Skip to main content

काय लिहावे तुझ्याचसाठी...

लेखक शब्दबम्बाळ यांनी बुधवार, 01/11/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
काय लिहावे तुझ्याचसाठी, मी घेऊन कागद तयार आहे असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे! असेच होते हरेक वेळी, लिहायचे तर बरेच असते चंद्र, तारे, नदी, कालवे सामावयाचे सारेच असते! पण जशी लेखणी येते हाती, कुणास ठाऊक कोठे जाती कागद राहतो तसाच कोरा अन शब्दही मजला सोडून जाती मग राहतो मीच एकटा, पण सोबत करते तुझी आठवण आठवणींच्या राज्यामधुनी तुझ्याच प्रेमाची साठवण मग मिठीत घेईन म्हणतो तुजला, पण अंतर मधले फार आहे हृदयापर्यंत पोहोचायासाठी, सध्या शब्दांचाच आधार आहे दडी मारुनी बसले कोठे, मी इथे लाचार आहे असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!
लेखनविषय:

वाचने 2833
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार आहे!>>> ==>> असे म्हणून आक्खी कविता लिहून मोकळे झालात की

मस्त कविता ... पण लगेच विडंबन करण्याचा मोह टाळता आला नाही... क्षमस्व -------------------------------------------- काय टायपावे तुझ्याचसाठी, मोबाईल तयार हाती राहे असे टायपावे , तसे टायपावे , की सरळ फॉरवडावे... विचार आहे! असेच होते हरेक वेळी, टायपावे तर बरेच वाटते बदाम किस दिल साऱ्याच ईमोजी सामावयाचे वाटते ! पण जसा मोबाईल येतो हाती, टॉवर कमी होऊन जाती सर्च रिजल्ट येतो कोरा जेव्हा सिग्नल सोडून जाती नेटपॅक लवकर संपे, मी इथे लाचार आहे गुगल नसता कसे लिहावे हा चिरंतर विचार आहे!

In reply to by पगला गजोधर

पण जसा मोबाईल येतो हाती, टॉवर कमी होऊन जाती सर्च रिजल्ट येतो कोरा जेव्हा सिग्नल सोडून जाती..

असे लिहावे, तसे लिहावे, कसे लिहावे विचार कसला करता हो... शब्द बोलूनी, भाव सांगूनी मन मोकळे करा हो... अटीतटीचा सामना एकदाच रंगून जाऊ द्या हो.... उत्तर काहीही असले तरीही मन शुध्ह होऊन जाईल हो...