जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू
दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या
हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या
खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी
ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा
ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2875
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सुरेख! सुंदर!
अहाहा!! खुप सुंदर
_____/\_____
सुंदर !
खोरण म्हणजे काय?
खोरण म्हणजे
In reply to खोरण म्हणजे काय? by एस
धन्यवाद. कविता छान आहे.
In reply to खोरण म्हणजे by अनन्त्_यात्री
एस, प्रतिसादाबद्दल
In reply to धन्यवाद. कविता छान आहे. by एस
वाह! सुंदर
वाह!
अप्रतिम !
प्रतिसादांबद्दल