Skip to main content

धर्मांतरासाठी मॉडेलवर पतीची बळजबरी

लेखक ओम शतानन्द यांनी शनिवार, 18/11/2017 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
रश्मी शहाबाजकर नामक एकेकाळच्या model ची बातमी - १२ वर्षापूर्वी असिफ नामक इसमाशी तिने प्रेमविवाह केला , सर्व धर्म एकच सत्य सांगतात, सर्व धर्म सारखेच , एखादी व्यक्ती मुस्लीम असो की हिंदू , प्रेमात धर्म बघणे म्हणजे प्रतिगामित्व असल्या मूर्ख , भोंगळ समजुती असलेल्या पुरोगामी समाजवादी गांधीवादी सेकुलर विचारसरणीची असावी. नेहमी प्रमाणे या असिफने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी आपण कट्टर धार्मिक नाही आणि लग्न केल्यावर धर्म बदलणे आवश्यक नाही , तुझा धर्म तुझ्यापाशी ,माझा माझ्या पाशी अशी खोटी आश्वासने दिली . कुठलीही मुलगी प्रेमात पडली की तिला स्वत:चे प्रेम आणि स्वत;चे सुख यापुढे दुसरे काही दिसत नाही, जाणवत नाही, आणि ती स्वत:च्या आई वडील नातेवाईक यांना सोडून जायला एका पायावर तयार असते . आपल्या लग्नाचे काही सामाजिक परिणाम होतील याचा विचार करणे दूरच . महत्वाचे एकच आपला स्वार्थ . स्त्री हे पुनरुत्पादन करणारे यंत्र . हिंदू मधील जेवढ्या स्त्रिया आपल्या धर्मात येतील तेवढे फायदेशीर , तेवढी अधिक मुस्लीम संतती पैदा होईल . संख्याबळ वाढले की आपली शक्ती वाढली आणि मग देशात जगात सर्व ठिकाणी आपलाच धर्म प्रस्थापित होण्याकडे झपाट्याने वाटचाल. अशी विचारसरणी असलेले शांतीप्रिय धार्मिक लोक हिंदू स्त्रियांना प्रेमाच्या जाळ्यात फसविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात आणि आपल्या मूर्ख हिंदू स्त्रिया त्यास बळी पडतात . लग्न नंतर सर्व आश्वासने गुंडाळून ठेवून या असिफ ने रश्मी ला धर्मांतर करण्यासाठी दबाव छळ सुरु केला , तिच्या मुलालाही तिच्या पासून तोडले , मुलाला असे पढविले की तुझी आई च्या घरात सैतान राहतो कारण ती हिंदू धार्मिक रिती पाळते . या असिफ च्या जाळ्यात अजून एक इशिता नावाची मूर्ख हिंदू मुलगी - त्याच्या अर्ध्या वयाची - सापडली . धर्मांतर करून त्याच्याशी लग्न करून राहू लागली. हा असिफ व त्याचे नातेवाईक रश्मी ला धर्मांतर करण्या साठी धमकावत आहेत . आपले पुरोगामी लोक आतातरी लव जिहाद चे वास्तव स्वीकारतील का आपल्या मूर्ख हिंदू स्त्रियांना कधी अक्कल येणार कोण जाणे

वाचने 87716
प्रतिक्रिया 413

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

+१ . सगळा प्रतिवाद ' गैरवापर' या एका मुद्यावरच दिला आहे. === श्रीगुरुजी: पतीने शरीरसंबंधाची मागणी केल्यास पत्नीने त्याची इच्छा पूर्ण केलीच पाहिजे (तिची इच्छा नसली तरी) असा कुराणाचा आदेश आहे. अॅमी: • इतर धार्मिक ग्रंथांमधे याबद्दल काय आदेश आहेत? सध्याचा भारतीय कायदा '"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो. "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? हा मूळ प्रश्न आहे. हे कसं सिद्ध करणार, गैरवापर झाला तर काय वगैरे सगळे पुढचे मुद्दे झाले. === 'पत्नीशी शरीरसंबंध' या मुद्यावरून इस्लामला झोडपता येत नाही. जर झोडपायच असेलचतर सगळेच धर्म आणि सध्याचा कायदा सगळ्यांनाच झोडपाव लागेल!!

In reply to by तर्राट जोकर

जोकर बुवा नायतर काय? दोघांचेही गोल गोल शब्दांचे मनोरे बांधणे चालू आहे. तुम्ही ऍमी ताईंचे स्टेनोग्राफर आहात का? नसेल तर कशाला पच पच करताय? स्वतःच मत मांडा नाही तर गप्प बसा

In reply to by तर्राट जोकर

मी दिलेले खालचे प्रतिसाद वाचले तरी का? उगाच जिथे तिथे "पच पच" करून कशाला ठेवताय? तुमच्यात आणि त्या मोगा/ चंपाबाई/ जामोप्यात फरक राहिलेला नाही असे वाटते.

In reply to by एमी

ऍमी ताई "लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? when married wife's consent is granted असे कायदा समजतो ते चूक आहे असेच माझे मत आहे. स्त्रीला स्वतःच्या शरीरावर संपूर्ण हक्क आहे असेच माझे मत आहे. परंतु याला बलात्कार समजले तर त्याला अतिशय कडक कायदे लागू होतात म्हणून या कायद्याची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल कायदे तज्ज्ञांना दुविधा आहे. तसेही आज १८ वर्षांपूर्वी केलेले लग्न हे बेकायदेशीर आहे असे असताना ते थांबवणे सरकारला जमलेले नाही यामुळेच सरकार आजही असा कायदा करण्यास धजावत नाही. मी माझे मत सांगत नव्हतो तर कायदे तज्ज्ञांची दुविधा सांगत होतो. गैरवापराबद्दल मत मांडण्याचे कारण एकच-- कायद्याचे मूळ तत्व कि "एकही निष्पाप माणसाला शिक्षा होता कामा नये"

In reply to by सुबोध खरे

"लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय? >> ते चूक आहे असेच माझेदेखील वैयक्तिक मत आहे. + तो कायद्याने गुन्हा असावा असेदेखील मला वाटते. कायद्यात बदल व्हायचे तेव्हा होतील पण तोपर्यंत सजग स्रीपुरुषांनी वैयक्तिक पातळीवर pre/post nup agreement करून हा कायदा आम्हाला अमान्य आहे असे सांगावे. याखेरीज स्वतःच्या+इतर धर्मातले विवाहाबद्दलचे कायदेदेखील माहित करून घेऊन स्वतःपुरता customized करार करावा. शॉपिंग विधी वगैरें वर वेळ पैसा श्रम घालवायचेच असतील तर तेदेखील करा पण हे कायदा समजून घेणे आणि customize करून करार करणे हे आधी करा.

