✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मान गए पंतवैद्य...

ट
टर्मीनेटर यांनी
गुरुवार, 09/14/2017 - 19:53  ·  लेख
लेख
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला. वपुंची अनेक पुस्तके आत्तापर्यंत वाचली होती पण ह्या नावाची कथा वाचल्याचे काही आठवत नव्हते, त्यामुळे झोप येत असून सुद्धा केवळ २७ मिनिटे आणि ५३ सेकंदांचाच तर आहे कि, आत्ताच बघू असा विचार करून पुढचा हा व्हिडीओ पहिलाच.(व्हिडिओमध्ये फक्त कथेचे मुखपृष्ठ असून चलचित्र काहीच नसल्याने ऐकलाच म्हणा ना.) पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, द.मा.मिरासदार, शंकर पाटील ह्या मातब्बर लेखकांच्या कथा आणि कथाकथनांचा मी खूप आधीपासूनच फॅन, त्यामुळे त्यांच्या कॅसेट्स, सीडी'ज आणि पुस्तकांचा संग्रह पण केला होता. पण कशी काय कोणास ठाऊक, हि कथा मात्र वाचायची किंवा ऐकायची राहूनच गेली होती. काल ती ऐकायला मिळाली आणि एक छान समाधान मिळाले. वर उल्लेख केलेल्या सर्वच लेखकांची कथेतील पात्रे वाचकांच्या/श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभी करायची हातोटी विलक्षण आहे. अगदी हुबेहूब ती व्यक्तिरेखा मनःचक्षूंसमोर उभी राहते. 'पंतवैद्य' ह्या कथेतील पंतवैद्य हि व्यक्तिरेखा जर खरोखरीच त्यांना वास्तवात भेटलेली व्यक्ती असेल तर वपुंच्या निरीक्षणशक्तीला आणि काल्पनिक असेल तर त्यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीला लाख लाख सलाम. बहुतांश वाचनप्रेमी मिपाकरांनी हि कथा आधी वाचली/ऐकली असेलच, परंतु माझ्याप्रमाणे काहीजणांची राहून गेली असेल तर त्यांच्या सोयीसाठी व्हिडिओची लिंक मी वर दिलेली आहे. ऐका व आनंद घ्या... "नसलेलं अवसान, उसनं बळ आणून आणता येतं...असलेली शक्ती विसरणं, ह्याला फार मनोधैर्य लागतं" - पंतवैद्य (व.पु.काळे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
आस्वाद
शिफारस

प्रतिक्रिया द्या
2977 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

अरे वा! ऐकायला हवी ही कथा.

एस
गुरुवार, 09/14/2017 - 23:37 नवीन
अरे वा! ऐकायला हवी ही कथा.
  • Log in or register to post comments

जरूर ऐका...

टर्मीनेटर
Fri, 09/15/2017 - 08:23 नवीन
जरूर ऐका...Don't judge a book by its cover ह्या म्हणीचा प्रत्यय येईल. :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी पण नुकतीच ऐकलि ही कथा,

शित्रेउमेश
Fri, 09/15/2017 - 10:31 नवीन
मी पण नुकतीच ऐकलि ही कथा, भारीये एकदम....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा