मागील भाग
ये शिंच्या कार्टा.. मला मारायचा प्लान केला हायस काय रे - पिडाआ रागाने माझ्या कडे धावून येत म्हणाले.
मी काय केलं ओ - मी घाबरुन म्हणालो
लेका, हे फळ तुला कुठं मिळाल - एक पिवळंस बोरासारखं फळ माझ्या डोळ्यासमोर नाचवत पिडा ओरडले.
अरे, हे तुम्हाला कसं मिळालं, हे तर दुस-याच उपयोगासाठी आणलं होतं - असं म्हणून मी पटकन ते फळ त्याच्या हातातून काढून घेतलं.
कसलं आहे रे ते फळ - नाना पाठीमागून हळूच म्हणाला.
अबे, ते तेच फळ आहे जे बाहुबली मध्ये - मी डोळा मारत म्हणालो.
समजलं समजलं, पण ह्याचं करणार काय तू - नाना डोळे मिचकावत म्हणाला.
देख ते रह ना, साला कोन आपल्याशी लफडा करेल त्याच्या ताटात हेच - मी सातमजली हास्य करत म्हणालो.
अबे, खुळा झाला कारं तु बाल्या - ब्रिटिश मागून माझ्या अंगावर येत म्हणाला.
अरे भावड्या, तुला नाय देणार काळजी नं गं करु - मी हसत म्हणालो.
**
च्या** ह्या कार्टाच्या, मला वाटलंच हुतं हो काय तरी लफडा करणार - देशपांडे काका तुंबाकु चोळत म्हणाले.
बट यु नो, आय थिंक.. त्याचा प्लान चांगलाच आहे -टिंग्या आकाशाकडे पाहत दार्शनिक अंदाजात म्हणाला.
ते फळं चारायचा? - असं म्हणत प्रभु पण त्यांच्या चर्चे मध्ये सामील झाले.
फळ - देशपांडे काका व टिंग्या दोघे दचकले.
कुठे आहेत फळे.. आम्हाला मिळालीच नाहीत अजून - टिंग्या व देश-काका दोघे म्हणाले.
जा, त्या कार्ट्याकडे आहेत बघा - असे म्हनून प्रभु परत समाधिस्त झाले.
**
सर्वांनी मिळुन जर आपण प्रयत्न केले तर आपण काही तासात झोपड्या उभ्या करु शकतो- सामंत काका आपला चष्मा संभाळत म्हणाले.
बरोबरं आहे तुमचं - एक सुरात दोनच-चार जणच म्हणाले.
जेव्हा मी प्राध्यापक **** ह्याच्या बरोबर चर्चा करत होतो तेव्हा..... - सामंत काका पुन्हा म्हणाले.
सुंदर, एकदम मनाला हात घातलात काका, +१ - असे दोनचार जण म्हणाले हे पहाताच तात्या नीं डोळे वटारले.
**
तात्यांनी डोळे वटारलेले बघता तो कंपु गायब झाला.
तुम्ही मला सांगता का, मीच त्या निलकांत ला सांगून झोपड्यापण डिझाइन करुन घेतो - तात्या हसत म्हणाले.
तात्या, ते कोण आहेत हो.. डबल बॅरल दुनाळी घेऊन फिरत आहेत, शिकारी आहेत का - सामंत काका निरागसपणे म्हणाले.
ते व्ह्यं.. अहो ते आपले बिरुटे साहेब, ओ बिरुटे सर या इकडं - देशपांडे काकांनी महत्वपुर्ण माहीती पुरवली व त्यांना बोलवले.
काय राव, तुमची बंदुक इकड पण का - हॅ हॅ हॅ हसत देशपांडे काका म्हणाले.
अहो हि नॉन डिटॅचेबल आहे, एकदम फिक्स - हा हा हा सात मजली हास्य करत बिरुटे साहेब म्हणाले.
णमस्कार डिलीट साहेब, स्वारी स्वारी बरं का.. चुकलं बिरुटे सर - टार्या केकाटला मागूनच.
एक बटन दबाया, तेरा प्रतिसाद खल्लास. समजलास का टार्या, नाद नाय करायाचा त्यांचा - डॉन्या आपली गंजलेली देशी पिस्तुल दाखवत म्हणाला.
अरे गप्प बसा रे, माझी समाधी लागत नाही आहे कधी पासून - एक डोळा उघडत प्रभु म्हणाले.
सगळे तिथून पसार झाले, हो उगाच काय तरी क्रिप्टिक टाकलं प्रभु ने तर डोक्याचे राहीलेली केसं पण उडायची.
**
अय्या, मिंटे तुझ्या ड्रेसचा रंग एकदम ह्या वातावरणाशी मॅच होतो आहे नै - नयनी ने डोळे मिचकावत मिंटीला विचारले.