In reply to by एमी

ते चूक आहे असेच माझेदेखील वैयक्तिक मत आहे. + तो कायद्याने गुन्हा असावा असेदेखील मला वाटते.
लग्नात सामान्यपणे अभिप्रेत असलेल्या अशा कोणकोणत्या मुद्द्यांवर बाई (वा बाबा) असा रँडमली आपल्या मर्जीने, आपल्या प्रायवसीसाठी, स्वातंत्र्यासाठी इ इ पार्टनरला नकार देतो ते योग्य आहे म्हणे? समजा उद्या एका बाब्याने म्हटले, मला या महिन्यात घरी कवडिचा पैसा द्यायचा नाही - माझे पैसे, माझे स्वातंत्र्य, माझा अधिकार, माझी प्रायवसी, माझी संपत्ती, इ इ. एक महीना मी एकटाच वापरणार. जर बाईला सेक्सला हो वा नाही म्हणायचा अबसॉल्यूट अधिकार (मंजे अकारण, नवर्‍याच्या ईच्चेचा अनादर करत) हवा तसेच अनंत अधिकार पुरुषांनाही घेता येतील ना? ============================= बाईने नको म्हणलेल्या काळात नवर्‍याला दुसर्‍या बाईकडे जाण्याचा अधिकार / किंवा तिला घरी घेऊन येण्याचा अधिकार मला रास्त वाटतो. =========================== अशा प्रकारे अधिकार अधिकार ज्यांना खेळायचा आहे त्यांनी लग्न करूच नये. ====================== व्यवस्था आमच्यासाठी इतकी बदला कि शेवटी ती व्यवस्था व्यवस्थाच उरू यापेक्षा तुम्हाला आपली आपली दुसरी व्यवस्था करा ना.

In reply to by एमी

बलात्कार / बळजबरी केव्हाही केला तरी गुन्हाच असावा. विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे. गैरवापर टाळण्यासाठी काही कायदे असावेत पण कुठेतरी गैरवापर होईल म्हणून (हायपोथेटिकली) गुन्हाच नाही असे म्हणणे ठीक नाही.४९८, ऍट्रॉसिटी विरोधी कायदे आणि बाकी अनेक कायदे अन्याय होतात /झाले आहेत म्हणूनच आहेत. गैरवापर व्हायला नकोच पण म्हणून धाक बसतील असे कायदे नको म्हणणे चूक आहे. बाकी लग्न म्हणजे आयुष्यभर शारीरिक गरज पूर्ण करेनच याला काही आधार आहे का? कायद्या मध्ये प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहेत त्याच्या हे विरोधी नाही काय . मनस्थिती नाही, तब्येत , तणाव इ कुठल्याही कारणामुळे पत्नीने पत्नी नकार देत असेल तरी बळजबरी करणे म्हणजे बलात्कारच आहे.

In reply to by दुश्यन्त

तुम्हालापण यादीत टाकत आहे ओ पाचव्या नंबरवर :) धन्यवाद. बाकी लग्न म्हणजे आयुष्यभर शारीरिक गरज पूर्ण करेनच याला काही आधार आहे का? >> हो आहे आधार. नक्की कलम आणि शब्द सांगता येणार नाहीत कारण मी वकील नाही. पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल. === फ्रॅंकली सांगायचतर ' लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे म्हणणारे दोनेक दिवसांत तिघेजण मिपावर भेटतील असे वाटले नव्हते. कारण गेल्या ४+ वर्षात दोनचजण भेटलेले तेपण माबोवर. भविष्य आशादायी आहे असे म्हणायला हरकत नसावी :-)

In reply to by एमी

...साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे .. हे पटत नाही . १. म्हणजे धर्म, रूढी वगैरे मध्ये एकवेळ ठीक पण घटना प्रत्येक व्यक्तीला 'व्यक्ती' म्हणून मुलभूत अधिकार देते (लिंग , धर्म ,जात ,वंश काहीही असो). मग एखादयला व्यक्तीला भले ते पती पत्नी असोत, शरीरसंबंधाला होकार /नकार देणे हा व्यक्तिगत अधिकार आहे. केवळ पती -पत्नी आहे म्हणून केव्हाव्ही हवे ते करणे बळजबरीच आहे. २. दुसरे असे कि आजकाल नवरा बायको दोघेही कमावतात मग पोसणे वगैरे त्यांना लागू होत नाही मग त्यांनी काय करावे. आणि शारीरिक गरजा तर दोघांना असतात केवळ नवर्याच्या गरजा भागवेन बदल्यात पोसले जाईल हा तर वन वे मामला झाला! ३. बाकी हिंदू धर्मात तर सहजीवन, परस्पर संमती वगैरे भरपूर तात्त्विक गोष्टी असतात मग लग्न केले म्हणून आयुष्यभर गरजा भागवणे हा तर करार झाला. आपण हिंदू लोक तर विवाह हा संस्कार आहे वगैरे गप्पा मारत असतो. त्यानुसार पण बळजबरी अयोग्यच आहे.

In reply to by दुश्यन्त

१. फार जुने कायदे आहेत हे.1600s मधे कधीतरी इंग्रजांनी बनवले. आणि भारतात 1860 मधे आले. घटनेत तसेच्यातसे ठेवले गेले. खुद्द विकसित देशात आता 2000 नंतर ते बदलेले. २. पूर्वी बायकाना कुठे काय पर्याय होते शिक्षण, आर्थिक स्वावलंबनाचे. आतदेखील बऱ्याच बायका dependent असतात. ज्या स्वतंत्र आहेत त्यानी आग्रह धरावा नकाराधिकारचा. ३. ते सहजीवन, संस्कार वगैरे गफ्फा ऐकल्या आहेत. एका अनुबंध, कृतज्ञता वगैरे प्रवचन देणारयांना म्हणलं " काय हो जर सेक्स हा लग्नाचा पाया नसेल तर marital rape ला कायद्याने गुन्हा करायला तुमची हरकत नसेल ना?" तर ते म्हणाले "नको नको सकाळी चहात साखर कमी पडली म्हणून बायकोला ओरडल तर ती तडक पोलिसकडे जाऊन बलात्कारच गुन्हा दाखल करेल" ऑ किती तो विश्वास अनुबंधनावर =))

In reply to by दुश्यन्त

मग पोसणे वगैरे त्यांना लागू होत नाही मग त्यांनी काय करावे.
ते एरवीही लागू होत नाही. बाई काही फक्त पलंगावर लोळून सेक्स करते आणि हादडत राहते असं नसतं. स्त्रीच्या कामाचं आर्थिक मूल्यमापन केलं तर प्रत्येक (९५%) घरात स्त्रीच्च पुरुषाला कमावते नि पोसते असं निघेल. बाईच्या कामाला बाजारभाव नाही म्हणून ती फुक्कट खाते म्हणणं हा एक मोठा जावईशोध आहे. --------------------------- प्रयोग म्हणून कधी सेक्स आणि पलंगावर बसून खाणे वजा जाता सर्व कामे करण्यासाठी सरकारी नियमांप्रमाणे नोकर हायर करून बघा. नाय दिवाळं वाजलं तर ....

In reply to by एमी

नक्की कलम आणि शब्द सांगता येणार नाहीत कारण मी वकील नाही. पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल.
हेच किती भयानक आहे मुळात. ह्यामूळेच कुटुंबसंस्था शोषणाची पहिली प्रयोगशाळा आहे आपल्याकडे. बायको आणि नवरा दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत ते यासाठीच. 'लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे माझे देखिल मत आहे(अर्थात तो व्य्वस्थित डिफाईन केला जावा जेणेकरून गैरवापर रोखता येईल.). पण, याजोडीला सेक्स करू देत नाही/करण्यास साह्य करत नाही या करणान्वये तात्काळ घटस्फोट मिळण्याची सोय असली पाहिजे. मुळात घटस्फोटाला जो एक कलंक चिकटला आहे तो अवश्यमेव आणि लवकरात लवकर नष्ट व्हावा.

In reply to by पुंबा

बायको आणि नवरा दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असले पाहिजेत ते यासाठीच. >> +1 'लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे माझे देखिल मत आहे >> धन्यवाद :) पण, याजोडीला सेक्स करू देत नाही/करण्यास साह्य करत नाही या करणान्वये तात्काळ घटस्फोट मिळण्याची सोय असली पाहिजे. >> आहे की ते कलम आधीच. आणि आता mutual consent ने होनारा घटस्फोट तात्कालदेखील होतो. आधीच मुळात घटस्फोटाला जो एक कलंक चिकटला आहे तो अवश्यमेव आणि लवकरात लवकर नष्ट व्हावा. >> +1. === याखेरीज मला इस्लाममधली मेहेरची रक्कम आधीच ठरवणे, ठरावीक काळासाठीच पोटगी, मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे वगैरे कलम योग्य वाटतात.

In reply to by एमी

https://timesofindia.indiatimes.com/india/Denial-of-sex-by-spouse-is-cr…
तुमचे खरे आहे. या लिंकमध्ये सेक्स डिनाय करणे म्हणजे क्रौर्य म्हटले गेले आहे.
याखेरीज मला इस्लाममधली मेहेरची रक्कम आधीच ठरवणे, ठरावीक काळासाठीच पोटगी, मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे वगैरे कलम योग्य वाटतात.
मला मेहेर, पोटगी हेच मुळी पटत नाही.
मुलांची कस्टडी खर्च उचलणाऱ्याकडे
हे तर आजिबातच नाही. मुलाने ठराविक वय ओलांडेपर्यंत दोघांनी समान खर्च उचलायचा. कस्टडी दोघांकडे मिळून. मुलाची कस्टडी ही पैशाने विकत घेऊ शकणारी कमॉडिटी बनणे योग्य नाही, मला मॉरली चुकीचे वाटते.

In reply to by पुंबा

मला मेहेर, पोटगी हेच मुळी पटत नाही. >> हिंदू कायद्या'पेक्षा' इस्लाम कायदे चांगले आहेत याबाबतीत. === हे तर आजिबातच नाही. मुलाने ठराविक वय ओलांडेपर्यंत दोघांनी समान खर्च उचलायचा. कस्टडी दोघांकडे मिळून. मुलाची कस्टडी ही पैशाने विकत घेऊ शकणारी कमॉडिटी बनणे योग्य नाही, मला मॉरली चुकीचे वाटते. >> हे पण ठीकच आहे. जे काही विचार असतील ते आधीच बोलून, negotiate करुन करार करणे हेच योग्य ठरेल.

In reply to by एमी

पण साधारण हिंदू लग्नाचा बेसच हा आहे की पत्नी पतीच्या शारीरिक गरज पूर्ण करेल आणि त्याबदल्यात पती तिला आयुष्यभर पोसेल.
अगायो. हिंदू ठेवलेल्या बाईचा पण हा बेस नसतो असं माझं निरिक्षण आहे. बायकोचं जाऊच द्या. ------------------ हिंदू धर्मात स्त्री पुरुषाचं नातं अध्यात्मिक, धार्मिक, ईश्वरिय, इ इ असतं असं आम्ही पाहिलेल्या हिंदू धर्माचं सत्य आहे. हिंदूच्या शेजारी राहून मुस्लिमही भारतात अशाच प्रकारचं वैवाहिक नातं पाळतात. (याला अंद्राबी सारख्या बाई प्रजनन मशिन आहे म्हणणारी देशद्रोही इ इ अपवाद, सोडा.)

In reply to by एमी

फ्रॅंकली सांगायचतर ' लग्नातर्गत बलात्कार गुन्हा असावा' असे म्हणणारे दोनेक दिवसांत तिघेजण मिपावर भेटतील असे वाटले नव्हते. कारण गेल्या ४+ वर्षात दोनचजण भेटलेले तेपण माबोवर. भविष्य आशादायी आहे असे म्हणायला हरकत नसावी :-)
अगदी कंचाही बलात्कार गुन्हाच आहे ही साधी गोष्ट चार वर्षे कळली नाही मंजे कमाल आहे.

In reply to by दुश्यन्त

विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे.
विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा आहेच. कायद्याने देखील आहे. बलात्काराच्या कायद्यात नवरा अपवाद नाही. ---------------------------- लग्नानंतर शरीरसंबंधाबद्दल तक्रार करू शकत नाही. बलात्काराबद्दल करू शकतात. आणि प्रत्येक शरीरसंबंधाला बलात्कार म्हटलं तर न्यायालय ते मान्य करत नाही.

In reply to by दुश्यन्त

विवाहांतर्गत बलात्कार गुन्हाच असायला पाहिजे. गैरवापर टाळण्यासाठी काही कायदे असावेत
कायदे आहेत. कोर्टाला तो विशीष्ट शरीरसंबंध बलात्कार कसा आहे हे पटवता आलं तर शिक्षा आहे.

In reply to by एमी

'"१५+ वयाच्या पत्नीसोबत पतीने ठेवलेला शरीरसंबंध हा 'कधीच' बलात्कार नसतो" असे सांगतो.
शरीरसंबंध हा बलात्कार नसतो असं आपला कायदा म्हणतो. बलात्कार हा बलात्कार नसतो असं म्हणत नाही.

