✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गूढ अंधारातील जग -२

स
सुबोध खरे यांनी
Tue, 11/14/2017 - 20:45  ·  लेख
लेख
गूढ अंधारातील जग -२ मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ. युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत. यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो. शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याची युद्ध लढण्याची क्षमता आणि ती क्षमता कमी करण्यासाठी त्याची आर्थिक क्षमता कमी करणे आवश्यक आहे. यासाठी शत्रूवर थेट हल्ला करून त्याची लष्करी साधन सामग्री नष्ट करणे हा दंड या उपायाचा भाग आहे. त्याच्या व्यापाराची नाकेबंदी करणे आणि त्याच्या कडे येणाऱ्या आयातीवर आणि त्याने करण्याच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली कि शत्रूची आर्थिक नाकेबंदी होते. उदा. भारताला रोज ४०लाख बॅरल म्हणजेच रोज तुम्हाला पाच लाख बारा हजार टन कच्चे तेल लागते.ट्रकने आणायचे ठरवले तर केवळ तेलासाठीच ५१ हजार ट्रक रोजचे लागतील. ( पाकिस्तानला ४ लाख बॅरल कच्चे तेल लागते. हा सर्व व्यापार केवळ आणि केवळ समुद्रमार्गे होऊ शकतो ( जे देश तेलउत्पादक देशाला लागून आहेत त्यांना पाईप लाईनने पुरवता येणे शक्य आहे). भारताच्या दोन्ही शत्रूंच्याकडे जाणारे सागरी मार्ग हे दोन चिंचोळ्या सामुद्रधुनी(STRAIT) मधून जातात. चीनकडे जाणारा सागरी मार्ग हा मलाक्का च्या सामुद्रधुनी तुन जातो तर पाकिस्तान कडे जाणारा सागरी मार्ग हा होर्मूझच्या सामुद्रधुनीतुन जातो.चीन कडे जाणारे ८० %तेल आणि चीनकडून निर्यात होणारा ७५ % मलाक्काच्या सामुद्रधुनी तुन जातो. या सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग हा फक्त अडीच किमी आहे. http://www.businessinsider.com/maps-oil-trade-choke-points-person-gulf-and-east-asia-2017-4?IR=T चीनशी दोन हात करायचे तर त्याच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का लावणे आवश्यक आहे म्हणूनच भारताने जाणून बुजून अंदमान निकोबार वरील आपले लष्करी तळ वाढवायला सुरुवात केली आहे. या भागाची भारताने नाके बंदी केली तर चीनची आर्थिक सत्ता कोसळायला फार कमी दिवस लागतील. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) साठी चीन एवढा अधीर का झाला आहे आणि चीनने आपल्या नौदलाचा आणि विशेषतः पाणबुडी शाखेचा झपाट्याने विस्तार का सुरु केला आहे याचे उत्तर आपल्याला येथे मिळेल. जागतिक बाजारात चीनचा कोणीही मित्र नाही. भारत अमेरिका रशिया जपान दक्षिणपूर्व आशियातील देश (कोरिया ,मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएटनाम इ.) सर्वानाच चीनच्या विस्तारवादाची भीती वाटत आली आहे. पाकिस्तानची परिस्थिती अशीच आहे. त्यांच्या कडे येणारे कच्चे तेल हे सौदी अरेबिया इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि कतार कडून येते. आणि यातील इराण सोडले तर बाकी सर्व देशाकडून येणारे तेल(८५%) होर्मूझच्या सामुद्रधुनीतून येते. त्यातून भारताने इराणच्या चहाबार बंदराचा विकास चालू केला आहे. भारताने इराण बरोबर आपले संबंध बरेच चांगले ठेवले आहेत. शिवाय पाकिस्तान हा सुन्नी बहुल देश असून तेथे शियांवर सतत अत्याचार/शिरकाण