Skip to main content

ताज्या घडामोडी - १२

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 25/09/2017 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
चालू धाग्यात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा

वाचने 38918
प्रतिक्रिया 197

प्रतिक्रिया

In reply to by अमितदादा

लेख पटला..
पण इतर धर्मांच्या, विशेषतः इस्लामच्या विरोधात काहीही लिहिले तर त्याचे परिणाम हिंसेत होतात आणि तरीही त्याविरुद्ध पारंपारिक माध्यमे ब्र काढत नाहीत. केरळमध्ये प्राध्यापक टी.जे.जोसेफ यांच्या हाताचा पंजा काही मुसलमान धर्माधांनी छाटून टाकला. एका प्रश्नपत्रिकेत प्रेषितांविषयी वादग्रस्त प्रश्न विचारल्याबद्दल इस्लामी धर्माधांनी जोसेफ यांच्यावर हा हल्ला केला. पी एफ आय ह्या इस्लामी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. या संघटनेची दहशत केरळमध्ये इतकी आहे की टी.जे.जोसेफ ह्यांच्या पाठीशी ना सरकार उभे राहिले, ना चर्च. या प्रकारानंतर निराश होऊन त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली. एका संपूर्ण कुटुंबाची अशी वाताहत होऊनदेखील देशातला लिबरल मीडिया जोसेफ यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मागे महाराष्ट्रात एका वृत्तपत्राने आयसिसला पैसे कुठून येतात, हे दाखवण्यासाठी नुसतं "पिगी बॅंक' हे रेखाचित्र वापरलं होतं तर इस्लामी कट्टर संघटनांनी या वृत्तपत्राच्या औरंगाबाद कार्यालयावर मोर्चा आणला आणि संपादकांनी सपशेल शरणागती पत्करून माफी मागितली. तेव्हा या वृत्तपत्राने माफी मागणं चूक आहे, असं म्हणण्याचं धाडस स्वतःला "पुरोगामी विचारवंत' म्हणवणाऱ्या किती लोकांनी दाखवलं? कोलकत्त्याच्या टेरेसांना मिळालेल्या तथाकथित संतपदाच्या विरोधात अग्रलेख लिहीण्याचे धाडस दाखवणाऱ्या मराठी वृत्तपत्रावर छापलेला अग्रेलख "मागे घेण्याची' नामुष्की ओढवली. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनाही माफी मागावी लागली. पण त्यांच्या बाजूने त्यांच्याच व्यवसायातले किती लोक बोलले?
:((

In reply to by अमितदादा

अमितदादा, खरंतर जुनी काँग्रेस अतिसौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी होतीच. सरदार पटेलांनी स्वातंत्र्योत्तर काळात सोमनाथाचं मंदिर जीर्णोद्धार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९७१ साली पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा काँग्रेसला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श प्रस्थापित करायची सुवर्णसंधी होती. इंदिरा गांधी यांचं खरं नाव मैमुना बेगम खान. तर एक मुस्लीम महिला भारताच्या ५००० वर्षांच्या विजयाचा इतिहास सांगते आणि मुस्लीम राष्ट्राचे दोन तुकडे करते हा हिंदू अस्मितेचा विजय आहे. या विजयाच्या भक्कम पायावर पाकिस्तानचा वैचारिक पराभव करणं सहज शक्य होतं. मात्र काँग्रेसकडून ते झालं नाही. शीखांना दुखावल्यावरून इंदिरा गांधींची हत्या झाली. पुढे राजीव गांधींना प्रचंड बहुमत मिळूनही शाहबानो प्रकरणात मुल्लामौलवींसमोर सपशेल लोटांगण घातलं. अशा प्रकारे हिंदू सदिच्छांची विल्हेवाट लावण्यात आली. भारतातल्या बुद्धीजीवी वर्गाचा एक लाडका सिद्धांत आहे. तो म्हणजे मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन करतात. आणि दुसरा लाडका सिद्धांत म्हणजे हिंदू मतदार नेहमी विखुरलेला असतो. या दोन सिद्धांतांवर विसंबून मुस्लिमांची अधिकाधिक मते मिळवण्याच्या हव्यासातून काँग्रेस आणि सेक्युलर पक्षांकडून हिंदूंना दुखावणं सुरू झालं. १९८९ ते २००९ या वीस पंचवीस वर्षांच्या कालावधीत हे चित्रं जरी सर्वसामान्य असलं तरी या दोन्ही सिद्धांतांना पुरून उरेल असा प्रचार करता येऊ शकतो. तसा मोदींनी केला. हिंदूसुद्धा एकगठ्ठा मतदान करू शकतात हे काँग्रेसच्या हळूहळू ध्यानी येऊ घातलंय. हे सुचिन्ह आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by II श्रीमंत पेशवे II

पेशवे , गा पै टणाटण प्रभात वाचतात आणि तुम्ही असली खतरनाक पुस्तके वाचता..! त्याखाल्लाच्या कंमेंट्स तर लाजवाब,,,, ... चरणामृत द्या, आमच्या मस्तकावर शिंपडतो.

In reply to by विशुमित

विशुमित, गरजूंसाठी खालील श्लोक म्हणतो आहे : सर्वेऽपि सुखिन: सन्तु सर्वे: सन्तु निरामया: सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात (वरील श्लोकात कृपया चूक भूल देणे घेणे.) कोणाला कसली गरज पडेल ते सांगता येत नाही. पहाटे पहाटे काय टणाटण होतं ते सगळ्यांना ठाऊक आहे. पण मिपावरील काही लोकांचं ते होताहोता होत नाही. म्हणून हे लोकं 'टणाटण प्रभात' असा टाहो फोडीत हिंडत असतात. तुम्ही त्यांच्यातले होऊ नका. अशा वंचितांसाठी वरील श्लोक म्हंटला आहे. कृपया वैयक्तिक रीत्या घेऊ नये. धन्यवाद! आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ओके.. आम्ही कोणाच्याच बाजूचे नाही. जे स्वतःला नाही पटत त्यावर बोलणारच भले दुसऱ्याला पटो अगर न पटो... बिलकुल वैयिक्तक घेणार नाही. बाकी तुमच्या आवडीनिवडीचा आदर आहेच

In reply to by II श्रीमंत पेशवे II

फिरोझ गांधी बाबत सुरुवात चुकीची आहे, मी पुढे काही वाचले नाही. फिरोझ गांधी हे गांधी म्हणूनच जन्माला आले होते. खान नाही. ते जन्माने पारशी होते, त्यांचे आई आणि वडील दोघे पण पारशी होते. विकी दुआ मी विकी वर अशा गोष्टींबाबत जास्त विश्वास ठेवतो कारण मला त्या पुस्तकाच्या सत्यतेची खात्री नाही. तिकडे कोणतेही विश्वासार्ह संदर्भ नाहीत. विकी वर संदर्भ दिले आहेत. तिथे लोक सतत बघत/ संपादित करत असतात.

In reply to by अनन्त अवधुत

मी थोडीशी वेगळी हकीकत वाचली आहे. फिरोज गांधींचे मूळचे आडनाव घँडी असे होते. फिरोज मुस्लिम असल्याने इंदिराजींनी त्यांच्याबरोबर लग्न करण्यास नेहरूंचा विरोध होता. गांधीजींना धर्माच्या कारणावरून केलेला विरोध मान्य नव्हता. शेवटी गांधीजींनी फिरोजना स्वतःच्या मांडीवर बसवून दत्तक घेतले व त्यामुळे त्यांना स्वतःचे गांधी आडनाव दिले. त्यानंतर ते लग्न झाले. खरेखोटे खुदा जाने.

