वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल द्रविड - The wolf who lived for the pack
प्रिय राहुल,
४५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! वन ब्रिक अॅट अ टाईम मध्ये तुझ्या कारकीर्दीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला होता... आज जरा पुढे जाऊन मन मोकळं करावं म्हणतो.
एकतर तू क्रिकेट खेळत नाहियेस हेच पटत नाही बघ. बॅटिंग करताना तू ४५ वर पोहोचेपर्यंत समोरच्या गोलंदाजांनी हत्यारं म्यान केलेली असायची. सिनेमातल्या डॉक्टरनं "अब इनको दवा की नहीं दुवा की जरूरत है" सांगितल्यावर नातेवाईकांचे होतात तसे चेहरे करून "फक्त प्रयत्न करणं आपल्या हातात आहे" असा कर्मयोगी विचार करून बिचारे गोलंदाजी करत राहायचे. कारण ४५ धावांवर पोचलेला राहुल द्रविड म्हणजे दगडावरच्या शेवाळ्यापेक्षा चिकट. मग बोलर्ससाठी फक्त वाट पाहाणे... की कधीतरी हा माणूस चुकेल आणि बाद होईल.
शोएब अख्तरला तू बाद करायला सर्वांत अवघड फलंदाज वाटायचास.
ब्रायन लारा एकदा म्हणाला होता "माझा जीव वाचवण्यासाठी कोणाला बॅटिंग करावी लागली तर मी राहुल द्रविडला निवडीन."
साक्षात मॅथ्यु हेडन म्हणला "हे आजुबाजुला जे थोतांड चालतं त्याला अॅग्रेशन म्हणत नाहीत. तुम्हाला आक्रमकता बघायची आहे? राहुल द्रविडच्या डोळ्यांत बघा!"
सिद्धू म्हणाला "राहुल द्रविड टीमसाठी काचांच्या तुकड्यांवरूनसुद्धा चालत जाईल"
क्रिकेटच्या देवाच्या नशीबी सुद्धा "असं" कौतुक आलं नसेल. Your are in the league of your own."द वॉल", "मिस्टर डिपेण्डेबल" वगैरे अभिधानं तुला चिकटली ती उगाच नाही.
तसं तुझ्या फलंदाजीत काही आकर्षक नव्हतं रे! लारा, मार्क वॉ, संगकारा सारखे अफलातून कलाकार तुझे समकालीन. तुझ्याच संघात सचिन, सौरव, सेहवाग आणि आकर्षक फलंदाजांचा बादशहा लक्ष्मण. आम्हाला "eye candy" फलंदाज भरपूर होते. पण एखाद्या स्टेजवर ऐश्वर्या, दीपिका, प्रियांका वगैरे सौंदर्यखनींच्या मेळ्यात विद्या बालनच्या डोळ्यांतली चमक उठून दिसावी तसा ह्या आक्रमक फलंदाजांच्या जमान्यातसुद्धा तुझा भक्कम बचाव उठून दिसायचा. भक्कम बचावातली आक्रमकता आम्हाला दाखवली ती राहुल द्रविडने. तुझा बचाव म्हणजे अहिंसा नव्हती. त्यात लाखोंच्या पर्शियन फौजेसमोर उभ्या ठाकलेल्या लियोनायडसची हिंमत होती. आक्रमण कितीही आकर्षक असूदे ... मजबूत बचावातली "खोली" त्याला नाही. बायको एरवी कितीही जीन्स टॉप वापरूदे... पण नवरा तिच्या प्रेमात पडतो तो तिला पाडव्याला नऊवारीत, नाकात नथ आणि निवडकच दागिन्यांत पाहूनच. क्रिकेटचं म्हणून जे काही "सौंदर्य", "नजाकत", "ठहराव" आहे ना... तो फक्त तुझ्यामुळे मित्रा! हिरव्यागार विकेटवर, ढगाळ वातावरणात, आग ओकणार्या वेगवान गोलंदाजापुढे पाय रोवून उभं राहातानाचा तुझा आत्मविश्वास, तुझा डौल, तुझा आब पाहिल्यानंतर कोणाची बिशाद तुला अनाकर्षक म्हणण्याची. क्रिकेटच्या मैदानावर बुद्धिबळाचा डाव मांडण फक्त आणि फक्त तुलाच शक्य होतं रे! खडतर परिस्थितीचा आमचा "बेंचमार्क" म्हणजे राहुल द्रविड. "राहुल द्रविडला सुद्धा खेळता नसतं आलं" अशी परिस्थिती म्हणजे अवघडपणाची शीव सोडून फलंदाज अशक्यपणाच्या हद्दीत शिरला.
आणि वर तुझी विनम्रता आणि आजकाल फार फार विरळा दिसणारा गुण म्हणजे नि:स्वार्थीपणा! टीमची गरज म्हणून राहुल ओपनिंगला आला... टीमची गरज म्हणून कर्णधार झाला... टीमची गरज म्हणून विकेटकीपर झाला आणि आता तर कोच झाला. बीसीसीआयनं जर का आजवर सर्वांत महत्त्वाचा निर्णय कोणता घेतला असेल तर तुला अंडर १९ संघाचा प्रशिक्षक नेमण्याचा. ह्या पोरांवर क्रिकेटचेच नाही तर आयुष्यभर साथ देतील असे वागण्याचे "संस्कार" करायला तुझ्यापेक्षा योग्य माणूस सापडलाच नसता.
तू आम्हाला परफेक्ट टायमिंगनी मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्ह पलिकडचं सौंदर्य दाखवलंस. षटकार खेचण्याच्या पलिकडची ताकद दाखवलीस. आणि आता आम्हाला दिसतो तो पोरांच्या सायन्स एक्झिबिशनला बाकीच्या पालकांबरोबर रांगेत शांत उभा असलेला राहुल द्रविड. अत्यंत नम्रपणे बंगलोर विद्यापीठाची डॉक्टरेट नाकारताना "मी ती एक दिवस माझ्या कष्टाने मिळवीन म्हणणारा राहुल द्रविड. केव्हिन पीटरसनला ईमेलमध्ये स्पिनर्सना खेळण्याचे नुस्के सांगणारा राहुल द्रविड. पाकिस्तानी क्रिकेटपटू महंमद हाफिजबरोबर हसतमुखाने सेल्फी काढणारा राहुल द्रविड. मृत्युशय्येवरच्या तरुणाला स्काइपवरून धीरच नाही तर प्रोत्साहन देणारा राहुल द्रविड. १९ वर्षांखालील टीमच्या पोरांना पंखांखाली घेणारा राहुल द्रविड. एक अविस्मरणीय असं Bradman Oration देणारा राहुल द्रविड. ह्याचसाठी... तुझ्या क्रिकेटसाठी आणि क्रिकेटपलिकडच्या तुझ्यासाठी.... आमच्यासाठी तू भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू आहेस!
तो आन दो राहुल द्रविड! आम्ही तुझ्याकडून शिकलो... आमची पोरंही शिकतील.
Happy birthday!

वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख आवडला....
सुंदर लेख.
हेच म्हणणार होतो. लेख आवडला.
+१
सही!
लेख छान
अप्रतीम लेख ! जुग जुग जिओ
मस्तच जमलाय लेख
मस्तच जमलाय लेख
टी-२०
तो देव नाही पण देवमाणूस आहे
लेख आवडला.
सुंदर लेख!
मस्त
माझाही आवडता खेळाडू...
आवडले!
खूप छान लेख.
माझा आवडता खेळाडू. लेखन
सुरेख लेख
एका खेळीयाने..