होत असतात. सर्वात मोठा आणि एकमेव शिया असलेला इराण यांचे पाकिस्तानशी संबंध याकारणाने (आणि बलुचिस्तान मुळॅ) कायम तणावपूर्ण राहिलेले आहेत. https://www.thequint.com/voices/blogs/chabahar-and-gwadar-struggle-for-power-between-india-and-pakistan-china-iran-cpec-obor अशा अनेक कारणांमुळे युद्ध झाले तर प्रत्यक्ष लष्करी विजय न मिळवता पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक कोंडी करणे भारताला सहज शक्य आहे. पाणबुडीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे लपून राहणे.STEALTH पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली असलेली वस्तू आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे रडार किंवा सोनारचा जन्म होण्याअगोदर केवळ दृष्टीला दिसेल अशा लष्करी वाहनांपैकी पाणबुडी शोधून काढणे फारच कठीण होते. याचा फायदा घेत जर्मनीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना जवळ जवळ पराभवापर्यंत आणले होते. एखादे जहाज आपल्याला दिवस किंवा रात्री उपग्रहाच्या साहाय्याने काही क्षणात शोधणे सहज शक्य आहे पण आजही पाणबुडी एकदा पाण्याच्या खाली गेली तर तिला शोधून काढणे हे जवळ जवळ अशक्य आहे. अरबी समुद्राचा विस्तार ३८ लाख चौरस किमी आहे आणि मोठ्या आकाराच्या पाणबुडीचा आकार (अरिहंत सारख्या) एक सहस्त्रांश चौरस किमी आहे म्हणजेच पाणबुडीला शोधून काढणे हे अक्ख्या महाराष्ट्र राज्यात एक काळ्या रंगाचा बिबळ्या अमावास्येच्या रात्री शोधून काढण्याएवढे "सोपे" आहे अशी पाणबुडी जर मलाक्काच्या आखाताच्या आजूबाजूला दडून बसली असेल तर तिला उपग्रह किंवा विमान अथवा जहाजाने शोधून काढणे हे जवळजवळ अशक्य आहे. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या पाणबुडीने आपले खुकरी हे जहाज बुडवले होते पण भारताकडे ४ फॉक्सट्रॉट वर्गाच्या चार पाणबुड्या असूनही त्यांना एकही पाकिस्तानी जहाजाला बुडवता आले नाही. हे आश्चर्यच नव्हे काय? त्यात आश्चर्य काहीच नव्हते कारण पाकिस्तानच्या नौदलाची सर्वच्या सर्व जहाजे भारतीय पाणबुड्याना घाबरून कराची बंदराच्या आसपास सुरक्षित उथळ पाणयात बसून होती. रिंगणात प्रतिस्पर्धी उतरलाच नाही तर तुम्ही काय कुस्ती खेळणार आणि त्याला हरवणार? त्यावर भारतीय नौदलाच्या जहाजांनी ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथॉन असे दोन हल्ले करून पाकिस्तानि नौदलाची कंबरच मोडली. https://en.wikipedia.org/wiki/Operation_Trident_(1971) https://en.wikipedia.org/wiki/Operation_Python पण यामुळे भारताचा व्यापार मात्र सुरळीत चालू होता आणि पाकिस्तानची संपूर्ण नाकेबंदी झाली होती. फॉकलंड च्या युद्धात ब्रिटिश नौसेनेने अर्जेंटिनाची जनरल बेलग्रेनो नावाची नौका बुडवल्यावर अर्जेंटिना नौदलाने त्यांची जहाजे बंदरातच ठेवली होती. Following the loss of General Belgrano, the Argentinian fleet returned to its bases and played no major role in the rest of the conflict. British nuclear submarines continued to operate in the sea areas between Argentina and the Falkland Islands, gathering intelligence, providing early warning of air raids and effectively imposing Sea