In reply to by श्रीगुरुजी

त्यामुळे फिरोज यांनी गांधी आडनाव वापरायला सुरुवात केली असे मी पण वाचले आहे. पण त्याला कसलाही विश्वास ठेवण्याजोगा पुरावा/ संदर्भ नाही.

In reply to by अमितदादा

लेखात लिहिलेली परिस्थिती खूप विचार करायला लावणारी आहे. पण हा लेख चक्क सकाळ सारख्या कॉंग्रेस धार्जिण्या वर्तमानपत्रात पाहून जरा धक्का बसला.

मुस्लीम नेहमी एकगठ्ठा मतदन करतात. या गैरभाजप पक्षीयांच्या आवडत्या गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला आहे. जवळ जवळ २० टक्के मुसलमान मतदार असलेल्या उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता भाजप ला एक हाती विजय मिळाल्यामुळे इतर सर्व पक्ष बावचळल्यासारखे झाले आहेत.

बरोबर यामुळे मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात या गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला, तसेच उत्तर प्रदेशात एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट न देता आणखी एका गृहीतकाला उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत सुरुंग लागला तो म्हणजे सबका साथ सबका विकास.

In reply to by अमितदादा

कसा काय बुवा? उलट तिहेरी तलाकच्या विरुद्ध जागृती घडवून विवाहित मुस्लिम स्त्रियांना दिलासा दिला आहे. -गा.पै.

In reply to by मार्मिक गोडसे

परदेशी पर्यटक असोत वा देशातले. उप्र मध्ये जातातच ते मुळी ताजमहाल पहायला. पर्यटनविषयक बुकलेटमधून ताजमहाल हटवणे म्हणजे फार मोठा हिंदुत्ववादी निर्णय आहे असं योगीला वाटत आहे. ताजमहाल भारतीय संस्कृतीचा भाग नाही असेदेखील तो म्हणाला होता. पण ह्या असल्या करंटेपणामुळे ना ताजमहालच्या सौंदर्यावर काही फरक पडेल ना लोकांच्या ताजमहालवरच्या प्रेमावर. ताजमहाल बांधला हिंदू(बहुतांश) कारागिरांनी, हिंदूंच्या(बहुतांश) कराच्या पैशातून. ताजमहाल हिंदू आणि मुस्लिम स्थापत्यकलेच्या संगमातून निर्माण झाला. असे असताना निव्वळ वेडगळ द्वेशातून असली चिंधीगिरी करणं टिपीकल योगीइश आहे.

In reply to by पुंबा

सौरा, ताजमहाल शहाजहानने बांधला असा प्रवाद प्रचलित आहे. तो हिंदू प्रासाद आहे हे मान्य करणं अवघड. म्हणून त्याला विस्मृतीत ढकलायची योजना दिसते आहे. एकदा का लोकं विसरले की हळूच हिंदू मुळं शोधून प्रस्थापित करायची अशी व्यूहरचना दिसते आहे. आ.न., -गा.पै.

http://www.loksatta.com/mumbai-news/electricity-shortage-in-maharashtra… वरील बातमित एका ठीकाणी असे म्हटले आहे की "मात्र, मुंबईत वीजकपात होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. " असे का ? http://epaper.loksatta.com/1383575/indian-express/06-10-2017#page/11/2 वरील बातमित एका ठीकाणी असे म्हटले आहे की मुलुंड , भांडुप मधे दोन तीन तासाहुन अधिक भार नियमन करावे लागले . हीच दोन ठीकाणे का निवडली ? एकंदरीत भार नियमनाचे निकष काय आहेत ?

In reply to by मराठी_माणूस

चेपुवर रात्री धिंगाणा चालला होता की राज ठाकरेंचे भाषण कोणी टीव्हीवर पाहू नये म्हणून अख्या महाराष्ट्राची लाईट गुल केली आहे. प्रत्येक्षात हे भानियमन आहे हे आज समजले. --- आमच्या कडे काल १६ तास वीज नव्हती. आज सकाळी ८ वाजता गेलेली वीज दुपारी २ वाजता आली आहे आणि पुन्हा ४.३० वाजता जाऊन रात्री १०.३० वाजता येईल असा सांगावा धाडला आहे वीज मंडळाने (व्हाट्सअप ग्रुप वर). ऑक्टोबर हिट ने लहान मुले बेजार झाली आहेत. मोठ्या लोकांना कट काढता येईना ते लहान मुले काय सहन करणार! --- पण लहान थोरांनी हा त्रास सहन केलाच पाहिजे. देशासाठी एवढे सोसू शकत नाही म्हणजे काय ? ६० वर्ष सोसले मग आता सोसले म्हणून काय झाले? ---- राज्यात कृत्रिम वीज तुटवडा कसा निर्माण केला जातो आणि महागडी वीज विकत घेऊन कसे कंपन्यांचा फायदा करून दिला जातो, याचं विश्लेषण सध्याचे मिस्टर क्लीन चिटर अगोदर घसा फाटेपर्यंत करत असायचे. पण त्यांच्या दृष्टीने आता हा प्रश्न फालतूच! दखलपात्र सुद्धा नाही!

In reply to by विशुमित

शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी आता १८००० कोटींच्या पलिकडे गेली आहे. भारनियमन अटळ आहे. शेतकऱ्यांच्या थकबाकीचे परिणाम इतरांना सुद्धा सहन करावे लागणार.

In reply to by श्रीगुरुजी

शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची थकबाकी आता १८००० कोटींच्या पलिकडे गेली आहे. भारनियमन अटळ आहे. भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे? मुळात ही थकबाकी झालीच कशी?

In reply to by मार्मिक गोडसे

भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे?>> ==>> त्यांच्या कडे सुपीक डोके आहे. मुळात ही थकबाकी झालीच कशी?>> ==>> गांजा पिउन काम करत असतील या खात्यातील लोक. त्यात त्यांची तळी उचलायला YZ लोक आहेतच शेतकऱ्यांवर बिल फाडायला. ह्यांच्या कडे लाईट आहे ना, यांच्या बुडाला गार लागले ना मग मरु देत बाकी जनता. चाटूगिरी काय सोडणार नाहीत.

In reply to by विशुमित

शेतकर्‍यांना पेटवायला बरेच 'जाणते', 'नेणते' राजे आणि बच्चे आहेत. बिल थकविणार्‍यांच्या मागे राजकीय वरदहस्त असल्याने महामंडळ फारशी कारवाई करू शकत नाही. महामंडळाने कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर अधिकार्‍यांना मारहाण करून पळवून लावणे, कार्यालयात कोंडून ठेवणे अशी गुंडगिरी चालते. आमच्याकडे वीज आहे कारण आम्ही बिले वेळेवर भरतो. आपण वीज वापरली तरी बिल भरायचे नाही व आपल्या थकलेल्या बिलाची रक्कम इतर करदात्यांच्या करातून/शुल्कातून वसूल करायची असले प्रकार आम्ही करीत नाही.

