Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २०

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 25/01/2018 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजतक व एबीपी न्यूज या दोन वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या नवीन मतदार सर्वेक्षणाचे अंदाज आज जाहीर केले. १) आजतक - कार्वी सर्वेक्षण हे सर्वेक्षण ३० डिसेंबर २०१७ ते १० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ४०% मतांसहीत एकूण ३०९ जागा मिळतील तर संपुआला २७% मतांसहीत एकूण १०२ जागा मिळतील. या सर्वेक्षणात शिवसेना रालोआत आहे असे गृहित धरलेले आहे व संजदचा देखील रालोआत समावेश करण्यात आला आहे. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. जर संपुआत तॄणमूल काँग्रेस, सप व बसप सामील झाले तर संपुआच्या मतांची टक्केवारी ३८% पर्यंत जाऊन एकूण जागा २०२ मिळू शकतील, तर या परिस्थितीत रालोआला २५८ जागा मिळू शकतील. म्हणजे रालोआ वजा शिवसेना आणि संपुआ अधिक तृणमूल अधिक सप अधिक बसप अशी निवडणुक झाली तर संपुआ रालोआपेक्षा जास्त जागा मिळवू शकेल. https://www.indiatoday.in/india/story/india-today-mood-of-the-nation-po… २) एबीपी न्यूज - सीएसडीएस सर्वेक्षण हे सर्वेक्षण ७ जानेवारी २०१८ ते २० जानेवारी २०१८ या काळात संपूर्ण देशात करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार आज निवडणुक झाली तर रालोआला ३४% मतांसहीत एकूण ३०१ जागा मिळतील तर संपुआला २५% मतांसहीत एकूण १२७ जागा मिळतील. या सर्वेक्षणानुसार भाजपला २७२ जागांचा बहुमताचा आकडा पार करणे अवघड आहे. http://www.abplive.in/india-news/nda-to-win-293-309-seats-if-general-el…

वाचने 43270
प्रतिक्रिया 217

प्रतिक्रिया

म्हैसूर येथे पाठविण्यात येणारे जैन कंपनीच्या ३९ ठिबक नळ्यांच्या बंडलपैकी ७० हजार ९७७ रुपये किंमतीचे १५ ठिबक बंडल अज्ञात चोरट्यांनी सुरत रेल्वे लाईनवरील धक्क्यावरून चोरून नेले आहे. ही घटना २२ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी बुधवारी (दि. २४) कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पौड जवळ रावडे गावाच्या हद्दीतील डोंगरामध्ये सुमारे 20 ते 25 मोर, लांडोर आणि काही रानकोंबड्यांचा मृत्युमुखी झालेल्या अवस्थेत आढळल्या. या घटनेमुळे परिसरातील डोंगरभागात मोठी दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान तीन ते चार दिवसापूर्वी विषबाधेमुळे या पक्षांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे

हळदीकुंकू समारंभ व पालक सभा म. न.पा शाळा क्र ५३ मुलांची मुंढवा या शाळेतील इ २ री च्या वर्गात हळदीकुंकू समारंभाच्या निमिताने माता पालक सभा घेतली गेली या सभेत पालकांनी वर्गातील मुलांचे वाचन घेतले यामुळे पालकांना आपल्या मुलांची प्रगती प्रत्यक्ष पाहता आली

पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. हे 21 वे पुष्प प्रदर्शन असून ते 25 ते 28 जानेवारी या कालावधी नागरिकांना पाहण्यासाठी खुले आहे. अशी माहिती एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी दिली. या पुष्प प्रदर्शनात केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या, कुंड्यांची आकर्षक मांडणी. मनमोहक फुलांची मांडणी, पाने, फुले वापरून तयार केलेल्या विविध पुष्परचना आणि विविद प्रकारचे प्रदर्षणीय स्टॉलचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. याप्रदर्शनाला पुष्पप्रेमींनी हजेरी लावत पहिल्याच दिवशी भरपूर प्रतिसाद दिला. यावेळी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनचे मानद सचिव सुरेश पिंगळे, संस्थेच्या समन्वयक अनुपमा बर्वे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दहा आसियान देशांमधील प्रत्येकी एकाला पद्मश्री देण्यात आली आहे.क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि बिलिअर्ड खेळाडू पंकज अडवाणी यांना पद्मभूषण देण्यात आले आहे. पद्मश्री विजेत्यांमध्ये डॉ. अभय आणि राणी बंग तसेच गंगाधर पानतावणे यांचा समावेश आहे.