अगं, मी तर मुद्दाम घेतला हा ड्रेस, अमितेच क्रिडिट कार्ड पडले होते माझ्याकडे तो विसरला होता - हिहिहि हसत मिंटी म्हणाली.
तरीच मी म्हणत होतो, हिशोब का लागत नाही आहे माझा, आन बँग बघू करत एकदा बॅलन्सशीट चेक करतो - अमित डोकं खाजवत म्हणाला.
आदितीताई अवखळकर पाटीलांचा विजय असो विजय असो - डोन्या चिरक्या आवाजात वरडला, पण कुणाचीच साथ लाभली नाही हे पाहून यमीने आपली बँग+ दुर्बीन+ काही पुस्तकांचा संच + लिनिक्सवाला लॅपोटॉपो+ इतर सामान (अंदाजे २ टन) डॉन्याकडे फेकले. पण भार न पेलवल्यामुळे डॉन्या चारीमुंड्याचीत. लगेच मी, नाना, टार्या त्याच्या मदतीला गेलो तेव्हा कुठे तो उभा राहीला.
ह ल क ट - डॉन्या स्पष्टपणे काहीतरी असेच पुटपुटला. पण अदिती आपली जिमची पावती सापडते का ती शोधत होती त्यामुळे तीच्या ते लक्ष्यात आलं नाही, त्यामुळे डॉन्या वाचला, महाजालावर लिहणे व समोरसमोर बोलणे ह्यातला फरक त्याला कळाला नसावा.
अरे बस येवढंच सामान - डॉन्या हसत म्हणाला, व आपले कपडे झाडू लागला.
दुखः पण कसे हसावे हे ह्याच्या कडे शिकावे - खिखिखि हसत..धम्याने डॉन्याच्या पाठीत रप्पाटा मारला व कुणाला तरी मारलाच आज ह्या आनंदात शिटी वाजवत पुढे निघाला.
ये दा, ये राज दा - मागुन स्पृहा आली.
तु पण आली का ? - मी डोक्याला अट्या घालत म्हणालो.
कारे मंद , तुला नाही आवडले मी आलेली, - स्पृहा हसत म्हणाली.
मंद म्हणालीस, माझ्या समोरच म्हण, त्या नयनी व मिंटे समोर नको, माझे आई - मी जवळ जवळ साष्टांग नमस्कार घालत म्हणालो.
समोर बुट्टी भर फळे, थंडगार नदीचे पाणी व दहा-बारा बायका... गप्पाचा फड रंगला, अगं ती पाककृती मध्ये मिठच कमी पडले, पण मी काय म्हणते संस्कृती नावाची काही चीज आहे की नाही, चित्रपट म्हणजे माझा जिव की प्राण, तीचे नखरे पाहीले का ?, अय्या सोन्याची चेन, अगं बाई माझे मॅचिंग संन्डेल राहिले वाटतं, अगं तु कुठला सेंट वापरतेस, मी केलेले जेवन त्यांना आवडतच नाही, आमचे हे म्हणजे अगदी हेच आहेत.... इत्यादी इत्यादी - वरुन देव म्हणाला असेल आज कळाले मंदी का आली ती आमच्या भारतवर्षामधे ;)
**
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं, जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. - विजुभाऊ काही तरी पुटपुटु लागले.
समोरच नदी आहे, व त्याच्या जवळच पर्वत जा तिकडे - कुचकट पणे कोणी तरि बोललं पण विजुभाऊ हिरवळ, नदी व पर्वतामध्ये गुंग होते, त्यामुळे काही रिएक्सन आली नाही.
मी काय म्हणतो, आपण सर्व जण मिळून एक पार्थना म्हणून या - टिग्या म्हणाला.
कश्याला उगाच देवांना ह्या हिमालयातून पण पळून लावायचं रे बाबा राहु दे, आपण अंताक्षरी खेळू या. - विजुभाऊ म्हणाले.
पहिले अक्षर मी देतो, हे घे.. इजाजत चाहता हुं, तुम्हारे पास आने की.. तमाचा खाता हूं.. - असे काही तरी म्हणाले विजुभाऊ.
आलोच आलो, ये डॉन्या आलो - असे म्हणुन टिंग्या पसार झाला.
**
नाना, टिंग्या, धम्या, डॉन्या, अन्या व बाकीची मंडळी चला जंगलात चला - मी जरा जोराताच बोलवलं सगळ्यांना.
जंगलात का म्हनून मी नाय येणार - डॉन्या जंगलाकडे बघ म्हणाला.
ये, माझ्या नावातच बैल आहे पण मी लै हुशार, मी येतो चल. - अन्या लगेच तयार होत म्हणाला.
