शनिवारवाडा कट्टा - २७ जानेवारी दुपारी ४ वाजता

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in जनातलं, मनातलं
23 Jan 2018 - 11:45 am

यापूर्वी २२ जून २०१४ रोजी मी प्रथमच मिपा कट्ट्याला उपस्थित राहिलो. त्या कट्ट्याच्या गोड आठवणी अजूनही ताज्या आहेत.
त्या कट्ट्याचा धागा अन वृत्तांत.

पुन्हा एकदा तसाच धमाल कट्टा अनुभवण्यासाठी नव्या कट्ट्याचा बेत आखला आहे.

भेटीचे स्थळ: शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरचे प्रांगण
तारीख व वेळ: शनिवार २७ जानेवारी, दुपारी ४ वाजता

अधिकाधिक मिपाकरांनी, मिपावाचकांनी या कट्ट्याला आवर्जून यावे ही विनंती.


गेल्या कट्ट्याच्या वेळी काढलेला हा फोटो.

२७ जानेवारीच्या कट्टयाबद्दल काही प्रश्न असल्यास प्रतिक्रियेद्वारे विचारावे ही विनंती.

मौजमजासद्भावना

प्रतिक्रिया

गॅरी ट्रुमन's picture

23 Jan 2018 - 11:55 am | गॅरी ट्रुमन

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. नेहमीप्रमाणे कट्ट्याला येऊ शकणार नाही. वृत्तांत आणि फोटोची वाट बघत आहे.

बिटाकाका's picture

23 Jan 2018 - 11:56 am | बिटाकाका

यायची खूप इच्छा आहे पण लॉन्ग वीकेंडला पुण्याबाहेर असल्यामुळे कट्टा चुकणार :(.

मुक्त विहारि's picture

23 Jan 2018 - 11:57 am | मुक्त विहारि

कट्याला शुभेच्छा...

लॉंग वीकेंडमधला बरोबर मधला दिवस धरल्यास अशा कट्टयाला कितपत उपस्थिती लाभेल याबद्दल शंका येते. भारतीय जनताही वीकेंड लाइफबाबत जागृत होतेय श्रीरंगअण्णा. ;-)

कपिलमुनी's picture

23 Jan 2018 - 12:31 pm | कपिलमुनी

कट्टयाला शुभेच्छा

कट्ट्याला आणि श्रीरंगपंतांना लै लै शुभेच्छा.
व्रुत्तांताच्या फोटोत चि. उमा दिसावी हि अपेक्षा. ;)

प्रचेतस's picture

23 Jan 2018 - 12:52 pm | प्रचेतस

शनिवारी ऑफिसला सुट्टी नसल्याने संध्याकाळी ६ नंतरच जमू शकेल.

टवाळ कार्टा's picture

23 Jan 2018 - 3:57 pm | टवाळ कार्टा

शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक :D

आम्ही इथे मुंबैत पाट्या टाकणे सुरु केल्याने पुण्यनगरीतल्या कट्ट्याला येणे शक्य होणार नाहीये.. तस्मात आय माय स्वारी बरं का..

शनिवारवाड्यातील शनिवारच्या कट्ट्याला मॉप शुभेच्छा !
लैच्च महत्वाच्या कामात असल्याने येऊ शकणार नाही, इच्छा असूनही !

ज्योति अळवणी's picture

23 Jan 2018 - 6:24 pm | ज्योति अळवणी

श्रीरंगजी,

कट्टा पुढील शनिवारी करता येईल का? अनेक मिपाकर येऊ शकत नाहीयेत 27 तारखेला. मी मुंबईमध्ये असते. या शनिवारी नाही जमणार. पण पुढील शनिवारी ठरवलत तर नक्की प्रयत्न करेन.

टर्मीनेटर's picture

24 Jan 2018 - 12:57 pm | टर्मीनेटर

सहमत...३१ तारखे पर्यंत केरळ दौरा असल्यामुळे मनापासून यायची इच्छा असूनही २७ तारखेला उपस्थित राहणे शक्य नाही...तारीख पुढची असेल तर नक्की येणार...

नाखु's picture

24 Jan 2018 - 7:25 am | नाखु

शनिवार न कर्त्याचा वार असल्याने येणे लै अवघड आहे

पंताना भेटायची प्रबळ इच्छा असलेला नाखु

चौथा कोनाडा's picture

25 Jan 2018 - 10:23 am | चौथा कोनाडा

शनिवार न कर्त्याचा वार .....

लै भारी कारण !

:-)))

मी यायचा प्रयत्न करणार अहे या वेळेस.. कृपया फोन नं व्यनि करावा ही विनंती.

समीरसूर's picture

24 Jan 2018 - 1:33 pm | समीरसूर

श्रीरंग साहेब,

२७ जानेवारीला मी पूर्ण दिवस एका समारंभात ढेपेवाडा येथे असणार आहे; त्यामुळे या कट्ट्यास इच्छा असूनही येता येणार नाही. कट्ट्याला अनेक शुभेच्छा! वेळ मिळाल्यास घरी या; बर्‍याच वर्षांत भेट नाही. कट्टा पुढे ढकलला गेल्यास येण्याचा अवश्य प्रयत्न करीन.

समीर

पुण्यातले सकाळी ९-३ कट्टे रेल्वेमुळे जमु शकतात. संध्याकाळी आल्यास रात्री पावणे बाराची यात्रा स्पेशल पंढरपुर गाडीतून परत यावे लागते.

मी नक्की येणार. कृपया दिनांक बदलू नये ही विनंती ☺

पगला गजोधर's picture

24 Jan 2018 - 2:07 pm | पगला गजोधर

वहिवटीप्रमाणे या पुणे कट्ट्याचा, धागा क्र २ व क्र ३, कधी काढणार आहात ?

पद्मावति's picture

24 Jan 2018 - 2:15 pm | पद्मावति

अरे वाह, मस्तच. शुभेच्छा आणि सचित्र वृत्तांताच्या प्रतीक्षेत.

संध्याकाळी सहा नंतर प्रयत्न करु शकेन तोवर असाल तर तसं सांगून ठेवा.

श्रीरंग आणि जुइ पुण्यात स्वागत. कट्ट्याची तारीख नक्की आहे का तिसरा धागा निघालाय? !!

मुक्त विहारि's picture

25 Jan 2018 - 4:40 am | मुक्त विहारि

अद्याप तरी नाही.

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2018 - 2:07 pm | टवाळ कार्टा

चि. उमाला विसरलात???

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jan 2018 - 8:07 pm | अत्रुप्त आत्मा

येणार!

सतिश गावडे's picture

24 Jan 2018 - 9:57 pm | सतिश गावडे

मोठा सप्ताहांत असल्याने शक्य होणार नाही. :)

शित्रेउमेश's picture

25 Jan 2018 - 9:21 am | शित्रेउमेश

मी यायचा प्रयत्न करणार अहे या वेळेस..

श्रीरंग_जोशी's picture

26 Jan 2018 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी

प्रतिक्रियांसाठी अन शुभेच्छांसाठी सर्वांचा अत्यंत आभारी आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू करण्याच्या २ दिवस आधी हा धागा टाकला. त्यामुळे प्रतिक्रियांवर उत्तरं देता आली नाहीत. आजच पहाटे मुंबईत पोचलो अन सकाळी पुण्यात पोचलो आहे.

नेहमीप्रमाणेच अत्यंत मर्यादित रजा आहेत तसेच फार थोड्या दिवसांत बरेच काही साध्य करायचे आहे. याच कारणाने कट्ट्याची तारीख अधिक मंडळींच्या सोयीची निवडणे शक्य होत नाहीये. यासाठी आपला क्षमाप्रार्थी आहे.

उद्या दुपारी ४ वाजता मी व जुइ चि. उमासह शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वारासमोरील प्रांगणात पोहोचू. साडेसहापर्यंत थांबण्याची योजना आहे. कन्येने कंटाळा न केल्यास थोडे अधिक थांबू शकू.

साडेतीन वर्षांपूर्वीच्या कट्ट्याला भेटलेल्या मिपास्नेह्यांच्या पुनर्भेटीसाठी अन अनेक इतर मिपास्नेह्यांच्या प्रथम भेटीसाठी उत्सुक आहोत. गेल्या खेपेप्रमाणे काही मिपावाचकही कट्ट्याला उपस्थित राहून दुधात साखर घालतील अशी आशा आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2018 - 4:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग, किती वाजता पोचत आहात ?

