Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग १६

लेखक गॅरी ट्रुमन यांनी सोमवार, 13/11/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे हा नवीन धागा.

वाचने 39272
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

In reply to by मार्मिक गोडसे

नाही ना जमत उत्तर द्यायला?प्रत्येक गोष्टीत दुसऱ्यावर अवलंबून राहिल्यामुळे पैदाशीचा प्रोब्लेम झालाय . स्वत:बद्दल किती खंत बाळगाल? तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरे प्रलंबित आहेत. तुम्हाला स्वत:ला उत्तरे देता येत नाही म्हणून लगेच स्वत:च्या पैदाशीबद्दलच शंका घेता?

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या उत्तराशिवाय तुमच्या उत्तराचे बीज फलणार नाही हे तुम्ही मान्य केलं आहे. बसा वाट बघत.

In reply to by मार्मिक गोडसे

माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात व माझा उत्तरे कोणावरही अवलंबून नसतात. तुमच्याकडे मात्र नुसतेच पोकळ दावे आहेत व उत्तरापासून तुम्ही कायम पळ काढता हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालं.

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्हाला उत्तराची संधी द्यायची इच्छा आहे. नाहीतर नंतर म्हणाल तुम्हाला संधीच नाही मिळाली म्हणून.

जी गोष्ट आता होणार मग होणार याच्या वावड्या आतापर्यंत कित्येकवेळा उठल्या होत्या ती गोष्ट आता लवकरच होणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्यात राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून येतील ही गोष्ट अगदीच स्पष्ट आहे. काँग्रेस पक्षाने याविषयी पुढील वेळापत्रक जाहिर केले आहे: ४ डिसेंबरपर्यंत अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. आणि गरज पडल्यास १६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जर राहुल गांधींचा एकच अर्ज आला तर ते अध्यक्ष म्हणून ४ तारखेलाच जाहिर होतील. अन्यथा १९ डिसेंबरला मतमोजणी होईल त्यानंतर ते अध्यक्षपदी विराजमान होतील. गुजरातमध्ये मतदान ९ आणि १४ डिसेंबर रोजी आहे आणि मतमोजणी १८ डिसेंबरला आहे. जरी राहुल गांधींचा एकच अर्ज आला आणि ते बिनविरोध निवडून गेले तरी हे होईल ४ डिसेंबरला. त्यानंतर ३ दिवसात गुजरातमधील पहिल्या फेरीचा आणि ८ दिवसात दुसर्‍या फेरीचा प्रचार थंडावेल. त्यामुळे अध्यक्षांना प्रचाराला वेळ मिळाला नाही ही सबब पराभव झाल्यास द्यायला तयार असेलच. आणि विजय मिळाला तर मग तो अर्थातच राहुल गांधींच्या प्रभावामुळे असणार आहे. २००० साली अध्यक्षीय निवडणुकांमध्ये जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींविरूध्द नावापुरती निवडणुक लढवली होती त्याप्रमाणे एखादा उमेदवार नावापुरता निवडणुक लढवतो का आणि गुजरातमध्ये मतदान होईपर्यंत राहुल गांधींची पदोन्नत्ती टाळतो का हेच बघायचे.

In reply to by गॅरी ट्रुमन

सव्वाशे वर्षे इतिहास असलेल्या पक्षाला लोकमान्यटिळक सुभाष बाबू महात्मा गांधी पंडित नेहरू लाल बहादूर शास्त्री सरदार पटेल सारखे दिग्गज नेते आणि अध्यक्ष म्हणून असलेल्या पक्षालाआपल्या अध्यक्षपदी बसवण्यासाठी श्रीमती सोनिया गांधी आणि त्यानंतर श्री राहुल गांधी यांच्यापेक्षा लायक उमेदवार मिळू नये या पेक्षा दैवदुर्विलास कोणता असावा? एवढे हुशार आणि सुशिक्षित नेते असताना केवळ गांधी घराण्यात लग्न झाले किंवा जन्म झाला यापेक्षा दुसरे कर्तृत्व नसलेल्या लोकांना अध्यक्ष केले जात आहे यापेक्षा जास्त वैचारिक दिवाळखोरी दुसरी नसेल।

In reply to by सुबोध खरे

अरे किती तो द्वेष किती ती जळजळ? त्यांच्या पक्षात ते काय गोंधळ घालतायत ते त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे ना? तुमचा का इतका तीळ तीळ जीव तुटतोय? काय मजबुरी आहे डॉक्टर?

In reply to by तर्राट जोकर

जोकर बुवा द्वेष ? जळजळ?तीळ तीळ जीव तुटतोय? का उगाच हसवून हसवून मारताय? काँग्रेसची "कीव करावी" अशी परिस्थिती असताना जळजळ आणि द्वेष हा हा हा हि हि हि ह ह पु वा

In reply to by गॅरी ट्रुमन

यामुळे अध्यक्षांना प्रचाराला वेळ मिळाला नाही ही सबब पराभव झाल्यास द्यायला तयार असेलच. आणि विजय मिळाला तर मग तो अर्थातच राहुल गांधींच्या प्रभावामुळे असणार आहे. >> राहुल गांधी अध्यक्ष असो वा नसो गेल्या बहुतेक दोन महिन्यापासून गुजरातात ठाण मांडून आहेत. त्याला काय फरक पडणार मतदानाआधी चार दिवस पक्षिय निवडणूक झाली तर? काँग्रेस जिंको वा हरो, श्रेय वा दोष तर राहुल गांधीलाच येईल असा कॉमन सेन्स सांगतो. उगा आपलं ओढून ताणून विद्वत्ता (खरेतर राहूलद्वेष) दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न. बाकी ग्रामपंचायतीत विजय मिळाला तर मोदींमुळेच, हरले तर मात्र इतर शंभर कारणे, चक्क जनतेला मूर्ख संबोधण्याचे प्रकार भाजप्यांनी केले आहेत, पळसाला पाने तीनच, घरोघरी मातीच्या चुली.

In reply to by गॅरी ट्रुमन

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १६ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि त्यात राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडून येतील ही गोष्ट अगदीच स्पष्ट आहे. Good News for the BJP and the nation. Now there will be more entertainment.

In reply to by मार्मिक गोडसे

पप्पू अध्यक्श नसताना इतकी करमणूक करतो. अध्यक्श झाल्यानंतर तर २४ तास अखंड करमणूक होईल. त्याचे आपण सर्वच लाभार्थी!

In reply to by मार्मिक गोडसे

दिल्लीतल्या फुकट्या लाभार्थ्यांना हाकलून लावल्यावर पुरस्कारवापसी झाली होती. तसं काही जनतेने केलेलं नाहीये. म्हणजे जनता फुकटी नाही हे खरंय. -गा.पै.

In reply to by मार्मिक गोडसे

आंम्ही पण फुकटे नाही. केबलचे बिल भरतो, आंतरजालाचं बिल भरतो म्हणून तर पप्पूची करमणूक पहायला मिळते.

In reply to by श्रीगुरुजी

लाज वाटते का गुजरात मधील "Peeping Tom" ह्या सर्वात मोठया "फुकट्या" लाभार्थीचे नाव घ्यायला?

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मनमोहनसिंगांच्या पहिल्या टर्ममधील माहिती आणि प्रसारणमंत्री आणि संसदीय कामकाजमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीमध्ये निधन झाले आहे. ते २००८ पासून कोमामध्ये होते. 1 प्रियरंजन दासमुन्शी १९८४ आणि १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमधील कलकत्त्यामधील हावरा मतदारसंघातून तर १९९९ आणि २००४ मध्ये पश्चिम बंगालमधीलच रायगंज मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. ११ एप्रिल १९९७ रोजी देवेगौडा सरकारवरील विश्वासदर्शक ठरावात काँग्रेसकडून चर्चेची सुरवात दासमुन्शींनी केली होती आणि सीताराम केसरींनी अचानक देवेगौडा सरकारचा पाठिंबा का काढून घेतला याचे समर्थन करायचा प्रयत्न त्यांनी केला होता. प्रियरंजन दासमुन्शींना श्रध्दांजली.

