Skip to main content

अतृप्ती-एक चिरंतना

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 05/12/2013 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
अतृप्त असावे सारे मन तृप्तीतूनच पाही तृप्ती'ही असते क्षणिका अतृप्ती चिरंतना'ही मानवास जन्मी एका नीज सांगे ति ही काही मन क्षणात चाखे तिजला अन् क्षणात काही नाही सारा हा जन्म तरिही का धावे तिच्याच पाठी मरणाही भेटी येता अतृप्ती उरते गाठी ऐश्या या अतृप्ती'ला मी देतो एक सलाम मन तृप्तीचे ना वैरी अतृप्तीचे न गुलाम ==०==०==०==० ************* अत्रुप्त ************* https://lh5.googleusercontent.com/-jahNQ2N2XGE/TqQt3Ev4zAI/AAAAAAAABD4/l0WHSRpPc8c/s600/PB050640.JPG (फोटो-अं.जा.साभार.)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 9336
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

छान!

(शीर्षक वाचून तुमच्या गर्लफ्रेंड किंवा बायकोविषयी लिहिलं आहे की काय असा संशय आला होता ;) ) क्षणिका-चिरंतना हा भेद आवडला. जिंदगी तो बेवफा है एक दिन ठुकरायेगी, मौत मैहबूबा है अपने साथ लेकर जायेगी या भेदासारखा. मात्र टायटलमुळे किंचित गोंधळलो. उभा जन्म आपण अतृप्तीला संगे घेऊन तृप्तीच्या मागे लागतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यात तृप्तीविषयी लिहिलं आहे हे पटकन लक्षात आलं नाही. शेवटच्या दोन ओळींत निश्चित काय सांगायचं आहे हे थोडं अजून स्पष्ट व्हायला हवं.

In reply to by राजेश घासकडवी

@ शेवटच्या दोन ओळींत निश्चित काय सांगायचं आहे हे थोडं अजून स्पष्ट व्हायला हवं.>>> @मन तृप्तीचे ना वैरी अतृप्तीचे न गुलाम >>> आहे त्या स्थितीचा,आहे तसा स्वीकार! :)

बुवा, एक सो एक कविता ! मला वाटते तुम्ही अलिकडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून चालत गेलेत काय ? स्मायलीवाले बाबाकी जय हो ! काही असो बुवा मेंदूत प्रतिभेचा वास नक्की आहे !

In reply to by चौकटराजा

@ मला वाटते तुम्ही अलिकडे एखाद्या पिंपळाच्या झाडाखालून चालत गेलेत काय ? >>> =)) गेलो होतो खरा! त्यातल्याच एका पारंबीनी गळा गच्च अवळला आहे! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

कुठली म्हणे ही पारंबी?? बाकी पिंपळाला पारंब्या फुटलेल्या पाहून निर्वाणास गेलो आहे. =))

In reply to by प्रचेतस

@पिंपळाला पारंब्या फुटलेल्या पाहून निर्वाणास गेलो आहे>>> http://www.sherv.net/cm/emo/angry/bang-head-on-wall.gif अवघड आहे रे भगवंता! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/facepalm-smiley-emoticon.gif प्रत्येक गोष्ट तात्विक...प्रत्येक गोष्ट!

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रत्येक गोष्ट तात्विक...प्रत्येक गोष्ट!
अरे हो, खरंच की. कवीला काही कल्पनास्वातंत्र्य असू असते ते मी पामर पार विसरूनच गेलो होतो. म्हणतात ना जे न देखे रवी....ते ते देखे कवी जरी वृक्ष असो पिंपळ, तयास फुटो पारंबी =))

"सारा हा जन्म तरिही का धावे तिच्याच पाठी मरणाही भेटी येता अतृप्ती उरते गाठी" हे जबराच

अप्रतिम. अतिशय सरस कविता रचायलेत बुवा आजकाल.

आवडली .

चिरंतना.......... आहाहा ! आहा हा! क्य बात ! काय मस्त लिहिलंयत ! वाह! जबरदस्त...

आवडली

कविता आवडली! (जाता जाता: तो पणतीचा फोटो मी काढलेला आहे)

In reply to by पैसा

@तो पणतीचा फोटो मी काढलेला आहे>>> हायला! :D मी गुगलबाबाला, "पणती" असा सर्च दिल्यावर तो फोटू मला मिळालावता! पण आता http://www.sherv.net/cm/emoticons/thanks/animated-thank-you-smiley-emoticon.gif

बुवा, सगळ आहे खर असच. बरोब्बर शब्दात पकडलत.

क्या बात है !

कविता आवडली. मोजक्या शब्दांत बरेच काही सांगून जाणारी. अतृप्ती येते ती अपूर्णतेच्या अथांगतेच्या जाणिवेतून. पूर्णत्व म्हणजे ज्याने-त्याने आपापल्या परीने आपापल्या अपूर्णतेला घेतलेला छेद म्हणता येईल. तो गाठला की तृप्ती मिळाली असे त्या क्षणापुरते भासते. एकूणच तृप्ती-अतृप्तीचा लपंडाव हा चिरंतन आहे.