कुमार१'s picture

27 Jan 2018 - 8:57 am | कुमार१

धन्यवाद, नक्क्की भेटूयात

शेखरमोघे's picture

27 Jan 2018 - 9:49 am | शेखरमोघे

कट्ट्याला हार्दिक शुभेच्छा. पुण्याबाहेर असल्याने कट्ट्याला येऊ शकणार नाही. सविस्तर वृत्तान्त कळेलच.

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2018 - 10:09 am | चौथा कोनाडा

या कट्ट्यात आमची संघटना सहभागी होऊ शकत नाही, वेळे अभावी.

तथापी कट्ट्यास आमच्या संघटने तर्फे भरभरून शुभेच्छा !

- मिपा उर्वरित कट्टा करणी सेना

झाला का कट्टा सुरु?

प्रदीप@१२३'s picture

27 Jan 2018 - 5:40 pm | प्रदीप@१२३

येणार.....यायचा प्रयत्न.

कपिलमुनी's picture

27 Jan 2018 - 6:09 pm | कपिलमुनी

??

कानडाऊ योगेशु's picture

27 Jan 2018 - 7:05 pm | कानडाऊ योगेशु

प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;)

कट्ट्यासाठी शुभेच्छा!

कानडाऊ योगेशु's picture

27 Jan 2018 - 7:05 pm | कानडाऊ योगेशु

प्रकाश आंबेडकरांनाही बोलवा. ;)

कट्ट्यासाठी शुभेच्छा!

श्रीरंग_जोशी's picture

27 Jan 2018 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी

सर्वप्रथम मी कट्ट्याला उपस्थित असणार्‍यांची मी स्वतः खूप उशिरा पोचल्याबद्दल माफी मागतो. बहुधा मी ४:५० वाजता पोचलो.

डॉ. सुहास म्हात्रे, कुमार१ व अभिजीत अवलिया यांना कट्ट्यात सामील झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

थोडक्यात क्षणचित्रे -
मी चि. उमा व माझ्या आईबरोबर कट्ट्याच्या स्थळी पोचलो तेव्हा डॉ. म्हात्रे व कुमार१ तिथे बर्‍याच वेळापासून उपस्थित होते असे दिसले. मी भेटताच उशिर झाल्याबदल त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढच्या मिनिटालाच जुइ तिच्या वडिलांबरोबर कट्टास्थळी पोचली.

त्यानंतर आम्ही थोडा वेळ ओळख करणे व जुजबी गप्पा करण्यात घालवला अन अभिजीत अवलिया यांचे आगमन झाले.

क्रमशः ....

माझा हा पहिलाच मिपा कट्टा. त्यामुळे आभासी जगातील काहीजणांना तरी प्रत्यक्षात पाहण्याची जाम उत्सुकता होती.
४.१० ला पोचलो. नजर सैरभैर. अद्याप कोणालाच पाहिलेले नाही, मग ओळखायचे तरी कसे?
वाड्याच्या दाराशी एकजण उभे होते. त्यांच्याकडे पाहून कसेनुसे हसलो आणि भीतभित विचारले,"तुम्ही जोशी का?"
पण निराशाच पदरी कारण त्यांनी फक्त नकारदर्शक मान हलवली.
मग थोडी उंचावरील जागी उभे असलेल्यांवरून नजर फिरवू लागलो. मग एक 'सभ्य गृहस्थ' नजरेत भरले. का कोण जाणे पण एकदम आतून वाटले की हा 'आपला माणूस' आहे. मग हळूच जवळ गेलो अन त्यांचेकडे बोट दाखवत 'मिसळ पाव?' असे विचारले.
आता मात्र नेम बसलेला होता! मंडळी, हे गृहस्थ म्हणचेच आपले आदरणीय आणि मित्रवत डॉ. सुहास म्हात्रे !
तर अशा या आनंददायी भेटीने शनिवारचा शनिवारवाडा कट्टा चालू झाला होता..….
(क्रमशः)

चौथा कोनाडा's picture

27 Jan 2018 - 8:30 pm | चौथा कोनाडा

छान !
पुभाप्र.

कट्ट्याआडून आपलं मानूस ची झाइरात केली, कौतुक वाटलं !
:-)))

कुमार१'s picture

27 Jan 2018 - 9:34 pm | कुमार१

पुढे चालू...
आता मात्र एकदम जिवात जीव आला. आता दोन ऐवजी चार डोळे अन्य मिपाकरांची वाट पाहू लागले. दरम्यान आमचा ओळख कार्यक्रम सुरू झाला. आता हे ‘डॉ’ गृहस्थ म्हणजे माझ्यासारखेच वैद्यकीय डॉ. की पीएचडी धारक हे अद्याप कळायचे होते.

