एका अनावर कैफात लिहिली होती
ती कविता
नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण
थोडी खरीही वाटली
ती कविता
नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा
जास्तच खरी वाटली
ती कविता
नंतर वाटलं – इतक्या ओळी कशाला ह्या कवितेत ?
मग खोडायला गेलो दोन चार ओळी
तेव्हा
ओळीतल्या रिकाम्या जागेतून
सण्णकन फणा काढत
जिव्हारी डसली
ती कविता
काव्यरस
वाचने
5618
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरा
आवडली...
आवल्डी.... कविता नेक्स्ट डोर
शब्दजिल्ब्यां वगळीता, अर्थ
In reply to आवल्डी.... कविता नेक्स्ट डोर by पगला गजोधर
अहाहा!!!!
चपराक
अतीव सुंदर! कल्पना
मस्तच !!!
प्रतिसाद देणार्या
प्रतिभा जेव्हा अशी उसळी घेते तेव्हाच उत्स्फुर्त आणि बावनकशी काव्
अतिशय सुंदर!
वा! अस्सल बावनकशी कविता.
दुर्गविहारी,"ये रे घना"चा
किस्सा सांगतो.
In reply to दुर्गविहारी,"ये रे घना"चा by अनन्त्_यात्री
क्या बात है! भारीच किस्सा. एक
In reply to किस्सा सांगतो. by दुर्गविहारी
वा!
In reply to किस्सा सांगतो. by दुर्गविहारी
एस, प्राची अश्विनी
दुर्गविहारी, एस- पुन्हा आभार.
सुरेख.
डॉ. दिलीप,
In reply to सुरेख. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त कविता आहे.
अभिजीत अवलिया, शलभ
माफ करा परंतु ...
गबाळ्या. माफ करा परंतु