Skip to main content

भिमा कोरेगाव ला नक्की काय झाले आहे?

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी मंगळवार, 02/01/2018 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी काल कोरेगाव भिमा येथे झालेल्या लढाईला २०० वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्या नंतर तिथे २ गटांमध्ये दगडफेक झाली आणि काही जण म्रुत्युमुखी पडुन वातावरण तंग झाले. मग नगर रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला आणि कोरेगाव पार्क, नगर रोड,वाघोलि परिसरात कलम १४४ लावण्यात आले. दुसरी म.टा. मधील बातमी हे सांगते https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/prakash… आज हे लोण पुणे परीसर आणि मुंबई पर्यंत पोचले आहे. शिवाय प्रकाश आंबेडकर वगैरे नेत्यांनी याला दलित-सवर्ण रुप देउन उद्या महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. एकंदर प्रकार काय आहे याची कोणाला कल्पना आहे का?

वाचने 43176
प्रतिक्रिया 142

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क,
मेवानीने सरळ सरळ स्ट्रीट वॉरचे आवाहन आणि त्यानंतर झालेली दंगल तुम्हाला योग्य वाटते ....
यालाच नक्षली पद्धत म्हणतात. हे देशाविरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे. नक्षल्यांना मिळणारा ग्रामीण पाठींबा रोडावत चालल्यामुळे त्यांनी शहरी भागात दंगली माजवायला सुरू केल्या आहेत. प्रकाश आंबेडकर आणि जिग्नेश मेवाणी हे नक्षल्यांचे हस्तक आहेत. आ.न., -गा.पै.

ही एक जुनी बातमी मिळाली. Published on: July 9, 2017 2:05 am https://www.loksatta.com/mumbai-news/the-battle-of-bhima-koregaon-15080… === पुण्याजवळ कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभावर दरवर्षीप्रमाणे अभिवादनासाठी गेलेल्या समुदायावर सोमवारी झालेल्या हल्ल्याचे पडसाद सोशल मीडियावर कसे उमटले याची ही झलक http://www.bigul.co.in/bigul/1996/sec/11/koregaon%20bheema%20incident