राजस्थानातील पोटनिवडणुकांमध्ये करणी सेना आणि इतर राजपूत संघटना काँग्रेसला समर्थन देणार. पद्मावत चित्रपटप्रकरणी राज्य सरकारच्या 'दुर्लक्षामुळे' हा निर्णय घेतला गेला असे खाली दिलेल्या बातमीत म्हटले आहे . आणि राजपूत समाजाला आरक्षणाची मागणी आहेच. म्हणजे हा सगळा प्रकार कोणी स्पॉन्सर केला होता हे वेगळे सांगायला पाहिजे का? काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे. http://www.financialexpress.com/india-news/padmavati-fallout-karani-sen…

In reply to by गॅरी ट्रुमन

>>> काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे. + २० लाख

In reply to by गॅरी ट्रुमन

मग भाजप शासित काही राज्य सरकारांनी देखील या चित्रपटावर बंदी का घातली असावी? मतलब सब मिले हुए है. काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे.'' हि जरा अतिशयोक्ती वाटते. फक्त भाजप म्हणजे देश नाही.

आज मुंबईत संविधान बचाओ रॅली आहे म्हणे. त्यात सामील होणार्‍यांच्या यादीत एक नाव आहे सीताराम येचुरी. म्हणजे यांच्या पक्षाचे सरकार केरळमध्ये ध्वजवंदनाला बंदी घालणार आणि हे इकडे मुंबईत संविधान बचाओ रॅलीमध्ये सामील होणार. काय मंडळी आहे की नाही पुरोगामी सेक्युलर लॉजिक? २०१९ च्या निवडणुका जवळ आल्याचे जाणवतेय की नाही?

In reply to by गॅरी ट्रुमन

शाळेत झेंडावंदन शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती किंवा तिथले लोकप्रतिनिधीनी करावे, असा संकेत ( की नियम ) आहे.. श्री भागवत यापैकी नेमके कोण आहेत ? त्यांच्या स्वतःच्या शाखा देशभर असताना तिथे न करता हे नेहमी दुसरीकडे जाऊन धवजवंदन का करतात ?

काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी किड आहे. प्रचंड सहमत !!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/aap-potrait-tipu-sultan-in-de… दिल्ली विधानसभेत ७० स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे लावण्यात येत आहेत. त्यात टिपू सुलतानच्या चित्राचाही समावेश आहे. टिपू कधीपासून स्वातंत्र्यसैनिक झाला? टिपूची प्रतिमा अत्यंत क्रूर व धर्माध मुस्लिम अशी असून त्याने हजारो हिंदूची कत्तल करून अनेकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले होते. असा नराधम, केजरीवालसारख्या नालायकांना वंदनीय असावा, यात नवल नाही. कर्नाटकमध्येदेखील टिपूचे उदात्तीकरण सुरू आहे. तिथे टिपू जयंती वगैरे साजरी केली जाते. एकंदरीत टिपू हा निधर्मांधांचा नवीन पोस्टर बॉय आहे. आगामी काळात अफझल गुरू, याकूब मेमन, कसाब इ. अतिरेकी देखील यांना वंदनीय होतील व त्यांचे पुतळे उभारून त्यांची जयंती साजरी केली जाईल यात तिळमात्र शंका नाही.