फ्रान्सबरोबर मनमोहननी केलेले विमानाचे डील मोदीनी कॅन्सल केले म्हणे. मनमोहन .. ७२० कोटी ( प्रति एअरक्राफ्ट ) टेक्नोलोजी ट्रान्सफर होणार होती मध्ये एजंट नव्हता. मोदीजी ... १६०० कोटी ( प्रति एअरक्राफ्ट ) टेक्नोलोजी मिळणार नाही. अंबानीची कंपनी मध्यस्थ आहे. अच्छे दिन ( फ्रान्स के और अंबानी के ) आ गये !

सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ट्रिपल तलाकवर बंदी घालायचे विधेयक मांडायची शक्यता आहे असे https://timesofindia.indiatimes.com/india/centre-likely-to-introduce-bi… ही बातमी म्हणत आहे. तसे झाले आणि त्या विधेयकाचे भिजत घोंगडे न पडता लवकर कायद्यात रूपांतर झाले तर ते ऐतिहासिक असेल. खोट्या धर्मनिरपेक्षतेला तिलांजली द्यायचे महत्वाचे काम त्यातून सुरू होईल.

एअर इंडियात निर्गुंतवणीकरण (डिसइन्व्हेस्टमेन्ट) करायचा सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाच आहे. त्या दृष्टीने सरकारने एस.बी.आय कॅप्सला सल्लागार म्हणून नेमले आहे. http://www.livemint.com/Companies/jtVTaUhJtDwiMyzBrMqEFO/Air-India-priv… नरसिंहरावांच्या सरकारने या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरवात केली. नरसिंहरावांच्या कारिकिर्दीच्या सुरवातीपासून वाजपेयींच्या कारिकिर्दीच्या शेवटपर्यंत ओ.एन.जी.सी, इंडियन ऑईल, एन.टी.पी.सी, एच.पी.सी.एल, बी.पी.सी.एल, गेल, स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँकेसारख्या सरकारी बँका इत्यादी अनेक उद्योगांमध्ये डिसइन्वेस्टमेन्ट करण्यात आले होते. पण २००४ नंतर एक कोल इंडिया सोडले तर असे मोठे डिसइन्व्हेस्टमेन्ट करण्यात आले नव्हते. जर एअर इंडियाचे अशाप्रकारे डिसइन्व्हेस्टमेन्ट करण्यात येणार असेल तर ते चांगलेच आहे. आजही डिसइन्व्हेस्टमेन्ट केलेल्या कंपन्यांमध्ये ५०% पेक्षा जास्त शेअर सरकारचेच आहेत. त्यामुळे त्या सरकारी कंपन्याच आहेत. पण तरीही सरकारचे त्या उद्योगांमधील अस्तित्व जितक्या प्रमाणात शेअर विकले आहेत तितक्या प्रमाणावर कमी झाले आहे. भविष्यात सगळ्या उद्योगांमधून सरकार असणे हा प्रकार बंद होईल आणि समाजवादी विचारसरणीचे अवशेष पूर्ण मिटवले जातील ही अपेक्षा करू.

In reply to by गॅरी ट्रुमन

पण २००४ नंतर एक कोल इंडिया सोडले तर असे मोठे डिसइन्व्हेस्टमेन्ट करण्यात आले नव्हते.
कोल इंडियाबरोबरच एअरपोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडीयाचेही डिसइन्व्हेस्टमेन्ट करण्यात आले होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

अरे बापरे मग डावे, साम्यवादी, समाजवादी यांचा तर तिळपापड होणार. युनियनबाजी संप मोर्चे याना सुरुवात होणार आता. याचा शेवट काय होणार ते माहिती आहेच.

डायवेस्टमेंट... बापजाद्यानी बी लावले, झाड मोठे केले, त्याच्या चार फांद्या बाजारात विकणे आणि वर बापजाद्यानाच शिव्या घालणे ! भाजपा आल्याने देश सुधारला, सरकार सुधारले, मोदी आले , शिस्त आली.. असा कांगावाही करायचा आणि वर जुन्या कंपन्या विकूनही टाकायच्या ! ह्याना चालवता येत नाहीत का?

In reply to by सुबोध खरे

एकाच वेळी शिस्तबद्ध विकासप्रिय सरकार आले असा कांगावाही करायचा आणि सरकारी कंपन्यांचे दुसर्‍याना देवून टाकायचे, मला तरी यात विरोधाभास वाटतो.

In reply to by babu b

शेअर्स

In reply to by तर्राट जोकर

एक खरी विनोदी बातमी आहे, दिल्ली आंदोलनास (कि बघण्यास ) गेलेले १५०० महाराष्ट्रीय शेतकर्‍यांची रेल्वेगाडी परतीच्या वेळी चक्क तीचा मार्ग भटकून मध्यप्रदेश मध्ये पोहचली नी प्रवासी अनपेक्षीत गावात जाऊन अडकले. :) आजतक वृत्त त्यांच्या यात्रेची एक जमेची बाजू मंडळी फुकटेपणा न करता राजरोस विशेष ट्रेन बूक करून गेली. businesstoday चे वृत्त खरे असेल तर विशेष ट्रेन करण्यासाठी मंडळींनी ३९ लाख मोजले असावेत . ३९ लाख भागीले १४९४ प्रवासी म्हणजे प्रती माणसी २६०० प्रती शेतकरी फार लहान रक्कम झाली. प्रत्येकी ३०,०००च कर्ज माफ झाल तर ३००० चा खर्च मोठा नाही आणि नाही झाल तर फक्त ३००० मध्ये दिल्ली पाहून येण्याची हौस फिटली. संदर्भःबिझनेस टुडे वृत्तपत्र हा प्रतिसाद लिहिताना जसे पाहीले पण आख्खी ट्रेन बूक करण्यासाठी पैसे एकरकमी आधी भरावे लागले असणार. अशा दहा जरी ट्रेन बूक केल्या असतील तर रेल्वेचा चार एक कोटीचा किफायतशीर धंदा झाला पर्यटनही झाले. आता १५ हजार शेतकर्‍यांकडून गावोगावी जाऊन पैसे गोळा करणे अवघड गेले असेल. त्या पेक्षा आधी कुणीतरी एक रकमी पैसे मोजून नंतर शेतकर्‍या कडून पैसे वापस घेतले असतील तर अशा आसामी बड्याच म्हणावयास हव्यात. आता वाचलेल्या बातकीत आमच्या कयासात अथवा गणितात त्रुटी असेल तर चुकभूल देणेघेणे , पण गणिताचा विचार एकुण रोचक आहे ! आधिकधिक आंदोलने झाली पाहीजेत देश वासींयांना देशाच्या राजधानीचे दर्शन अत्यल्प खर्चात झालेच पाहीजे असे आमचेही मत आहे. असो. (मंडळी विनोदाने लिहिलय तेव्हा हलकेच घ्या )

In reply to by माहितगार

तुमचा प्रतिसाद म्हणजे शुद्ध खोडसाळपणा आहे, तुमच्यासाठी दोन प्रश्न १. ३० हजार रुपये इतके कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांची यादी आहे तुमच्याकडे? २. शेतकरी दिल्लीला आंदोलनाला गेले की फिरायला बघायला गेले हा भोचकपणा कशासाठी? माहितगार, तटस्थपणाचा बुरखा फाटतोय बरं का... सांभाळून. सरकारविरुद्ध होणारी प्रतेक गोष्ट तुम्हाला कटकारस्थान वाटायला लागली आहे, जणू शेतकर्‍यांना काही म्हणजे काहीच प्रश्न नाहीत आणि फुकटात दिल्लीवारी करायची म्हणून मोर्च्याचे निमित्त काढून दिल्ली फिरायला जात आहेत असं काही तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करता आहात. बेशरमपणाची हद्द आहे. वरुन विनोद करतोय म्हणून सांभाळून घ्या चा शहाजोगपणा.... सरकार इकडे शेतकर्‍यांवर गोळ्या झाडतंय आणि तुम्हाला विनोद सुचतायत का?

