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-po… २) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-el…

वाचने 43270
प्रतिक्रिया 217

प्रतिक्रिया

In reply to by श्रीगुरुजी

बातम्या विकिपेडिया गुप्तांचे ट्विटर स्वतः गुप्ता Leader of Opposition Delhi (MLA, Rohini) असे लिहितात , तुम्हाला बहुतेक गुप्तापेक्षा जास्त माहिती असावी.

In reply to by श्रीगुरुजी

"The Honourable Speaker has recognised Shri Vijender Gupta, Member of Legislative Assembly, who is leader of the House of the party in Opposition to the government having greatest numerical strength, as Leader of Opposition in the Legislative Assembly of the National Capital Territory of Delhi with immediate effect," a notification issued by the Delhi Legislative Assembly Secretariat said today. माध्यमातून उल्लेख होणे आणि सभागृहाच्या अध्यक्षांनी नियुक्त करणे यात फरक आहे. सभागृहातील पद हे अधिकॄत आहे https://en.wikipedia.org/wiki/Lok_Sabha या दुव्यावर गेला असता Leader of the Opposition : Vacant असे दिसेल कारण माध्यमे नाही तर सभागॄह विरोधि पक्षनेता कोण असते. मग सांगा बघू , आपने भाजपला १०% सीटा नसूनही विरोधी पक्षनेतेपद दिले , हो की नाही ? ;)

In reply to by श्रीगुरुजी

मग तुम्हाला काय विश्वासार्ह वाटते ? भाजपाचे गुप्ता स्वतः विश्वासार्ह आहेत का ? ते स्वतःला विरोधी पक्षनेते म्हणतात . दिल्ली सरकारच्या अधिकृत साईटवर http://www.delhi.gov.in/DoIT/Publicity/pdf/Online%20Directory%202016.pdf इथे २१ व्या पानावर LEADER OF OPPOSITION Leader of Sh. Vijender Gupta O: 23890250 F: 23890059 Opposition B.J.P. R: 23072774, 23072773 M: 9873427234 C-1/40 Pandara Park, New Delhi असा उल्लेख आहे . आता सरकारी अधिकृत उल्लेख विश्वासार्ह आहेत का असा पुन्हा गळा कढू नका .

In reply to by श्रीगुरुजी

सरकारी गोष्ट ही सरकारी असते . त्यात आप / भाजप असे नसते. आणि सगळ्या बातम्या गुगलून पहा , गुप्ताचे ट्विटर वर सुद्धा त्या पदाचा उल्लेख आहे . त्या सर्व बातम्या , सरकारी साईट , विकिपेडिया , गुप्ताचे ट्विटर हे आप वाले लिहित नाहीत . चुकले तर हो म्हणा की ! रडताय कशाला.

In reply to by कपिलमुनी

आआपवाल्यांची गोष्टी वेगळी आहे. ते सरकार वगैरे ओळखत नाहीत. खोटे बोलण्यात व वागण्यात ते पटाईत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपचे गुप्ता ? ते पण खोटारडे आहेत का ? गुरुजी , जर सभागृहात विरोधी पक्षनेतेपद दिले आहे ही वस्तुस्थिती आहे , ज्याचे बरेच पुरावे दिले आहेत . तुमच्या ना मानण्याने फक्त तुम्ही खोटे पडले आहात आणि द्वेषात खोटे लिहिता हे दिसले आहे. दिल्ली मधे भाजपाकडे १० % सीट नसून विरोधी पक्षनेतेपद दिले नाही याचा एक तरी पुरावा तुमच्या कडे आहे का ? तुम्ही या बद्दल गुगल करून , वाचून , पत्र व्यवहार करून माहिती गोळा केली आहे का ?

In reply to by श्रीगुरुजी

फक्त विकि नाहिये , इतर दुवे आहेत ते वाचा ! स्वत: ला हवे तेवढेच वाचायचे , मुद्द्दा नसला स्वतःच चुकले की रडायचे ! मूळ मुद्य्याला बगल द्यायची . तुम्ही गुप्ताच्या ट्विटर बद्दल आणि अधिकृत साईट बद्दल , सगळ्या न्यूज चॅनेल बद्दल बोलत नाही. आणि तुम्हाला एक तरी ( विकीचा सुद्धा ) पुरावा जमतोय का द्यायला ? की तोंडघशी पडल्याचे मान्य करवत नाही ??

In reply to by कपिलमुनी

१४४ व्य पानावर टिपू सुलतानाचे चित्र नाहीच. आआप वाले इतके निखालस खोटे बोलू शकतात ? मुनीवर वर मी लिहिलेल्या या दोन ओळींवर आपले काय म्हणणे आहे? आआप इतके धडधडीतपणे खोटं बोलू शकतात का एवढा साधा प्रश्न आहे. बाकी विरोधी पक्ष प्रमुख म्हणून दिल्ली विधानसभेत नक्की काय सोयी उपलब्ध आहेत हेही वाचायला आवडेल. नुसते फुकटचे श्रेय उपटणे हा तर श्री केजरीवालांचा आवडता उद्योग आहे. कारण लोकसभेतील विरोधी पक्ष नेते हे फार महत्त्वाचे आणि घटनात्मक जबाबदारीचे पद आहे. कारण cag हे सरकारला नव्हे तर विरोधी पक्ष प्रमुखाला उत्तरदायी असतात म्हणून सरकारची उणीदुणी सहज बाहेर पडू शकतात. दिल्ली विधानसभेत असे काही आहे का हे वाचायला आवडेल

In reply to by सुबोध खरे

मूळ मुद्दा असा होता की मी जेव्हा लिहिले , आपने १० % सीट नसताना विरोधी पक्षनेतेपद दिले तेव्हा गुरुजीनी नाही असे सांगितले. त्याचे पुरावे दिले नन्तर त्यांनी प्रतिवाद केला नाही .( यानंतर नक्की येतील) दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्याला अधिकार /सोयी काय आहेत ते महिती नाही , पण ते पद दिले आहे हे मान्य करून त्याच्या अधिकारांवर टीका करणे किंवा आपवर टीका करणे योग्य ठरेल. पण पद दिलेच नाही हे म्हणणे चुकीचे आहे. डॉक्टर , तुमचे म्हणणे काय आहे ? दिल्लीमधे भाजपाला विरोधी पक्षनेतेपद दिले आहे का नाही ? --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आप च्या टिपूच्या वादात मला का ओढत आहात ?मी त्या मुद्द्यावर कोणताही प्रतिसाद दिला नाही. गविंनी त्या प्रतीची पीडीएफ दिली आहेच. त्या पीडीएफ मधील दुवा . खाली पान नम्बर आहे. tipu माझ्या वाचनाप्रमाणे हे टिपूचे आहे. जालावर शोध घेतले असता रेफरन्स सापडतील. वरील दुव्यात आणि चित्रात उत्तर सापडेल अशी आशा करतो. आता हे टिप्पूचेच आहे का? त्याचे नाव कुठे लिहिले आहे वगैरे बालीश प्र्श्नात मला पडायचे नाही. * माझा टिपूच्या चित्राला पाठिंबा नाही.

In reply to by कपिलमुनी

तुमच्या प्रयत्नांना दाद द्यावी वाटली म्हणून हा प्रतिसाद. फारच कष्ट घेताय राव. चला या निमित्ताने का होईना, सांगोवागीच्या गप्पांमधून छातीठोक दावे करण्यापेक्षा काही काँक्रिट एविडंस देताय आणि आम्हाला नवी माहिती मिळतेय त्याबद्दल धन्यवाद. :)

