नेणिवेला जाणिवेने छेदता जे उरतसे
ते पुरे समजून घेणे कधिच का सोपे नसे?
या क्षणी ते स्तंभ भासे, शूर्प ते पुढच्या क्षणी
पाहू मी गजरूप कैसे, नेत्र माझे झाकुनी
कोणी त्या म्हणतात माया; वास्तवाचा विभ्रम
कोणी त्या म्हणती अविद्या; सर्जनोद्भव संभ्रम
वास्तवाचे रूप कैसे? कोण जाणे सर्वथा?
ज्ञेय-ज्ञाता भेद फिटता शेष आदिम शांतता
काव्यरस
वाचने
1798
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
सगळा या मेंदुतला केमिकल लोचा आहे....त्यामुळे..
प्रयत्नान्ती
In reply to सगळा या मेंदुतला केमिकल लोचा आहे....त्यामुळे.. by ज्ञानोबाचे पैजार
सुरेख. किती सुंदर शब्द
तुमचा हा प्रतिसाद, क्लिष्ट
In reply to सुरेख. किती सुंदर शब्द by प्राची अश्विनी
:)
In reply to तुमचा हा प्रतिसाद, क्लिष्ट by माहितगार
प्राची अश्विनी,