कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?
मला वाटते शीर्षक चर्चेसाठी पुरेसे आहे. धागा लेखाच्या बाकीच्या भागाची आवश्यकता चर्चा पुढे जाईल तशी स्पष्ट होऊ शकेल सध्या त्यावर डोके लावले नाही तरीही चालण्यासारखे आहे.
* नमनाला घडाभर
ऋग्वेदातील सुविचार नावाचा माझा धागा आहे. त्यात बहुधा दोन महत्वाचे सुविचार नोंदवायचे राहून गेले असावेत. ते पुढील प्रमाणे
* एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति - ऋग्वेद 1.64.46 - meaning wise people explain the same truth in different manners.
* ऋग्वेदः १-८९-१ (व्याकरण खीस आणि संदर्भ)
** आ ! नः भद्राः क्रतवः विश्वतः यन्तु -- Let our noble thoughts spread across the universe.
** भद्राः क्रतवः नः विश्वतः आयन्तु - - Let noble thoughts come to us from all sides.
(कुणि नेमके मराठी अनुवाद उपलब्ध केल्यास स्वागतच असेल
भारतीय तत्वज्ञानातील या उदात्त दृष्टीकोणांमुळेच स्वामी विवेकानम्द कुप-मंडूक वृत्ती सोडण्याचे आवाहन करू शकत. हा धागा लेख काढण्यामागे दोन्ही उद्देश आहेत एक आपली कुपमंडूकता दूर ठेऊन कुराण-हदीथ मधून काही चांगले (आणि एकतर्फी नव्हे) घेण्यासारखे आहे का ? ते शोधणे.
दुसरे असेही कि मिपा करांना कुराण आणि हदिथ बद्दल कुठे कुठे शंका असल्या तरी , मनुस्मृतीची आणि इतर ग्रंथांची जेवढी मनमोकळी चिकित्सा करणे शक्य होते तेवढी कुराण आणि हदिथची करणे शक्य होत नाही. यात जी कारणे आहेत १) आपला त्या विषयावर आणि त्यांच्या मूळ भाषेचा अभ्यास नसतो २) एवढे करुन मेहनत घेतली तरी शिफ्टींग ऑफ गोल पोस्ट तुम्ही योग्य जागूहून योग्य संदर्भ निवडलेला नाही असे होण्याची मोठी शक्यता ३) आपल्या कडून अप्रस्तूत टिका आणि वाद टाळणे ४) आपले बरोबर असलेतरी उत्पात मुल्य अधिक अस्लेल्यां सोबत विवादात न अडकणे.
मी मिपाकर शरदसरांच्या धायावरील या प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे जेवण्याच्या ताटात खारट होणार नाही एवढे शंका आणि टिकेचे मिठ हवेच मीठ घेताना पंच महाभुतांपेक्षा काही वेळा त्या त्या सुभेदारांचे उत्पात मूल्य धास्ती देणारे असू शकते . याला दुसरा मार्ग असा कि आपल्या ताटात काय घ्यायचे याचा विचार करणे अधिक सुकर असू शकते त्या साठी वेगळा चर्चा धागा ; म्हणजे त्याच वेळी काळ्या कुट्ट ढगातही चंदेरी किनार किंबहुना काळ्या रंगातील सौंदर्य शोधण्यची सवय आपली आपल्याला लाभदायक होईल शिवाय त्यातील त्याज्य काय याचा नीर क्षीर विवेक विनासायास होऊ शकतो.
मी शब्द आणि ग्रंथ पूजक नाही बुद्धी प्रामाण्य ने कुठून काही चांगले घेता आले तर अवश्य घ्यावे.