In reply to by मार्मिक गोडसे

भारनियमन केल्याने थकबाकी कशी वसूल होणार आहे?
१० पोळ्या खाल्ल्याने अतिसेवन झाल्याने जेवण थांबवले असं ते विधान आहे. जेवण थांबल्याने अतिसेवन कसं जाणार हा प्रश्न असयुक्तिक आहे.
मुळात ही थकबाकी झालीच कशी?
त्यावेळेस आपण वेताचे फोक घेऊन चौकात नव्हतात. तेव्हा आपल्या लाडक्या मनमोहन सिंग यांच्या प्रणित सरकारांनी कितीही थकबाकी झाली तरी शेतकर्‍यांची वीज कापायची नाही असा नियम केला. आता तुम्हाला म्हणायला आवडेल कि आता तर तुमचे (आमचे आवडते) सरकार आहे, त्यांनी लाड का चालू ठेवले? तर त्याचं कायय, आमच्या लाडक्या सरकारने जर पैल्याच दिवशी मागचे सगळे कायदे कानून रद्द केले असते तर वेताच्या फोकासोबत तुम्ही आजून काय काय घेऊन चौकात थांबला असतात. =============================== अजाण लोकांनी वेताचे फोक काय प्रकरण आहे हे जाणण्यासाठी "ये अच्छी बात नहीं है" ही पोस्ट वाचावी.

In reply to by arunjoshi123

12 तास भार नियमन?? ... याला फक्त शेतकऱ्यांची थकबाकीच कारणीभूत आहे हे कोणत्या आधारावर ठरवले प्रतिसाद कर्त्याने ? --- आम्ही इथल्या वीज कर्मचाऱ्यांना विचारले तर कमी वीज निर्मिती कारण आहे हे उत्तर मिळाले. --- मागच्या सरकारची सारंगी वाजवणे बंद करा. --- लाईट नसल्यामुळे होणारे नुकसानाने प्रतिसाद कर्त्याच्या पितरांचे काय जाणार आहे ? --- किती ही पदर घेतले तरी मकेच्या कंसासारखी उघडी राहणारच आहेत. ते काय तुम्ही झाकू शकत नाही. तुमची गोलगोल चर्चा चालू द्यात.

In reply to by विशुमित

उत्पन्न कमी झाले की आपोआप उत्पादन कमी होते. आपण भरपूर वीज वापरून सुद्धा वापरलेल्या विजेची किंमत दिली नाही तर निदान आपल्या पितरांचे तरी काहीही जाणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

काय बंडल मारताय! ही घ्या लोड शेडींग ची कारणे. त्यात कुठे ही शेतकरी थकबाकीचा उल्लेख नाही आहे. तुमची उघडली पडली आहेत. ती झाकण्यासाठी तुम्ही अजून १० पदर ओढणार यात तिळमात्र शंका नाही. --- http://www.mahadiscom.in/interpole_upload/DAS_and_LS.pdf

In reply to by विशुमित

कोणत्याही देशात वेगवेगळ्या प्रकारची जनता असते. एखाद्या शहरातील सर्वच जण एकाच परिस्थितीत नसतात. शहरातील काही भागातील नागरिक शहरासाठी व देशासाठी कररूपाने भरपूर महसूल देतात. याउलट काही भागातून होणारे करसंकलन फारसे नसते. त्यामुळे शहरातील नगरपालिका शहरावर जो खर्च करते त्यातील बराचसा भाग हा कररूपाने भरपूर योगदान देणार्‍या भागासाठी वापरला जातो व ज्या भागातून फारसे उत्पन्न नाही त्या भागासाठी खर्च करताना हा आखडता घेतला जातो. अर्थात हे धोरण लिखित स्वरूपात नसते, परंतु तरीही ते राबविले जाते. त्यामुळेच उदाहरणार्थ न्यूयॉर्क सारख्या शहरात अगदी कमी उत्पन्न असलेल्या भागातील रस्ते, स्वच्छता इ. फारशी चांगली नसते कारण या भागातून करसंकलन फारसे होत नाही व त्यामुळे नगरपालिका या भागातील सोयीसुविधांवर पैसे खर्च करताना हात आखडता घेते. महाराष्ट्रात शेतकरी खेडोपाडी पसरले आहेत. शहरातून साधारणपणे नोकरी, व्यवसाय करणारेच जास्त प्रमाणात आहेत. शहरात राहणार्‍या सर्वसामान्य नागरिकाला वीजबिल थकविणे खूप अवघड असते. सलग २ महिन्यांचे बिल भरले नाहीत तर तिसर्‍या महिन्यात वीजजोडणी खंडित केली जाते. त्यामुळे शहरातून वीजबिल भरण्याचे प्रमाण बरेच जास्त आहे. खेड्यात बहुसंख्य शेतकरी आहेत. २-३ महिन्यापूर्वी आलेल्या अहवालानुसार ९०% शेतकर्‍यांची वीजबिले थकीत असून एकूण थकीत आकडा १८,००० कोटी रूपयांच्या वर गेला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा वीजेच्या मागणीपेक्षा पुरवठा कमी पडतो, तेव्हा भारनियमन खेड्यातून जास्त प्रमाणात केले जाते. याचे कारण म्हणजे शहरातील ग्राहकांकडूनच बर्‍याच प्रमाणात वीजबिलांची वसुली होते व त्यामुळे त्यांना कमी त्रास व्हावा हा उद्देश असतो. खेड्यातून थकबाकीचे प्रमाण खूप जास्त असल्याने भारनियमनाचा बराचसा भार त्यांच्यावरच थोपला जातो. वर लिहिल्याप्रमाणे न्यूयॉर्कसारख्या शहरात ज्या भागातून करसंकलन कमी आहे तिथे सुविधांवर फारसा खर्च केला जात नाही व जिथून मोठ्या प्रमाणात कर मिळतो त्या भागांमध्येच बहुतांशी सुविधा दिल्या जातात. हे धोरण लिखित स्वरूपात नसते, परंतु सर्वत्र ते असेच राबविले जाते. वीज महामंडळाने अधिकृत कारणे कोणतीही दिली तरी जेव्हा भारनियमनाची वेळ येते तेव्हा जास्त भारनियमन खेड्यातून केले जाते व शहरात होणारे भारनियमन तुलनेने कमी असते. याचे कारण वर दिल्याप्रमाणेच आहे.

In reply to by विशुमित

IT सेल बंद झाल्यापासून ते काहीबाही बरळू लागले आहेत. शेतकरी हा त्यांचा लाडका शत्रू असल्याने लाडक्या सरकारच्या अपयशाला शेतकऱ्यास जबाबदार ठरवायचे हा ह्यांचा लाडका खेळ झाला आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

हा आयटी सेल वगैरे नक्की काय आहे याची आम्हास कल्पना नाही. सध्याचे सरकार आमचे लाडके आहे व ते अपयशी नसून चांगलेच यशस्वी आहे. या सरकारवर भुंकणारे कोणकोण आहेत हे पाहिले की सरकार किती यशस्वी आहे हे लगेच समजते. मुळात सरकार यशस्वी असल्याने अपयशास शेतकरी किंवा इतर कोणालाही जबाबदार असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

या सरकारवर भुंकणारे कोणकोण आहेत हे पाहिले की सरकार किती यशस्वी आहे हे लगेच समजते. हे ही आता यशस्वी सरकारवर भुंकायला लागलेत.

In reply to by arunjoshi123

आमच्या लाडक्या सरकारने जर पैल्याच दिवशी मागचे सगळे कायदे कानून रद्द केले असते तर वेताच्या फो तूकासोबत तुम्ही आजून काय काय घेऊन चौकात थांबला असतात अच्छा म्हणजे कायदा - सुव्यवस्था राखण्यात 'लाडके सरकार ' अपयशी ठरले असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

In reply to by मार्मिक गोडसे

प्रयत्न करून पहा. असा अनेकांनी आजवर प्रयत्न केला. पण ते स्वतःच कोठे भिरकावले गेले हे समजले सुद्धा नाही.

