✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रमलखुणांची भाषा

अ — अनन्त्_यात्री, Tue, 09/19/2017 - 11:44
जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....

प्रतिक्रिया द्या
2858 वाचन

💬 प्रतिसाद (12)

काय सुरेख! सुंदर!

यशोधरा
Tue, 09/19/2017 - 12:04 नवीन
काय सुरेख! सुंदर!
  • Log in or register to post comments

अहाहा!! खुप सुंदर

पुंबा
Tue, 09/19/2017 - 12:05 नवीन
अहाहा!! खुप सुंदर
  • Log in or register to post comments

_____/\_____

चांदणे संदीप
Tue, 09/19/2017 - 13:56 नवीन
भारीच! Sandy
  • Log in or register to post comments

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 09/19/2017 - 14:03 नवीन
सुंदर !
  • Log in or register to post comments

खोरण म्हणजे काय?

एस
Tue, 09/19/2017 - 17:00 नवीन
खोरण म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

खोरण म्हणजे

अनन्त्_यात्री
Wed, 09/20/2017 - 09:23 नवीन
वड/पिंपळ वगैरे झाडांच्या बुंध्यापाशी पणती, दिवा वगैरे नीट ठेवता यावा म्हणून एखाद्या दगडात खोदून केलेला कोनाडा. हा शब्द कोकणात प्रचलित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धन्यवाद. कविता छान आहे.

एस
Sat, 09/23/2017 - 01:17 नवीन
धन्यवाद. कविता छान आहे. तालावर म्हणून पाहिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

एस, प्रतिसादाबद्दल

अनन्त्_यात्री
Mon, 09/25/2017 - 11:20 नवीन
मनःपूर्वक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

वाह! सुंदर

जेडी
Wed, 09/20/2017 - 09:34 नवीन
वाह! सुंदर
  • Log in or register to post comments

वाह!

राघव
Wed, 09/20/2017 - 09:54 नवीन
ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा सुंदर! :-)
  • Log in or register to post comments

अप्रतिम !

माम्लेदारचा पन्खा
Wed, 09/20/2017 - 13:32 नवीन
बहारदार . . . .
  • Log in or register to post comments

प्रतिसादांबद्दल

अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/21/2017 - 10:45 नवीन
मनःपूर्वक धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा