काल झालेल्या दत्त जयंती साठी मी लिहिलेला अभंग
||दत्त स्तुती ||
अनसूयानंदन ब्रह्मा विष्णू महेश्वर
अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ ||
तीन शिरे सहा हात रूप तुझे
हाती कमंडलू भगवी वस्त्रे साजे ||१||
अनसूया माता पतीचरणी लीन
चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२||
त्रिशूल डमरू शंख चक्र गदा हाती
मागे उभी कामधेनू श्वान पुढे वसती ||३||
भूत पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती
जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४||
श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती
पीठापूर कुवरपूर गाणगापूरी राहती ||५||
वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोटी
अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६||
औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर
दर्शन देई भक्ता अवधूत दिगंबर ||७||
त्रिगुणात्मक शक्तींचे स्थान असे तूंचि
वंदन तुजला करिता सात्विक वृत्ती साची ||८||
बहुजन्मी पुण्य केले आजि फळा आले
दत्तकृपा होऊनिया 'मी' पण हे गळले ||९||
दत्तचरणांवरती मी मस्तक ठेवतो
कृपा असू दे अवधूता वैभव मी नमितो ||१०||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3252
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभंग, भारुड, ओवी ह्यात नेमका
आउट ऑफ सिलॅबस
In reply to अभंग, भारुड, ओवी ह्यात नेमका by प्रचेतस
तुम्हास येत्या बुधवारी येणारी
In reply to आउट ऑफ सिलॅबस by दुर्गविहारी
||........
हा अभंग आहे?
..
कविता आवडली
गा पै जी
In reply to कविता आवडली by गामा पैलवान