गूढ अंधारातील जग -२
लेखनप्रकार
गूढ अंधारातील जग -२
मूळ पाणबुडी या शाखेची गरज काय आणि तिचा हेतू किंवा उद्देश काय हे आपण समजून घेऊ.
युद्धाचा मूळ हेतू म्हणजे आपल्या शत्रूचे आर्थिक शारीरिक /सामरिक आणि मानसिक खच्चीकरण करणे. जी गोष्ट सामोपचाराने सुटत नाही(साम) तिच्यासाठी पैसे मोजून(दाम) काम होत असेल तर ठीक ते जर होत नसेल तर दंड (युद्ध) आणि भेद (शत्रूला एकटा पाडणे) हे आपले काम करण्याचे उपाय अनादिकालापासून तत्वज्ञानात सांगितले आणि वापरले गेले आहेत.
यात लष्कराचा किंवा कूटनीतीचा भाग दंड आणि भेद यात केला जातो. शत्रूला नामोहरम करण्यासाठी त्याची युद्ध लढण्याची क्षमता आणि ती क्षमता कमी करण्यासाठी त्याची आर्थिक क्षमता कमी करणे आवश्यक आहे. यासाठी शत्रूवर थेट हल्ला करून त्याची लष्करी साधन सामग्री नष्ट करणे हा दंड या उपायाचा भाग आहे. त्याच्या व्यापाराची नाकेबंदी करणे आणि त्याच्या कडे येणाऱ्या आयातीवर आणि त्याने करण्याच्या निर्यातीवर तुम्ही बंदी आणली कि शत्रूची आर्थिक नाकेबंदी होते.
उदा. भारताला रोज ४०लाख बॅरल म्हणजेच रोज तुम्हाला पाच लाख बारा हजार टन कच्चे तेल लागते.ट्रकने आणायचे ठरवले तर केवळ तेलासाठीच ५१ हजार ट्रक रोजचे लागतील. ( पाकिस्तानला ४ लाख बॅरल कच्चे तेल लागते. हा सर्व व्यापार केवळ आणि केवळ समुद्रमार्गे होऊ शकतो ( जे देश तेलउत्पादक देशाला लागून आहेत त्यांना पाईप लाईनने पुरवता येणे शक्य आहे).
भारताच्या दोन्ही शत्रूंच्याकडे जाणारे सागरी मार्ग हे दोन चिंचोळ्या सामुद्रधुनी(STRAIT) मधून जातात. चीनकडे जाणारा सागरी मार्ग हा मलाक्का च्या सामुद्रधुनी तुन जातो तर पाकिस्तान कडे जाणारा सागरी मार्ग हा होर्मूझच्या सामुद्रधुनीतुन जातो.चीन कडे जाणारे ८० %तेल आणि चीनकडून निर्यात होणारा ७५ % मलाक्काच्या सामुद्रधुनी तुन जातो. या सामुद्रधुनीचा सर्वात अरुंद भाग हा फक्त अडीच किमी आहे.
http://www.businessinsider.com/maps-oil-trade-choke-points-person-gulf-and-east-asia-2017-4?IR=T
चीनशी दोन हात करायचे तर त्याच्या आर्थिक सामर्थ्याला धक्का लावणे आवश्यक आहे म्हणूनच भारताने जाणून बुजून अंदमान निकोबार वरील आपले लष्करी तळ वाढवायला सुरुवात केली आहे.
या भागाची भारताने नाके बंदी केली तर चीनची आर्थिक सत्ता कोसळायला फार कमी दिवस लागतील. चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका (CPEC) साठी चीन एवढा अधीर का झाला आहे आणि चीनने आपल्या नौदलाचा आणि विशेषतः पाणबुडी शाखेचा झपाट्याने विस्तार का सुरु केला आहे याचे उत्तर आपल्याला येथे मिळेल. जागतिक बाजारात चीनचा कोणीही मित्र नाही. भारत अमेरिका रशिया जपान दक्षिणपूर्व आशियातील देश (कोरिया ,मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएटनाम इ.) सर्वानाच चीनच्या विस्तारवादाची भीती वाटत आली आहे.
पाकिस्तानची परिस्थिती अशीच आहे. त्यांच्या कडे येणारे कच्चे तेल हे सौदी अरेबिया इराण, संयुक्त अरब अमिराती, कुवैत आणि कतार कडून येते. आणि यातील इराण सोडले तर बाकी सर्व देशाकडून येणारे तेल(८५%) होर्मूझच्या सामुद्रधुनीतून येते. त्यातून भारताने इराणच्या चहाबार बंदराचा विकास चालू केला आहे. भारताने इराण बरोबर आपले संबंध बरेच चांगले ठेवले आहेत. शिवाय पाकिस्तान हा सुन्नी बहुल देश असून तेथे शियांवर सतत अत्याचार/शिरकाण होत असतात. सर्वात मोठा आणि एकमेव शिया असलेला इराण यांचे पाकिस्तानशी संबंध याकारणाने (आणि बलुचिस्तान मुळॅ) कायम तणावपूर्ण राहिलेले आहेत.
https://www.thequint.com/voices/blogs/chabahar-and-gwadar-struggle-for-power-between-india-and-pakistan-china-iran-cpec-obor
अशा अनेक कारणांमुळे युद्ध झाले तर प्रत्यक्ष लष्करी विजय न मिळवता पाकिस्तानची आर्थिक आणि सामरिक कोंडी करणे भारताला सहज शक्य आहे. पाणबुडीचा सगळ्यात महत्त्वाचा गुण म्हणजे लपून राहणे.STEALTH
पाण्याच्या पृष्ठभागाच्या खाली असलेली वस्तू आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे रडार किंवा सोनारचा जन्म होण्याअगोदर केवळ दृष्टीला दिसेल अशा लष्करी वाहनांपैकी पाणबुडी शोधून काढणे फारच कठीण होते. याचा फायदा घेत जर्मनीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांना जवळ जवळ पराभवापर्यंत आणले होते.
एखादे जहाज आपल्याला दिवस किंवा रात्री उपग्रहाच्या साहाय्याने काही क्षणात शोधणे सहज शक्य आहे पण आजही पाणबुडी एकदा पाण्याच्या खाली गेली तर तिला शोधून काढणे हे जवळ जवळ अशक्य आहे.
अरबी समुद्राचा विस्तार ३८ लाख चौरस किमी आहे आणि मोठ्या आकाराच्या पाणबुडीचा आकार (अरिहंत सारख्या) एक सहस्त्रांश चौरस किमी आहे म्हणजेच पाणबुडीला शोधून काढणे हे
अक्ख्या महाराष्ट्र राज्यात एक काळ्या रंगाचा बिबळ्या अमावास्येच्या रात्री शोधून काढण्याएवढे "सोपे" आहे
अशी पाणबुडी जर मलाक्काच्या आखाताच्या आजूबाजूला दडून बसली असेल तर तिला उपग्रह किंवा विमान अथवा जहाजाने शोधून काढणे हे जवळजवळ अशक्य आहे.
१९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या पाणबुडीने आपले खुकरी हे जहाज बुडवले होते पण भारताकडे ४ फॉक्सट्रॉट वर्गाच्या चार पाणबुड्या असूनही त्यांना एकही पाकिस्तानी जहाजाला बुडवता आले नाही. हे आश्चर्यच नव्हे काय?
त्यात आश्चर्य काहीच नव्हते कारण पाकिस्तानच्या नौदलाची सर्वच्या सर्व जहाजे भारतीय पाणबुड्याना घाबरून कराची बंदराच्या आसपास सुरक्षित उथळ पाणयात बसून होती. रिंगणात प्रतिस्पर्धी उतरलाच नाही तर तुम्ही काय कुस्ती खेळणार आणि त्याला हरवणार? त्यावर भारतीय नौदलाच्या जहाजांनी ऑपरेशन ट्रायडेंट आणि ऑपरेशन पायथॉन असे दोन हल्ले करून पाकिस्तानि नौदलाची कंबरच मोडली.
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Trident_(1971)
https://en.wikipedia.org/wiki/Operation_Python
पण यामुळे भारताचा व्यापार मात्र सुरळीत चालू होता आणि पाकिस्तानची संपूर्ण नाकेबंदी झाली होती.
फॉकलंड च्या युद्धात ब्रिटिश नौसेनेने अर्जेंटिनाची जनरल बेलग्रेनो नावाची नौका बुडवल्यावर अर्जेंटिना नौदलाने त्यांची जहाजे बंदरातच ठेवली होती. Following the loss of General Belgrano, the Argentinian fleet returned to its bases and played no major role in the rest of the conflict. British nuclear submarines continued to operate in the sea areas between Argentina and the Falkland Islands, gathering intelligence, providing early warning of air raids and effectively imposing Sea denial.
https://en.wikipedia.org/wiki/ARA_General_Belgrano
पाणबुडीची दहशत अशी असते.
पाणबुडी या शस्त्राचा वापर केवळ युद्धातच होतो असे नव्हे तर युद्धाला प्रतिबंध (DETERRENT) म्हणून पण याचा वापर होऊ शकतो. अण्वस्त्रधारक क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी हा एक युद्ध टाळण्यात फार मोठा आधार असू शकतो. दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रात सहसा युद्ध होत नाही कारण सर्वंकष संहार ( mutually assured destruction) हि भीती युद्धाच्या काठावरून राष्ट्रांना परत येण्यास भाग पडू शकते. पण एखाद्या राष्ट्राच्या माथेफिरू हुकूमशहाने सर्व समावेशक असा पहिला अण्वस्त्र हल्ला( first strike) केला तर दुसऱ्या राष्ट्राचा सर्वनाश होऊन त्यात त्याची अण्वस्त्रे सुद्धा नष्ट होण्याची भीती असते.अशा परिस्थितीत त्या राष्ट्राकडे जर अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी असेल तर ती पाणबुडी अशा भयंकर हल्ल्यातही सुरक्षित राहील आणि मग त्या पाणबुडीने केलेल्या प्रतिहल्ल्यात( second strike) मूळ अण्वस्त्रे वापरणारा देश सुद्धा नष्ट होईल. त्यामुळे असा हल्ला करण्याचा मूर्खपणा पहिला देश करू धजावणार नाही. उदा. चीनने भारतावर अण्वस्त्र असलेली क्षेपणास्त्रे डागली आणि भारताचा भूभाग संपूर्णपणे भाजून टाकला तरी आपल्याकडे असलेली "अरिहंत" हि अण्वस्त्र धारी क्षेपणास्त्रे असलेली पाणबुडी दक्षिण चीनच्या समुद्रातुन १२ सागरिका क्षेपणास्त्रे (K १५) हायड्रोजन बॉम्ब टाकून चीनला बेचिराख करू शकेल अशी आज आपली क्षमता आहे. अशीच दुसरी अणुपाणबुडी "अरिदमन" या वर्षाअखेरीस जलावतरण करेल आणि २०१९ पर्यंत संपूर्णपणे युद्धक्षमता धारण करेल. https://en.wikipedia.org/wiki/Arihant-class_submarine
असाच एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे (non state actors) असंघटित किंवा घातपाती कारवाया करणाऱ्या दहशतवादी किंवा सागरी चाचे यांचा बंदोबस्त करण्यासाठी होऊ शकतो. एडन च्या किंवा मलाक्का आखातात असलेले चाचे हे नौदलाच्या जहाजाला पहिले कि तेथील जनतेत मिसळून जातात आणि जहाज गेले कि परत सक्रिय होतात. अशा वेळेस तेथे आपली पाणबुडी त्यांच्यावर दिवसापण "नजर" ठेवू शकते आणि हे लोक कुठे जातात त्याचा ठावठिकाणा सापडला कि त्यांच्या तळावर क्षेपणास्त्रे डागून त्याचा संहार करू शकतात. नागा किंवा रोहिंग्या बंडखोरांना चीनची "फूस" मिळत असते जेणेकरून भारत आणि म्यानमार मध्ये तणाव राहावा आणि आपल्याला तेथे शिरकाव करता यावा. अशा विषम शत्रू विरुद्ध होणाऱ्या असमतोल युद्धात केलेल्या कारवाईचा कोणताही पुरावा मागे न ठेवता कार्यवाही करण्यासाठी पाणबुडीचा फार मोठा उपयोग होऊ शकतो.
कालवेरी या भारतीय पाणबुडीतून क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी झाली आहे
https://timesofindia.indiatimes.com/india/navy-successfully-test-fires-anti-ship-missile-from-kalvari-submarine/articleshow/57430490.cms
https://economictimes.indiatimes.com/news/defence/first-scorpene-submarine-ins-kalvari-delivered-to-navy-to-be-commissioned-soon/articleshow/60783199.cms
https://www.youtube.com/watch?v=dzttFhYUR7g
क्रमशः
वाचने
39346
वाचनखूण
प्रतिक्रिया
63
वा!!
In reply to वा!! by तुषार काळभोर
अरि म्हणजे शत्रू.म्हणून
In reply to वा!! by तुषार काळभोर
अभिमान वाटावा अशी माहिती! +1
सुरेख
https://youtu.be/7v7T_WJvzqI
मस्तं !
मस्त लेख आहे
In reply to मस्त लेख आहे by नेत्रेश
भेदचा खरा अर्थ फूट पाडणे हा
वाचतिये.
मस्तच! दोन्हीही भागांत छान
व्वा!
In reply to व्वा! by स्मिता.
अगदी!!
छान सुरूवात
पाणबुडीची अंतर्गत माहिती
येउद्या
जबरदस्त !
भारीच
छान माहीती.
_/\_
In reply to _/\_ by टवाळ कार्टा
४८ तास
In reply to _/\_ by टवाळ कार्टा
पुढच्या भागांमध्ये जास्त
In reply to पुढच्या भागांमध्ये जास्त by सुबोध खरे
पुभालटा
जबरदस्त
वाचतोय.
हा भाग आवडला
..
खूपच माहितीपूर्ण
In reply to खूपच माहितीपूर्ण by पैसा
+१११
उत्तम माहिती, तुमचे लेख
पाणबुडी मध्ये हवा शुद्ध कशी ठेवतात Hypoxemia टाळण्यासाठी ?
In reply to पाणबुडी मध्ये हवा शुद्ध कशी ठेवतात Hypoxemia टाळण्यासाठी ? by चामुंडराय
आपण श्वास घेतो त्या हवेत
पाणबुडी बोटीसारखी हेलकावे
In reply to पाणबुडी बोटीसारखी हेलकावे by टवाळ कार्टा
पाणबुडी हो दंडगोलाच्या आकारात
In reply to पाणबुडी हो दंडगोलाच्या आकारात by सुबोध खरे
४५-६०डिग्री इतकी दोन्ही
In reply to ४५-६०डिग्री इतकी दोन्ही by सुबोध खरे
तेच म्हणतोय....पाणबुडी
In reply to तेच म्हणतोय....पाणबुडी by टवाळ कार्टा
पाणबुडी पाण्याखाली १० मीटर
भारीच.. भारताच्या क्षमतेविषयी
In reply to भारीच.. भारताच्या क्षमतेविषयी by लोनली प्लॅनेट
लोकप्रभा
अप्रतिम लेख !!!! पुढचा भाग
जबरदस्ज, वाचतोय ...
एक शंका
In reply to एक शंका by मराठी कथालेखक
पाणबुडी पाण्याच्या
अण्वस्त्रधारी उपग्रह
In reply to अण्वस्त्रधारी उपग्रह by मराठी कथालेखक
अण्वस्त्रधारी कृत्रिम उपग्रह
नेहमी प्रमाणेच सुंदर!
मस्त सर
वाचतेय.. सुरेख माहिती.
सापेक्ष आकारमान
वावा..
युद्धकाळात पाणबुडीतील
In reply to युद्धकाळात पाणबुडीतील by मार्मिक गोडसे
अगदी
In reply to अगदी by संग्राम
संपर्क यंत्रणेबद्दल पुढच्या
अर्जेंटिना "सॅन जुआन" नावाची
In reply to अर्जेंटिना "सॅन जुआन" नावाची by सुबोध खरे
पाणबुडी गेल्या तीन दिवसापासून
In reply to पाणबुडी गेल्या तीन दिवसापासून by अभिजीत अवलिया
हाच संपर्क तुटला आहे म्हणून
In reply to हाच संपर्क तुटला आहे म्हणून by सुबोध खरे
http://www.news.com.au/world
In reply to http://www.news.com.au/world by सुबोध खरे
http://www.news.com.au/world
वाचूनच श्वास दडपला भो ......
मस्त
In reply to मस्त by ट्रेड मार्क
पाणबुडीत एक ८ x १० फुटाची
In reply to पाणबुडीत एक ८ x १० फुटाची by सुबोध खरे
धन्यवाद, चांगली माहिती
छान माहिती..
पाणबुडीतील ४४ जणांच्या जिवंत