चल, चल. - नाना, टिंग्या व धम्या म्हणाले व डॉन्याला पकडून चालू लागले.
पण काय करायला चाललो आहोत आपण - डॉन्या परत हळू आवाजात म्हणाला.
अरे लेका अजून दिवस आहे, रात्री झोपण्याची सोय नको करायला, चार लाकडं गोळा करु मस्त पैकी फायर कँम्प करु- नाना म्हणाला.
**
तुम्ही लोकं येथे फिरायला नाही आला आहात, सर्व लाभ व लोभ सोडून तुम्ही आला आहात - सहज "तेच" पुस्तक संभाळत म्हणाले.
बरोबर सहज राव, आता कसं बोललात बघा - मागून कोणी तरी म्हणाले.
अरे पण तो शिंच्या कार्ट कुठ आहे, त्याला मारावं वाटत आहे खुप - पिडाआ मुठी आवळत म्हणाले.
का हो, त्याला का मारणार तुम्ही - समाधीतून उठत प्रभु म्हणाले.
नाही ओ, त्याला हे हिमालय सोडून.. खाली मध्य भारतात कुठे नाही जागा मिळाली आश्रमासाठी.- पिडाआ म्हणाले.
मध्य भारतात म्हणजे खजोराहो जवळ कां - हॅ हॅ हॅ.. नाना डोळा मारत हसत म्हणाला.
कुणाला कश्याची काळजी नाही आहे, आपल्या भगिनी / मैत्रीणी बरोबर आहेत, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे सोडून कसल्या मिटिंगा घेत बसला आहात, मला शरम वाटते तुमची - वरुन आकाशवाणी व्हावी असा अवाज आला व सगळे पटापटा पळाले, खाण्यापीण्याचे सामान शोधण्यासाठी.
**
क्रमश : - लै दिवसाने क्रमशः हा शब्द लिवला लै भारी वाटलं बघा...
**
टिप : हे सर्व फक्त विनोदी अंगाने आहे, वर उल्लेख केलेली नावं फक्त नावं आहेत त्या व्यक्ती नाहीत, महाजालावरील त्यांचे लेखन व प्रतिसाद ह्यातील भाषा बघून मी अंदाज केला आहे, काही मला आदरणिय आहेत, काही माझ्या पेक्षा मोठे आहेत त्यांचा अनादर करण्याची माझी काहीही मनिषा नाही आहे, जे लहान आहेत माझ्या पेक्षा त्यांनी उंकाचू केले तर बघा... आवाज नाय पाहीजे.. काय ;) , हा फक्त व फक्त विनोद आहे कुणाची भावना दुखवण्याचा ह्यात काही ही उद्देश नाही आहे, ज्यांना असं वाटतं की ह्यात माझं नाव नसावे त्यांनी मला खरडावे अथवा व्यनी करावे, मिपा प्रशासनाला ह्यात काही वागवे वाटले तर कृपया योग्य ति सुचना द्यावी. अजून काही आपेक्ष असेल तर व्यनी अथवा खरडा मला. कुणाला काहीच अडचण नसेल तर मग पुढील भाग पटापटा टाकेन व सलग टाकेन ही मी माझ्या विझत असलेल्या शिगरेटाची शपथ घेऊन सांगतो =)) .
वाचने
7913
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
लय भारी हो
लै भारी ..
In reply to लय भारी हो by ३_१४ विक्षिप्त अदिती
माझा पार्ट?
>>माझा
In reply to माझा पार्ट? by शेखर
हम्म... लेका
पुढे पुढे
In reply to हम्म... लेका by अवलिया
लै
हा हा हा .. .
राजे
In reply to हा हा हा .. . by सुक्या
चंद्रावर
In reply to राजे by टारझन
राजे मी पण
In reply to हा हा हा .. . by सुक्या
तु बी
In reply to राजे मी पण by घाशीराम कोतवाल १.२
अई ग्ग राजे..............
निषेध
नाही यार..
In reply to निषेध by परिकथेतील राजकुमार
का रे
दिसतील
In reply to का रे by अवलिया
देशपांडे
त्यामुळे
माझा
जरा ओळख
In reply to माझा by विनायक प्रभू
मास्तर ...
In reply to माझा by विनायक प्रभू
स्टॉकीष्ट
In reply to मास्तर ... by टारझन
चालू द्या
चालू दे !!!
कचा माल
In reply to चालू दे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अय्या,
In reply to कचा माल by दशानन
कु़जकट बोलण
In reply to अय्या, by मृगनयनी
अग्गाआईए
In reply to अय्या, by मृगनयनी
:)
हो
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
सग'ळ्यांना
In reply to हो by दशानन
मस्त..
मला पण घ्या ना
चांगले
हे हे हे !!
In reply to चांगले by देवदत्त