In reply to by तर्राट जोकर

त.जो. आपणास नेमके काय झोंबले आहे ? अपण आपले मिपावरचे सदस्य नाव काय घेतले आहे? मग कुणी जरासे हसले हसवले तर एवढे अस्वस्थ का व्हावे? भारतीय रेल्वे अनेक गंभीर प्रसंगातून गेली असेल म्हणून वेगळ्या दिशेनी झालेल्या अचानक प्रवासा बद्दल हसूही नये म्हणजे विनोदातला विनोद आहे. आंदोलनाला जाऊन आलेली समस्त मंडळी सातत्याने सुतकी चेहेरे करून बसली होती असे आपले म्हणणे आहे का ? कोणतीही गोष्ट अती झाली की हसू येते हा निसर्ग नियम नव्हे काय. कोणत्याही सरकारने अती केले की सरकारचेही हसू होते. मी अती केले तर माझे हसू होते. आपण किंवा इतर जण अती केले तर त्याचेही हसू होते किंवा कसे. माझ्याकडून अती होते तेव्हा माझे मला लक्षात येत नाही पण इतर लोक हसू शकत असतात. आता माझ्याकडून अती होते आहे हे वास्तव मी स्विकारावे की नाही - जड असते खरे. तुमच्या प्रमाणेच भावनेच्या ओघात असताना कदाचित माझी अतीरंजीत बाजू मला लक्षात येईलच असे नाही. हसणार्‍यांचा तुमच्या प्रमाणेच राग येईल पण असे राग क्षणिक असतात. उठता बसता महात्मा गांधींचे नाव घेणारी तथाकथित नेते मंडळी (कोणत्याही पक्ष संघटनांची असोत) आंदोलनांना हिंसाचार होई पर्यंत आंदोलने ताणतातच कशी काय ? वरून हिंसाचार आणि मृतांच्या बद्दलचे सांत्वन करून प्रत्यक्षात सत्तेतले काय आणि बाहेरचे काय तूप कुणाच्या पोळ्यांवर ओढले जाते ते काय गुपीत आहे की त्याचे भांडवल करून लेखकांच्या लेखन स्वातंत्र्यावर आपण गदा आणू इच्छित आहात ? खर्‍या समस्याग्रस्त शेतकर्‍यांबद्दल कामगारांबद्दल सर्वांनाच सहानूभूती असते. त्या बद्दल वेगळे सांगण्याची गरज आहे की प्रत्येकवेळी खोट्या सहानुभूती दाखवण्याची गरज आहे ? - तुम्ही व्यक्तीगत टिका केलीत म्हणून सांगतो, शेतकर्‍यांनाही समोर ठेऊन खेळते भांडवल अशा विषयावर मी स्वत लेखन केले आहे आणि ग्रामीण भागात उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षण देण्यातही सामील झालो आहे ते प्रश्नांचा काहीच अभ्यास नसताना नसावे स्वतः बद्दल अधिक बोलू नये असो- भारतात कोणत्याही सभेला गर्दी जमवणे हे एक हुकमी तंत्र झाले आहे, आणि अशा सभां जे भरवतात आणि उपस्थिती लावतात त्यांना त्याचा स्वयमेव अनुभव भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा पुन्हा आलेला असणार आहे किंवा कसे. आपण मला प्रश्न विचारत आहात, विनोदी प्रतिसादाचा उद्देश आंदोलनास हजेरी लावणार्‍यांपेक्षा ट्रेन बुकींगच्या खर्चांचे 'अर्थपूर्ण' नियोजन करणार्‍यांकडे लक्ष वेधतो हे आपल्याही लक्षात आले असणार. असो. सरकारे कुणाची आहेत याचा संबंध नाही; आम्ही मुंबई मधल्या कापड गिरणी कामगार ते बँक कर्मचारी; हे कर्मचारी ते ते कर्मचारी आंदोलने आणि त्यांचे पुढे काय झाले ते पहाताच आलो आहोत. समस्या असतात पण कोणत्याही आंदोलनांना सहानुभूती एका मर्यादेपर्यंतच मिळतात खूप ताणले तर सरकारचे सोडा उर्वरीत जनतेची सहानुभूती गमावली जाण्याची शक्यता आंदोलन कर्त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वास लक्षात येत नाही. आंदोलनात सहभागी लोक अनाहुतपणे आपापल्या पोळीवर तूप ओढणार्‍यांकडून वापरले जातात. मागच्या एखाद दोन निवडणूकांपासून शहरांचा प्रभाव वाढत असला तरीही, भारतातील ग्रामपंचायत ते संसद राजकारणावर ग्रामीणांचे आणि शेतकर्‍यांचेच स्वातंत्र्यापासून वर्चस्व राहीलेले नाही का ? सरकारे कोणत्याही पक्षाची असोत शेतकर्‍यांच्या मतांशिवाय निवडून आलेली नाहीत काय मग त्यांच्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत संसदीय मार्गाने विधानमंडळे संसदेतून चर्चा दबाव न येता आंदोलने मर्यादे बाहेर ताणण्याची गरज का भासते