In reply to by एमी

"लग्न करतानाच पत्नीने 'आयुष्यभर पतीच्या शारीरिक गरजा पूर्ण करेन' असा कन्सेन्ट दिलेला असतो" असे कायदा समजतो.ते बरोबर आहे कि चूक याबद्दल तुमच वैयक्तिक मत काय?
हे बरोबर आहे. आणि हे म्यूच्युअल आहे. तुम्ही वाचलेल्या खटल्यात ते आलं नसलं तरी.

In reply to by एमी

'पत्नीशी शरीरसंबंध' या मुद्यावरून इस्लामला झोडपता येत नाही. जर झोडपायच असेलचतर सगळेच धर्म आणि सध्याचा कायदा सगळ्यांनाच झोडपाव लागेल!
तुम्ही काढलेला दिव्य अनर्थ १००% मान्य केला तरी इस्लाम आणि शध्याचा कायदा या दोघांनाच झोडपता येते. हिंदू धर्माला नाही.

In reply to by एमी

गैरवापर केला जाईल म्हणून कायदा बनवता येत नसेल तर आतापर्यंत कोणताच कायदा बनला नसता.
चला मग आपण खोटे बोलायला ६ महिने सक्तमजुरिचा कायदा बनवू.

In reply to by एमी

गैरवापर केला जाईल म्हणून कायदा बनवता येत नसेल तर आतापर्यंत कोणताच कायदा बनला नसता.
सर्व कायदे गैरवापर केला जाणार नाही असेच बनलेले असतात.

In reply to by सुबोध खरे

बायकोने भावनावेगाच्या भरात
स्त्रीयांना भावनावेगाचा भर वैगेरे काही नसतो, सर्वच स्त्रीया अत्यंत संतुलित सुविचारी असतात, तेव्हा हे व्यक्तव्यच चुकीचे आहे.

In reply to by सुबोध खरे

याचा अर्थ असा नाही कि असे कायदेतज्ञ पत्नीवर हणाऱ्या अत्याचाराचे समर्थन करतात( हा आरोप बहुतेक अति उदारमतवादी किंवा अतिस्त्रीस्वातंत्र्य वादी करताना आढळतात).
कायदेतज्ञ हे हिंदू धार्मिक पुरुष आहेत. त्यांनी मनुस्मृती वाचलेली असणार. इतकेच काय काही काही जज (ते ही चक्क सुप्रिम कोर्टाचे) निवाड्यात मनुस्मृतीचा दाखला देतात!!! बायका वेगळ्या ग्रहावरच्या आहेत. ----------------------------- आणि रोगापेक्षा इलाज खराब असला म्हणून काय झालं. वाईट परीणाम फक्त पुरुषांवर होनार आहे. इतकी हजार वर्षे स्त्रीञांनी इतके करोडो अन्याय सहन केले. आता पुरुषांना करू द्यात. हाच खरा न्याय!

In reply to by एमी

विवाहांतर्गत बलात्कार गुन्हा असायला पाहिजे. हे कायद्यात सिद्ध करणे त्रासदायक असेल पण कठीण नाही. या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे.

In reply to by Duishen

धन्यवाद Duishen :) माबोवरचे भरत., माबो-मिपावरचे आदित्यकोरडे आणि आता तुम्ही! आकडा वाढत आहे... I am happy. या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे. >> Exactly हेच अपेक्षित आहे! कायद्यातल्या खाचाखोचा, त्याचा गैर/वापर, न्यायालयात खेटे घालणे वगैरें खरंतर sideproduct झाले. "समाजमनाची, व्यक्तीची विचारप्रक्रिया बदलणे; लग्न केले असलेतरी जोडीदाराला कधीच गृहीत धरता येत नाही हे प्रत्येकाला कळणे आणि मान्य असणे" या गोष्टी प्रबोधन करून लोकांमधे मुरवायला जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा कमी वेळ कायदा बनवल्यास लागेल. तोच धार्मिक नियमांचा मूळ उद्देश होता आणि आता कायद्याचा आहे.

In reply to by एमी

ऍमी ताई सध्या पत्नीच्या संमती शिवाय केलेला संभोग हा बलात्कार (३७६ )या कायद्यात येत नसून घरगुती हिंसा (४९८ अ) या कायद्यात गणला जातो याचे कारण बलात्कार हा गुन्हा अजामीनपात्र आहे पण घरगुती हिंसा हा कायदा जामीनपात्र आहे. "४९८ अ" मध्ये असूनही प्रत्यक्ष किती केसेस मध्ये पोलिसात तक्रार दाखल केली जाते हे पाहिलेत तर मी काय म्हणतो ते लक्षात येईल. बलात्कार कायद्याखाली जर "पत्नीशी संभोग" आणायचा असेल तर त्याला हा कायदा आमूलाग्र बदलावा लागेल आणि ती गोष्ट एवढी सोपी नाही.

In reply to by Duishen

हे कायद्यात सिद्ध करणे त्रासदायक असेल पण कठीण नाही. हे कसे सिद्ध करणार याचविषयी मी अनेकदा विचारले आहे. त्यावर अजून एकानेही उत्तर दिले नाही. मुळात या गुन्ह्याची व्याख्या काय असेल, तो कसा सिद्ध करणार याविषयी माहिती द्यावी.

In reply to by Duishen

या कायद्यामुळे जोडीदार किमान एकमेकांच्या इच्छा विचारात घेण्याची प्रक्रिया अधिक सकसपणे करतील अशी आशा आहे.
मग आपण संपूर्ण मानवजात एकमेकाच्या कल्याणाचा विचार करेल असा कायदा करू.

In reply to by श्रीगुरुजी

१. पंथ आणि धर्म हे सारख्याच संकल्पना आहेत का? २. पश्चाताप हे चूक उमगल्याचे लक्षण आहे महामूर्खपणाचे कसे? इतिहासात किंवा मिथकात पश्चातापाची अनेक उदाहरणे आहेत. महाकवी वाल्मिकी यांना देखील पश्चाताप झाल होता. स्वत:च्याच बंधूभावांना मारले असा पश्चाताप अर्जुनालाही झाला होता. ३. विवाह, घटस्फोट, पोटगी, अपत्यांचा ताबा, पत्नीशी शरीरसंबंध, कपडे इ. विषयीचे कायदे व पद्धती स्त्रियांसाठी अत्यंत अन्यायकारक आहेत, हे तर सगळीकडेच आढळते. पण अंगुलीनिर्देश एकीकडेच का असावा?

