(खुरपणी)
पेरणा
खुरपणी
संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास
लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ ||
इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ
प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ ||
पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा,
चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ ||
एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले
श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ ||
प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ ||
असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी केले
हेटाळणीचे रतिब आता, सहन होईना झाले ||६ ||
अपमानांकीत
पैजारबुवा,
लेखनविषय:
याद्या
10069
प्रतिक्रिया
15
काव्यरस
मिसळपाव
लावणी खुरपणी नंतर आगामी कापणी
कविता आवडली. विग्दद म्हंजे
गलतीसे मिस्टेक हो गया...
In reply to कविता आवडली. विग्दद म्हंजे by एस
यांच्या
मा माहीतगार यांच्या कडून
In reply to यांच्या by नाखु
नाही नाही आम्ही असे पातक कसे करु?
In reply to यांच्या by नाखु
हा हा हा !!!! भारी लिहीलय
झाली मनाची खुरपणी , राग गेला
झाली मनाची खुरपणी , राग गेला
भारी ! =)) =))
तुमच्या शेतीसाठी बियाणे
सगाशेट
In reply to तुमच्या शेतीसाठी बियाणे by सतिश गावडे
वाह!!
सुपर्ब !! पैजारबुवा रॉक्स !!
=))