Skip to main content

||दत्त स्तुती ||

लेखक वैभवदातार यांनी सोमवार, 04/12/2017 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल झालेल्या दत्त जयंती साठी मी लिहिलेला अभंग ||दत्त स्तुती || अनसूयानंदन ब्रह्मा विष्णू महेश्वर अवतरले भूवरी दत्त दिगंबर ||धृ || तीन शिरे सहा हात रूप तुझे हाती कमंडलू भगवी वस्त्रे साजे ||१|| अनसूया माता पतीचरणी लीन चरणजल स्पर्शिता बालके तीन ||२|| त्रिशूल डमरू शंख चक्र गदा हाती मागे उभी कामधेनू श्वान पुढे वसती ||३|| भूत पिशाच्चे तुजला पाहुनिया पळती जो ध्यातो भक्तीने हृदयी त्या वसती ||४|| श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती पीठापूर कुवरपूर गाणगापूरी राहती ||५|| वासुदेवानंद सरस्वती स्वामी समर्थ अक्कलकोटी अवतार दत्तांचे रूपे कोटी कोटी ||६|| औदुंबर वृक्षातळी वास असे निरंतर दर्शन देई भक्ता अवधूत दिगंबर ||७|| त्रिगुणात्मक शक्तींचे स्थान असे तूंचि वंदन तुजला करिता सात्विक वृत्ती साची ||८|| बहुजन्मी पुण्य केले आजि फळा आले दत्तकृपा होऊनिया 'मी' पण हे गळले ||९|| दत्तचरणांवरती मी मस्तक ठेवतो कृपा असू दे अवधूता वैभव मी नमितो ||१०||
लेखनविषय:

वाचने 3252
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

आउट ऑफ सिलॅबस प्रश्न विचारु नका हो. त्यापेक्षा कॅलेंडर पहा, म्हणजे पुढच्या कवितेचा मुहूर्त कळेल. ;-)

...... ||

छान

वैभवदातार, कविता आवडली. फक्त भुते, पिशाच्चे दूर पळतात हे दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दत्त लिंगदेहांस गती देतो. त्यामुळे भुते, पिशाच्चे आवर्जून दत्ताकडे जात असावीत असा अंदाज आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

फक्त भुते, पिशाच्चे दूर पळतात हे दुरुस्त करायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे दत्त लिंगदेहांस गती देतो.>>> ==>> हे जरा विस्कटून सांगता का ?