परवा संध्याकाळपासून इथे बर्फवृष्टी सुरु होती काल संध्याकाळी संपली! मिसळपावावरही अशीच धमाल हास्यवृष्टी घडवून आणण्यात कमालीचा उ(हु)च्च सहभाग असलेल्या सगळ्या बिनीच्या कलावंतांना ही आरती समर्पित! ;)
जय गणेश जय गणेश जय गणेश देवा
आता पुन्हा लवकरी दे असाच मेवा ||धृ||
दे मला काव्य जरा उसने दे रे देवा
मिपाकरी डुबवतात करति तुझा हेवा ||१||
जनातली मनात 'ती', काय करु देवा?
वाचवा हो 'विप्र' मला 'खडू फळा' ठेवा ||२||
खिचडीचा भात जरा करिन म्हणे देवा
पाक वा नापाक कृती असेल तशी खावा ||३||
आवशीचा घो आता 'पुला'खालून केव्हा?
उह अन आह करी 'लिखाळा'चा पावा ||४||
दुर्बीटणे बाईंच्या हो 'पब'मधे जावा
बदकांचा क्वॉक जणु घुमतोया रावा ||५||
'तूच आहेस तो' कविता म्हणे वा वा
बोकडाला समजेना 'पिडा'चा कावा ||६||
टिंग्याचा टिंग टिंग कॉल देतो शेवा
स्टँड अप कॉमेडीचा शीन आवरावा ||७||
खारपाड्या दादूसला गुत्ता कुठे ठावा
दारुच्यारं फुग्यासंगं झोलं घेत जावा ||७||
'पोट' बरं नसल तर हवाबाण खावा
गप पडून रहा की रं अवलिया भावा ||८||
करीन तुझं गुणगान मनातल्या देवा
सादर असे 'रंग्या'ची विडंबनी सेवा ||९||
चतुरंग
वाचने
5754
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही तर एका
असेच म्हणतो
In reply to ही तर एका by ३_१४ विक्षिप्त अदिती
विडंबन
१ नंबर..
+२
In reply to १ नंबर.. by प्राजु
मस्त
जियो!
हा हा हा!
बेक्कार!!!
१+
In reply to बेक्कार!!! by बिपिन कार्यकर्ते
(लई)^infinity भारी
१
अफलातुन...
रंगा,
भा री
सुपर !!
सुपर डुपर
In reply to सुपर !! by अनिल हटेला
उच्च विडंबन
मिन्टीशी
In reply to उच्च विडंबन by मिंटी
मस्तच........एकदम एका ओव्हर मध्ये ६सिक्सच
>
सही !!
लय भारी
जबडा
अप्रतीम !
लय
महाआरतीत सामिल झालेल्या सर्व भक्तगणांचे आभार!!
सही