In reply to by विशुमित

एखाद्या नीच/वाईट/कु (जे काय ते) वृत्तीचे समर्थन करण्यात भला आमचा काय फायदा असू शकतो? काय प्रेरणा असू शकते? =================== यात असं देखिल आहे का कि मोदी हे कुप्रवृत्तींत मोडतात आणि असं ज्ञान आम्हाला आहे तरी पण आम्ही असं करतो? मंजे आमच्यात वृत्ती आणि बुद्धी दोन्हींचा प्रोब्लेम आहे का फक्त बुद्धीचा?

In reply to by विशुमित

मागो शेठ कुठे नादी लागता यांच्या, हे सगळे "फेकू" समर्थक आहेत. आयुष्यभर भ्रष्टाचार करणार्‍या व जातीय विद्वेषाच्या काड्या लावणार्‍यांचे "राजा"चे आंधळे भक्त असण्यापेक्षा कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार न करता देशाला पुढे नेण्यासाठी अहोरात्र काम करणार्‍या व्यक्तीचे समर्थक असणे कधीही अनेक पटीने चांगले.

In reply to by श्रीगुरुजी

पहिले भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करा मग मनातला कंड शमवा..!! राहिला प्रश्न भक्तीचा,वयक्तिक आयुष्यात मी जरी पवार समर्थक (तुम्ही भक्त म्हणा, मला फरक पडत नाही) असलो तरी मिपावर मी पवार/राष्ट्रवादी समर्थक म्हणून प्रतिक्रिया देत नाही ना माझी भक्ती इतरांवर लादत असतो. मिपाचा वापर करून लोक कोण्या पक्ष्याचे मीडिया सेल चालवतात हे जगजाहीर झाले आहे. स्वतः अहोरात्र कष्ट उपसणाऱ्याचे समर्थक आहेत हे पण डिकलर केलेत. फक्त त्यांची तळी उचलण्यापूर्वी इतरांवर बेछूट आरोप करणे आणि तुमच्या अवतारी देवाचा नाकर्तेपणा इतरांवर लादू नका ही कळकळीची विनंती..!!

In reply to by विशुमित

आमच्या मनात कंड वगैरे अजिबात नाही. असलाच तर तो तुमच्याच मनात असेल. चिक्की घोटाळा, तूर घोटाळा वगैरेंचा वर उल्लेख झाला तेव्हा मी हेच म्हणत होतो की पत्रकार परीषदेत किंवा विधानसभेत भ्रष्टाचारांचे आरोप करण्यापेक्षा न्यायालयात जा व आरोप सिद्ध करा. इथे तुम्हीही तेच म्हणत आहात. माझे म्हणणे तुम्हाला पटलेले दिसते. बाकी मी पवारांचे नाव घेतले नाही तरीसुद्धा तुम्हाला ते बरोबर समजलेले दिसते. नाव घेण्याची आवश्यकताच नसते. महाराष्ट्रातील सर्वाधिक भ्रष्टाचारी व सर्वाधिक जातीय विद्वेषाच्या काड्या टाकणारी व्यक्ती कोण हे नाव न सांगताही सर्वांच्या लक्षात येते. बादवे, "पूर्वी छत्रपती पेशव्यांची नेमणूक करायचे. पण आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करतात." अशी जातीय काडी काही महिन्यांपूर्वी टाकून आग भडकाविण्याचा प्रयत्न करणारे एक थोर, "जाणते" नेते ३-४ दिवसांपूर्वीच सातारा-कराड या भागात राजकीय भूकंप करण्यासाठी गेले होते (मुंगीने उडी मारल्यावर जितकी जमीन हादरेल तितकी जमीनसुद्धा या भूकंपाने हादरली नाही हे अलाहिदा). त्यावेळी त्यांच्या गाडीचे सारथ्य छत्रपती करीत होते. पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक करण्याच्या तुलनेत छत्रपतींना सारथी बनविणे हे जास्त अवमानकारक नाही का?

In reply to by श्रीगुरुजी

आमच्या मनात कंड वगैरे अजिबात नाही. >> ==>> मग चांगले आहे. बाकी मी पवारांचे नाव घेतले नाही तरीसुद्धा तुम्हाला ते बरोबर समजलेले दिसते. नाव घेण्याची आवश्यकताच नसते. >> ==>> मी तरी "राजा" शब्दावरून ओळखले की तुम्हाला शरद पवार म्हणायचे आहे ते. "फेकू" म्हंटल्यावर व्यक्ती कोण हे नाव न सांगताही तुमच्या लक्षात आले अगदी तसेच म्हणा. पेशव्यांनी छत्रपतींची नेमणूक करण्याच्या तुलनेत छत्रपतींना सारथी बनविणे हे जास्त अवमानकारक नाही का?>>> ==>> हे मला कशाला विचारता ? "राजां"ना जाऊन विचारा. बादवे "छत्रपतींना सारथी बनविणे" म्हणजे की " मी मागे बसणार आहे आणि तुम्हाला गाडी चालवावी लागणार आहे" असे काही पवार उदयनराजेंना म्हणाले का ? गाडी छत्रपतींची, जे ते सहसा स्वतः बुंगाट चालवतात. ते घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या त्यांच्या पेक्षा बुजुर्ग असणाऱ्याला चालवायला कसे देतील? त्यात एवढे समजायला कॉमन सेन्स ची सुद्धा आवश्यकता नसावी बहुदा..! गाडी कोणाची रुबाब कोणाचा..!!

In reply to by विशुमित

महाराष्ट्रात स्वयंघोषित राजे बरेच आहेत. त्यातल्या कोणाचेही नाव न घेतासुद्धा तुमच्या मनात केवळ हेच नाव कसे आले? बाकी फेकू म्हणजे कोण हे मला समजलेले नाही. छत्रपती बुंगाट चालवू देत नाही तर टुकुटुकु चालवू देत, ज्याला छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी करणे सहन झाले नाही त्याने छत्रपतींच्या पायापाशी बसून मुजरा करण्यापेक्षा छत्रपतींच्या मांडीला मांडी खेटून बसणे आणि छत्रपतींना सारथ्य करावयास लावणे हा निव्वळ छत्रपतींचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बरं जाऊ द्या, तुम्हाला नाही झेपायचे !! बादवे छत्रपती तर सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर तुकडा खायचे आणि खांद्याला खांदा देऊन लढायचे. 'पानिपत' सारखी अस्पृश्याच्या वेग वेगळ्या चुली नव्हते मांडत. (अजून 'बारा' पदर घेतले ना तरी उघडीच राहणार आहेत. वरून 'बारा'मतीच्या नावाने शंख करतील. चालायचे..!)

In reply to by विशुमित

सगळ्यांच्या बरोबर बसून भाकर तुकडा खाणारे आणि खांद्याला खांदा देऊन लढणारे ते छत्रपती वेगळे. हे छत्रपती सगळ्यांबरोबर बसून ग्लासाला ग्लास लावून काय करतात ते सांगण्याची गरज नाही. मुळात ज्या राजांना छत्रपतींची पेशव्यांनी नेमणूक केल्याचा अपमान सहन झाला नाही त्यांनी छत्रपतींच्या मांडीला मांडी लावून बसून छत्रपतींनाच सारथ्य करायला लावून निव्वळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे छत्रपती सगळ्यांबरोबर बसून ग्लासाला ग्लास लावून काय करतात ते सांगण्याची गरज नाही.>> ==>> तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या. मुळात ज्या राजांना छत्रपतींची पेशव्यांनी नेमणूक केल्याचा अपमान सहन झाला नाही त्यांनी छत्रपतींच्या मांडीला मांडी लावून बसून छत्रपतींनाच सारथ्य करायला लावून निव्वळ छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे.>>> ==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही. --- मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात. --- http://www.loksatta.com/maharashtra-news/udayanraje-and-sharad-pawar-tr… http://www.hindustantimes.com/pune-news/sharad-pawar-udayanraje-s-pune-…

In reply to by विशुमित

तुम्ही कोठे पाहिले ग्लासला ग्लास लावलेले ? अशा ग्लासातल्या सर्वपक्षीय पार्ट्या चिकार होत असतात. वृत्तपत्रात येत नाहीत फक्त त्या. त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे. ==>> अपमान वगैरे खूपच अतिरंजित शब्द वापरून आणि तीच तीच गोष्ट हजार वेळा सांगण्याची गोबेल्स नीती तुमच्यावरच उलटू नये म्हणजे झाले. नाम साधर्म्य असल्या कारणाने ते फक्त रूपक होते हे पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलेले आहेच. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत ना म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे. बाकी काही कारण नाही. कसले नामसाधर्म्य? आपल्या जातीय काडी टाकणार्‍या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही. नेमक्या निवडणुकांच्या काळात अशी काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही. एकदा निवडणुक संपल्यानंतर किंवा प्रकरण अंगावर आल्यानंतर स्पष्टीकरण दिल्यास त्यात अर्थ नसतो. फडणवीस मुख्यमंत्री नव्हते त्या काळात सुद्धा पवार जातीयवादी काड्या लावितच होते. सध्याचे फडणवीस ब्राह्मण आहेत, म्हणून ब्राहमण्यवादी कंठ दाटून आला आहे असा समज चुकीचा आहे. मला या बातमी बद्दल सविस्तर माहिती नव्हती. मला वाटले गाडी उदयनराजेंची होती, पण गाडी पवारांची होती वाटते. वृत्तपत्रीय कात्रणात (लिंक) पाहिले तर गाडी त्यांचा ड्राइवर चालवत होता, उदयनराजे पुढच्या सीट वर बसले होते आणि पवार साहेब मागे बसले होते. मग गाडीत मांडीला मांडी लावून कसे काय बसलेले दिसले गुरुजी/पत्रकारांना काय माहित? ड्राइवर गाडी चालवत होता तर वृत्तपत्रात उदयनराजे सारथ्य करत होते हे कसे काय छापले? (आणखी कोणाकडे लिंक असेल तर कृपया द्या, ज्या मध्ये उदयनराजे गाडी चालवत आहेत) वृत्तपत्रीय बातम्यावरच विश्वास ठेवणाऱ्या गुरुजींसारख्या लोकांचे त्यामुळेच गैरसमज होतो आणि पवारांना दूषणे देण्याचा कंड उफाळून येतो. आमच्यासारख्याना भक्ताची लेबल चीटकवण्यात येतात. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे. ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे. बादवे, या प्रवासाची एक चित्रफीत पाहिली. पवार आणि उदय बसलेली गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांना तर्र अवस्थेत आम्ही वाहिन्यांवर पाहिले आहे.>>> ==>> ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ? आपल्या जातीय काडी टाकणार्‍या विधानाचे पवारांनी स्पष्टीकरण दिल्याचे वाचनात नाही.>>> ==>> वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा. काडी लावण्याचा उद्देश लपून राहत नाही>>> ==>> ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही. मांडीला मांडी लावून बसणे म्हणजे समान पातळीवर बसणे.>>> ==>> आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ? ज्यांना छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केल्याचे इतके तीव्र दु:ख झाले, त्यांनी छत्रपतींबरोबर एकाच गाडीत बसणे (आणि तेसुद्धा छत्रपती पुढे आणि हे मागे अशा जास्त अपमानास्पद स्थितीत) हे छत्रपतींचा अपमान करण्यासारखेच आहे.>>> ==>> दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.) गाडी जवळ येताच आजूबाजूला उभ्या असलेल्या रिकामटेकड्यांपैकी २-३ जणांनी गाडी त्यांच्या जवळून जाताना गाडीकडे पाहून खाली वाकून मुजरा केला. हे दृश्य पाहून सखेद धक्का बसला.>>> ==>> असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!!

In reply to by विशुमित

ते तर्र आहेत हे कसे काय समजले? टीव्ही वर वास आला का ? ते बरोबर समजतं. रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं. त्यासाठी वास घ्यायची गरज नसते. हे सुद्धा अगदी तसंच. वाचनाबरोबर परिसर अभ्यास पण वाढवा. परिसर अभ्यास? ब्राह्मण्यवादाचा उद्देश पण तुम्हाला काही केल्या लपवून ठेवता येत नाही. पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश? आम्ही "फडणवीस" शब्दाचं लॉजिक सांगितले ते तुम्हाला पटले नाही आणि तुमचे लॉजिक आम्ही मान्य करावे ? काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक? आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही. दोन्ही राजे बघून घेतील. ज्याला जास्त त्रास झाला असेल त्याने उदयनराजेंचे कान फुंकावे. हाय काय आणि नाय काय. (पण मुजरा करून जावे लागते बरका त्यांच्या राजवाड्यात.) बरोबर. छत्रपतींची नेमणूक पेशव्यांनी केली असेल तर ते पेशवे आणि छत्रपती बघून घेतील. बारामतीकरांनी त्यांचे कान फुंकण्याची आणि काडी लावण्याची गरज नव्हती. बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही. असे रिकामटेकडे "अच्छे दिन" येतील म्हणून हुजरेगिरी करायला लाखांनी पडलेत. ज्याची त्याची भक्ती..!! अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.

In reply to by श्रीगुरुजी

रूग्णाने डॉक्टरसमोर ढोसली नाही तरी रूग्ण ढोसतो हे डॉक्टरला समजतं>>> ==>> ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. परिसर अभ्यास?>> ==>> आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते. पवारांच्या जातीय काड्यांबद्दल लिहिणे म्हणजे ब्राह्मण्यवादाचा उद्देश?>> ==>> जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल. काय होतं फडणवीस शब्दाचं लॉजिक?>>> ==>> पूर्वी छत्रपती 'फडणवीस' नेमायचे आता फडणवीसांनी छत्रपतीना नेमले. त्या काळी फडणवीस वेगळी संज्ञा होती आणि आता ते विशेष नाम आहे एवढाच काय तो फरक. आमचं लॉजिक तुम्ही मान्य करावे असा हट्ट नाही.>>> ==>> तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत. बादवे, ज्यांना पत्त्यांच्या कॅटमधील राजाएवढी सुद्धा किंमत नाही अशा राजांना किंवा इतर कोणालाही आम्ही मुजरा करीत नाही.>>> ==>> फक्त हुजरेगिरी जमते. अजूनही महाराज, छत्रपती, युवराज, राजे, श्रीमंत अशातच जे रिकामटेकडे अडकून पडलेत अशांना अच्छे दिन कधीही येणे शक्य नाही.>>> ==>> अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते.

In reply to by विशुमित

ये लॉजिक कुछ हजम नही हुआ. चालायचंच. आय टी सेल च्या बाहेर बरीच खरी माहिती मिळते. आय टी सेल म्हणजे काय? जाणून बुजून केलेला अप्रचार आहे. घीसेपीटे कॅसेट पुन्हा वाजवले जाईल. पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही. तुमचा हट्ट पुरवायला आम्ही 'कथित' अच्छे दिन चे याचक नाहीं आहोत. याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात. फक्त हुजरेगिरी जमते. आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही. म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही. अजून अच्छे दिन मध्ये अडकून पडलेल्या रिकामटेकड्यांची दया येते. चडफड समजू शकते. परंतु आता इलाज नाही. तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत (खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल).