मग जेव्हा कळले की आम्ही दोघेही पुण्याच्याच बी.जे. मेडिकल चे माजी विद्यार्थी आहोत तेव्हा झालेला आनंद काय सांगू ! मग ती ‘तुमची बॅच, आमची बॅच, कोणते हॉस्पिटल-युनिट, अजून कोणकोण वर्गातले...... असे मस्त स्मरणरंजन झाले.

दरम्यान एकीकडे वाड्यावरील लोकांची झुंबड वाढत चाललेली. अहो, जोडून सुट्या आल्यावर होणारच ना. त्यात सेल्फीवाल्यांचा धुमाकूळ.
मी जरी पुणेकर असलो तरी आज जवळजवळ वीस वर्षांनी वाड्यात शिरणार होतो. तसे एकदा शालेय जीवनात तिथल्या एक-दोन सहली झाल्यावर पुढे तिथे मुद्दामहून आत कशाला कोण जाईल?

...आणि मग आम्हा दोघांच्या गप्पा रंगात येत असतानाच श्रीरंगचे ‘सकुसप’ आगमन जाहले......
(आता फुडचे एक दोन प्रतिसाद अन्य कट्टेकरींचे येउद्यात की राव....)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2018 - 10:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

श्रीरंग जोशी आणि कुमार१ यांनी कट्टावर्णन दिले आहेच, त्यात मी काही प्रकाशचित्रांची भर टाकतो...


बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते ;)


मिपाकर आणि श्रीरंग जोशी यांच्याबरोबर आलेले ज्येष्ठ कट्टेकरी


लाईट अँड साऊंड शोसाठी बनवलेल्या प्रेक्षकसज्जातल्या खुर्च्यांत बसून गप्पा मारताना शनिवारवाड्याच्या परिसराचे घेतलेले एक चित्र

गवि's picture

27 Jan 2018 - 10:32 pm | गवि

कारने गोल फेरी मारली शनिवारवाड्याला. फारच कंजेस्टेड ठिकाण.

फक्त एक जलद भेट घेऊन निघायची इच्छा होती पण पार्किंग सोडाच, थांबवणंही शक्य झालं नाही. मैलोगणती दूर पार्किंग करुन फॅमिलीला तंगदतोड़ करत आणणं कठीण होऊन बसलं.

त्यामुळे नाइलाजाने शनिवारवाड्याला दुरूनच रामराम करावा लागला.

उत्स्फूर्त कट्टयांच्या जागा केवळ "मध्यवर्ती" न ठेवता किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती.

पुढील कट्टयांना शुभेच्छा.

.....किंचित पार्किंग फ्रेंडली ठेवाव्यात अशी विनंती.

------

आमच्या डोंबोलीला कधी येताय?

बस सिर्फ लोकल काही हय....

बस सिर्फ लोकल काही हय....

का ब्वॉ? स्वतःचं सोईचं वाहन घेऊन येणाऱ्या बाह्य मनुष्यांना डोम्बोलीत प्रवेश बंद? ;-)

अहो दोनतीनदा येऊन गेलोय तिथे स्ववाहनाने. जिथे वाहनतळ आहे आणि बसणं, खानपान, गप्पा अशा सोयी एकत्र मिळतील अशा जागा उपलब्ध असल्याचं आठवतं पण नावं आठवत नाहीत. अर्थात लोकलनेच येणें ही पूर्वअट असेल डोम्बोलीची तर मग अन्यत्र भेटूच. ;-)

... डोम्बोलीत प्रवेश बंद?"

असे नाही. पण केवळ गाडी ठेवायला जागा मिळाली नाही, म्हणून काम होवू शकले नाही, ही अडचण डोंबिवलीला तरी येवू शकत नाही. कारण लोकलचा पर्याय आहे.

ओह, तशा अर्थाने.. ओक्के.

मग ठरवा आता.. :-)

मुक्त विहारि's picture

28 Jan 2018 - 12:16 pm | मुक्त विहारि

ठरवू लवकरच.

लोणावळा एमटिडिसी ( ते खरंतर मळवलीला आहे) इथे दहापैकी नऊ गोष्टी आहेत.
- पुणे ,मुंबईस मध्यवर्ती.
- पार्कींग भरपूर
- रिझॅाट एन्ट्री फी नाही
- हॅाटेलात जागा भरपूर
-मोठा ग्रुप असल्यास बाजुचा डाइनिंग हॅाल
- फिरत फिरत गप्पा मारता येतात दोनचार गटांना
- स्त्रिया ,मुले आल्यास त्यांनाही चालेल
- रेल्वेनेही येता येते
*( विमानतळ दूर आहे)
*(कँटिनचा कान्ट्रॅक्टर बदलला की थोडा फरक पडतो मेन्यवर इतकंच)

मुक्त विहारि's picture

29 Jan 2018 - 11:43 am | मुक्त विहारि

आणि बाहेरून खाद्य पदार्थ आणले तर चालतात का?

मुंबईकडून रेल्वे रिटन तिकिट रु१२०,

२)बाहेरून खाद्य पदार्थ आणले तर ते कोणत्याच उपहारगृहात खाल्लेले चालत नाहीत परंतू इथे चहा कॅाफी, नाश्ता करून नंतर नदीवर जाऊन तिथे आणलेले डबे खाता येतील. शिवाय भरपूर झाडे असलेले आवार आणि बाकडी आहेत बसायला.
३) मळवली स्टेशनकडून चालत वीस मिनिटे लागतात. रेल्वे फाटकाकडून ओटो असतातच पण त्या मोठ्या रसत्याने फिरून जातात.
४) पुण्याकडचे लोणावळा लोकलने / कारने येऊ शकतात.

चौकटराजा's picture

29 Jan 2018 - 8:52 pm | चौकटराजा

असा मध्यवर्ती कट्टा झाला तर मी येणार ... म्हणजे येणारच !

अर्थात,

कट्याला किती मिपाकर आले हा मूद्दा फारच गौण.

कधी-कधी मी एका मिपाकराबरोबर पण कट्टा केला आहे.

माझा पहिला कट्टा दुबईत कुंदनशेख बरोबरच झाला होता आणि आम्ही दोघेच रात्रभर कट्टा साजरा करत होतो.

असो,

वृत्तांताच्या अपेक्षेत आम्ही सगळेच आहोत.

कुमार१'s picture

28 Jan 2018 - 3:12 pm | कुमार१

.

....आता आम्ही वाड्यात शिरणार तेवढयात अभिजित अवलिया दाखल झाले. अशा प्रकारे आम्ही ५ मिपाकर आणि २ वाचक असे सप्तक पूर्ण झाले होते. 'हम पांच' म्हणजे डॉ. सुहास, श्रीरंग, जुई, अभिजित अ आणि मी . आणि हो! लहानग्या उमाला आम्ही 'भावी मिपाकर'च समजून घेतले. ☺

मग वाड्यात रांगेने प्रवेश, फेरफटका, इतिहासाची उजळणी, काही मिपाकरांच्या आठवणी आणि हास्यविनोद करत दोन तास आनंदात गेले.
आता तेथील शिरस्त्याप्रमाणे बाहेर पडण्यासाठी च्या सूचक शिट्ट्या वाजू लागल्या. मग आमचे निरोपाचे हस्तांदोलन झाले आणि उत्साहित मनाने आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.

अरे वा! मस्त झाला की कट्टा.

अभिजीत अवलिया's picture

28 Jan 2018 - 6:48 pm | अभिजीत अवलिया

सर्वाना भेटून आनंद झाला. मी श्रीरंग ह्यांना ४:२० पर्यंत येतो असे सांगून ठेवले होते. आजकाल डिमेन्शिया झाल्यासारखी माझी अवस्था असल्याने मी शनिवारवाड्याच्या जवळ पोचल्यावर आत जायचे गेटच विसरलो आणि चुकून पुढे निघून गेलो. ह्या भागात सगळे वन वे असल्याने गावाला वळसा घालून परत गेट पर्यंत येण्यात १० मिनिटे गेली. अतृप्त आत्मा येतो येतो असे सांगून पण ६:१५ झाले तरी अवतरले नाहीत. वास्तविक आत्म्याला कुठेही एका क्षणात पोचता आले पाहिजे. पण असो. मजा आली.

"अ.आंचे" दर्शन घ्यायला घरात एखादा सत्यनारायण ठेवायचा.

