(खुरपणी)

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
29 Dec 2017 - 5:12 pm

पेरणा

खुरपणी

संयम संपला संतापाने, फुलला माझा श्वास
लागलात जर मागे माझ्या, घेइन मिपा संन्यास ||१ ||

इक्षुदंडी कविता लिहिता, धावत येती टवाळ
प्रतिसादांच्या उतरंडीने, मन होते किती घायाळ ||२ ||

पान खाऊन येती दाजीबा पिंकाच्या टाकीत चुळा,
चार शब्दही कौतुकाचे लिहीले न माझ्या भाळा ||३ ||

एकएक प्रतिसाद वाचून माझे अंगअंग शहारले
श्वास होतो विग्दद, हे माझे विश्वची न उरले |||४ ||

प्रतिसादांनी तुमच्या राया स्वत्व माझे हरवले
कॅलेंडरी कविता करता माझे भान हरपले ||५ ||

असेल तुमची प्रीती म्हणूनी, कितीदा दुर्लक्ष मी केले
हेटाळणीचे रतिब आता, सहन होईना झाले ||६ ||

अपमानांकीत
पैजारबुवा,

काणकोणकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालकथाउखाणेइंदुरीमटणाच्या पाककृतीऔषधोपचारकृष्णमुर्ती

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

29 Dec 2017 - 5:47 pm | पगला गजोधर

लावणी खुरपणी नंतर आगामी कापणी मळणी पण येऊ देत ....

कविता आवडली. विग्दद म्हंजे काय? आमचेकडे टंकनिका नसली तरी किरकोळ टंकनचुका दुरुस्तीचे काम आनंदाने करून दिले जाईल. (करायचे आहे काय?)

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Dec 2017 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

ते अ‍ॅचकुली "विदगद" असे लिहायचे होते, पण गलतीसे मिस्टेक हो गया, आणि नजरेतन सुटला. तुम्हाला जमत असेल तर पलिज दुरुस्त करा.

हा विदगद पहिल्यांदा भेटला तो ज्ञानेश्वर माउलिंच्या "परिमळु विदगदु रे भ्रमरा" मधे. नंतर बर्‍याच वेळा तो कुठे कुठे सापडत गेला.

बरेच दिवस तो मनात घोळत राहिला आणि शेवटी इकडे तो वापरायची संधी मिळाली.

पण नजरचुक झाली.

पैजारबुवा,

नाखु's picture

29 Dec 2017 - 8:55 pm | नाखु

निंदणी, खुरपणी मुळे तण माजत नाही हे खरे असले तरी बाल्यावस्थेत असलेल्या कोमल कविमनास किती यातनामय वेदना होत असतील याची कल्पना पैजारबुवांना नसावी याचं आम्हाला आश्चर्य वाटले असं मिपाकरांना वाटत असेलही पण ते सहज स्वाभाविक आहे हे मी विनम्रपणे नमूद करतो आहे​

मा माहीतगार यांच्या कडून प्रेरणा घेऊन फक्त ४१ शब्दात वाक्य लिहीण्याचा प्रयत्न करणारा नाखु बागकामवाला

माहितगार's picture

29 Dec 2017 - 10:37 pm | माहितगार

मा माहीतगार यांच्या कडून प्रेरणा घेऊन फक्त ४१ शब्दात वाक्य लिहीण्याचा प्रयत्न करणारा नाखु बागकामवाला

:)) __/\__ पण क्रेडीट ओव्हर टू लो. टिळक, शालेय वयात आम्ही कळून दोन सवयी शालेय धड्यांमधील टिळकांकडून घेतल्या (पण इतर नाही(; ताटात वाढलेल्या पदार्थाबद्दल सहसा तक्रार करावयाची नाही , आणि दुसरे हि लांब पल्ल्यांची आता कालबाह्या झालेली सवय. असो. आठवणीने आमच्या मानस गुरुंची विद्या आपणास अवगत झाल्या बद्दल आपला लो. टिळक गौरव पुरस्कार देऊन गौरव करत आहे. :)

बाकी पैजार बुवांना खुरपणी आणि शेतकी कामांसाठी आमच्या शुभेच्छा.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Dec 2017 - 10:16 am | ज्ञानोबाचे पैजार

आपण आमच्यावर वृथा संशय घेत आहात

ती कोमल कलिका खुडण्याचा आमचा कोणताही मानस नव्हता आणि नाहीये हे मी अतिशय नम्रपणे सांगु इच्छितो.

आपले बालक सुदृढ़ असावे अशी इच्छा बाळगणारे पालक आपल्या बालकाला पोलिओची लस टोचतातच. लस टोचल्यावर बालकाला वेदना होणार, त्याला ताप येणार हे त्यांना ठाउक असते. पण त्यावेळी ते मन घट्ट करतात.

आमची काहीशी अवस्था ही कविता लिहीताना झालेली होती.

पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

30 Dec 2017 - 12:31 pm | दुर्गविहारी

हा हा हा !!!! भारी लिहीलय. कविवर्यांना आत्ताच व्य.नि. करुन आलोय. बाकी एक्झिट गाजवली त्यांनी.

सिरुसेरि's picture

30 Dec 2017 - 2:39 pm | सिरुसेरि

झाली मनाची खुरपणी , राग गेला उतरणी / ( स्वपण गेले उतरणी )
होउ देत हल्ले हजार , थांबला तो ऐरणी

सिरुसेरि's picture

30 Dec 2017 - 2:40 pm | सिरुसेरि

झाली मनाची खुरपणी , राग गेला उतरणी / ( स्वपण गेले उतरणी )
होउ देत हल्ले हजार , अचल असे या रणी

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Dec 2017 - 10:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी ! =)) =))

बाकी, "खुरपणी"ची सुरवात "पेरणा" पेक्षा "पेरणी" अशी जास्त शोभली असती :) ;)

सतिश गावडे's picture

31 Dec 2017 - 8:05 am | सतिश गावडे

तुमच्या शेतीसाठी बियाणे पुरवणारे बियाण्यांचे दुकानदार आता बियाणे विकणार नाहीत म्हणणे.

नाखु's picture

31 Dec 2017 - 9:57 am | नाखु

जर संबोधलं त्यांना अनंतयात्रींने!
तर पुन्हा व्यवसाय त्यांचा खात्रीनं!!

आशावादी नाखु

सूड's picture

2 Jan 2018 - 3:27 pm | सूड

वाह!!

शार्दुल_हातोळकर's picture

14 Jan 2018 - 6:04 pm | शार्दुल_हातोळकर

सुपर्ब !! पैजारबुवा रॉक्स !!

पैसा's picture

14 Jan 2018 - 9:23 pm | पैसा

=))