denial. https://en.wikipedia.org/wiki/ARA_General_Belgrano पाणबुडीची दहशत अशी असते. पाणबुडी या शस्त्राचा वापर केवळ युद्धातच होतो असे नव्हे तर युद्धाला प्रतिबंध (DETERRENT) म्हणून पण याचा वापर होऊ शकतो. अण्वस्त्रधारक क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी हा एक युद्ध टाळण्यात फार मोठा आधार असू शकतो. दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रात सहसा युद्ध होत नाही कारण सर्वंकष संहार ( mutually assured destruction) हि भीती युद्धाच्या काठावरून राष्ट्रांना परत येण्यास भाग पडू शकते. पण एखाद्या राष्ट्राच्या माथेफिरू हुकूमशहाने सर्व समावेशक असा पहिला अण्वस्त्र हल्ला( first strike) केला तर दुसऱ्या राष्ट्राचा सर्वनाश होऊन त्यात त्याची अण्वस्त्रे सुद्धा नष्ट होण्याची भीती असते.अशा परिस्थितीत त्या राष्ट्राकडे जर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी असेल तर ती पाणबुडी अशा भयंकर हल्ल्यातही सुरक्षित राहील आणि मग त्या पाणबुडीने केलेल्या प्रतिहल्ल्यात( second strike) मूळ अण्वस्त्रे वापरणारा देश सुद्धा नष्ट होईल. त्यामुळे असा हल्ला करण्याचा मूर्खपणा पहिला देश करू धजावणार नाही. उदा. चीनने भारतावर अण्वस्त्र असलेली क्षेपणास्त्रे डागली आणि भारताचा भूभाग संपूर्णपणे भाजून टाकला तरी आपल्याकडे असलेली "अरिहंत" हि अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी दक्षिण चीनच्या समुद्रातुन १२ सागरिका क्षेपणास्त्रे (K १५) हायड्रोजन बॉम्ब टाकून चीनला बेचिराख करू शकेल अशी आज आपली क्षमता आहे. अशीच दुसरी अणुपाणबुडी "अरिदमन" या वर्षाअखेरीस जलावतरण करेल आणि २०१९ पर्यंत संपूर्णपणे युद्धक्षमता धारण करेल. https://en.wikipedia.org/wiki/Arihant-class_submarine असाच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे (non state actors) असंघटित किंवा घातपाती कारवाया करणाऱ्या दहशतवादी किंवा सागरी चाचे यांचा बंदोबस्त करण्यासाठी होऊ शकतो. एडन च्या किंवा मलाक्का आखातात असलेले चाचे हे नौदलाच्या जहाजाला पहिले कि तेथील जनतेत मिसळून जातात आणि जहाज गेले कि परत सक्रिय होतात. अशा वेळेस तेथे आपली पाणबुडी त्यांच्यावर दिवसापण "नजर" ठेवू शकते आणि हे लोक कुठे जातात त्याचा ठावठिकाणा सापडला कि त्यांच्या तळावर क्षेपणास्त्रे डागून त्याचा संहार करू शकतात. नागा किंवा रोहिंग्या बंडखोरांना चीनची "फूस" मिळत असते जेणेकरून भारत आणि म्यानमार मध्ये तणाव राहावा आणि आपल्याला तेथे शिरकाव करता यावा. अशा विषम शत्रू विरुद्ध होणाऱ्या असमतोल युद्धात केलेल्या कारवाईचा कोणताही पुरावा मागे न ठेवता कार्यवाही करण्यासाठी पाणबुडीचा फार मोठा उपयोग होऊ शकतो. कालवेरी या भारतीय पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी झाली आहे https://timesofindia.indiatimes.com/india/navy-successfully-test-fires-anti-ship-missile-from-kalvari-submarine/articleshow/57430490.cms https://economictimes.indiatimes.com/news/defence/first-scorpene-submarine-ins-kalvari-delivered-to-navy-to-be-commissioned-soon/articleshow/60783199.cms https://www.youtube.com/watch?v=dzttFhYUR7g क्रमशः

