प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी.
https://www.misalpav.com/node/41232

तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत..... गोव्याच्या समुद्रकिनार्यावर पॅरासेलींगचा आनंद लुटताना तरुणी.
Making of photo and status :
हा फोटो मी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काढला होता. फोटोमध्ये आकाशात उंचावर पॅराशूटला लटकलेली दिसते ती माझी मुलगी आहे. खरं तर एका फोटोत सर्व गोष्टींचा अंतर्भाव व्हावा म्हणून मी तो थोडा एडिट केला आहे. डावीकडे समुदकिनारा आणि वाळूवर रमलेली माणसं, उजवीकडे अथांग समुद्र, वरती निळेभोर आकाश आणि त्यावर तरंगणारे कापसासारखे दिसणारे पांढरे ढग. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दिसणारे पॅराशूट हा मूळ फोटो आहे. त्यामध्ये पॅराग्लायडिंगकरीता सुरक्षिततेची साधने मुलीच्या शरीराला बांधतानाचा दुसरा फोटो इन्सर्ट केला आहे. आणि मग मुलगी आकाशात किती उंचावर गेलेली आहे, हे सांगायला बाण वगैरे दाखवण्याचे त्यावर संस्कार केले आहेत.
पॅराशूटने माझी मुलगी आकाशात अंदाजे पंधरा माळेतरी उंचावर गेली होती. एकुलती एक असूनसुद्धा, धोका पत्करून आम्ही तिला उंच आकाशात विहारण्याचा आनंद लुटण्यास प्रोत्साहन दिले. त्यावरून मला वरील स्टेटस बनवावेसे वाटले, की माझ्या मुली! तू तुझ्या आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत याची आम्ही तुला खात्री देतो.
--- सचिन काळे.
माझा ब्लॉग : https://sachinkale763.blogspot.in
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो छान आहे.
फोटो छान आहे.
धन्यवाद!
In reply to फोटो छान आहे. by अमरेंद्र बाहुबली
@ अमरेंद्र बाहुबली, धन्यवाद!
मिप्रप्र.
मिपाकरांच्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.;)
हो!
In reply to मिप्रप्र. by प्राची अश्विनी
@ प्राची अश्विनी, हो! मीसुद्धा!!! :स्मित:
का? का?? का???
छळताय असे???
माफी असावी
In reply to का? का?? का??? by दिपक.कुवेत
@ दिपक.कुवेत, का? छळताय असे??? >>> माझा असा काही उद्देश नाही हो!!! माफी असावी.
सचिन जी
In reply to माफी असावी by सचिन काळे
आय मीन असे छान छान फोटो टाकून आणि त्याचं स्टेटस देउन का छळताय असे म्हणायचं आहे......
मला माफ़ करा.
In reply to सचिन जी by दिपक.कुवेत
@ दिपक.कुवेत, मला माफ करा, माझा गैरसमज झाला म्हणून तसा प्रतिसाद दिला. माझ्या मालिकेचे कौतुक केल्याबद्दल आपले फार फार आभार.
छान आहे फोटो ...
छान अभिमान वाटला तुमचा...
आता परत पुढल्या रविवारची वाट पाहाणं आलं. :-(
धन्यवाद!
In reply to छान आहे फोटो ... by बाजीप्रभू
@ बाजीप्रभू, धन्यवाद!!
मस्त !!
फोटो आवडला . मयुरीची भरारी !
स्टेटस आधी चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला, मग गद्य आहे हे लक्षात आले. :-)
picture-in-picture पण आवडले.
येउ द्या अजून
धन्यवाद!
In reply to मस्त !! by आवडाबाई
@ आवडाबाई, आपण देत असलेल्या प्रोत्साहनाकरिता मी आपला अत्यंत आभारी आहे.
वाह वाह
धोका पत्करून आपल्या ह्रदयावर दगड ठेवून एकुलत्या एक मुलीच्या पंखाना बळ देण्याचे आपण जे धाडस दाखवलंत त्याला माझा मनःपूर्वक सलाम.
तुमच्या स्टेटसची एक आठवडाभर वाट पाहणे हा माझ्यासारख्या चाहत्यावरील अन्याय आहे. तरी आपण या स्टेटसला रविवारी सकाळी 9 वाजता असा मुहूर्त न ठेवता आपल्या सौंदर्यदृष्टीला जे नजरेस पडेल, आपल्याला ज्यावर भाष्य करावेसे तेव्हा ते लगेच करा अशी माझी नम्र विनंती.
मीही तेच सांगितलं मागच्या
In reply to वाह वाह by सतिश गावडे
मीही तेच सांगितलं मागच्या भागात पण काळे साहेब आम्हा गरिबांच्या विनंतीला मान देणार नाहीत.
स्मित
In reply to मीही तेच सांगितलं मागच्या by अमरेंद्र बाहुबली
:स्मित:
धन्यवाद!
In reply to वाह वाह by सतिश गावडे
@ सतिश गावडेजी, मुलीच्या पंखाना बळ देण्याचे आपण जे धाडस दाखवलंत >>> धन्यवाद!
आपल्या सौंदर्यदृष्टीला जे नजरेस पडेल, आपल्याला ज्यावर भाष्य करावेसे तेव्हा ते लगेच करा >>> जरूर सर!!! प्रोत्साहन देण्याकरिता आपले आभार. :स्मित:
+१ . सहमत .
+१ . सहमत . असेच वेगवेगळ्या विषयांवरील कल्पक फोटो येउ देत .
धन्यवाद!
In reply to +१ . सहमत . by सिरुसेरि
@ सिरुसेरी, प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार!
आयुष्यात मोठे होण्याकरिता
आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत
हे आवडले.
धन्यवाद!
In reply to आयुष्यात मोठे होण्याकरिता by जागु
@ जागु, धन्यवाद!
भारी
स्टेटस् आणि फोटो
धन्यवाद!
In reply to भारी by mr.pandit
@ mr.pandit, धन्यवाद!!