In reply to by श्रीगुरुजी

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वातंत्र्य सैनिकांचे नाव सांगा, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिले अशा संघाच्या नेत्यांची नावे सांगा असे आम्ही भाजपला म्हटले होते. मात्र भाजपने यावर काहीही उत्तर दिले नाही. २. संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र आहे. मग दिल्ली विधानसभेत टिपू सुलतानचे चित्र लावण्यात आले तर त्यात गैर काय? हे प्रतिसादमधून का टाळले? बाकी संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र कोणी टाकले आहे, कोणाला काही माहिती आहे का? (मी १४४ पण पाहून खात्री केलेली नाही हे नमूद करू इच्छितो)

In reply to by विशुमित

>>> १. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील स्वातंत्र्य सैनिकांचे नाव सांगा, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान दिले अशा संघाच्या नेत्यांची नावे सांगा असे आम्ही भाजपला म्हटले होते. मात्र भाजपने यावर काहीही उत्तर दिले नाही. अत्यंत हास्यास्पद बचाव आहे. या दोन गोष्टींचा संबंधच नाही. तसेच टिप्याचा दिल्लीशी कणभरही संबंध नाही. दिल्लीबाहेरील कोणी हवा होता तर या नरराक्शसापेक्शा इंग्रजांविरूद्ध लढलेला दुसरा बाजीराव होताच की. देशात असंख्य स्वातंत्र्यसैनिक होऊन गेले. ते सोडून यांना नेमका हा नराधमच कसा सापडला? ट्रुमनने बरोबर लिहिलं आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट, सगळे पुरोगामी विचारवंत ही देशाला लागलेली मोठी कीड आहे. >>> २. संविधानाच्या १४४ व्या पानावरही टिपू सुलतानचे चित्र आहे. मग दिल्ली विधानसभेत टिपू सुलतानचे चित्र लावण्यात आले तर त्यात गैर काय? या बद्दल माहिती नाही. नेहरूंची मुस्लिम चाटुगिरी माहिती असल्याने तसे असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

इंग्रजांविरुद्ध दुसरा बाजीराव लढला ? काय विनोद करताय गुरुजी ! लढले तर मग पेशवे इंग्रजांकडून पेन्शन का घेत होते ?

In reply to by श्रीगुरुजी

त्याला पेशवा हजर होता का ? की इतराना लढायला सांगून , मीही येतो असे म्हणून , तो तिथे आलाच नव्हता ?

In reply to by manguu@mail.com

आणि ती नंतर पेन्शन घेतली ती का? न लढण्यासाठी का ? किती होती ? सात की आठ लाख ?

In reply to by manguu@mail.com

तुम्ही आता "लोचट" असा आयडी घ्या, म्हणजे तुमची तळमळ संपादक मंडळाला कळेल.नंतर कदाचित आयडी उडणार नाही.

In reply to by विशुमित

जातीय समीकरणांनी गुजरातमधे भाजपला घाम फोडला. देशभर शेतकर्‍यांमधे असंतोष घुमसतोय. रोजगार निर्मीती वगैरे क्षेत्रात काहि ठाशीव काम झाल्याचं दिसत नाहि. करणी सेनेसारखे नवे उपद्रव हे गपगुमान सहन करताहेत. शिवसेना सारखे सहकारी साथ सोडुन जायला लागले आहेत. तरिही यांचे डोळे उघडायला तयार नाहि. एकदाचं मोदि कार्ड एक्स्पायर झालं कि परत विरोधीपक्ष पदाची खुर्ची उबवणे यापलिकडे काहि कार्यक्रम नाहि कि काय यांचा. अवघड आहे.

In reply to by अर्धवटराव

शिवसेना सोडून जातेय म्हणजे सुंठीवाचून खोकला जातोय. इतर मुद्द्यात दम नाही.

In reply to by श्रीगुरुजी

योग्य ठिकाणी मुद्द्यांची दखल घेतली जावी अशी इच्छा, आशा आणि अपेक्षा आहे. बाकि राम जाने.

In reply to by अर्धवटराव

मुळात शिवसेना सोडून गेलेली नाही आणि जाणारही नाही कारण (१) 'सामना'तून कितीही म्याव म्याव केली तरी सेनेला आपली खरी ताकद किती अल्प आहे याची कल्पना आहे आणि (२) सेना सत्तेसाठी अत्यंत कासावीस व लाचार आहे व स्वबळावर आपण सत्तेच्या जवळपास सुद्धा जाऊ शकत नाही हे सेनेला नेमके माहिती आहे. तरीसुद्धा सेनेने बाहेर पडण्याचा आततायीपणा केला, तर काळजी घेण्यास शहा व मोदी समर्थ आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

आणि शहाजींचं सामर्थ्य गुजरातमधे बघितलच आहे. कर्नाटकमधे सुद्धा राम वि. अल्ला वगैरे फालतुगिरी सुरु झाली आहे. असो.

In reply to by अर्धवटराव

टिप्या जयंती, कर्नाटकचा वेगळा ध्वज, लिंगायतांना वेगळा धर्म, लंकेशच्या खुनासाठी संघावर आरोप, हिंदूंचे खून वगैरे फालतूगिरी सुरू झाल्यानंतर त्यावर उत्तर येणारच.

In reply to by अर्धवटराव

कर्नाटकमधे सुद्धा राम वि. अल्ला वगैरे फालतुगिरी सुरु झाली आहे.
अर्धवटराव, तुम्हाला जे.एन.यु मध्ये भारताचे तुकडेतुकडे व्हावेत वगैरे प्रकार झाले होते ती फालतूगिरी वाटत असावी अशी अपेक्षा आहे. कारण गेल्या महिन्या-दीडमहिन्यात प्रधानसेवकांनी लाज आणली वगैरे तुम्ही म्हटले आहेत ते आठवले पण अशा तुकडेतुकडे गँगला राहुल, केजरीवाल, डावे इत्यादी सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे लाज आणली अशा प्रकारे तुम्ही कधी म्हटल्याचे आठवत नाही. सुशिक्षित लोकांचा हाच अ‍ॅटिट्यूड अगदी प्रचंड डोक्याला शॉट लावतो. मोदींनी सगळे प्रश्न सोडवायला हवेत नाहीतर ते प्रश्न मुळात निर्माण केले त्यांनाच आम्ही मत देऊ!! असो.

In reply to by अर्धवटराव

आणि शहाजींचं सामर्थ्य गुजरातमधे बघितलच आहे. गुजरातमध्ये मार्च १९९५ पासून (१९९७-९८ मधील १ वर्षांच्या वाघेलाच्या कारकीर्दीचा अपवाद वगळता) डिसेंबर २०१७ पर्यंत तब्बल २२ वर्षे भाजप सत्तेत होता. भाजपने सलग ५ विधानसभा व ५ लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळविले होते. एखादा पक्ष सलग इतका मोठा काळ एखाद्या प्रदेशात सत्तेवर असेल तर अँटीइंक्युंबन्सी मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन जनता बदल करण्यास उत्सुक असते. तशीच अँटीइंक्युंबन्सी यावेळी होती. त्याचबरोबर पटेलांना राखीव जागा प्रकरणावरून भडकावण्यात आले होते. पटेल, इतर मागासवर्गीय, दलित आणि खांग्रेस यांची अभद्र जातीय युती झाली होती. मतदानाच्या आदल्या दिवशी रातोरात २०१५ मध्ये पोलिस गोळीबारात मारल्या गेलेल्या दंगलखोर पटेलांचे चित्र छापलेली व शहीदांचे स्मरण ठेवा असे लिहिलेली लाखो पोस्टर्स राज्यात सर्वत्र लावण्यात येऊन जातीय भावना पेटविण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. त्यात भरीला निश्चलीकरण व वसेक सारखे कठोर आर्थिक निर्णय होतेच. माध्यमे भाजपविरूद्ध रोज आग ओकत होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा बहुमत मिळविणे हे काही लाडू खायचं काम नाही.

In reply to by अर्धवटराव

शिवसेना सारखे सहकारी साथ सोडुन जायला लागले आहेत. तरिही यांचे डोळे उघडायला तयार नाहि https://m.maharashtratimes.com/india-news/shivsena-took-part-in-nda-mee…

In reply to by अर्धवटराव

वेगळे लढणार असल्या कितीही फुशारक्या सेनेने मारल्या तरी सत्ता सोडण्याची हिंमत सेनेच्या पार्श्वभागात नाही हे लक्षात आले असेलच.