Book traversal links for गूढ अंधारातील जग -२

  • ‹ गूढ अंधारातील जग
  • Up
  • गूढ अंधारातील जग -३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
39266 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

वा!!

तुषार काळभोर
Tue, 11/14/2017 - 21:39 नवीन
अभिमान वाटावा अशी माहिती! अरिहंत- जैन संस्कृतीशी जवळीक साधणारे असल्याने भारताच्या शांतीपूर्ण प्रतिमेला साजेसे वाटायचे. अरिदमन वाचल्यावर शत्रूला नष्ट करणारा व शत्रूचा विनाश करणारा हे त्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध अर्थ लक्षात आले.
  • Log in or register to post comments

अरि म्हणजे शत्रू.म्हणून

सुबोध खरे
Tue, 11/14/2017 - 22:01 नवीन
अरि म्हणजे शत्रू.म्हणून अरिहंत किंवा अरिदमन ही नावे दिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

अभिमान वाटावा अशी माहिती! +1

शलभ
Tue, 11/14/2017 - 22:16 नवीन
अभिमान वाटावा अशी माहिती!
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

सुरेख

महेश हतोळकर
Tue, 11/14/2017 - 21:54 नवीन
मस्त सुरूवात सर
  • Log in or register to post comments

https://youtu.be/7v7T_WJvzqI

सुबोध खरे
Tue, 11/14/2017 - 22:10 नवीन
https://youtu.be/7v7T_WJvzqI अरिदमन बद्दल अधिक माहिती.
  • Log in or register to post comments

मस्तं !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 11/14/2017 - 22:29 नवीन
सुंदर महिती ! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

मस्त लेख आहे

नेत्रेश
Tue, 11/14/2017 - 23:39 नवीन
खुप नवी माहीती मिळते आहे. फक्त साम दाम दंड भेद मधला भेद चा अर्थ हा 'शत्रूला एकटा पाडणे' असा नसुन 'कपट / विश्वासघात / दगा' असा (माझ्या माहीती प्रमाणे) आहे.
  • Log in or register to post comments

भेदचा खरा अर्थ फूट पाडणे हा

सुबोध खरे
Wed, 11/15/2017 - 12:51 नवीन
भेदचा खरा अर्थ फूट पाडणे हा आहे. अभेद्य म्हणजे ज्यात फूट पाडता येणार नाही असे. म्हणून भेद हा कूटनीतीचा भाग म्हणजे शत्रुपक्षातील घटकांमध्ये फूट पाडणे असा अर्थ आहे. आज भारत अमेरिका आणि पाकिस्तान मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

वाचतिये.

रेवती
Wed, 11/15/2017 - 00:58 नवीन
वाचतिये.
  • Log in or register to post comments

मस्तच! दोन्हीही भागांत छान

रुपी
Wed, 11/15/2017 - 02:13 नवीन
मस्तच! दोन्हीही भागांत छान माहिती मिळाली.
  • Log in or register to post comments

व्वा!

स्मिता.
Wed, 11/15/2017 - 03:17 नवीन
छान वाटले हा भाग वाचून! येत्या भविष्यात चीन भारताविरूद्ध युद्ध पुकारून सगळी भारतभूमी बेचिराख करेल अशी जी भीती निर्माण केली जातेय ती आता माझ्यावर तेवढा प्रभाव करणार नाही.
  • Log in or register to post comments

अगदी!!

प्रीत-मोहर
गुरुवार, 11/16/2017 - 15:40 नवीन
अगदी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

छान सुरूवात

रामपुरी
Wed, 11/15/2017 - 03:34 नवीन
पु भा प्र छिद्रान्वेषणः इराण मधल्या बंदराचं नाव 'चहाबार' नसून 'चाबहार' असावे.
  • Log in or register to post comments

पाणबुडीची अंतर्गत माहिती

कंजूस
Wed, 11/15/2017 - 06:15 नवीन
पाणबुडीची अंतर्गत माहिती प्रथम घेऊन मग यद्धशास्त्र,इतिहास असे भाग घ्यावेत. आमच्याकडे अमुक रॅाकेट,तमुक विमान आहे अशी जाहिरात सर्वच राष्ट्रे करत असतात परंतू पाणबुडीविषयी फारच गुप्तता पाळत असावेत. प्रत्यक्ष हल्ला करण्यापेक्षा गुप्तपणे टेहळणी करणे हाच उद्देश असावा. मग शत्रुराष्ट्राच्या समुद्री हद्दीत घुसून पाहाणे हेसुद्धा असेल. पाणबुडी कितीकाळ पाण्याखाली राहू शकते हे तिची शक्ती वाढवते. पाणबुडीसंबंधी काही बोलायचे नाही अशी आणखी विशेष अट त्यावरच्या खलाशांकडून अपेक्षित असणारच. सैन्यातल्या प्रत्येकास गौप्यता पाळणे आवश्यक आहेच त्यावर ही विशेष असावी. परंतू ही माहिती रंजक नक्कीच आहे.
  • Log in or register to post comments

येउद्या

आनन्दा
Wed, 11/15/2017 - 08:06 नवीन
येउद्या
  • Log in or register to post comments

जबरदस्त !