In reply to by श्रीगुरुजी

चालायचंच.>>> ==>> अजून किती दिवस फेकणार आहात. आय टी सेल म्हणजे काय?>> ==>> एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. पवारांनी टाकलेल्या जातीयवादी काड्या ही वस्तुस्थिती आहे, अपप्रचार नाही.>>> ==>> चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची. याचकच गाडी बघायला ताटकळत उभे असतात आणि गाडी जवळून जाताना कंबरेत वाकून मुजरे करतात.>>> ==>> आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता) आम्ही कोणाचीच हुजरेगिरी करीत नाही. ==>> जोक ऑफ थे इयर हुजरेगिरी करायला आम्ही या तथाकथित महाराजांची प्रजा नाही.>>> ==>> मग अवतारी पुरुषाचे भक्त ? म्हणून तर आम्ही यांच्यासाठी श्रीमंत, युवराज, छत्रपती, महाराज असली हुजरेगिरीची विशेषणे वापरीत नाही.>>> ==>>व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती . चडफड समजू शकते.>>> ==>> "शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील. तुमचे महाराज, छत्रपती, युवराज, पोशिंदे, जाणते/नेणते राजे इ. चे दिवस संपले आहेत .>>> ==>> यापैकी आमचे कोणीच नाहीत हो. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमच्या मनाचे 'राजे' आहोत." (खरं तर भरले आहेत हा शब्दप्रयोगे जास्त चपखल दिसेल)>>> ==>> तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी.

In reply to by विशुमित

अजून किती दिवस फेकणार आहात. फेकणार??? एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. ???? चोराच्या मनात चांदणे म्हणतो ना तशी गत झाली आहे तुमची. कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!! आम्ही वामनासारखे याचक नाही आहोत. बळीराजा आहोत. (कर्जमाफी चा पदर घेतील पहा आता) वाचून हसायला आलं. पोशिंदा, अन्नदाता हे शब्दसुद्धा वापरले असते तर अजून हसलो असतो. जोक ऑफ थे इयर थे?? मग अवतारी पुरुषाचे भक्त ? जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही. व्यवहारी भाषेत वापरले असतील शब्द कुठे कुठे. पण स्वमर्जीतल्या लोकांचेच कसे उदोउदो होईल यात तुमचा हात पकडणे मुश्किल आहे. तुमचे मिस्टर क्लीन चीटर तर "आम्ही छत्रपतींचे (संभाजी) सेवक' असली विशेषणे वापरत होते. तेव्हा मुख्यमंत्री पदाची थोडी तरी आबा राखायची होती . व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी? "शकते" ?? श्री गुरुजी तुम्ही अनाहिता तर नाही आहात ना? अजाणतेपणी उगीच काही गैर-शब्द जायचे. तसे काही असेल तर मला बऱ्याच ठिकाणी माझ्या प्रतिक्रिया एडिट कराव्या लागतील. थोडा मराठीचा अभ्यास वाढवा. तुमची तळमळ समजली. "देव तरी त्याला कोण मारी" वाचले होते कोठेतरी. एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

फेकणार???>> ==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. ३. शरद पवार जातीवादी ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ एकच मिपा आयडी ३ लोक चालवतात, पूर्वी असे वाचले होते. ???? ==>> लिंक सापडली की उत्तर देतो. कमाल आहे! काड्या टाकणार पवार आणि चांदणे मात्र आमच्या मनात!!>>> ==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे. जसे आम्ही कोणाचेही हुजरे नाही तसेच आम्ही कोणाचेही भक्त नाही.>>> ==>> खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही. व्यवहारी भाषेत सुद्धा गुलामगिरी?>>> ==>> छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत? थोडा मराठीचा अभ्यास वाढवा.>> ""चडफड समजू शकते" स्त्रीलिंगी वाक्य वाटले... हे "चडफड समजू शकतो" असे असायला पाहिजे होते असे वाटले होते. अनाहिता नाही आहात हे सरळ सांगितले असते तरी चालले असते. एकदा शंभरी भरली की देव सुद्धा वाचवायला येत नाही.>> ==>> शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत.

In reply to by विशुमित

==>> १.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्‍याने कबुलीही असते. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. त्रिवार सत्य ३. शरद पवार जातीवादी महाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही. ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा. ==>> नावडतीचे मीठ आळणी म्हंटल्यावर तुम्हाला काड्याच वाटणार. फडणवीस म्हंटले की ब्राह्माणच हे तुम्ही पक्के मनात घट्ट केले म्हणून तर तुमच्या मनात चांदण्या दिसल्या. यात जातीय काड्या म्हणून स्वतःचे टोकरत रहायचे. फडणवीस म्हटले की ब्राह्मण हे तुमच्या साहेबांच्या आणि समर्थकांच्याच मनात आहे आणि या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. म्हणून तर पेटविण्याचे प्रयत्न अथक सुरु आहेत. खरे ही असेल कदाचित पण विश्वास वाटत नाही. मग नका ठेवू विश्वास. छत्रपती म्हणाले म्हणून गुलामगिरी कसे काय होते? "आम्ही छत्रपतींचे सेवक" हे म्हणाऱ्याना खरे गुलाम म्हणाले पाहिजे. पण तुम्ही त्यांना काही म्हणणार नाही कारण तो आपला माणूस आहे. त्यात मी कोठे ही श्रीमंत, युवराज, महाराज वगैरे विशेषणे लावली नाहीतरी "तुमचे" म्हणून मला कशाला चिटकवलीत? राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात. शंभरच्या वर पण जगलेली माणसे मी पाहिली आहेत. शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

१.चेहरा पाहिला की माणूस तर्र आहे की नाही टीव्ही वरून ओळखता येतो. नुसता चेहरा नसतो, त्याबरोबर बेताल बरळणेही असते आणि समर्थकांची ओशाळवाण्या चेहर्‍याने कबुलीही असते. २.शेतकऱ्यांच्या थकबाकीमुळे भारनियमन. त्रिवार सत्य ३. शरद पवार जातीवादी महाराष्ट्रात यांच्याइतका जातीयवादी दुसरा कोणीही नाही. ४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा.///////////////////////////////////////////////// ==>> याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ... या कालच्या पोराने (तेसुद्धा ब्राह्मण असलेल्या) आपल्याला चारीमुंड्या चीत केले हे त्यांना सहन होत नाहीय्ये. >>> ==>> बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते. खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल. मग नका ठेवू विश्वास.>> ==>> ओके. राजे, राजवाडे, संस्थाने इ. केव्हाच खालसा झाली. परंतु त्यांच्या घराण्यातील लोकांचा श्रीमंत, युवराज, छत्रपती, राजे, महाराज असल्या विशेषणांनी उल्लेख करून त्यांना कंबरेत वाकून मुजरा करणे याला गुलामगिरी म्हणतात.>>> ==>>श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ??? "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!! शंभर वर्षे पूर्ण होणे आणि शंभरी भरणे यातला फरक समजेल अशी आशा आहे.>>> ==>> फरक समजतो आणि त्यामागचा मतितार्थ सुद्धा..!