In reply to by विशुमित

RSS didn't participate in the freedom movement even though its founder K. B. Hedgewar participated in the freedom movements. He wanted to have personal involvement in the struggle, but not bring his organization into it. That was pragmatic. Other than INC, none of the major political groups in India actually participated in the freedom movement. Jinnah's Muslim League didn't; Ambedkar's ILP didn't; Savarkar's Hindu Mahasabha didn't; EV Ramaswamy's Justice party didn't. Even the Communists didn't for the most part. All these groups were quite nascent and their founders didn't want to get on the bad side of the British, thereby losing their movement and momentum. RSS was formed due to the Malabar riots of 1921 - that killed a large number of Hindus in the present state of Kerala. Congress didn't voice much against that event as part of the riots were targeted at the British rule too. For Hedgewar, this was a realization that he needed a group that will fight for the Hindu interests even if sometimes aligned with the British. In the initial decades, the movement was quite small, competing with both Congress and Mahasabha for the Hindu votes and Hedgewar was very careful to avoid politics. Only many decades later came the Jan Sangh/BJP - the political wing. Since they avoided politics, they didn't participate in the freedom movement. When Hedgewar died in 1940, the movement was left with Golwalkar who was more reclusive and had little desire for a paramilitary style organization. This pushed RSS even further away from politics. This is when Godse and others moved out of RSS to form Hindu Rashtra Dal as he & others thought RSS was too removed from reality. In hindsight this action of Golwalkar [keeping a big distance from politics] saved it from the destruction faced by other Hindutva groups post Mahatma's assassination. Golwalkar headed RSS for a long time [33 years] and it is only after his death that RSS became actively involved in politics under the next leader, Deoras. Without Deoras there would have been no BJP. Coming back to the question, you could have asked what was the contribution of individual temples, mosques, churches, social organizations to the freedom movement and in each case it amounts pretty close to ZERO. Like today, politics was a sensitive subject that many of these organizations tried to avoid.

In reply to by सुबोध खरे

च्यायला, काँग्रेसचं तरी काय योगदान आहे स्वातंत्र्यचळवळीत? इंग्रजांनंतर काँग्रेसी सत्तेवर आले याचा अर्थ काँग्रेसने इंग्रजांना घालवण्याची चळवळ चालवली असा होत नाही. काँग्रेसमुळे इंग्रज गेले असाही त्याचा अर्थ नाही. इंग्रज गेले ते आझाद हिंद सेनेच्या बंडाळीमुळे. -गा.पै.

In reply to by अनुप ढेरे

अगदी बरोबर. आझाद हिंद सेनेवरून प्रेरणा घेऊन नौदलाने केलेलं बंड होतं ते. इंग्रज सरकारतर्फे लढणाऱ्या भारतीय सैनिकांना जपानने युद्धकैदी बनवलं. अशांपासून आझाद हिंद सेना निर्माण करण्यात आली. त्यामुळे तिच्यात सामील झालेल्या भारतीय सैनिकांना बंडखोर समजलं गेलं. -गा.पै.

In reply to by श्रीगुरुजी

https://www.ndtv.com/delhi-news/after-karnataka-row-over-tipu-sultan-no… Referring to the BJP, Mr Goel said "I want to tell them that the Constitution of India also carries a picture of Tipu Sultan on page 144. So, either the people who fought the British to free the country and wrote this Constitution were 'gaddaar' (traitors) or they (BJP) are the ones".