In reply to by कपिलमुनी

मिसळपाव हे संस्थळ उजव्या विचारसरणीला प्रोत्साहन देणारे आहे हे जवळपास उघड गुपित आहे. परंतु गुरुजी आणि मुनिवर्य यांच्यातील कलगीतुरा दुर्दैवी म्हणावा लागेल. या निमित्ताने "गैरप्रकाराची माहिती द्या" अशा प्रकारची सुविधा या संस्थळावर असावी का असा विचार मनात आला. बऱ्याच वेळेला विचारसरणीपेक्षा तिला जोपासणारे माणसं हि त्या विचारसरणीला प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठा प्राप्त करून देतात. गुरुजींचे वागणे हे दुसऱ्या प्रकारात मोडते. संपादक मंडळींच्या लक्षात हा प्रतिसाद येईल कि नाही हे माहिती नाही. पण आल्यास त्यांनी झाल्या प्रकारची दाखल घ्यावी. सहसा मी देत आहे त्या प्रतिसादांवर अजून गदारोळ उठू शकतो. त्याचा प्रतिवाद मी करणार नाही हे आत्ताच नमूद करतो. मला खात्री आहे कि संबंधीत व्यक्ती याला स्वतःच्या जाज्वल्य देशाभिमान, धर्मपारायणता, आणि असीम प्रतिभेचा विजय समजेल. त्याला इलाज नाही.

In reply to by कपिलमुनी

आआपवाल्यांवर विश्वास ठेवणे अशक्य आहे. धादांत खोटे बोलणार्‍यांची ती टोळी आहे. भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिल्याचे अधिकृत पत्र आहे का? ते असल्यास विश्वास ठेवायचा का नाही यावर विचार करता येईल.

In reply to by श्रीगुरुजी

विरोधी पक्षनेता , असा अधिकृत राज्याभिषेक करतात का ? ( गुरुजींच्याकडून , अभ्यास वाढवा , असे उत्तर आले तर इतरानी उत्तर दिले तरी चालेल . )

In reply to by manguu@mail.com

सभागृहात विरोधी पक्षनेता असे पद असते . The Leader of the Opposition is the politician who leads the official opposition in either House of the Parliament of India. विधानसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेतेपद असते

In reply to by manguu@mail.com

..कुठे बसवले जाणार हे महत्त्वाचे नसून प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
अ ते ज्ञ सर्व पक्षातील सर्व घराणेशाही मोडून काढली पाहीजे . एखाद्या पक्षाचा अध्यक्ष न करता , ओळी न मोजता सर्वसामान्य जनतेत गर्दीत उभे करावयास हवे. आणि असे केल्याचे कोणतेही क्रेडीट न घेता बातमी न होता घराणेशाही गर्दीत विरघळण्याची गरज असावी.

भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कासगंजमध्ये काढलेल्या तिरंगा यात्रेदरम्यान दोन गटांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात एक जण ठार तर अनेक जण जखमी झाले असून या घटनेनंतर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी १० देशांचे नेते उपस्थित होते. भारतास प्रगती पथावर नेण्याचा दृढ संकल्प केलेला ,एक दुर्दम्य माणूस काय करू शकतो याचे हे प्रतिक होते. त्याच वेळी मुंबईत बुद्धी भ्रष्ट , पद भ्रष्ट , तत्व शून्य , सत्ता लोलुप , जातीय विद्वेषक , बेरोजगार नेते मंडळी संविधान बचाव मोर्चा काढती झाली होती. हे चित्र पहा आणि ते चित्र पहा असाच हा दिवस होता.

https://m.maharashtratimes.com/india-news/fresh-violence-in-kasganj-mob… संशयित म्हणून साध्वी प्रज्ञाला अटक ! .... हॅरी पॉटरमध्ये मिसेस् मॅग्गोनिकल हॅरी , हर्मायनी, रॉनला बोलते ... जब भी कोई हादसा होता है , तो आप तीनो हमेशा वही पे पाये जाते हो !

In reply to by manguu@mail.com

काँग्रेसचे सरकार असते तर आतापर्यंत भयानक गदारोळ झाला असता नै ?

