अविश्वसनीय सत्यकथा - डीएनए मिसमॅच
मुलांचे (मुलगा आणि मुलगी दोन्हीचा यात समावेश आहे) डीएनए त्यांच्या जैविक मातापित्यांशी जुळतात हे विज्ञानाने सिद्ध झालेले आहे. त्यातही एखाद्या वेळेस पिता कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट लागेल पण जन्मदाती आई तर कोण आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्टची सुद्धा गरज भासू नये.
पण लिडिया फेअरचाईल्ड नावाच्या एका आईच्या बाबतीत एक अविश्वनीय घटना घडली. तिला २ मुले होती आणि तिसऱ्या वेळेला ती गर्भवती असताना तिने आणि तिच्या नवऱ्याने घटस्फोट घ्यायचे ठरवले. कोर्टाने मुलांच्या पालनपोषणाचा हक्क ठरवण्यासाठी आई वडील आणि मुलांची डीएनए टेस्ट करायचे आदेश दिले. जेव्हा त्याचे रिझल्ट आले तेव्हा वडिलांचा आणि मुलांचा डीएनए जुळत होता परंतु आई आणि मुलांचा डीएनए अजिबात जुळत नव्हता. अगदी ०.०% मिसमॅच. हे आईसाठीच काय पण कायदेपंडितांसाठी पण धक्कादायक होतं.
कदाचित पहिली टेस्ट चुकली असेल म्हणून लिडियाने दुसरी टेस्ट करायचं ठरवलं. या दुसऱ्या टेस्टचे निकालही काही वेगळे आले नाहीत. लिडियाला कोर्टाची नोटीस आली की मुले तुम्ही पळवून आणली नाहीत किंवा कुठल्या सरोगसी स्कॅममध्ये सहभाग नाही किंवा दुसर्याचीच मुले दाखवून टॅक्समधले फायदे लाटले नाही हे सिद्ध करा. पुढचे काही दिवस लिडियासाठी फारच भयानक गेले. आपली मुलं आपल्यापासून दुरावणार आणि आपण त्यांना कधीच भेटू शकणार नाही या भीतीने तिला ग्रासलं. त्यात भर म्हणजे जर मुलं तिचीच आहेत हे सिद्ध करता आलं नाही तर तुरुंगाची हवा खायला लागली असती. त्यात तिच्या आधीच्या दोन्ही गर्भारपणाचे आणि बाळंतपणाचे सगळे रेकॉर्ड उपलब्ध होते. पण मग ज्या मुलांना तिने जन्म दिला ती मुले कुठे आहेत याचा पण शोध घेणे अवश्य होते. डीएनए टेस्ट सोडून जन्मदाती म्हणून सिद्ध करण्याचा दुसरा कुठला मार्ग आहे हे कोणालाच सुचत नव्हते.
लिडियाच्या सुदैवाने हा गोंधळ चालू असताना ती परत गर्भवती होतीच. मग कोर्टाने आदेश काढला की लिडिया जेव्हा बाळाला जन्म देईल तेव्हा कोर्टाची एक प्रतिनिधी लेबर रूम मध्ये उपस्थित असेल. बाळ जन्मल्या जन्मल्या बाळाचे डीएनए सॅम्पल घेऊन लिडियाच्या डीएनए बरोबर मॅच करा. तर नवीन बाळाचं डीएनए पण लिडियाबरोबर जुळत नव्हतं. लिडियाची चिंता जरा कमी झाली पण आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावायला लागला.
पण लिडियाच्या नशिबाने फिर्यादी (प्रॉसिक्युशन) पक्षाच्या वकिलाला कुठून तरी बॉस्टनमधल्या कॅरेन किगन नामक महिलेबद्दल माहिती मिळाली, जी तिने बचाव पक्षाच्या अॅलन टिंडेल नामक वकिलाच्या कानावर घातली. अॅलनने पुढे तपास केला असता एक धक्कादायक गोष्ट समजली की कॅरेन एक चिमेरिक स्त्री आहे. म्हणजेच अश्या व्यक्तींच्या शरीरात दोन वेगवेगळे डीएनए एकाच वेळेला असतात. या अनुषंगाने लिडियाच्या पुढील चाचण्या झाल्या. त्यात असे उघडकीला आले की लिडिया गर्भावस्थेत असताना सुरुवातीला जुळी मुलं म्हणून सुरुवात झाली. पण त्या दुसऱ्या गर्भाची वाढच फारशी झाली नाही. जसा जसा पहिला गर्भ वाढायला लागला, तेव्हा त्याने दुसऱ्या गर्भाला आपल्यात सामावून घेतलं. म्हणजे लिडिया जरी एक मूल म्हणून जन्माला आली तरी तिच्यात तिच्या न जन्मलेल्या बहिणीचा अंश राहिला. पुढे जेव्हा लिडियाला मुलं झाली तेव्हा त्यांच्यात लिडियाचा डीएनए न येता तिच्या न जन्मलेल्या जुळ्या बहिणीचा डीएनए आला.
फक्त अमेरिकेत आतापर्यंत ३० चिमेरिक लोक आढळले आहेत. सगळेच लोक डीएनए टेस्ट करायला जात नाहीत, त्यामुळे चिमेरिक लोकांची नक्की संख्या किती आहे हे समाजाने अवघड आहे. न जाणो आपल्यापैकी पण कोणी असू शकेल.
लिडियाबद्दल अधिक माहिती इथे वाचा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऐकावे ते नवलच!! कधी विचारच
टोटल कॅनफुझ
टोटल कॅनफुझ
सुरस !!
माझी पण अशीच समजूत होती
ओह्ह ! फार च आश्चर्यजनक आहे
रोचक!
कसं शक्य आहे?
आपलं म्हणणं बरोबर आहे
धक्कादायक
चिमेरा नाही.
धक्कादायक माहिती.
लिडियाचे केसांचे व त्वचेचे
या प्रकारात, एकाच पेशीत दोन
House
....एका माणसाला काही स्वप्न
अविश्वसनीय!
+१
रोचक.
इंटरेस्टिंग!
रोचक.
3 वेळा.. :D
तीन वेळा नाही .. एक वेळ ,
एकदम बरोबर
ओके.. तरीपण जास्तच खेचलं आहे
हो बघा वाट पण
_/\_
हे रंजक आहे.
गैरफायदा घेऊ नये म्हणून
माझ्या माहितीतल्या एका
धन्यवाद, हे माहित नव्हतं
रोचक
रोचक!!
नियमाला अपवाद असतो म्हणतात ते
फेनो आणि जेनो टाईप
Tetragametic chimerism is a
डॉक्टरसाहेब, तुम्ही दिलेली
This condition occurs through
टेट्रा गॅमेटिक चिमेरिझम
धन्यवाद
धन्यवाद! बरेचसे समजले.
एक शंका (लेखाबद्दल नाही) - जर
अद्भुत आहे जग
अगदी ०.०% मिसमॅच.
०.०% मिसमॅच = १००% मॅच.... +1
टेट्रा गॅमेटिक चिमेरिझम हि
च्यामारी लईच भानगड आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कुंग फू कुमारी... ;) :- Bruce Lee The Fighterऐकावं