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकार लोकशाही पध्दतीने कारभार करत आहे का असा प्रश्न उभा केला आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/raghuram-rajan-opens… चला मंडळी, पुरोगामी बुबुडाविपुमाधविंनो करा रघुराम राजन यांच्या नावाचा जयघोष सुरू. राजन काय म्हणालेत ते बघू: १. 'नोकरशाहीला बाजूला सारून एक छोटासा कंपू सरकारचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेत आहे. नोकरशाहीमध्ये एक प्रकारची भीती आहे': म्हणजे नोकरशाहीने महत्वाचे निर्णय घेणे ही लोकशाहीची व्याख्या आहे का राजन यांच्या मते? मजाच म्हणायची. २. मोदी सरकारचा कारभार खरोखरच लोकशाहीला अनुरूप आहे का? : हे होते रिझर्व्ह बँक गव्हर्नर. म्हणजे कितीही महत्वाचे पद असले तरी अर्थकारणाशी संबंधित एक गोष्ट ते बघत होते. त्यावरून पूर्ण मोदी सरकारचा कारभार कसा आहे आणि तो लोकशाहीला अनुरूप आहे का याविषयी टिप्पणी करण्याइतकी माहिती कशी मिळाली कोणास ठाऊक. राजनना टिका करायचा अधिकार आहे. पण त्यांचे शिक्षण, त्यांनी क्षेत्राला दिलेले योगदान आणि त्यांनी भूषविलेले पद लक्षात घेता त्यांनी केलेल्या टिकेला काहीतरी आधार असायला हवा आणि तो त्यांनी स्पष्ट करायला हवा. नाहीतर टारासारखे लोक गुडघ्यातली टिका करतात त्यात आणि राजननी केलेली टिका यात फरक काय राहिला? ३. देशात पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प रखडले आहेत. सरकारनं त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं: याविषयी दुमत नसावे. पण राजननी काही आकडेवारी प्रसिध्द केली आहे का की पूर्वी अडकलेले प्रकल्प किती, आता अडकलेले प्रकल्प किती वगैरे? आसामात सिल्चरची रेल्वेलाईन, दिल्ली-मेरठ रस्त्याचे सहापदरीकरण वगैरे प्रकल्प वेगाने पूर्ण केले त्याविषयी काय? दुसरे म्हणजे राजननीच गव्हर्नर असताना बँकांना एन.पी.ए चे खरे आकडे जाहिर करायला भाग पाडले हे त्यांनी चांगलेच केले. पण त्यानंतर बँका प्रकल्पांसाठी पैसे कर्जाऊ द्यायला हात आखडता घ्यायला लागल्या. त्या हल्लीच त्यात पुढाकार घ्यायला लागल्या आहेत अशा बातम्या आहेत. या प्रक्रीयेला नक्की किती वेळ लागतो? आता वेळ लागला आहे/लागत आहे तो अवाजवी जास्त आहे का अशा प्रकारचे भाष्य करायला नको का त्यांच्यासारख्या शिकल्यासवरलेल्या माणसाने? ४. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांना किंमत दिली जात नाही. एकीकडे म्हणायचे सरकार लोकशाही पध्दतीने काम करत नाही आणि दुसरीकडे म्हणायचे अधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयांना किंमत नाही. अधिकार्‍यांनी काहीही निर्णय घेतला तरी लोकशाही पध्दतीत त्यावर फायनल से सरकारचाच असतो याविषयी त्यांचे काय म्हणणे आहे? ५. आपल्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवले जाईल की काय, अशी भीती त्यांच्यात (अधिकार्‍यांमध्ये) आहे याला चोराच्या मनात चांदणे असे का म्हणू नये? ६. आपण एका छोट्या कंपूच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा गाडा हाकत आहोत का? 2.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था चालवण्याची क्षमता आपल्यात आहे का,' याचाही विचार व्हायला हवा,' असं राजन म्हणाले. त्याच धर्तीवर चिदंबरमपुत्राच्या सिंगापूरमधील संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती द्यायला यांनी कित्येक महिने का लावले याचाही विचार व्हायला हवा.

In reply to by गामा पैलवान

संविधानाची मूळ प्रत चित्रांनी भरलेली आहे. अनेक चित्र आहेत. टिपू आहे का नाही हे नाही महिती पण कृष्ण, अर्जुन, राम वगैरे आहेत.कृष्ण-अर्जुन डायरेक्टिव प्रिंसिपल्सच्या पानावर आहेत बहुधा.

In reply to by अनुप ढेरे

इथे पूर्ण मूळ हस्तलिखित घटना पेज बाय पेज वाचता / पाहता येईल. नेमक्या चित्रांचीही खात्री करुन घेता येईल. Scanned कॉपीही हवी असल्यास डाऊनलोड करता येईल. https://www.wdl.org/en/item/2672/

In reply to by गवि

गवि, माझी दृष्टी तितकीशी तीक्ष्ण नाही. त्यामुळे चित्रं दिसली नाहीत. त्याबद्दल क्षमस्व. आता यातनं टिपू सुलतान शोधावा लागेल. शिवाय तो टिपूच आहे असं स्पष्टपणे प्रतीत व्हायला हवं. तसं जरी स्पष्ट झालं तरी टिपूचा संविधानाशी नक्की सबंध काय यावर देखील प्रकाश पडायला हवा. माझ्या मते असा काही अधिकृत संबंध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

