Skip to main content

Making of photo and status : ५. गगनभरारी!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 05/11/2017 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना : ज्यांची प्रस्तावना वाचायची राहून गेली असेल, त्यांनी ती वाचण्याकरिता कृपया खाली दिलेल्या लिंकवर हळुवारपणे टिचकी मारावी. http://www.misalpav.com/node/41232 तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत..... गोव्याच्या समुद्रकिनार्यावर पॅरासेलींगचा आनंद लुटताना तरुणी. Making of photo and status : हा फोटो मी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर काढला होता. फोटोमध्ये आकाशात उंचावर पॅराशूटला लटकलेली दिसते ती माझी मुलगी आहे. खरं तर एका फोटोत सर्व गोष्टींचा अंतर्भाव व्हावा म्हणून मी तो थोडा एडिट केला आहे. डावीकडे समुदकिनारा आणि वाळूवर रमलेली माणसं, उजवीकडे अथांग समुद्र, वरती निळेभोर आकाश आणि त्यावर तरंगणारे कापसासारखे दिसणारे पांढरे ढग. आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर दिसणारे पॅराशूट हा मूळ फोटो आहे. त्यामध्ये पॅराग्लायडिंगकरीता सुरक्षिततेची साधने मुलीच्या शरीराला बांधतानाचा दुसरा फोटो इन्सर्ट केला आहे. आणि मग मुलगी आकाशात किती उंचावर गेलेली आहे, हे सांगायला बाण वगैरे दाखवण्याचे त्यावर संस्कार केले आहेत. पॅराशूटने माझी मुलगी आकाशात अंदाजे पंधरा माळेतरी उंचावर गेली होती. एकुलती एक असूनसुद्धा, धोका पत्करून आम्ही तिला उंच आकाशात विहारण्याचा आनंद लुटण्यास प्रोत्साहन दिले. त्यावरून मला वरील स्टेटस बनवावेसे वाटले, की माझ्या मुली! तू तुझ्या आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत याची आम्ही तुला खात्री देतो. --- सचिन काळे. माझा ब्लॉग : http://sachinkale763.blogspot.in
लेखनविषय:

वाचने 5363
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by दिपक.कुवेत

@ दिपक.कुवेत, मला माफ करा, माझा गैरसमज झाला म्हणून तसा प्रतिसाद दिला. माझ्या मालिकेचे कौतुक केल्याबद्दल आपले फार फार आभार.

आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत
छान अभिमान वाटला तुमचा... आता परत पुढल्या रविवारची वाट पाहाणं आलं. :-(

फोटो आवडला . मयुरीची भरारी ! स्टेटस आधी चालीत म्हणण्याचा प्रयत्न केला, मग गद्य आहे हे लक्षात आले. :-) picture-in-picture पण आवडले. येउ द्या अजून

धोका पत्करून आपल्या ह्रदयावर दगड ठेवून एकुलत्या एक मुलीच्या पंखाना बळ देण्याचे आपण जे धाडस दाखवलंत त्याला माझा मनःपूर्वक सलाम. तुमच्या स्टेटसची एक आठवडाभर वाट पाहणे हा माझ्यासारख्या चाहत्यावरील अन्याय आहे. तरी आपण या स्टेटसला रविवारी सकाळी 9 वाजता असा मुहूर्त न ठेवता आपल्या सौंदर्यदृष्टीला जे नजरेस पडेल, आपल्याला ज्यावर भाष्य करावेसे तेव्हा ते लगेच करा अशी माझी नम्र विनंती.

In reply to by सतिश गावडे

मीही तेच सांगितलं मागच्या भागात पण काळे साहेब आम्हा गरिबांच्या विनंतीला मान देणार नाहीत.

In reply to by सतिश गावडे

@ सतिश गावडेजी, मुलीच्या पंखाना बळ देण्याचे आपण जे धाडस दाखवलंत >>> धन्यवाद! आपल्या सौंदर्यदृष्टीला जे नजरेस पडेल, आपल्याला ज्यावर भाष्य करावेसे तेव्हा ते लगेच करा >>> जरूर सर!!! प्रोत्साहन देण्याकरिता आपले आभार. :स्मित:

आयुष्यात मोठे होण्याकरिता कितीही मोठे धोके पत्कर. नवीन नवीन आव्हाने स्वीकार. मग भलेही त्यात अपयश आले तरी बेहत्तर, आम्ही आईबाप कायम तुझ्या पाठीशी उभे असणार आहोत हे आवडले.