In reply to by Duishen

#3 . कायद्यात बदल झाल्यावर हिंदू धर्म बुडाला म्हणून आरडाओरडा करत नाहीत. बाकी बलात्काराच्या मुद्द्यावरून सगळ्यांचेच एक महत्वाचा गोष्टीकडे क्सउर्लक्ष होतेय.. सर्वसामान्यपणे आपण बलात्कार एकदाच होतो असे मानतो. एकदा बलात्कार केला म्हणून बायको काय किंवा नवरा काय दोघेही न्यायालयात जाण्याची शंका नाही. पण विवाहांतर्गत बलात्कार म्हटले तर तो आठवड्याला एकदा किंवा दोनदा तीनदा होत असणार. त्या दृष्टीने विचार केला तर हिंदू स्त्रिया नक्कीच न्यायालयात दाद मागू शकतात. मुसलमानांचे माहीत नाही

In reply to by आनन्दा

#3 . कायद्यात बदल झाल्यावर हिंदू धर्म बुडाला म्हणून आरडाओरडा करत नाहीत. म्हणूनच म्हणतोय आनंदाजी, हिंदूकोड बिल, तो का फेटाळण्यात आला आणि त्यावेळेसच्या धर्मपंडितांनी काय काय बोलले याचा अभ्यास करावा. त्या दृष्टीने विचार केला तर हिंदू स्त्रिया नक्कीच न्यायालयात दाद मागू शकतात. हे वाचून चांगले वाटले आणि असा सशक्त कायदा पाहिजे.

In reply to by Duishen

Duishen आजही स्त्रिया घरगुती हिंसा या कलमाखाली (४९८ अ) लग्ना अंतर्गत बलात्कार यासाठी दाद मागू शकतात हे आपल्याला माहित आहे का? माहित असेल तर केवळ वादासाठी तो बलात्काराच्या गुन्ह्यात सामील करा असे आपले म्हणणे आहे का? किती महिलांनी अशी तक्रार केली आहे याचा आपल्याकडे काही विदा आहे का? वर स्पष्ट पणे म्हटले आहे कि बलात्काराच्या गुन्हा अजामीनपात्र आहे. बायकोने बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर संभोग झाला हे सहज सिद्ध होईलंच पण स्त्रीने संमती दिली होती हे न्यायालयात सिद्ध होईपर्यंत नवरा तुरुंगातच राहील. काही वर्षे नवरा तुरुंगात राह्ल्यावर नवरा बायकोचे संबंध सुरळीत राहतील असे म्हणणे भाबडेपणाचे आहे असे नमूद करू इच्छितो. तरीही सामाजिक स्थिती न बदलता कायद्यात आमूलाग्र बदल करा असेच आपले म्हणणे आहे का?

In reply to by सुबोध खरे

सुबोध जी, आजही स्त्रिया घरगुती हिंसा या कलमाखाली (४९८ अ) लग्ना अंतर्गत बलात्कार यासाठी दाद मागू शकतात हे आपल्याला माहित आहे का? आय. पी.सी. ४९८ ए अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आपल्या माहितीसाठी खालील लिंक देत आहे - https://indiankanoon.org/doc/538436/ माहित असेल तर केवळ वादासाठी तो बलात्काराच्या गुन्ह्यात सामील करा असे आपले म्हणणे आहे का? मला वाटत या नात्याच्या समजुतीला कायद्याचे अधिष्ठान गरजेचे आहे. पत्नीची संमती 'गृहीत' धरल्या जाते. किमान असा काही कायदा अस्तित्वात आला आणि यथायोग्य जनजागृती झाली तर समागम या विषयाने पती-पत्नींच्या नात्यात चर्चा आणि सुसंवाद वाढेल. किती महिलांनी अशी तक्रार केली आहे याचा आपल्याकडे काही विदा आहे का? माफ करा. 'विदा' हा शब्द मिपावर वाचला आहे पण तो नेमका कशाचे संक्षिप्त रूप आहे याची माहिती नाही. पण आपल्या वाक्यावरून विदा म्हणजे पुरावा असा अर्थ घेऊन प्रतिसाद देत आहे. विविध कारणास्तव माझा संबंध अनेक महिला संघटनाशी आणि समुपदेशक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींशी दीर्घकाळ आला. त्यांच्या झालेल्या परिचयातून महिलांच्या विविध प्रश्नांविषयी चर्चा झाली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत महिलांचे विवाहांतर्गत बलात्काराच्या केसेस वर देखील चर्चा झाली आहे. हे पण अतिशय त्रासलेल्या महिलांच्या बोलण्यातून येत असे. एकतर आपण पतीला 'समर्पित' असावे / घर सांभाळले पाहिजे / घर तुटू नये अशी शिकवण असल्यामुळे अनैच्छिक आणि जबरदस्तीने केलेला समागम नाईलाजाने स्वीकारल्या जातो आणि हा पण बलात्कार असतो याची त्यातील बहुतेक जणींना जाणीव नसते. मुळात त्याला कायद्यात अधिष्ठान नसल्यामुळे 'नवरा त्रास देतो, मारहाण करतो' म्हणून नोंद असे. अनेक केसेस असे जरी म्हटले तरीही त्याला संख्यात्मक पुरावा नाही. वर स्पष्ट पणे म्हटले आहे कि बलात्काराच्या गुन्हा अजामीनपात्र आहे. मला थोडा संदर्भ द्याल? माझे स्वत:चे मत आहे की १८ वर्षाखालील संबंध हे 'बलात्कार' या कक्षेत यावेत. हे थोडे धाडसाचे आहे कारण आपल्या देशात बालविवाहाचे अजूनही प्रमाण बऱ्यापैकी आहे. लग्नाचे संमती वय १० वरून बदलत जाऊन १८ वर्षे होण्याला आपल्याकडे साधारणत: १०० -१२५ वर्षाचा कालावधी लागला आहे. भवंरीदेवीची केस तर आपल्याला माहिती असणारच आहे. जर बालविवाहाचा (प्रतिबंधक) कायदा नसता तर भवंरीदेवीची केस कधीच समोर आली नसती. पण किमान कायद्याचा आधार म्हणून पुढे चालून 'विशाखा मार्गदर्शिका' आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध) कायदा आला. किमान दाद मागण्यासाठी महिलांना जागा तर मिळाली. ३७६ बी सोडला तर सर्व बलात्काराचे गुन्हे हे अजामीनपात्र आहेत. ३७६ बी मधे पत्नी सेपरेट राहत असेल आणि अश्या पत्नीशी बळजोरी केल्यास तो बलात्कार मानल्या जाईल पण तो जामीनपात्र आहे. तरीही सामाजिक स्थिती न बदलता कायद्यात आमूलाग्र बदल करा असेच आपले म्हणणे आहे का? लिंगभेदभाव आणि लिंग विषमता असणाऱ्या आपल्या समाजात स्त्रीभृण हत्या ही कायद्याच्या कक्षेत आली नसती तर याचे प्रमाण प्रचंड वाढले असते. बृहन्मुंबई सारख्या ८९% साक्षरता असणाऱ्या पॉष शहरात सेक्स रेशो केवळ ८३२ आहे (संदर्भ सेन्सस २०११). महाराष्ट्रातील सगळ्यात कमी!. बृहन्मुंबई मधे कोलाबा, सैंडहर्स्ट रोड, मरीन लाइन्स, ग्रांट रोड, भायखळा, परेल, माटुंगा, दादर / प्लाजा, एल्फीन्सस्टन यांचा समावेश आहे. स्थलांतरितांचे प्रमाण गृहीत धरूनही स्त्रीभृण हत्या होत नाही असे कसे नाकारता येईल? किंवा बीडचे उदाहरण तर कुप्रसिद्ध आहे. शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात केवळ ९१५ सेक्स रेशो आहे. तेंव्हा पारंपारिक समजुतीत अडकलेल्या समाजाच्या मतपरिवर्तनावर केवळ भर देऊन चालणार नाही त्यापेक्षा कायद्याचे अधिष्ठान निर्माण होऊन त्रासाला वाचा फोडण्यासाठी जागा आवश्यक आहे असे वाटते.

In reply to by Duishen

वादात न शिरता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. स्त्रीच्या संमतीशिवाय नवऱ्याने तिच्याशी जबरदस्तीने संभोग करणे हा गुन्हाच आहे आणि त्याला कोणतेंही समर्थन होऊशकत नाही असे मी वर स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे नीट समजावून न घेता केवळ कायदा केल्याने प्रश्न सुटेल हे म्हणणे म्हणजे आराम खुर्चीतील विचारवंतासारखा विचार करणे आहे. आज बहुसंख्य स्त्रिया तक्रार करत नाहीत याचे कारण काय तर त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. लहान वयात लग्न झाल्याने त्यांची शैक्षणिक पात्रता फारच कमी असते. त्यातून बाल विवाहाचे मुख कारण गरिबी आहे. उत्तरप्रदेश बिहार सारख्याच नव्हे तरी महाराष्ट्रासारख्य कल्याणकारी राज्यातहि खायचे एक तोंड कमी होते इतका साधा विचार असतो. अशा परिस्थितीत मुलीने नवऱ्याविरुद्ध तक्रार केली तर तिला आईबापांचा आधार मिळतच नाही कारण लग्न झालेली मुलगी परत अली तर खायचे एक तोंड वाढते. मग त्या मुलीने जायचे कुठे? नवऱ्याने हाकलल्यावर तिने जायचे कुठे? नवऱ्याची स्वतःची मालमत्ता नसेल तर हक्क कुठल्या मालमत्तेवर मागायचा? पोटगीसाठी न्यायालयात जाणे इ गोष्टी हातावर पोट असलेल्या माणसांना परवडत नाही. वैयक्तिक हक्क इ. हे भरल्या पोटाचे चोचले आहेत असे दुर्दैवाने मला म्हणावे लागते. बहुसंख्य स्त्रिया "चरितार्थासाठी" लग्न करतात असे र धों कर्वे १९३१ साली म्हणून गेले आहेत ती वस्तुस्थिती आज ८६ वर्षांनी फारशी बदललेली नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट हि आहे कि बालविवाह विरोधी कायदा निर्दयपणे राबविला गेला पाहिजे आणि माध्यमिक शिक्षणसुद्धा मोफत आणि सक्तीचे केले पाहिजे . कमीत कमी १० वि आणि व्यवसाय शिक्षण दिले तरच स्त्रिया आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील. याशिवाय संमतीशिवाय संभोग करणे हा गुन्हा आहे अशा तर्हेचे लैंगिक शिक्षण मुलांचे शाळेत सातवी आठवी पासूनच होणे आवश्यक आहे. केवळ संमतीविरुद्ध संभोग हा "बलात्कार" म्हणून कायदा केला तर चार मध्यम/ उच्च वर्गीय सुशिक्षित पांढरपेशा स्वावलंबी स्त्रियांना न्याय मिळेल. हा न्यायाचा विजय नसून न्यायाचे विडंबनच(travesty of justice) म्हणावे लागेल. स्त्रीचे "आर्थिक सक्षमीकरण" झाले तरच तिची खरी प्रगती होईल. बाकी कायदे कितीही करा. जाता जाता --लग्नातील जबरदस्ती संभोग हा "बलात्कार" म्हणून कायदा झाला आणि एखाद्या स्त्रीच्या नवऱ्याला तो सिद्ध झाला म्हणून जन्मठेपेची ( मरेपर्यंत सश्रम कारावास) शिक्षा द्यायची का? आणि अशी शिक्षा झाल्यावर न्याय नक्की कुणाला मिळेल? बाकी शब्दाचा किस पाडण्यात मला अजिबात रस नाही इति लेखन सीमा

In reply to by सुबोध खरे

माझं नेमकं उलट निरीक्षण आहे. निम्न वर्गातल्या स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असतात. रादर त्यांची कुटुंब त्याच चालवत असतात. लवकर लग्न करून देणे, नवऱ्याने टाकली तर माहेरी सहारा ना मिळणे यामागे आर्थिकपेक्षा सामाजिक कारणं जास्त आहेत. "चरितार्थासाठी" लग्न करणाऱ्या स्त्रिया इथे मराठी आंजावर दिसतात. मध्यम/उच्चमध्यम वर्ग. त्यांच आणि नवऱ्याचं deal झालेलं असतं. म्हणूनच इथे लग्नातर्गत बलात्कार हा इश्यू होताना दिसत नाही. प्रॉब्लेम हा आहे की default कायदा सगळ्यांना लागू होतो. उच्च/ मध्यम वर्गातले पुरुष prenup करून आपले interest सांभाळू शकतात पण निम्न वर्गातल्या स्त्रीकडे तो पर्याय नसतो. त्यामुळे default कायदा तिला सुरक्षा देईल असा हवा. जाताजाता: जन्मठेप 14 वर्षांची असते. बलात्कारासाठी 7 वर्षांची शिक्षा आहे. लग्नांतर्गत बलात्कारासाठी त्यापेक्षा थोडी कमी ठेवता येईल. पण शिक्षा हवीच. फक्त यापुढे असे करू नको असले सोल्युशन नको; जे सध्या 498a करतेय.

In reply to by एमी

Criminal Law (Amendment) Act, 2013 376. 1. Whoever, except in the cases provided for in sub-section (2), commits rape, shall be punished with rigorous imprisonment of either description for a term which shall not he less than seven years, but which may extend to imprisonment for life, and shall also be liable to fine.

In reply to by सुबोध खरे

तिथेच खाली हे देखील आहे: Sexual intercourse by husband upon his wife during separation 376B. Whoever has sexual intercourse with his own wife, who is living separately, whether under a decree of separation or otherwise, without her consent, shall be punished with imprisonment of either description for a term which shall not be less than "two" years but which may extend to "seven" years, and shall also be liable to fine. आता जर विभक्त नवर्याला 2 ते 7 वर्ष शिक्षा होत असेल तर विभक्त नसलेल्या नवर्याला 7 ते 14 ते 20 किंवा मरेपर्यत शिक्षा करायला त्या गुन्ह्याची तीव्रता किती लागेल! अन असेल तेवढी तीव्रता तर होउदे तेवढी शिक्षा...

In reply to by एमी

जाताजाता: जन्मठेप 14 वर्षांची असते. बलात्कारासाठी 7 वर्षांची शिक्षा आहे. लग्नांतर्गत बलात्कारासाठी त्यापेक्षा थोडी कमी ठेवता येईल. पण शिक्षा हवीच. हे वर लिहिलंय आणि आता वस्तुस्थिती वेगळी आहे याचा पुरावा दिल्यावर "घूमजाव" आपल्याला दंडवत!!!

In reply to by सुबोध खरे

कसलं घूमजाव आणि कितीदा दंडवत? तुम्ही ज्या लिंक देता त्या स्वतःतरी पूर्ण वाचता का? विभक्त नवर्याला बलात्कारसाठी जास्तीत जास्त 7 वर्षांची शिक्षा करता येते असंच लिहलं आहे ना तिथे? मग विभक्त नसलेल्या नवर्याला त्यापेक्षा जास्त शिक्षा कधी आणि का होईल? अन तुमचं काय म्हणणय आयुष्यभर जन्मठेप होण्याइतका हिंसक बलात्कार करणाऱ्याला सोडून द्यावं आणि त्याच्या बायकोला परत त्याच्याकडे रहायला लावावं?

In reply to by सुबोध खरे

जाताजाता: जन्मठेप 14 वर्षांची असते.
चुकीची माहिती.. जन्मठेपीची मुदत १४ वर्षांची असते, ही चुकीची समजुत आहे.. हे वाचा.

In reply to by एमी

माझं नेमकं उलट निरीक्षण आहे. हे बरोबर "चरितार्थासाठी" लग्न करणाऱ्या स्त्रिया इथे मराठी आंजावर दिसतात. मध्यम/उच्चमध्यम वर्ग. त्यांच आणि नवऱ्याचं deal झालेलं असतं. म्हणूनच इथे लग्नातर्गत बलात्कार हा इश्यू होताना दिसत नाही. वॊव ,मग पुढे बोलणंच नाही. अनाहितांना अगदी गहिवरून आलं असेल साक्षात दंडवत

In reply to by सुबोध खरे

दंडवतासाठी आभार _/\_ गहिवरलेल्या अनाहितांनी आपापल्या नवर्याना विचारावं "तुझं काय मत आहे लग्नांतर्गत बलात्काराबद्दल? postnup करशील का?" केलं तर चांगलंच आहे! मीपण विश्वास ठेवेन मग कि खरच दालआटाच्या चाकोल्या बनवायच्या बदल्यात त्यांना 40k ची लाईफस्टाईल मिळतेय!

In reply to by एमी

"चरितार्थासाठी" लग्न करणाऱ्या स्त्रिया इथे मराठी आंजावर दिसतात.
अगायो, इथे स्त्रीयांनी कधीच का लग्न केले ते सांगीतलेले नाही आणि सांगीतले तर असे उत्तर दिले नाही.

In reply to by एमी

लग्नांतर्गत बलात्कारासाठी त्यापेक्षा थोडी कमी ठेवता येईल.
कशामुळं? कशामुळं? पाप ते पापच ना?

In reply to by सुबोध खरे

>>>>>वादात न शिरता मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. स्त्रीच्या संमतीशिवाय नवऱ्याने तिच्याशी जबरदस्तीने संभोग करणे हा गुन्हाच आहे आणि त्याला कोणतेंही समर्थन होऊशकत नाही + Infinity माणुस म्हणुन प्रत्येकालाच भावभावना असतातच, आणि त्या विचारात न घेता त्या विरोधात कुठलीहि गोष्ट केलि ( तो माणुस कुठ्ल्याही जातीधर्माचा, लि॓गाचा असला तरी) तर तो मानवतेच्या भावनेतून (कि॓वा द्रुष्टिकोनातुन म्हणा हवे तर.) गुन्हाच आहे. माणुस म्हणुन आपली वागणुक जेव्हा समोरच्या माणसाशि माणसासारखी असेल, ( जातपात, धर्म, लि॓ग ह्या गोष्टी विचारात न घेता) तेव्हाच ह्या असल्या गोष्टी कमी होतील.

In reply to by Duishen

आय. पी.सी. ४९८ ए अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आपल्या माहितीसाठी खालील लिंक देत आहे - https://indiankanoon.org/doc/538436/
लिंकेचा आणि वाक्याचा काय संबंध?

In reply to by Duishen

आपल्या समाजात स्त्रीभृण हत्या ही कायद्याच्या कक्षेत आली नसती तर याचे प्रमाण प्रचंड वाढले असते.
जिथे संपत्ती बायकांकडे असते तिथे - केरळ, मेघालय, बोडोलँड - हा रेशो उलटा अनैसर्गिक आहे आणि त्यासाठी आजही काही कायदा नाही. उलट काही मूर्ख पुरोगामी हे आकडे भूषण म्हणून मिरवतात.

In reply to by Duishen

इतिहासातून बाहेर या हो. मी सध्याच्या स्थितीबद्दल सांगतोय. अंधश्रद्धा निरमूलन कायदा झालाच की नाही विरोधकांच्या नाकावर टिचचून? म्हणजे हिंदू वैयक्तिक कायद्यात सुधारणा करणे तुलनेने सोपे आहे. त्याला जर विरोध झालाच तर कायदेशीर पातळीवर न्यायालयातच होईल. रस्त्यावर गाड्या जाळून आणि स्मृतिचिन्हे मोडून नाही असे मी म्हणतो. तुमचं काय मत?