आहे ? की या मागे लोक नियुक्त सरकारांनी कामच करू नये अशा राजकीय भूमीकांची पेरणी आहे ? ब्रिटीश पूर्व काळात सर्व कर केवळ शेतकर्‍यांकडून घेतले जात ते अव्वाच्या सव्वा असले तरी असंख्य लढायांचे खर्च निघून राजे राजवाडे अय्याशी करू शकतील एवढा पैसा भारतीय शेतकर्‍यांकडूनच उभा केला जात असे ना ? स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामपंचायतींना दिल्या जाणार्‍या पैशा पलिकडे कोणता पैसा श्रीमंत शेतकरी देतो ? ग्रामीण भागात कारचा विक्री वाढते ऐन दुष्काळ ग्रस्थ ग्रामीण शहरात सोन्याची दुकानदारी आणि उलाढाल वाढलेली हे शहरात येऊन रोजंदारी करणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलांना कळत नाही असे वाटते का काय ? आणि दर वर्षी कर्ज माफीसाठी आंदोलने करण्यापेक्षा बँकातील पैसा अनुदान म्हणून का मागितला जात नाही म्हणजे पुन्हा पुन्हा माफ करण्याचा प्रश्नच नाही. सरकार तुम्हीच निवडून देता, कर्ज माफीच्या नोटा छापण्यासाठी रिझर्व बँक तुमचीच आहे. पण निव्वळ नोटा छापून सबसिड्या आणि कर्ज माफ्या केल्याने दुष्टचक्र कमी होते का वाढते हे कोणत्याही अर्थतज्ञाने स्पष्ट करावे. आज असंख्य शेतकर्‍यांची मुलांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. आणि शहरातील महागाईला तोंड देणारा कामगारवर्गीही शेतकर्‍यांचाच भाऊ बंध असावा. अर्थशास्त्रीय समस्या केवळ भावनांच्या आणि संकुचित राजकारणाच्या (संघटना पक्ष सरकारे कोणतेही असू देत) जोरावर सोडवता आल्या असत्या तर आंदोलनांची भाषा करण्याचीही वेळ आली नसती. भावनेच्या बळावरचे राजकारण हे तर्कशास्त्राच्या नियमात बसतेच असे नाही त्यामुळे आमच्या समजेच्या बाहेरचे आणि क्वचित चेष्टेचा विषय होते याचा अर्थ ज्यांचे हेतु साशंकीत आहेत त्यांचा निर्देश होतो आहे त्यांनी आपण टिकेचा विषय का होतो आहोत याचे आत्मपरीक्षण केल्यास कोणत्याही चळवळीती त्रुटी दूर होण्यासच मदत होईल न पेक्षा कालाय तस्माय नमः म्हणून येरे माझ्या मागल्या म्हणून रडत पुढे जाणे नशिबी शिल्लक राहू शकते. ज्याचे नशिब त्याच्या सोबत हेही खरे आहे म्हणून आमच्या सारख्या इतरांनी मनाला लावून घेण्याचेही कारण नसावे. आता तुमच्या तथाकथित प्रश्नांकडे येतो
१. ३० हजार रुपये इतके कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांची यादी आहे तुमच्याकडे?
१) मनमोहनसिंगांच्या काळात एकदा कर्ज माफ करून झाली आहेत त्यास नेमकी किती वर्षे झाली त्यानंतर त्यांच्याच काळात कर्जपद्धतच बंद करून अनुदान पद्धतच का मागून घेतली नाही. कर्ज माफ्याच हव्यात तर त्यास कर्ज का म्हणावे ? २) ३ हजराचा प्रवास खर्च करणारे शेतकरी ३० हजारापेक्षा कमी कर्ज असलेले असतील का या बाबत साशंकता वाटते. ज्यांचे कर्ज ३०,००० पेक्षा कमी असेल तो ३००० प्रवास खर्च का करेल - अंदोलनात सहभागी होणारे शेतकरी खरेच एवढे दुधखुळे असतात ? आणि ३०००० पेक्षा कमी कर्ज असूनही प्रवास करत असेल तर प्रवास खर्च 'गर्दी मॅनेजर' अरेंज करत असण्याच्या संशयास जागा रहाते किंवा कसे २. शेतकरी दिल्लीला आंदोलनाला गेले की फिरायला बघायला गेले हा भोचकपणा कशासाठी? त्यात भोचकपणा नव्हे, विसंगती आणि विरोधाभास दर्शन असावे. बाकी तटस्थपणा हे माझे व्यक्तीगत मुल्य आहे, विचार स्वातंत्र्य वापरून मांडणी करताना माझ्या व्यक्तीगत मुल्यांपलिकडे कुणाशीही बांधील असणे अभिप्रेत नाही आणि मातृभाषा देश संस्कृती प्रेम आणि मतमतांतरे बाळगूनही आपल्या माणसांच्या प्रती आस्था या मुल्यांशी इतरांच्या सांगण्यावरून नव्हे स्वतःस पटते आणि जमते तेवढे जागत असतोच.असो. आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी आभार. इति लेखन सिमा

