Skip to main content

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 16/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
" अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच ना एकमेकांना . " " म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? " " अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . " " कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली . " काय ते ? मी ऐकलं नाही . " " तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . " " अगं असं का सांग ना काय ते ? " " ते राहू दे, ते मी असाच बोलत होते . तू सांग तुझं लक्ष असत ना आजकाल कॉलेजमध्ये लेक्चर करत नाहीस . " " आता मी लेक्चर द्यायला लागल्यावर कोण थांबणार आहे ? " " PJ बंद कर रे . " " मग तूच तर म्हटलीस . " " मी तू लेक्चर अटेंड नाही करत त्याबद्दल बोलतेय , परत attendance चा प्रॉब्लेम होईल बर का . " " असू दे, तुला काय त्याच ? माझं काय चाललय तुला काय माहित ? " " का काय झालं ? " " हम्म काय सांगू ? " " ए सांगणारेस का ? " " आता काय आणि कस सांगू ? " " ए बास राहूदे तुझं . " " अग तस नाही , सांगतोय मी " " अरे बर आठवलं मला जरा काम आहे आलेच मी . " " अग ऐक तरी ...." " ए परत आता जाते मी . " .................................................................................................................................................................... " अग काय कसलं एव्हढं काम आहे तुझं ? त्याला बोलायचं होत ना तुझ्याशी ? ऐकून नंतर जाता आलं असत ना ? " अग उगाच भाव खात होता म्हणून निघाले आणि त्याच काही महत्वाचं नसत उगाच काहीतरी TP सुरु असतो .असं खूप serious असल्यासारखं बोलायचं आणि खरं तर महत्वाचं काहीच नसत . म्हणून निघाले ." " पण खरंच काही असेल तर उगाच नको ... " ..........क्रमशः खरंच काही असेल का ? उगाच निघाले का मी ? थांबले असते तर ? छे उगाच आले मी काय बोलायचं होत त्याला ? .....क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2146
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

नुसतेच संवादांमागून संवाद टाकले तर वाचायला कंटाळा येतो लोकांना. काहीतरी मध्ये लिहा. प्रसंगाचे वर्णन करा. म्हणजे कथा नक्की काय आहे हे कळेल.