काय लिहावे तुझ्याचसाठी, मी घेऊन कागद तयार आहे
असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!
असेच होते हरेक वेळी, लिहायचे तर बरेच असते
चंद्र, तारे, नदी, कालवे सामावयाचे सारेच असते!
पण जशी लेखणी येते हाती, कुणास ठाऊक कोठे जाती
कागद राहतो तसाच कोरा अन शब्दही मजला सोडून जाती
मग राहतो मीच एकटा, पण सोबत करते तुझी आठवण
आठवणींच्या राज्यामधुनी तुझ्याच प्रेमाची साठवण
मग मिठीत घेईन म्हणतो तुजला, पण अंतर मधले फार आहे
हृदयापर्यंत पोहोचायासाठी, सध्या शब्दांचाच आधार आहे
दडी मारुनी बसले कोठे, मी इथे लाचार आहे
असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2833
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान... आवडली ..!!
हाहा! धन्यवाद विशुमित जी! :)
In reply to छान... आवडली ..!! by विशुमित
मस्त कविता ...
=)) आवडल्या दोन्ही कविता!
In reply to मस्त कविता ... by पगला गजोधर
भारी विडंबन! :D
In reply to मस्त कविता ... by पगला गजोधर
भन्नाट
In reply to मस्त कविता ... by पगला गजोधर
भन्नाट
In reply to मस्त कविता ... by पगला गजोधर
कविते ऐवजी विडंबनच भाव खाऊन गेलय
In reply to मस्त कविता ... by पगला गजोधर
आवडली.
मूळ कविता आणि विडंबन, दोन्ही
धन्यवाद अॅमी जी, प्राची
छान आहे.
मजेदार कविता !
असे लिहावे, तसे लिहावे, कसे
:)
In reply to असे लिहावे, तसे लिहावे, कसे by sayali
धन्यवाद जागु जी, स्नेहांकिता