तसं जरी स्पष्ट झालं तरी टिपूचा संविधानाशी नक्की सबंध काय यावर देखील प्रकाश पडायला हवा. माझ्या मते असा काही अधिकृत संबंध नाही.
+१ सहमत. वर उल्लेख आलेल्या १४४ क्र. पानावर तरी टिपू अथवा कोणतेच चित्र दिसत नाहीये. शिवाय कोणत्याही चित्राचा एकूण घटनेशी / किंवा त्या त्या पृष्ठावरच्या मजकुराशी थेट संबंध आहे किंवा कसे हेही माहीत नाही. कदाचित ही चित्रं अशीच सुशोभीकरण म्हणून वापरलेली असू शकतील.

In reply to by कपिलमुनी

ओके. Scan करणाऱ्या टीमने / व्यक्तीने पाठपोठ पाने इन्क्लुडिंग कोरी मागची साइडही scan केलेली दिसते. त्यामुळे पेज नंबर त्या रीडरनुसार न पाहता थेट पानाच्या फूटरमधे पहायला हवेत असं दिसतं.

प्रजासत्ताक दिनानिमित्त समारंभासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांना आमंत्रित पाहुण्यांच्या पहिल्या रांगेऐवजी चौथ्या रांगेत स्थान देण्यात आले आहे. मोदी सरकारने हेतुपुरस्सर जाहीर पाणउतारा करण्याचे ठरवूनही राहुल यांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे ठरवले आहे. सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात त्यांना तिन्ही वर्षे पहिल्या रांगेत स्थान दिले होते. मात्र त्यांच्याकडून गेल्या महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेणाऱ्या राहुल यांना डिवचण्यासाठी मुद्दाम चौथ्या रांगेत बसवले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी सत्ताधारी पक्षासोबत विरोधी पक्षाच्या नेत्यालाही पहिल्या रांगेत बसवण्याची आजवरची परंपरा आहे. मोदी सरकारचे हे खालच्या पातळीचे आणि संकुचित मानसिकतेचे राजकारण असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. मात्र, पहिल्या रांगेत स्थान नाकारून चौथ्या रांगेत बसविण्याच्या मोदी सरकारच्या खेळीला उत्तर देण्यासाठी राहुल यांनीही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. कुठे बसवले जाणार हे महत्त्वाचे नसून प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाचा सोहळा हा देशाचा उत्सव असून, मोदी सरकारच्या दुर्भावनेनंतरही राहुल या समारंभाचे साक्षीदार होतील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

In reply to by manguu@mail.com

मोदी आणि अमित शाह , रंगमंचाचा असतो तसा प्ल्यान उघडून बसले आहेत. तिकीट मागणार तेच्या वकुबा नुसार शिटांवर फुल्या ओढत आहेत , तेवढ्यात बारीवर राहुल जी आले. मोदिनी पहिले आणि अमित वर वराडले " बशिव त्येला मागे ३र्या लैनीत , लय फुढे फुडे करतोय " अमित ने त्याची पण भडास काढली आणि त्याने राहुल च्या तिकिटावर ५ आकडा लिवला. राहुल ने पुढच्या रांगेत बसावा असा मोदिकडे गळा काढला. अत्यंत करुण कटाक्ष टाकून मोदी म्हणाले " त्याला राजधर्मानुसार आरक्षण हाय" आपला आरक्षणाचा मुद्दा ह्या दोन चोरांनी चोरला असा कांगावा मग राहुलने मिसळ खाता खाता केला. प्रत्यक्ष प्रजासत्ताक दिनी राहुल राहुल ला तिकीट सापडले नाही. गुलाम नबी कडे एक एक्स्ट्रा तिकीट होते ६ व्या लैनितले. राहुलजी तेथे बसले. मिडियाला हे काय बी ठावे नाय - किती मसाला होता ? सगळा वाया घालवला !

In reply to by आनन्दा

सोनियांबद्दल कुणी विचारले ? राहूलजींबद्दल विचारले. https://blogs.timesofindia.indiatimes.com/sanjeev-singh-blog/why-sixth-… Whatever the excuse, it is a sad reflection on such celebrated events being politicised, especially in light of the fact that previous regimes always ensured that the top leader of the principal opposition party were always given their due.