मोहन
Wed, 11/15/2017 - 10:35 नवीन
पुढील भाग पटापट येवू द्या साहेब. लेखमाला प्रकाशना योग्य नक्कीच होणार असे भाकीत करून ठेवतो.
  • Log in or register to post comments

भारीच

इरसाल
Wed, 11/15/2017 - 10:37 नवीन
जबरदस्त !!!!!!
  • Log in or register to post comments

छान माहीती.

जागु
Wed, 11/15/2017 - 11:35 नवीन
छान माहीती.
  • Log in or register to post comments

_/\_

टवाळ कार्टा
Wed, 11/15/2017 - 13:03 नवीन
_/\_ रच्याकने पाणबुडी सोनारने ओळखता येत नाही?
  • Log in or register to post comments

४८ तास

महेश हतोळकर
Wed, 11/15/2017 - 13:16 नवीन
डॉक्टरांचच ४८ तास वाचा. बरीच कल्पना येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पुढच्या भागांमध्ये जास्त

सुबोध खरे
Wed, 11/15/2017 - 13:25 नवीन
पुढच्या भागांमध्ये जास्त विस्ताराने येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पुभालटा

टवाळ कार्टा
Wed, 11/15/2017 - 15:55 नवीन
पुभालटा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

जबरदस्त

पाटीलभाऊ
Wed, 11/15/2017 - 13:32 नवीन
जबरदस्त माहिती _/\_ पु भा प्र
  • Log in or register to post comments

वाचतोय.

सूड
Wed, 11/15/2017 - 14:16 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

हा भाग आवडला

दीपक११७७
Wed, 11/15/2017 - 15:17 नवीन
हा भाग आवडला पुभालटा
  • Log in or register to post comments

..

babu b
Wed, 11/15/2017 - 15:24 नवीन
छान
  • Log in or register to post comments

खूपच माहितीपूर्ण

पैसा
Wed, 11/15/2017 - 21:57 नवीन
खूपच माहितीपूर्ण आणि रंजक लिहिता आहात.
  • Log in or register to post comments

+१११

नाखु
गुरुवार, 11/16/2017 - 16:34 नवीन
ज्या विषयावर फारसे काही लिहिले जात नाही असे विविध विषयांवर डॉ आवर्जून सविस्तर माहिती आणि रंजक पद्धतीने लिहीत असतात मिपावरील नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

उत्तम माहिती, तुमचे लेख

टीकोजीराव
Wed, 11/15/2017 - 22:55 नवीन
उत्तम माहिती, तुमचे लेख नेहमीच छान असतात.
  • Log in or register to post comments

पाणबुडी मध्ये हवा शुद्ध कशी ठेवतात Hypoxemia टाळण्यासाठी ?

चामुंडराय
गुरुवार, 11/16/2017 - 08:51 नवीन
पाणबुडी मध्ये हवा शुद्ध कशी ठेवतात Hypoxemia टाळण्यासाठी ? ज्यांना Claustrophobia असतो अश्या नौसैनिकांना देखील पाणबुडीत जावे लागते का?
  • Log in or register to post comments