In reply to by manguu@mail.com

मोदींनी बऱ्याच ठिकाणी विकासकामांसाठी मंदिरे हलवली, जे विश्व हिंदू परिषदेला मान्य नव्हते.. बादवे, मोदी हा माणूस म्हणून संघपरिवारापलिकडे जाऊन समजून घ्या, मग तुम्हाला कळेल की त्यांचे इतके फॅन का आहेत?

In reply to by आनन्दा

कुठे कधी झाले ? आणि विकासकामातील अडथळे हलवणे हे लोकल लेवलला होइल ना ? की डायरेक्ट मोदीना फोन ?

In reply to by manguu@mail.com

अश्या गोष्टी जेव्हा राज्य पातळीवर होतात तेव्हा त्यामागे तेव्हढाच दणकट पाठिंबा असावा लागतो.. मला असे म्हणायचे नाही की केवळ मंदिरेच हलवली, अन्य धर्मांची प्रार्थनास्थळे देखील हलवली, पण हिंदूंच्या स्थळांना हिंदू म्हणून काहीही सवलत दिलेली नाही.. सरदार सरोवरात हिंदूंचे कोणतेतरी महत्वाचे मंदिर रेलोकेट करवे लागले होते, पण अश्या गोष्टींनी मोदींवर काही फरक पडत नाही. या गोष्टींना विहिंपचा विरोध होता, ते कदाचित त्यांच्या जागी बरोबर असतील, पण विकासाच्या आड अश्या श्रद्धा येणे तसेही वाईटच.

In reply to by manguu@mail.com

आणि विकासकामातील अडथळे हलवणे हे लोकल लेवलला होइल ना ? की डायरेक्ट मोदीना फोन ?
का? कुठल्यातरी रॅन्डम ठिकाणी कोणीतरी रॅन्डम वक्तव्य केले तरी त्याचे स्पष्टीकरण डायरेक्ट मोदींकडून मागायची पध्दत तुमच्यासारख्यांनीच सुरू केली ना? मग लोकल लेव्हलला केलेल्या विकासकामाचे श्रेय मोदींना का देऊ नये?

In reply to by गॅरी ट्रुमन

ते मोगा खान डू आय डीच्या-- डू आयडी चा -- डू आयडी घेऊन आले आहेत त्यांच्या नादाला कुठे लागताय?

शिवसेनेला काही उपरती झाली तर davyanchya गटात सामील होण्यात फारशी अडचण येऊ नये. तसेही त्यांचे हिंदुत्व फारसे जहाल म्हणून काही नावाजले जात नाही. दुसरे म्हणजे आत्ता तर घसरगुंडीची सुरुवात आहे.भाजपाला मिळणारया जागा भविष्यात कमीच होतील. चांगला पाऊस आणि जागतिक मंदीचा फायदा जनतेपर्यंत न फोहोचविण्याची त्यांची प्रवृत्ती लोकांना चांगलीच समजली असेल. म्हणजे पुढील दोन अर्थसंकल्पात अगदी खैरात केली तरी पुढे हलाल व्हावे लागणार हे जनतेला समजू शकते. बरं, खैरात करून करून किती करणार. GST आणि नोटबंदीने अर्थव्यवस्था धुपलेली आहेच. त्यात पुढील काळात मोदींचा एखादा विरोधकांना फायदेशीर ठरणारा मास्टर स्ट्रोक आला कि विचारायलाच नको.

आज पुढील जागांसाठी पोटनिवडणुकांचे मतदान होत आहे: १. राजस्थानः अल्वर आणि अजमेर या लोकसभा जागांसाठी तर मंडलगड या विधानसभा जागेसाठी. २. पश्चिम बंगालः उलुबेरिया या लोकसभा जागेसाठी तर नोआपारा या विधानसभा जागेसाठी राजस्थानातील निकाल महत्वाचे असणार आहेत. एक तर वसुंधरा राजेंच्या सरकारविरूध्द अ‍ॅन्टी इन्कबन्सी असणार आहे. त्यातच सचिन पायलटच्या नेतृत्वाखाली काँग्रेस बरीच सुस्थितीत आली आहे. जर या तीन जागांवर चांगली कामगिरी काँग्रेसने केल्यास या वर्षाच्या शेवटी होणार्‍या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला मोठे बळ मिळेल. मतमोजणी १ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याव्यतिरिक्त मध्य प्रदेशात दोन तर ओरिसात एका विधानसभा जागेसाठी फेब्रुवारीत पोटनिवडणुक होणार आहे.

देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाल्याचं 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या रँकिंग आणि गुणसंख्येवरून दिसून येतं. दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताचं यंदाचं रँकिंग आणि गुणसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या वर्षी भारत रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. https://m.maharashtratimes.com/india-news/india-among-top-three-countri…

In reply to by manguu@mail.com

बातमीचा मथळा आणि आतला कन्टेन्ट वाचला, किंव आली. द्वेषापायी बौद्धिक दिवाळखोरी ती यापेक्षा काय वेगळी असू शकेल. चालायचंच!

In reply to by बिटाकाका

अरारारा, जर त्याने बातमी पूर्ण वाचली असती तर असे लिहिण्याची हिंमत केली नसती. खाली काय लिहिलय बघा -
Media was the lowest at 61, dropping five points since 2017

In reply to by manguu@mail.com

देशातील जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास कमी झाल्याचं 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'च्या रँकिंग आणि गुणसंख्येवरून दिसून येतं. दावोसमध्ये जारी करण्यात आलेल्या 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'मध्ये भारताचं यंदाचं रँकिंग आणि गुणसंख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घसरली आहे. गेल्या वर्षी भारत रँकींगमध्ये पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. 'मटा'चा मूर्खपणा दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना दिसतोय. एडेलमॅन या विदेशी कंपनीने केलेले हे सर्वक्षण राजकीय नसून वेगवेगळ्या देशातील सरकार, माध्यमे व असरकारी संस्था यांच्यावर जनतेचा किती विश्वास आहे याचे सर्वेक्षण आहे. हे प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन केलेले सर्वेक्षण नसून ऑनलाईन सर्वेक्षण असल्याने या सर्वेक्षणाला प्रतिसाद देणारे एका ठराविक वर्गातील आहेत. 'मटा'च्या बातमीचे शीर्षक आहे 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!'. मुळात सर्वसामान्य जनता या सर्वेक्षणात सहभागीच नाही, हे राजकीय सर्वेक्षण नाही आणि सरकारबरोबरच माध्यमे व असरकारी संस्था यांची विश्वासार्हता सुद्धा तपासण्यात आली आहे. तरीसुद्धा 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला!' असा दिशाभूल करणारा, असत्य व सनसनाटी मथळा देऊन 'मटा'ने स्वतःचे हसू करून घेतले आहे. मागील वर्षी असलेल्या ७२ व्या क्रमांकावरून ६८ वर येणे म्हणजे जनतेचा विश्वास उडाला असे म्हणणे म्हणजे मागील परीक्षेतील गुणांच्या तुलनेत या परीक्षेत एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाला असे म्हणण्यासारखे आहे. याच बातमीत लिहिले आहे की 'जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतर 'ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स'नं दिलेलं रँकिंग सरकारसाठी आशादायी आहे, असं मानलं जात आहे.'. एकीकडे म्हणतात की 'जनतेचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला' आणि दुसरीकडे म्हणतात कठोर आर्थिक सुधारणांनंतर सुद्धा मिळालेला क्रमांक सरकारसाठी आशादायी आहे. म्हणजे एका विषयात ४ गुण कमी मिळाल्यानंतर विद्यार्थी संपूर्ण परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याची दवंडी पिटायची आणि दुसरीकडे म्हणायचं की प्रश्नपत्रिका खूप अवघड असूनसुद्धा इतके गुण मिळणे विद्यार्थ्यासाठी आशादायी आहे. 'मटा'ला लाज वाटायला हवी. मोदीद्वेषाची परिसीमा होत आहे. केतकरांनी ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात 'मटा'चे संपादक झाल्यानंतर त्याचा 'सोटा' (सोनिया टाइम्स) करून त्याचे खांग्रेसचे मुखपत्र बनविले होते व वृत्तपत्राची विश्वासार्हता पूर्ण रसातळाला नेली होती. आता नवीन आलेले विजय चोरमारे त्यांच्या एक पाऊल पुढे आहेत. सातत्याने मोदींविरोधी असत्य बातम्या छापणे, 'सामना'च्या अग्रलेखाचा कचरा छापणे असले फालतू प्रकार बंद होतील तो सुदिन.