In reply to by manguu@mail.com

>>> the top leader of the principal opposition party were always given their due. Pappu as well was given his due.

In reply to by manguu@mail.com

राहुल ला जागा ना देणं ही कदाचित चूक असेल, पण त्यासाठी अमित शहा ला मध्ये आणण्याची गरज नव्हती. तुम्ही अमित शहा मध्ये आणलं, मी सोनिया गांधी.. मूळ मुद्दा हा आहे की या वेळेस अतिथी वाढल्यामुळे हा बदल झाला आहे का हे मी शोधतोय.. आणि तसेही मान हा कमवायचा असतो, हट्ट करून कोणी मान देत नाही.. सोनिया गांधींना डावलायची कोणाची हिम्मत होती का?

In reply to by आनन्दा

हा सरकारचा कार्यक्रम असतो. सरकार या शब्दात विजयी पक्ष आणि विरोधी पक्ष यांचा समावेश होतो. विरोधी पक्ष नेत्याचा तरी किमान समावेश असतोच. पण 'शहा' ह्यांचा समावेश होऊ शकत नाही. तरी त्याना जागा मिळाली , पण विरोधी पक्षाच्या अध्यक्षाला / नेत्याला नाही, ही बाब संपूर्ण देशालाच 'आमच्या बाजूचे असाल तरच पुढे, अन्यथा मागे ' असा संदेश देणारी आहे.

In reply to by manguu@mail.com

२०१३ मध्ये गडकरी व २०१४ मध्ये राजनाथ सिंह यांना तर आमंत्रणच दिले नव्हते. त्या तुलनेत, कोणताही पाचपोच नसलेल्या व अत्यंत पोरकट असलेल्या पप्पूला ६ वी रांग देऊन त्याचा वाजवीपेक्शा जास्त सन्मान केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी काही कारण नसताना भाजपा राहुलला सहानुभूती मिळवण्याची संधी देत आहे असे माझे मत आहे. अर्थात त्यामागे काही गणिते असतीलच, पण माझ्यासारख्या मध्यममार्गी माणसाला हे फारसे पचण्यासारखे नाही. किंवा दुसरी बाजू देखील असू शकेल, की काँग्रेस कांगावा करतेय, पण त्यातली तथ्ये लोकांसमोर आणली गेली पाहिजेत.

In reply to by manguu@mail.com

सत्ताधार्यांचा उन्मत्तपणा. काय झाला हो यात ? राहुल गांधी हे केवळ एक खासदार आहेत. ते विरोधी पक्षाचे नेते या घटनात्मक पदावर नाहीत( हे पद रिक्त आहे) याचा आपल्याला विसर पडला का? केवळ इतर काँग्रेसी राहुल गांधींची लाळ घोटण्यासाठी राळ उडवीत आहेत त्यात तुम्ही पण सहभागि होताय का?

In reply to by सुबोध खरे

दुवा लोकसभेत तांत्रिक कारण काढून पद रिकामा ठेवले आणि दिल्ली मध्ये केवळ 3 आमदार असताना आपने पद दिले. आपचा मोठेपणा !!

In reply to by कपिलमुनी

आपचा मोठेपणा लाभाच्या पदामध्ये आणि राज्यसभा उमेदवारीमध्ये दिसला आहेच, तेव्हा तो मान्य करावयास हरकत नसावी..

In reply to by आनन्दा

भाजपचे इनमिन ३ आमदार असूनही बहुमताच्या जोरावर त्यांचे सदस्यत्व स्थगित करून त्यांना अधिवेशनात बंदी घालणे, भाषण करून न देता सभागृहातून मार्शलकरवी बाहेर उचलून नेणे इ. गूंडगिरीच्या प्रकारातून आआपचा मोठेपणा दिसला आहे.

In reply to by कपिलमुनी

"३ आमदार असून विरोधी पक्षनेतेपद दिले का नाही? " एवढाच मुद्दा आहे . जे भाजपाने केन्द्रात दिले नाहोये . आपला इतर शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या ! पण या मुद्द्यावर बोला