In reply to by विशुमित

याला फेकणे म्हणणार नाही तर काय म्हणणार ... वरील सर्व गोष्टी सत्य आहेत. बघ कसा जातीवाद तुमच्या प्रत्येक वाक्यातून बाहेर पडतोय ते. खरी कुस्ती देवाज्ञा झालेल्या मुंडेंनी गुणांच्या आधारे (चितपट नव्हे) जिंकली होती. पण माळ ह्या गड्याच्या गळ्यात पडली. फोडाफोडी करून चिटूरफुटूर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे पण एखादा धोबीपछाड बसला तर आस्मान दिसेल. मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न . . . असे अनेक डाव फडणविसांनी यशस्वीरित्या परतविले आहेत. फडणविसांना सातत्याने धोबीपछाड टाकून लोळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु फडणविसांनी प्रत्येक वेळी चाईट घालून यांना तोंडावर आपटविले आहे. यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे. श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. कोणी मुजरा केला ? मी ??? "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल सोयीस्कर फाटा दिला. म्हंटले होते ना आपला माणूस आहे ..!! सुरूवात कोठून झाली ते पहा.

In reply to by श्रीगुरुजी

वरील सर्व गोष्टी सत्य आहेत.>>> ==>> १, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?) --- मराठा मोर्चा, मराठ्यांना राखीव जागा, ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन, शेतकरी कर्जमाफी आंदोलन, वारंवार जातीय काड्या टाकून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न, सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप, शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न>>> ==>> १. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता. २. मराठ्यांना राखीव जागा- तरतुदीत बसत असेल तर इतरांचे पोटात दुखण्याचे काही कारण नाही. कायद्याने मिळत नसेल तर त्यावरच भले कोण अवलंबून राहत बसणार नाहीत. पहिल्यापासून माझी तरी हीच भूमिका आहे. किमान शिक्षण आणि नोकरीत फायदा व्हावा एवढाच हेतू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यात फडणवीसांचे काय योगदान आहे ? ३. ब्राह्मणांविरूद्ध अत्यंत घाण लिहिणार्‍या खेडेकरच्या गलिच्छ पुस्तकाचे प्रकाशन- -- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ? ४. शेतकरी कर्जमाफी आंदोलन -- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते) ५. सातत्याने सुरू असलेले बिनबुडाचे भ्रष्टाचाराचे आरोप -- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत. ६. शिवसेनेने पाठिंबा काढून घ्यावा यासाठी सुरू असलेले अथक प्रयत्न -- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला. --- यांनी टाकलेला प्रत्येक डाव फडणविसांनी जिंकून यांना अस्मान दाखविले आहे.>>> ==>> उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत. --डिग्री मिळवणे खूप सोपे आहे पण काम करणे खूप अवघड असते. कारण डिग्री मिळवण्यापुरताच केलेला अभ्यास हा काम करताना जास्त उपयोगी पडत नाही. - इति आमचे बॉस.

In reply to by विशुमित

सुरूवात कोठून झाली ते पहा.>>> श्रीमंत, युवराज राजे, महाराज हे शब्द मी कुठं वापरले. मी कुठे मुजरा केला आणि "आम्ही छत्रपतींचे सेवक" या बद्दल बोला ...

In reply to by विशुमित

१, २, ३ ला काय आधार आहे ? वृत्तपत्रीय बातम्या की मणघडत फेकाफेकी? आणि ४ बद्दल खाली थॉर जी ने प्रतिसाद दिलाच आहे आणि मिल्टन सरांच्या धाग्यात थेरल यांनी भारतीय नोटबंदीचे समर्थन केले होते असे वाचनात कोठेही आढळले नाही उलट कॅशलेस बद्दल ते ८ नोव्हेंबरला नवीन धागा काढणार आहेत. (वीज थकबाकीची यादी मिळेल का?) वाचन वाढवा. वीज थकबाकीची यादी मराविमंकडे मिळेल. १. मराठा मोर्चा- मोर्च्याच्या आखणीत आणि अंमलबजावणीत पवारांचा कोठे ही संबंध आणि सहभाग नव्हता. हेच तर त्यांचे वैशिष्ट्य आहे.
२. मराठ्यांना राखीव जागा- तरतुदीत बसत असेल तर इतरांचे पोटात दुखण्याचे काही कारण नाही. कायद्याने मिळत नसेल तर त्यावरच भले कोण अवलंबून राहत बसणार नाहीत. पहिल्यापासून माझी तरी हीच भूमिका आहे. किमान शिक्षण आणि नोकरीत फायदा व्हावा एवढाच हेतू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यात फडणवीसांचे काय योगदान आहे ?
स्वतःकडे सर्व सत्ता, बहुतेक सर्व पदे, बहुतेक सर्व जमीन असे सर्व काही असताना स्वतःचे काहीही न सोडता दुसर्‍यांसाठी जे थोडेसे शिल्लक आहे त्यातही दांडगाई करून हात मारणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. -- आला का नाही जातीवर ? मागे त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंचा पण सत्कार केला होता. वेगवेगळ्या विचारांचे लोक कार्यक्रमाला बोलवत असतात, त्यात कुठला आलाय जातीवाद? का फक्त ब्राह्मणांच्या विरुद्ध बोलणाऱ्याच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे काही असते का? संभाजी आणि शिवाजी महाराजांवर ज्यांनी अत्यंत हीन पद्धतीने लिहले त्या गडकरींच्या नाटकाची हिरारीने बाजू ओढण्याचे काम आपण सुद्धा केले. कशासाठी?? स्वजातीसाठी केले असे आम्ही तुम्हाला म्हणायचे का ? खेडेकर/कोकाट्याच्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून तिथे ब्राह्मणांविरूद्ध काडी टाकणे हा जातीयवादच आहे. गडकर्‍यांचे "राजसंन्यास" हे नाटक मी वाचले आहे. त्यात काहीही हीन लिहिलेले नाही. तुम्ही ते वाचले नसल्यास वाचा. मुद्दा फक्त गडकरींच्या नाटकाची बाजू मांडण्याचा नव्हता. त्या निमित्ताने ब्राह्मण संत, ब्राह्मण स्वातंत्र्यसैनिक, ब्राह्मण राज्यकर्ते इ. वर खोटेनाटे आरोप करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत हीन लेखन करण्याचे काम ९० च्या दशकापासून सुरू आहे. संत रामदासस्वामी, दादोजी कोंडदेव, थोरले बाजीराव, स्वातंत्र्यवीर सावरकर इ. अनेकांविरूद्ध अत्यंत गलिच्छ लेखन केले गेले आहे. दादोजी कोंडदेवांचा पुतळा उखडून कचर्‍याच्या गाडीतून नेणे याचाच पुढचा भाग म्हणजे गडकरींचा पुतळा उखडणे. खेडेकरने ब्राह्मण स्त्रियांविरूद्ध जे लिहिले आहे ते वाचताना अत्यंत शरम वाटते. अशा अत्यंत नीच व्यक्तीने लिहिलेल्या घाणेरड्या पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहून एका घाणेरड्या पुस्तकाला व त्याच्या नीच लेखकाला महत्त्व प्राप्त करून देणे व त्याप्रसंगी जातीयवादी भाषण ठोकणे हे अत्यंत निषेधार्ह कृत्य आहे. अर्थात असे करण्याची ही पहिली वेळ नाही. ९० च्या दशकात भाजप-सेना युतीविरूद्ध पेशवाई-शिवशाही वाद यांनीच उठविला होता. माजी गृहसचिव माधव गोडबोले यांची जात यांनीच काढली होती. राजू शेट्टींची जात यांनीच काढली होती. छत्रपती-पेशवे ही काडी यांनीच टाकली होती. -- लोक या भाजप (खाजप म्हणालो असतो पण बाईल हेटाळणी करायची आमची संस्कृती नाही आहे) सरकार फेकू का म्हणते ते याचसाठी. फडणवीस पहिल्यापासून म्हणत होते ना कर्जमाफी देणार नाही म्हणून, तसा त्यांचा बाणाच होता ना. मग निकषा सह सरसकट कर्जमाफीचे एवढे नाटक करण्याची काय गरज होती. यात शरद पवारांचे काय नुकसान होणार आहे? उलट लोकच फडणवीसांना थापाडे म्हणायला लागले आहेत. खासगीत लोक 'साले' सरकार म्हणतात (ह्या गोष्टी पेप्रात येत नाहीत, त्यासाठी लोकात जाऊन फिरावे लागते) फडणविसांचा कर्जमाफीला विरोध होता. परंतु वातावरण पेटविले गेले. शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणविसांवर नेम धरलेला होता. शेवटी राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्यात शांतता राखण्यासाठी तडजोडी कराव्याच लागतात. सरसकट कर्जमाफीसाठी वातावरण तापवून या धनदांडग्यांना आपली पोळी भाजून घ्यायची होती. सरसकट कर्जमाफी केली तर राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लागून खरा फायदा या धनदांडग्यांनाच होणार आणि अजिबात कर्जमाफी केली नाही तर वातावरण पेटत जाणार यातून फडणविसांना मार्ग काढावा लागला. म्हणूनच त्यांनी निकषासहीत कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफीची सर्व माहिती कागदावर यावी यासाठी ऑनलाईन अर्ज भरायला सांगून त्यासाठी आधारपत्र व पूर्ण माहिती मागितली आहे. त्यातूनच फुगविलेला शेतकर्‍यांचा आकडाही समोर आला आहे. फडणविसांच्या विरोधात मांडलेला हा डावसुद्धा वाया गेला आहे. -- विरोधी पक्ष आहे आरोप करणारच. बिनबुडाचे का काय ते कोर्ट ठरवेल. यात फडणवीसांनी फक्त हा हू करून आखाड्यात टाईमपास केला. "अवगत केले आहे" हे लोक सहज सहजी विसरणार नाहीत. करा की. कोर्ट त्याबद्दल ठरवेल पण ते कोणी कोर्टात गेले तर. ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत त्यांची कोर्टात जायची हिंमत नाही. कालच नबाब मलिक अजून एकदा बरळला. नांदेडमध्ये म्हणे भाजपने मोपलवारांचे ३०० कोटी वाटले. या गाढवाला निकाल लागल्यानंतर हे बरं समजलं. इतके दिवस काय झोपा काढत होता का? मागच्या वर्षीही तो बरळला होता की गिरीश बापटांनी तूर डाळीत २०० कोटींचा भ्रष्टाचार केला. थोड्या दिवसांनी त्याने हा आकडा २००० कोटींवर नेला आणि नंतर काही दिवसांनी हा भ्रष्टाचार २०००० कोटींचा आहे असे बडबडायला लागला. आता विचारले तर हा घोटाळा २ खर्व रूपयांचा आहे असे तो बरळेल. असल्या फालतू आरोपांवर टाईमपासच करायचा असतो. -- यात फडणवीसांचे कशाचे कसब? त्या शिवसेनेनी माती खाल्ली म्हणून अजून रिंगणात आहात. युतीची आंधळी कोशिंबीर नीट खेळता येईना आणि चाललेत तेल लावलेल्या पैलवानाला चाईट घालून पाडायला. शिवसेनेला फारसे काही न देतासुद्धा बाहेर पडता येत नाही हेच फडणविसांचे कसब आहे. विरोधी पक्षात जाऊन बसलेली सेना एका रात्रीत सत्तेत आली. फडणविसांनी फेकलेली ३-४ फालतू मंत्रीपदे सेनेने आनंदाने स्वीकारली. त्यामुळे भाजपने न मागता पाठिंबा जाहीर केलेले तेल लावलेले पैलवान आपोआपच चित झाले व त्यांना माती खावी लागली. त्यानंतर मराठा मोर्चा, राखीव जागा, कर्जमाफी, शिवसेनेला डिवचणे, जातीयवादी वक्तव्ये या सर्व डावपेचातून फडणविस यशस्वीपणे निसटले आहेत. या तेले लावलेल्या पैलवानाने आधी अशोक चव्हाण व नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा जेरीस आणले होते. म्हणूनच लकवा अशी अभद्र भाषा त्यांना वापरावी लागली होती. अजूनही ते तेल लावून शड्डू ठोकून जोरबैठका काढायचा प्रयत्न करतात. परंतु आपली सद्दी पूर्ण संपली आहे हे त्यांना उमगतच नाही. उलट पवारांनी टाकलेल्या प्रत्येक डावामुळे पुरते गुरफटून गेले आहेत. राज्य चालवायचे सोडून अभ्यास करत बसलेत. पवारांचे सगळे डाव फडणविसांनी लीलया परतविले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

४. रिचर्ड थेलर ने नोटबंदीचे समर्थन केले होते.इ इ इ मिल्टनांचा धागा वाचा.
आँ? तुम्हाला अजुनही म्हणायचे आहे की त्यांनी "भारतात नोटबंदी ज्यापद्धतीने लागू केली गेली आणि जे निर्णय घेतले गेले त्याचा अभ्यास करून थेलर यांनी त्याचे समर्थन केले होते?" थेलर यांनी, भारताने नोटा बाद केल्या आहेत ही बातमी ऐकल्यावर १ ट्वीट केले होते फक्त, त्यानंतर कुणीतरी त्यांना २००० च्या नोटेबद्दल सांगितले तेव्हा त्यांनी पुढचे ट्वीट केले. तेवढीच कींमत दिली आहे त्यांनी. त्यापलीकडे कणभरही महत्व दिलेले नाही या घटनेला. जेव्हा राजन भारतातून परत गेले तेव्हा थेलर यांनी देअर लॉस इस आवर गेन अशा आशयाचे ट्वीट देखील केले होते. बास करा की राव, एखाद्या मुद्यावर मत चुकले तर सोडून द्या. चुकले तरी कशाला पुढे रेटताय? बाकीचे मुद्दे घेऊन भांडा.

In reply to by विशुमित

मी पवार/राष्ट्रवादी समर्थक म्हणून प्रतिक्रिया देत नाही
तुम्ही समर्थक आहात तर तशीच प्रतिक्रिया देणं जास्त योग्य आहे.

In reply to by arunjoshi123

तुम्ही समर्थक आहात तर तशीच प्रतिक्रिया देणं जास्त योग्य आहे.>>> ==>> मिपावर मी चांगल्या चर्चा वाचण्यासाठी आणि जमेल तिथे आपले मत व्यक्त करण्यासाठी येतो. ज्यातून मला त्या संबंधित विषयाबाबत नाण्याच्या दोन्ही बाजू समजतील. माझे ज्ञानार्जन होईल. पक्षीय राजकारण करायला माझे गाव, माझा परिसर आणि माझा तालुका पुरेसा आहे.

In reply to by मार्मिक गोडसे

भारनियमन केल्याने थकबाकी वसूल होणार नाही कारण वसुली व भारनियमन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु भारनियमनाचा जो काही त्रास आहे तो नियमित बिल भरणार्‍यांना कमी व्हावा हा उद्देश असल्याने थकबाकीदारांच्या भागात जास्त वेळ भारनियमन करून नियमित बिल भरणार्‍यांच्या भागात ते तुलनेने कमी वेळ केले जाते.