In reply to by श्रीगुरुजी

मागील वर्षी असलेल्या ७२ व्या क्रमांकावरून ६८ वर येणे म्हणजे जनतेचा विश्वास उडाला असे म्हणणे
हे थोडे दुरुस्त करणे - ७२व्या स्थानावरून ६८व्या स्थानावर नाही तर मागच्या वर्षीच्या ७२ गुणांसह असलेल्या पहिल्या स्थानावरून ६८ गुण असलेल्या तिसऱ्या स्थानावर घसरण झाली असे ते आहे.

In reply to by बिटाकाका

अरेरे! मटाची लागण मलाही झाली. ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला असे झालेले दिसतेय.

In reply to by बिटाकाका

तशी मला शुद्ध मराठी भाषा समजते आणि आमच्या साईडला वाईच हा शब्द सहसा कोणी वापरात आणत नाही. खास माझ्यासाठी आपल्या शुद्ध मराठी भाषेचा बाज बदलू नये, असे वाटते. असो... ... मी फक्त म्हंटले महाराष्ट्र सरकारची दमछाक होत आहे. कोणते सरकार जवाबदार आहे हे नमूद केले नाही. तुम्ही या प्रकरणाकडे फक्त पक्षीय राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहात असे वाटते. सरकार कोणाचे का असेना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, या मताचा मी आहे. ...... https://www.loksatta.com/maharashtra-news/farmer-dharma-patil-suicide-c… या बातमीनुसार १९९ हेक्टर चे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हे कशाच्या आधारावर ? १० लाखाचा सानुग्रह देखील देण्याचे घोषित केले आहे, ही दमछाक नाहीतर काय आहे ?

In reply to by विशुमित

तशी मला शुद्ध मराठी भाषा समजते आणि आमच्या साईडला वाईच हा शब्द सहसा कोणी वापरात आणत नाही. खास माझ्यासाठी आपल्या शुद्ध मराठी भाषेचा बाज बदलू नये, असे वाटते. असो...
हे अतिअवांतर आहे पण ....फक्त माहितीसाठी...मला ग्रामीण भाषा जास्त आवडते कारण ती माझी मूळ भाषा आहे.
राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहात असे वाटते.
हाहाहा...चष्मा कोणाला काढायची गरज आहे वे वेगळे सांगायची गरज नाही. मी फक्त तुमच्या वाचनासाठी ती लिंक दिली. महाराष्ट्र सरकारची दमछाक होतेय कि अजून काय होतेय हे ठरवण्याआधी पूर्ण माहिती तर नक्कीच घ्यायला पाहिजे, काय म्हंता?
या बातमीनुसार १९९ हेक्टर चे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हे कशाच्या आधारावर ? १० लाखाचा सानुग्रह देखील देण्याचे घोषित केले आहे, ही दमछाक नाहीतर काय आहे ?
कशी काय हि दमछाक जरा सांगता का? एका शेतकऱ्याने योग्य अथवा अयोग्य मागणीसाठी आत्महत्या केली तर सरकारने त्याबद्दल खेद व्यक्त करून त्याबद्दल मोबदला दिला आहे तर ती दमछाक कशी काय? हि आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेमुळे झालेली हत्या आहे आणि म्हणून सरकार मदत करत आहे असे मंत्रीमहोदय म्हणाल्याचं आपली बातमीच सांगते. तुम्ही तर चष्मा लावलेला नाहीये ना मग दमछाक वगैरे कशाला? कि महाराष्ट्र सरकार भाजप-शिवसेना आहे म्हणून दमछाक आणि आपल्या आवडत्या पक्षाचं असतं तर शेतकरी-प्रेम असं काही असतं?