* एक महत्वाचा मुद्दा
** धार्मिक आणि सांस्कृतीत देवाण घेवाणीतील एक मोठी अडचण धर्म आणि संस्कृती यांची गल्लत करण्याच्या अवास्तव आग्रहातून येत रहाते ती प्रयत्नपूर्वक टाळली पाहीजे तरच कुपमंडूक वृत्ती टाळता येऊ शकतात असे वाटते. या बद्दल माझ एक धागा लेख आहे मिळाला की दुवा जोडेन
* काय घेता येऊ शकेल त्याची माझ्या मते उदाहरणे, ही यादी चर्चेतील काही उदाहणे आवडल्यास वाढवत जाईन.
१) धर्मसंस्थेचे मानवी जिवनातील अनेक हस्तक्षेप उदाहरणार्थ अर्थव्यवहारातील मर्यादे बाहेरचा हस्तक्षेप स्वतःच्या कार्य परीघाच्या मर्यादा समजून न घेणारा आणि अज्ञानश्रद्धामुलक ठरु शकतो. उदाहरण म्हणून "कुटूंब/देश कितीही कर्जात गेले तरी त्यांचा शेवटचा घास, शेवटच्या खोलीचा निवारा, उत्पनाच्या स्रोताचा शेवटचा हिस्सा जसे की शेताचा शेवटचा तुकडा कधीही हिरावला जाऊ नये इतपत ऋण-व्याज व्यवहाराचा अमानवी चेहरा सौम्य करण्यासाठी लागणार्या प्रबोधना तून चांगली बाजू स्विकारणे मला आवडेल पण ऋण आणि व्याज विषयक निर्णय अर्थशास्त्र आणि व्यावसायीक प्रगल्भतेवर अवलंबून असावेत त्याचे नियंत्रण राज्यसंस्थेची जबाबदारी आहे नैतिक प्रबोधना पलिकडे धर्म संस्थेन राज्यसंस्थेत हस्तक्षेप करु नये. या बद्दल माझा धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा या धाग्यावर पुर्वी उहापोह झालेला आहे.
२) याच पद्धतीने इस्लाम मधला स्त्रीयांच्या दृष्य संवाद आणि पुरुषांसोबत मिसळण्यावरची बंधने अवाजवी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यास मारक आहेत, पण त्याच वेळी योनी शुचितेवरचा भर कमी असल्यामुळे स्त्रीच्या पुर्नविवाहाकडे अधिक मोकळेपणाने पाहीले जाते.
* माझ्या यादीत खालील येऊ शकणार नाही
१) ज्युडायिक धर्मीयांचा मुर्तीपुजेला विरोध प्रथम दर्शनी बुद्धीप्रामाण्यवादाच्या जवळ जाणारा वाटला तरी तो पूर्णतः अंधश्रद्धा विरहीत नाही आणि मुख्य म्हणजे त्यांचा आग्रह व्यक्ति आणि समुहाच्या श्रद्धा आणि अभिव्यक्ती स्वांत्र्याचा जबरदस्तीने हिरावून घेऊ इच्छितो त्यातील जबरदस्ती हि मान्य करण्यासारखी गोष्ट नाही त्यामुळे सांस्कृतिक बहुलवादाची (cultural puralism ) ची जागा सांस्कृतीक दडपशाहीने घेतली जाते.
* संदर्भा साठी काही वेचक दुवे
** कुराणच्या मराठी अनुवाद प्रतीचा दुसर्या एका लेख प्रतिसादात हारुन शेख यांनी दिलेला अर्काईव्ह डॉट कॉम वरील दुवा.
(अर्थात केवळ मराठी अनुवादावर अवलंबून न रहाता गरज पडेल तशी गूगल ची मदत घेऊन इंग्रजी अनुवाद ही तपासून घ्यावेत . तरीही परिपूर्णता असेलच असे नाही म्हणून चर्चेत सहभागी सर्वांच्या वतीने डिसक्लेमर)
* Criticism_of_the_Quran#Hindu_criticism आणि Criticism_of_Islam#Nineteenth_and_twentieth_century
कॉनराड एल्स्ट या बेल्जीअन इंडॉलॉजीस्टचेही काही विचार पटले नाही तरीही काही विचार विचार करण्यासारखे असावेलेखात
* चर्चा सहभागासाठी टिपा
* काय घेण्यासारखे आहे त्यावर फोकस ठेवा म्हण्जे टिकेचा कडवट पणा न येता त्याज्य आपोआपच वेगळे पडेल.
* चर्चेत सहभागी होताना काही दक्षता घ्या कोणत्याही आजी माजी व्यक्तीवर व्यक्तिगत टिका टाळा .
* सभ्यता पाळा.
* शक्यतो राजकीय विषय खासकरून सद्य राजकीय विषय जिथे अत्यावश्यक नाही तेथे टाळा
* शीर्षकात एकमनाने हा शब्द प्रयोग केला आहे हेही लक्षात घ्यावे त्यामुळे कुणावर काही लादणे लादून घेणे अभिप्रेत नाही.
* चूकभूल देणे घेणे
* चर्चेत सभ्यता पूर्ण आणि अभ्यासपूर्ण ससंदर्भ सहभागासाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.
वाचने
24201
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
तुमचे धागे लैच जडशीळ असतात
In reply to तुमचे धागे लैच जडशीळ असतात by प्रचेतस
मला वाटते शीर्षक चर्चेसाठी
In reply to मला वाटते शीर्षक चर्चेसाठी by माहितगार
आणी ते हदीस आहे, हदीथ नाही.
In reply to आणी ते हदीस आहे, हदीथ नाही. by अत्रुप्त आत्मा
अरबी, पर्शियन भाषेत 'स' हा
In reply to अरबी, पर्शियन भाषेत 'स' हा by प्रचेतस
सलाम?
In reply to सलाम? by माहितगार
त्याबद्दल नाही सांगता येणार
In reply to अरबी, पर्शियन भाषेत 'स' हा by प्रचेतस
थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ
In reply to थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ थ by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्तजी आत्मा, तुम्ही इतका
In reply to अत्रुप्तजी आत्मा, तुम्ही इतका by प्रचेतस
आगोबाजी प्र-चेतस,
In reply to आगोबाजी प्र-चेतस, by अत्रुप्त आत्मा
=)) =)) =))
In reply to अरबी, पर्शियन भाषेत 'स' हा by प्रचेतस
अरबी व पर्शियन
In reply to अरबी व पर्शियन by हुप्प्या
धन्यवाद. माहितीपूर्ण प्रतिसाद
In reply to तुमचे धागे लैच जडशीळ असतात by प्रचेतस
उर्वरीत भागातील काही वाक्ये
लेखा मागचा इन्टेन्ट चांगला
In reply to लेखा मागचा इन्टेन्ट चांगला by पगला गजोधर
आपण म्हटल्या प्रमाणे कदाचित
फेसबुकवर "frand" request
In reply to फेसबुकवर "frand" request by साहना
** आ ! नः भद्राः क्रतवः
In reply to फेसबुकवर "frand" request by साहना
हो असतो ना
> पण त्याच वेळी योनी
In reply to > पण त्याच वेळी योनी by साहना
इसिसने याझिदींवर केलेल्या
In reply to इसिसने याझिदींवर केलेल्या by माहितगार
कदापी नाही
In reply to कदापी नाही by दासबोध.कॊम
आजची स्त्री सक्षम असते एकटी
आपण सुसंस्कृत आहात
In reply to आपण सुसंस्कृत आहात by दासबोध.कॊम
दासबोधाची काय मते आहेत ?
In reply to दासबोधाची काय मते आहेत ? by माहितगार
ग्रंथ कसा असावा व कसा नसावा
In reply to ग्रंथ कसा असावा व कसा नसावा by दासबोध.कॊम
समास**
In reply to ग्रंथ कसा असावा व कसा नसावा by दासबोध.कॊम
आम्हास बोध झालेले समास
जिज्ञासू लोकां साठी हदीस च्या
माहीतगारजी
* काय घेण्यासारखे आहे त्यावर फोकस ठेवा म्हण्जे टिकेचा कडवट पणा न येता त्याज्य आपोआपच वेगळे पडेल.चर्चाप्रस्तावक म्हणुन तुम्ही तुमची अपेक्षा वरील ओळीत स्पष्ट मांडलेली आहे. यावरुन तुम्हाला केवळ नवनीत च अपेक्षीत आहे. म्हणजे आयसोलेट प्रोटीन पावडर जसे येते तसे काहीसे. हा विचार सकारात्मक आहे मात्र सर्वच धर्मग्रंथांचा जनरली जो सर्वात मुलभुत प्रॉब्लेम असतो तो हा की ते परस्पर विसंगत अशा अनेक विधानांनी कमांड्स नी भरलेले असतात. या मागे वर्षानुवर्ष साठत गेलेल्या आग्रहांची गरजांची मुल्या परंपरांची अडगळ असते. त्यातुनही अगदी हट्टच धरला तर नवनीत निघते पण ते इतके जनरलाइज्ड इतके डायल्युटेड असते की त्याचा कुठलाही वापर उपभोग आपण घेऊ शकत नाही. किंवा ते कालाच्या कसोटीवर टिकतही नाही. दुसरा जेव्हा तुम्ही एकांगी म्हणजे मी फक्त चांगल तेच शोधुन काढणार असा आग्रह ठेवता तेव्हा अजुन अवघड होउन बसते कारण नुसता पॉजीटीव्ह किंवा नुसता निगेटीव्ह व्ह्यु ठेवल्याने क्रिटीकल एक्झामिनेशन ला मर्यादा येतात व ऑब्जेक्टीव्ह ट्रुथ गवसणे अवघड होऊन बसते. असे मला आपले एक वाटते.In reply to माहीतगारजी by मारवा
बरीच मंडळी टिका करताना ,
कुराण आणि हदिथ मधील कोणत्या
कुराण आणि हदिथ मधील कोणत्या चांगल्या गोष्टी हिंदू आणि भारतीय संस्कृतीस एकमनाने घेता येऊ शकतील ?पण असे काही करायची गरज आहे काय? हीच गोष्ट vice-versa करायचं म्हणलं तर काय होईल?In reply to कुराण आणि हदिथ मधील कोणत्या by गणामास्तर
मी नमुद केलेले ऋग्वेद आणि
ते २% च्या वर
In reply to ते २% च्या वर by दीपक११७७
बँकींग/ ऋण-व्याज व्यवहारात ?
In reply to बँकींग/ ऋण-व्याज व्यवहारात ? by माहितगार
सगळ
In reply to ते २% च्या वर by दीपक११७७
वा, या दोन टक्केमुळे,
कुप-मंडूक वृत्ती
In reply to कुप-मंडूक वृत्ती by मामाजी
१
In reply to १ by माहितगार
Comparative religion स्टडीज
In reply to कुप-मंडूक वृत्ती by मामाजी
२
३
In reply to ३ by माहितगार
माहितगार साहेब, माफ करा पण
In reply to माहितगार साहेब, माफ करा पण by माहितगार
आणखी हे राहीलेच की
In reply to ३ by माहितगार
माहितगार साहेब,
In reply to माहितगार साहेब, by मामाजी
If you read the Koran, you
नाही घेतल्या
In reply to नाही घेतल्या by अनिरुद्ध.वैद्य
१
माहीतगारजी
अयोग्य अर्थ
In reply to अयोग्य अर्थ by शरद
ठिक आहे ना
In reply to ठिक आहे ना by माहितगार
विवेकानंद
In reply to अयोग्य अर्थ by शरद
आवर्जून वाचावे असे एक भाष्य
अवांछित परिणाम व धोके
In reply to अवांछित परिणाम व धोके by गामा पैलवान
:-)
In reply to अवांछित परिणाम व धोके by गामा पैलवान
Spot on
एक सद्विचार म्हणून ही कल्पना