आपण श्वास घेतो त्या हवेत

सुबोध खरे
गुरुवार, 11/16/2017 - 18:04 नवीन
आपण श्वास घेतो त्या हवेत मुळात चार वायू असतात नायट्रोजन ७८% ऑक्सिजन २१%, आरगॉन ०.९४ %, आणि कार्बन डाय ऑक्साइड०.०४% यातील आपले शरीर ऑक्सिजन वापरते आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडते. उच्छवासाच्या हवेत ४.५% कार्बन डाय ऑक्साइड असतो. बाकी नायट्रोजन आणि अरगॉन चे शरीर काहीच करत नाही. पाणबुडीतील हवा व्यवस्थित ठेवण्यासाठी अतिरिक्त कार्बन डाय ऑक्साइड हा सोडा लाईम सारख्या पदार्थात शोषून घेतला जातो. CaO + CO२= CaCO ३ आणि कमी झालेला ऑक्सिजन हा एक तर दाबाखाली ठेवलेल्या टाक्यातून पुरवला जातो किंवा पाण्याचे विघटन करून मिळवला जातो. हा अशा टाक्यातून एक तर सतत थोड्या प्रमाणावर सोडला जातो किंवा थोड्याथोड्या वेळाने गटागटाने सोडला जातो. मुळात पाणबुडी या शाखेत फक्त स्वतःच्या मर्जीनेच लोक घेतले जातात त्यामुले Claustrophobia असतो असे नौसैनिक अशा फंदात पडतच नाहीत. पण तरीही एखाद्याला असा त्रास झाला तर तो एक वर्षाच्या प्रशिक्षणाच्या कालावधीतच बाहेर जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

पाणबुडी बोटीसारखी हेलकावे

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/16/2017 - 11:10 नवीन
पाणबुडी बोटीसारखी हेलकावे घेते का?
  • Log in or register to post comments

पाणबुडी हो दंडगोलाच्या आकारात

सुबोध खरे
गुरुवार, 11/16/2017 - 18:11 नवीन
पाणबुडी हो दंडगोलाच्या आकारात असल्यामुळे अगदी शांत समुद्रातही ती भरपूर गोल डोलत(rolling) असते आणि खवळलेल्या समुद्रात तर ती भयानक हलते ४५-६०डिग्री इतकी दोन्ही बाजूना. त्यामुळे समुद्र खवळलेला असेल तर बहुसंख्य नौसैनिक पाणबुडी पाण्याखालीच असेल तर बरे असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

४५-६०डिग्री इतकी दोन्ही

सुबोध खरे
गुरुवार, 11/16/2017 - 19:45 नवीन
४५-६०डिग्री इतकी दोन्ही बाजूना म्हणजे ३० डिग्री एका बाजूला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तेच म्हणतोय....पाणबुडी

टवाळ कार्टा
Sat, 11/18/2017 - 21:15 नवीन
तेच म्हणतोय....पाणबुडी पाण्याखाली असताना डोलते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पाणबुडी पाण्याखाली १० मीटर

सुबोध खरे
Fri, 12/29/2017 - 12:03 नवीन
पाणबुडी पाण्याखाली १० मीटर गेल्यावर (किंवा त्याहून खोल) सर्व कसे शांत असते. येणाऱ्या लाटा इ. या पृष्ठभागावरच परिणाम करतात त्यामुळे समुद्र खवळलेला असेल तर सैनिक पाण्याखाली जाणे जास्त पसंत करतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

भारीच.. भारताच्या क्षमतेविषयी

लोनली प्लॅनेट
गुरुवार, 11/16/2017 - 12:04 नवीन
भारीच.. भारताच्या क्षमतेविषयी एवढे माहित न्हवते 1971 मधील पाकिस्तानच्या गाझी आणि भारताची S21 या दोन पाणबुड्यांमधील झालेल्या युद्धा विषयी माहिती वाचायला आवडेल खरंच S21 ने गाझी ला जलसमाधी दिलेली आहे का पाकिस्तान हे मान्य करीत नाही ते म्हणते internal explosion मुळे गाझी बुडाली
  • Log in or register to post comments

लोकप्रभा

अनन्त अवधुत
Fri, 11/17/2017 - 02:31 नवीन
गेल्या १-२ वर्षात केव्हा तरी लोकप्रभा मध्ये यावर खूप छान लेख आला होता. नेमका अंक आता आठवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लोनली प्लॅनेट

अप्रतिम लेख !!!! पुढचा भाग

दुर्गविहारी
गुरुवार, 11/16/2017 - 16:49 नवीन
अप्रतिम लेख !!!! पुढचा भाग लवकर टाका. चहाबार दुरूस्त करुन घ्या.
  • Log in or register to post comments

जबरदस्ज, वाचतोय ...