In reply to by बिटाकाका

मला ग्रामीण भाषा जास्त आवडते कारण ती माझी मूळ भाषा आहे.>> ==>> मी जेवढे तुमचे प्रतिसाद वाचलेत त्यामध्ये तुम्ही ग्रामीण ढंग वापरलेला मला आढळला नाही (वापरला असेल ही बहुतेक). माझ्याच प्रतिसादाला तो अवांतर का वापरला असावा हा प्रश्न पडल्यामुळे माझ्याकडून अतिअवांतर झाले. रुचले नसेल तर क्षमस्व. राजकारणाच्या चष्म्यातून पाहत आहात असे वाटते. हाहाहा...चष्मा कोणाला काढायची गरज आहे वे वेगळे सांगायची गरज नाही. मी फक्त तुमच्या वाचनासाठी ती लिंक दिली. महाराष्ट्र सरकारची दमछाक होतेय कि अजून काय होतेय हे ठरवण्याआधी पूर्ण माहिती तर नक्कीच घ्यायला पाहिजे, काय म्हंता?>>> ==>> मी पक्षीय राजकारणाचा चष्मा हा शब्द प्रयोग यासाठी केला कारण तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये संपूर्ण बातमी मागील सरकार संदर्भात काय काय घडामोडी झाल्या एवढीच माहिती होती. चालू सरकारच्या काळात अशे प्रकार कशापद्धतीने हाताळायला पाहिजे होते या बद्दल चकार शब्द नाही. या बातमीनुसार According to the Land Acquisition Act, the government cannot make any changes in the compensation amount if the process is completed and the compensation is received by the affected person(s). याबाबत थोडी शंका आहे. एका शेतकऱ्याने योग्य अथवा अयोग्य मागणीसाठी आत्महत्या केली तर सरकारने त्याबद्दल खेद व्यक्त करून त्याबद्दल मोबदला दिला आहे तर ती दमछाक कशी काय?>>> ==>> निवेदन देऊन ही हा खेद आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्त केला असता तर आता पळापळी करायची गरज उरली असती. हि आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेमुळे झालेली हत्या आहे आणि म्हणून सरकार मदत करत आहे असे मंत्रीमहोदय म्हणाल्याचं आपली बातमीच सांगते.>>> ==>> सरकार आणि सरकारी यंत्रणा हे वेगवेगळे कसे हे जरा सांगता का? आणि सरकारी यंत्रणेमुळे झालेली हत्या आहे म्हंटल्यावर किती जणांवर ३०२ कलम लावले हे दिसले नाही.

In reply to by विशुमित

वरील आऊटलूक च्या बातमी मध्ये फक्त घटनाक्रम दिला आहे. तो भाजपसाठी अनुकूल आहे म्हणून लगेच राजकीय? ती बातमी परत एकदा नीट वाचलीत तर लक्षात येईल कि त्या घटनाक्रमात एप्रिल २०१४ ला मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि समोरच्या पक्षाकडून मान्यही झाली असे लिहिले आहे. आता बातमी असेही म्हणते कि कायद्याने एकदा मोबदला मंजूर झाला आणि हस्तांतरित झाला तर त्यात बदल करता येत नाहीत. तुमचं असं म्हणणं आहे का कि त्यानंतर फक्त निवेदन आलं म्हणून पुढच्या सरकारने त्यात बदल करायला हवा होता? आणि फक्त नियमाला धरून राहिले म्हणून पुढचे सरकार चुकीचे? ते कसे काय? अशा येणाऱ्या निवेदनांवर सरकारने निर्णय घ्यावेत असे आपले म्हणणे आहे का? हि दुर्दैवी आत्महत्या झाली म्हणून आता आपल्याला असे वाटते काय कि सरकारने निवेदनावर आधारित निर्णय घ्यायला हवा होता? अहो पण नियमांचं काय मग? सरकार आणि सरकारी यंत्रणा यातला खरंच फरक सांगायला हवा का? सरकारी यंत्रणा हि नियम आणि कायद्याने चालायला नको? त्या जमिनीचे योग्य मूल्यांकन (जर ते खरेच झाले नसेल तर ) योग्य वेळी करणे कोणाच्या हातात होते? तुम्हाला वरच्या बातमीत दिलेल्या घटनाक्रमावर अथवा नियमांवरच आक्षेप असेल तर त्यावर निश्चित चर्चा व्हावी.

