Skip to main content

(उगिच भेटली घाटावर ती)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 05/03/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर ओळख सारी धुवून गेली बर्‍याच दिवसांनंतर फेस धवल तोंडाला आला धुके दाटले डोळीं लालकेशरी चार शलाका फुलून आल्या गाली चपलेचाही प्रसाद आला शिवीआरतीनंतर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर पेकाटाची मोडुन हाडे हाती घेतला हात (वळ्णावरती अवघड इतक्या सहज घातली लाथ) धडपडलो अन् धूम ठोकली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या मागे धाउन आली बुक्क्यांची मग उधळ्ण झाली कुठेकुठे ति भयंकर उगिच भेटली घाटावर ती बर्‍याच दिवसांनंतर प्रेरणा: पुष्कराज यांना सहज वाटेवर भेटलेली कविता

वाचने 1417
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

एकदम जोरात दिसता... :-) - नाटक्या

मस्त :) --अवलिया