In reply to by आनन्दा

हिंदू कोड बिल हा अजूनही वर्तमानाचा प्रश्न आहे. ठीक आहे. सध्या आपण चर्चित असणारा विषयच घेऊ - 'विवाहांतर्गत बलात्कार'... खरेच का पारंपरिक समजुतीत बदल करणे सोपे आहे किंवा कायदा आणणे सोपे आहे? अंधश्रद्धा निरमूलन कायदा झालाच की नाही विरोधकांच्या नाकावर टिचचून? ......रस्त्यावर गाड्या जाळून आणि स्मृतिचिन्हे मोडून नाही असे मी म्हणतो. नरेंद्र दाभोळकर सरांबाबत जितके माहिती आहे त्यावरून त्यांची हत्या त्यांच्या प्रगतीशील विचार न पटल्यामुळे झाली. का केली कुणी केली हे उलगडेल. शेवटी विचारांची ही पण किंमत द्यावी लागली.

In reply to by Duishen

नरेंद्र दाभोळकर सरांबाबत जितके माहिती आहे त्यावरून त्यांची हत्या त्यांच्या प्रगतीशील विचार न पटल्यामुळे झाली. हा निष्कर्ष कशावरून काढला?

In reply to by आनन्दा

त्या दृष्टीने विचार केला तर हिंदू स्त्रिया नक्कीच न्यायालयात दाद मागू शकतात. >> नाही मागू शकत. मारहाण करून बलात्कार केला असेल तरी त्यातल्या फक्त मारहाणीसाठी दाद मागता येते.

In reply to by एमी

असं कोण म्हणतं? तीन तलाक बेकायदेशीर ठरल्यावर तो सुद्धा घरगुती हिंसा मध्ये येतो. मग बलात्कार येत नाही याला काय आधार आहे? उगाच काहीही.

In reply to by सुबोध खरे

http://www.livemint.com/Politics/oin3GVsX0EJkR8uccpniIJ/Ten-years-on-wh… या कायद्यातील कलम 3 वाचून घ्या आपल्या म्हणण्याच्या समर्थनासाठी काहीही लिहायचे का?

In reply to by सुबोध खरे

Not so fast sir! तुम्ही दिलेली लिंक वाचली. The definition includes not just physical abuse, which is more identifiable and is easier to prove (for example, using medical records), but also aspects like emotional and sexual abuse. >> ओके Significantly, PWDVA recognizes sexual violence within the confines of marriage. >> कसा? Marital rape, or sexual intercourse by a husband without the wife’s express consent, is an exception to rape under IPC. >> याबद्दलच मी वर बोलतेय. But PWDVA can come to the rescue of these women through protection orders or orders to stop violence. >> protection orders or orders to stop violence == "आजही स्त्रिया घरगुती हिंसा या कलमाखाली (४९८ अ) लग्ना अंतर्गत बलात्कार यासाठी दाद मागू शकतात" ??? protection order म्हणजे दाद मागणे? === आता हे पण वाचा: The impact of the law, however, hasn’t been remarkable. “If one looks at orders under the PWDVA, it will be noted that most orders do not specifically mention the category of sexual abuse even when alleged; when it is mentioned, the same is usually viewed through a patriarchal lens—from a moral viewpoint and less as violence or abuse,” said Sen. In fact, 10 years on, not much has changed in terms of awareness within the law enforcement agencies and the lower judiciary, say activists. “The law in spirit has not been implemented. The law is very useful but states have failed in enforcement. If you look at districts courts, cases don’t come as socially they are not still acceptable. Even when they come, they (the courts) are not sensitive at all,” said Ranjana Kumari, director at non-profit Centre for Social Research.

In reply to by एमी

आता हि लिंक वाचा http://www.indialawjournal.org/archives/volume2/issue_2/article_by_priy… काही महत्वाचे मुद्दे: • The UN Population Fund states that more than 2/3rds of married women in India, aged between 15 to 49 have been beaten, raped or forced to provide sex. • The marital rape exemption can be traced to statements by Sir Mathew Hale, Chief Justice in England, during the 1600s. He wrote, “The husband cannot be guilty of a rape committed by himself upon his lawful wife, for by their mutual matrimonial consent and contract, the wife hath given herself in kind unto the husband, whom she cannot retract.” Not surprisingly, thus, married women were never the subject of rape laws. Laws bestowed an absolute immunity on the husband in respect of his wife, solely on the basis of the marital relation. • In the present day, studies indicate that between 10 and 14% of married women are raped by their husbands: the incidents of marital rape soars to 1/3rd to ½ among clinical samples of battered women. Sexual assault by one’s spouse accounts for approximately 25% of rapes committed. • This section in dealing with sexual assault, in a very narrow purview lays down that, an offence of rape within marital bonds stands only if the wife be less than 12 years of age, if she be between 12 to 16 years, an offence is committed, however, less serious, attracting milder punishment. Once, the age crosses 16, there is no legal protection accorded to the wife, in direct contravention of human rights regulations.

In reply to by एमी

The much awaited Domestic Violence Act, 2005 (DVA) has also been a disappointment. It has provided civil remedies to what the provision of cruelty already gave criminal remedies, while keeping the status of the matter of marital rape in continuing disregard. Section 3 of the Domestic Violence Act, amongst other things in the definition of domestic violence, has included any act causing harm, injury, anything endangering health, life, etc., … mental, physical, or sexual. It condones sexual abuse in a domestic relationship of marriage or a live-in, only if it is life threatening or grievously hurtful. It is not about the freedom of decision of a woman’s wants. It is about the fundamental design of the marital institution that despite being married, she retains and individual status, where she doesn’t need to concede to every physical overture even though it is only be her husband. Honour and dignity remains with an individual, irrespective of marital status. Section 122 of the Indian Evidence Act prevents communication during marriage from being disclosed in court except when one married partner is being persecuted for n offence against the other. Since, marital rape is not an offence, the evidence is inadmissible, although relevant, unless it is a prosecution for battery, or some related physical or mental abuse under the provision of cruelty. Setting out to prove the offence of marital rape in court, combining the provisions of the DVA and IPC will be a nearly impossible task.

In reply to by एमी

Marital rape
कोणत्या कायद्यात हा शब्द अशाच असा वापरून गुन्हा नाही असं लिहिलं आहे?

In reply to by एमी

नाही मागू शकत. मारहाण करून बलात्कार केला असेल तरी त्यातल्या फक्त मारहाणीसाठी दाद मागता येते. आपले मत खरे आहे. माफ करा! माझे प्रतिसादातील वाक्य थोडे चुकीचे लिहिल्या गेले आहे. महिला बलात्काराची नव्हे तर मारहाणीची दाद मागू शकतात. न्यायालीन संदर्भात माझ्या मनात कायदा सशक्त होऊन मग दाद मागता येईल असे म्हणावयाचे होते.