In reply to by बिटाकाका

बा द वे, अजून थोडं शोधल्यावर असं कळलं की त्यांच्या सातबारावर कलमे नसल्यामुळे त्यांना कमी मोबदला मिळाला.. आता हा काय नवीन प्रकार? मी जाणत्या आयडीना विनंती करतो की हे सगळे चर्चा एक वेगळा धागा काढून करावी, नेमकं काय झालं, काय चुकलं, काय बदलता आलं असतं वगैरे..

In reply to by बिटाकाका

आता बातमी असेही म्हणते कि कायद्याने एकदा मोबदला मंजूर झाला आणि हस्तांतरित झाला तर त्यात बदल करता येत नाहीत.>>> ==>> झाला बदल. धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला. इतर 12 प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनाही वाढीव मोबदला मिळणार आहे. http://www.lokmat.com/maharashtra/farmer-dharma-patil-family-gets-54-la… ..... लोक चित्र असे उभे करतात की शेतकरी म्हणजे ऐतखाऊ, फक्त मदती लाटण्यासाठी आणि फुकट मिळावे यासाठी धडपडत असतो. ग्राउंड लॅव्हेल वर येऊन दखल घायला कोणी तयारच नाहीत. फक्त वृत्तपत्रीय बातम्यांचा आधार घायचा, सोयीनुसार.

In reply to by विशुमित

कोण लोक? तुमच्या प्रतिसादातील शेवटचा पॅरा माझ्या प्रतिसादाला उप-प्रतिसाद म्हणून टाकण्यामागाचे प्रयोजन काय? नेमके काय म्हणायचे आहे तुम्हाला? स्वतःला शेतकऱ्याचे कैवारी आणि दुसर्यांना शेतकऱ्याचे वैरी ठरवण्याची फॅशन आली आहे का आजकाल? बाकी, मागच्या सरकारचे पाप या सरकारने धुतले, याबद्दल सद्य सरकारचे माझ्या वैयक्तिक कॅपॅसीटीमध्ये अभिनंदन!

In reply to by विशुमित

हो का? कुणामुळे गेला बरे? आणि कुणी धुवायला लावले? आणि ज्यांनी ते पाप केलं त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? आणि, इथे कुठला नियमभंग झाला होता सांगाल का जरा?

In reply to by विशुमित

ही दमछाक नाहीतर काय आहे ? दमछाक वगैरे झाली का ते सांगता येणार नाही. परंतु वाटेल ते बेलगाम आरोप करणारा नबाब मलिक, आपल्या पप्पांची व चुलतभावाची कारकीर्द विसरणार्‍या सुळेवहिनी, बेताल धनंजय मुंडे इ. ना मात्र या आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

क्रिमिनल जयकुमारला सोयीस्करपणे का वगळले ? आत्महत्येमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या हे नक्की.>> ==>> सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याचा केविलवाणा आणि असंवेदनशील प्रयत्न. बाकी मावळ गोळीबार प्रकरणी देखील अशाच उकळ्या सद्य्च्या सत्ताधारी पक्षातील लोकांना फुटल्या असणार नाही ?