मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Foolपाखरा

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
पेरणा अर्थात Foolपाखरा का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? कोण? मी? तू जागी आहेस ना म्हणून, मी पण जागतोय . गिरणीच्या पट्ट्यासारखी अखंड बोलतेस कधी कधी वाटतं दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहातेस माझ्या कार्डावर आणि मग उद्या काय खरेदी करायचे? या विचाराने झोपेला तुझ्या डोळ्यात उतरायला जागाच उरत नाही . असं होतय का रे फुलपाखरा? त्रास देतो ना गॅरी असा? दूर निघून जातो आणि बच्चा गॅरीला शोधत रहाते! . एक गंमत करुया आज झोपलीस ना की गॅरीला तुझ्या स्वप्नात बोलावं स्वप्नात मग गॅरी आणि बच्चा खुप खेळतील, हसतील, धावतील राधिकाला घेऊ का बरोबर? नको, आधि आपण खुप मस्ती करु मग मस्ती केली म्हणून भांडायला येईलच ना ती? तेव्हा, आपण काहीही आर्ग्युमेंट्स करुया आम्ही दोघे भेटणारच असे सांगूया तिला कळणारच नाही कि काय करायचे ते मज्जा ना? . पण कोकरा, स्वप्नचं रे ते सकाळी ऊठलीस तर संपेल मग परत दिवसभर थोड थोड शॉपिंग करत रहाशील माझ्या कार्डावर आणि रात्री परत तु जागत राहशील, छे.. नकोच्च.. क्रेडीट कार्डाची बीलं भरताना नाकी नउ आलेत... . का जागतेस तू शोना? काय विचार करत असतेस तू? का झोप येत नाही? |नवर्‍याची बायकोप्रेमी | (२२/११/२११७) पैजारबुवा,

वाचने 5988 वाचनखूण प्रतिक्रिया 7

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

मिका तुझी कविता छानच आहे, वाचताक्षणीच आवडली होती... पण ते शोना वगेरे वाचल आणि मग हात शिवशीवायला लागले. पैजारबुवा,