कट्ट्या परी कट्टा पण होईल.

स्वगत : ह्या सत्यनारायण कट्ट्याला मात्र जावेच लागेल.प्रसादाचा शिरा खाऊन खूप काळ लोटला.

भूतकथा लेखक स्पांडुरंग न आल्याने आत्माही अतृप्तच.

ह्यावेळी कट्ट्याला येणे काही अपरिहार्य कारणांमुळे जमले नाही.
कट्टा मात्र छान झालेला दिसतोय.

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2018 - 10:37 am | चौथा कोनाडा

छान सह-वृतांत !

बघा, बघा, मिपाकट्टा होतोय म्हटल्यावर शनिवारवाड्यावर किती अफाट जनसागर उसळलेला होता ते

:-)

इथला ध्वनी-प्रकाशाचा खेळ पाच-सात वर्षांपुर्वी पाहिला होता. आवडला होता. आता बरा चाललाय का?

फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?

मुक्त विहारि's picture

29 Jan 2018 - 11:42 am | मुक्त विहारि

बहूदा त्यांनीच फोटो काढलेले दिसत आहेत.

मिपाकरांना सेल्फीचे वेड नाही, हे पण एक निरिक्षण...

कुमार१'s picture

29 Jan 2018 - 11:58 am | कुमार१

या वेळेस माझी एकाही मिपाकराची ओळख नव्हती त्यामुळे कट्टास्थळी पोचल्यावर जी अडचण जाणवली त्यातून मी कट्टा संयोजनासाठी काही सूचना करत आहे:
१. ज्यांनी ‘नक्की येणार’ असे प्रतिसादात कळवले असते त्यांना संयोजकाने व्य नि तून आपला मोबाइल क्र कळवावा. म्हणजे प्रथम येणाऱ्यास खूप फायदा होतो. नाहीतर कोणास विचारायचे असा पेच पडतो. हे पसंत नसल्यास…
२. संयोजकाने वेळेआधी 5 मि येऊन हातात ठळक दिसेल असे ‘मिपाकट्टा’ चे पत्रक ठेवावे. किंवा…
३. भेटीचे ठिकाण मोकळ्या सार्वजनिक जागेऐवजी रेस्तराँ ठेवावे म्हणजे काउंटर वर तशी सूचना देता येते.
इतरांची मते / अनुभव जरूर लिहा

कुमार१'s picture

29 Jan 2018 - 12:01 pm | कुमार१

फोटोमध्ये डॉ. सुहास दिसत नाहीयत का?>> होय, हा फोटो त्यांनी काढला आहे.
दुसरा फोटो श्रीरंग यांनी काढला आहे त्यात डॉ आहेत. तो येथे प्र करावा ही विनंती

जुइ's picture

30 Jan 2018 - 4:39 am | जुइ

कट्ट्याला शुभेच्छा देणार्‍या व कट्ट्यामध्ये सामिल होणार्‍या सर्व मिपाकरांना धन्यवाद.

माझ्या फोनने काढलेले कट्टेकर्‍यांचे फोटोज.

चामुंडराय's picture

30 Jan 2018 - 5:05 am | चामुंडराय

.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jan 2018 - 7:01 am | श्रीरंग_जोशी

उजवीकडून डावीकडे -
कुमार१, अभिजीत अवलिया, माझे सासरे, डॉ. सुहास म्हात्रे, मी (श्रीरंग_जोशी कडेवर कन्येला घेऊन), माझी आई.

धन्यवाद श्रीरंग_जोशी.

तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच.
कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.

धन्यवाद श्रीरंग_जोशी.

तुमची आणि डॉ. सुहास म्हात्रे यांची फोटो-ओळख होतीच.
कुमार१ आणि अभिजीत अवलिया यांची देखील फोटो-ओळख झाली.

मिपाकर द्वि-चक्री, त्री-चक्री आणि चार-चक्री रथ दौडत कट्टास्थानी पोहोचले तर !
ज्या शनिवार वाड्यात "ध चा मा" ची कारस्थानं झाली त्या शनिवार वाड्यात एका मिपाकरास "कार-स्थान" मिळाले नाही हे वाचून मौज वाटली.

या पुढे शनिवार वाड्यात कट्टा केल्यास "कार-पागा" ची सोया करावी लागेल असे दिसते.

खादाडीचे फोटो नसल्याने जळजळ कमी झाली हे नमूद करतो.