उपेक्षित
गुरुवार, 11/16/2017 - 17:47 नवीन
जबरदस्ज, वाचतोय ...
  • Log in or register to post comments

एक शंका

मराठी कथालेखक
गुरुवार, 11/16/2017 - 19:36 नवीन
आपल्याकडे असलेली "अरिहंत" हि अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी दक्षिण चीनच्या समुद्रातुन १२ सागरिका क्षेपणास्त्रे (K १५) हायड्रोजन बॉम्ब टाकून चीनला बेचिराख करू शकेल अशी आज आपली क्षमता आहे
पाण्याखाली राहूनच पाणबूडी जमिनीवर दूरपर्यंत (इथे संपुर्ण चीनचा विचार करतो आहे) अचूक मारा करु शकते का ? नसल्यास तिला पाण्यावर यावं लागेल, ते धोकादायक ठरेल.
  • Log in or register to post comments

पाणबुडी पाण्याच्या

सुबोध खरे
Tue, 12/19/2017 - 12:14 नवीन
पाणबुडी पाण्याच्या पृष्ठभागावर न येता (पाण्याखालूनच) क्षेपणास्त्रं डागू शकते. त्यामुळेच अणुपाणबुडी हे शत्रूला अत्यंत धोकादायक वाटणारे अस्त्र आहे.याबद्दल अधिक पुढील भागामध्ये येईलच. आपला प्रतिसाद नजरेतून सुटून गेला आणि उत्तर द्यायला उशीर झाला याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

अण्वस्त्रधारी उपग्रह

मराठी कथालेखक
गुरुवार, 11/16/2017 - 19:52 नवीन
अण्वस्त्रधारी कृत्रिम उपग्रह पण असतात का ? नसतील तरी मला वाटतंय लवकरच ते पण निर्माण होतील. कृत्रिम उपग्रह सुद्धा वजनाने / आकाराने अतिशय लहान असतात, ते पृथ्वीवरील लक्ष्यावर अचूकपणे मारा करु शकतील , डागलेले अस्त्र वातावरणाशी घर्षण होवून नष्ट होवू नये म्हणून योग्य ते तंत्रज्ञान वापरले तर हे शक्य होईल.
  • Log in or register to post comments

अण्वस्त्रधारी कृत्रिम उपग्रह

सुबोध खरे
गुरुवार, 11/16/2017 - 20:11 नवीन
अण्वस्त्रधारी कृत्रिम उपग्रह सध्या तरी नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

नेहमी प्रमाणेच सुंदर!

Nitin Palkar
गुरुवार, 11/16/2017 - 21:31 नवीन
पुभालटा _/\_
  • Log in or register to post comments

मस्त सर

गोंधळी
गुरुवार, 11/16/2017 - 21:46 नवीन
पुभाप्र.
  • Log in or register to post comments

वाचतेय.. सुरेख माहिती.

यशोधरा
Fri, 11/17/2017 - 05:10 नवीन
वाचतेय.. सुरेख माहिती. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सापेक्ष आकारमान

विंजिनेर
Sat, 11/18/2017 - 02:56 नवीन
Image removed. साभारः इथून
  • Log in or register to post comments

वावा..

स्वाती दिनेश
Sat, 11/18/2017 - 13:04 नवीन
वाचते आहे. माझा आतेभाऊ भारतीय नौदलात पाणबुडीचा कॅप्टन होता, तो निवृत्त होण्याआधी त्याने आम्हा सर्वांसाठी पाणबुडी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली होती, त्याची आठवण ताजी झाली. त्या चिंचोळ्या आणि स्टीप शिडीवरून चढणे उतरणे एक दिव्यच आणि महिनोन महिने पाण्याखाली त्या माशासारख्या पाणबुडीत नुसते राहणेच नव्हे तर शत्रूला काबूत ठेवण्याकरता सतर्क राहणे म्हणजे मानसिक, शारिरिक फिटनेसची परिसीमाच! तुम्ही खूप छान माहिती देत आहात, वाचते आहेच. स्वाती
  • Log in or register to post comments

युद्धकाळात पाणबुडीतील

मार्मिक गोडसे
Sat, 11/18/2017 - 15:33 नवीन
युद्धकाळात पाणबुडीतील नौसैनिकांना युध्दाच्या घडामोडी कशा समजतात? संपर्काचे साधन काय असते?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा