Skip to main content

हे सव्यसाची,

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 23/10/2017 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
खुणावतील तुला जटिल गणिते- विश्वाच्या महास्फोटी प्रसववेणांची हाकारतील तुला कोडी- * विस्कळखाईत क्षणोकणी होणार्‍या विश्वाच्या अटळ अंताची# या अपार भूतभविष्यादरम्यान लीलया झेपावणारा तुझ्या प्रज्ञेचा झोका कुठे खिळवलाय, हे सव्यसाची? तो इथेय बघ, निळ्या पाखरपंखावर अथक थिरकणार्‍या क्षणभंगूर वर्तमानात (*entropic end of the universe#)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1014
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

वाह!!!
तो इथेय बघ, निळ्या पाखरपंखावर
मस्त!! सव्यसाची का(कुठला पुराणातला संदर्भ आहे का?)?

  • सव्यसाची (= दोन्हीपैकी कोणत्याही हाताने एखादी क्रिया सारख्याच सफाईने करणारा/री) हे धनुर्धर अर्जुनाचे एक नाव होते.
  • इथे मात्र हे संबोधन "unusually skillful ,versatile"या अर्थाने उत्तुंग प्रतिभेच्या मानवाला उद्देशून मी वापरलंय.