In reply to by माहितगार

ब्रिटीश पूर्व काळात सर्व कर केवळ शेतकर्‍यांकडून घेतले जात ते अव्वाच्या सव्वा असले तरी असंख्य लढायांचे खर्च निघून राजे राजवाडे अय्याशी करू शकतील एवढा पैसा भारतीय शेतकर्‍यांकडूनच उभा केला जात असे ना ?

In reply to by माहितगार

तुमच्याकडे शष्पभर खात्रीलायक माहिती नाही, केवळ तुमच्या मनगढंत शंकांच्या जोरावर उड्या मारत आहात. असल्यास कोणते शेतकरी, कोणती संघटना, कोणती ट्रेन, प्रवाशी शेतकरी म्हणजे तेच सर्व कर्जमाफी मान्य झालेले आहेत का यासर्वांची शहानिशा करुन आपली (विनोदाच्या नावाखाली केलेली) बकवास केली असती तर बरे झाले असते. शंका काढायला काय ढिगभर काढू शकतो, त्याला काय लागतं विशेष कौशल्य.

In reply to by तर्राट जोकर

शंका काढायला काय ढिगभर काढू शकतो, त्याला काय लागतं विशेष कौशल्य. अरेरे तुमच्या कौशल्यक्षेत्रात अतिक्रमण झाल्याने जळजळ झाली काय..??

In reply to by babu b

खिक्क.. ते सरकारचे जावई नव्हते, किंवा ते बाटगे बिटगे नसल्याने निष्ठा देशाशी असतात - अल्लाशी नाही. निष्ठा हा शब्द माहिती आहे ना..?

In reply to by babu b

मी अ ते ज्ञ समस्त गर्दी चिमुटभर मिठा सोबत घेतो. खारट होईल एवढे मीठ न घेण्याबद्दलही तसा जागरूक असण्याचा प्रयत्न असतो. या वेळी बातमीत संख्या होती गणित आमच्या गुरुजींनी शिकवले होते. आणि बातमी ते माझे गणितात चुका असू शकतात हे कबूल केलेले आहेच.

In reply to by तर्राट जोकर

इकडे काही जण सरकारची २ हजार स्क़्वेअर फुल जागा ढापून त्यावर या गोष्टी बरोबर कशा याचेही समर्थन करीत होते !

इन्फोसिस व विप्रोने समभाग बायबॅकची ऑफर दिली आहे. इन्फोसिसची बायबॅकची प्रक्रिया ३० नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या काळात असेल. बायबॅकसाठी कंपनी प्रति समभाग ११५० रू. देणार आहे. समभागाचा आजचा बाजारभाव ९६६ रूपये आहे.

In reply to by babu b

काय म्हणताय? माझे HCL आणि NHPC चे सगळेच समभाग त्यांनी परत घेतले. तुमचा नशीबच खोटं बहुधा

In reply to by सुबोध खरे

तुमचे घेतले म्हणजे सर्वांचे सर्व शेअर्स परत घेतले का ?

In reply to by श्रीगुरुजी

जे समभाग तुमच्या खात्यात १-नोव्हेंबर ला असतील तेच फक्त बायबॅक साठी वापरता येतील, त्यामुळे आता ह्या बातमीचा काही उपयोग नाही

In reply to by गंम्बा

दोन लाखापेक्षा कमी रकमेच्या छोट्या गुंतवणूकदारांसाठी १५ टक्के कोटा असतो. अशा किती गुंतवणूकदारांनी ही ऑफर स्वीकारली ह्यावर तुमच्याकडील किती समभाग कंपनी स्वीकारेल ह ठरते. १०० % गुंतवणूकदारांनी ऑफर स्वीकारल्यास entitlement ratio प्रमाणे समभाग परत घेतले जातात. मोठ्या गुंतवणूकदारांचे सगळेच शेअर परत घेतले जाण्याची शक्यता कमी असू शकते.

In reply to by मार्मिक गोडसे

लहान गुंतवणूकदार म्हणून मी त्यांनी दिलेल्या "प्रमाणापेक्षा जास्त" परत केलेले संभागही बऱयाच कंपन्यांनी स्वीकारले उदा. टी सी एस.(२७५० रु)

माहितगार, जे आरोप तुम्ही करताय ते संघाच्या कुजबूज प्रकाराने का करताय? खुलेपणाने पुरावे मांडून करा की? इथे फाटते का हातभर? फक्त दुसर्‍यांना पुरावे मागायचा नालायकपणा करता येतो? बेशरम लोक.

In reply to by मोदक

जळफळाट, चडफडाट, जळजळ, मळमळ . . . सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. परिस्थिती समजून घ्या.

In reply to by तर्राट जोकर

"योगेंद्र यादव" हे नाव बरोबर आहे का ? पारदर्शकते बद्दल ते स्वतः आग्रही असावेत. आणि गर्दी जमवण्याच्या अर्थकारणाबाबत इतर राजकारण्यांनी अद्याप पारदर्शकता दाखवली नसेल पण योगेंद्र यादव आणि त्यांच्या सच्च्या अनुयायांसाठी ही पारदर्शकता दाखवण्याची चांगली संधी असू शकते. वृत्तपत्रातील मला दिसलेले आकडे आणि गणिती कयास - ज्यास तुम्ही कुजबूज म्हणताय ते माझ्याकडून मांडून झाले आहेत - माझ्या गणिती कयासांचा संघाशी संबंध लावणे हा मला गणित शिकवलेल्या गुरुजींना हसवणारा वेगळा विनोद आहे :). जळफळाट आणि असभ्य शब्दांचा वापर न करता माझ्या मांडणीचे व्यवस्थीत पारदर्शक खंडन ही योगेंद्र यादव आणि त्यांच्या सुज्ञ अनुयायांची नैतीक जबाबदारी असावी. ही जबाबदारी काही कायदेशीर नाही की कुणाची चिडचिड व्हावी. असो. इति लेख्न समाप्ती