Skip to main content

बकरी ईद आणि हैदराबाद (अर्थात हैदराबाद डायरी)

लेखक सचिन कुलकर्णी यांनी शनिवार, 02/09/2017 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
मी हैद्राबादमध्ये गेली ६ वर्षं राहतोय. बकरी ईद जवळ आली की इथल्या काही इलाक्यांमध्ये (जसं की मेहंदीपटनम) बकऱ्यांचे बाजार लागायला सुरुवात होते. मोठ्या मोठ्या रस्त्यांच्या कडेला मंडप टाकून तिथे बकऱ्यांचे जथेच्या जथे साऱ्या भारतभरातून विक्रीसाठी आणले जातात. यामध्ये तगडे बोकड, पुष्ट बकऱ्या, मध्यम बकऱ्या आणि अगदी कोवळी पिल्लं पण असतात. ज्याला जसा परवडेल तसा प्राणी विकत घेता येतो. कुर्बानीसाठी भाविक (?) लोक, मोठ्या कुटुंबातील लोक, मशिदींचे प्रतिनिधी तसेच छोटे मोठे कसाई देखील इथून 'माल' घेऊन जातात. त्यामुळे कोणी स्कूटरवरून एक बकरी नेतोय तर काही जण टेम्पोच्या टेम्पो भरून बकऱ्या नेतोय हे दृश्य इथे हमखास दिसते. त्या बकऱ्यांचे मात्र हाल बघवत नाहीत अश्या वेळेस. घेऊन जातांना त्यांचे पाय बांधले जातात. काही तरुण बकरे हे तोडायचा प्रयत्न करतात पण तेही थोड्या प्रयत्नानंतर कळून चुकतात की काही उपयोग नाही. अश्या वेळेस बकऱ्यांचे दीनवाणे चेहरे बघवत नाहीत. काल तर मला टेम्पोमध्ये २ तगडे बैल देखील घेऊन जातांना दिसले. (इथे गोवंश हत्या बंदी नाही). खुद्द बकरी ईदच्या दिवशी तर रस्त्यांवर अत्यंत ओंगळवाणे दृश्य असते. इथे हलाल मटणच लागते. त्यामुळे बकऱ्यांच्या मानेला चीर देऊन सारे रक्त वाहून गेल्यावर मग बकरी सोलली जाते आणि मग कापली जाते. त्यामुळे रक्ताचे पाटच्या पाट रस्त्यांवरून वाहत असतात. तिथेच मांस विक्री होते आणि कातडी जाळली जाते त्यामुळे रस्त्यांवर दुर्गंधीचे साम्राज्य असते. कोणीही सेन्सीबल माणूस तिथून ह्ळह्ळ व्यक्त न करता आणि नाकाला रुमाल न लावता जाऊ शकत नाही आणि हायजीनच्या साऱ्या संकल्पना तर वेशीवर टांगलेल्या असतात. मुस्लिम समाज प्रथेप्रमाणे कुर्बानी करतोच (हा आणखी वेगळा विषय आहे ऍकच्युअली) आणि समाजातल्या मोठ्या वर्गाचे हे अन्न आहे त्यामुळे बकऱ्या मारण्यावर आक्षेप नाही घेता येणार पण यातला किळसवाणा प्रकार टाळून हा सण साजरा करता येणार नाही का ? -- (खिन्न) सचिन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 19857
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

धागाकार्त्याचा मूळ मुद्दा स्वच्छतेचा असावा. हलाल कि खटका यांच्या योग्यायोग्यतेचा नसावा. त्यांनी हैद्राबाद मधली जी परिस्थिती वर्णन केली आहे तशीच परिस्थिती काही वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मुंब्र्यामध्ये असे. काही वर्षांपूर्वी म्हणण्याचे कारण, मला डोंबिवली सोडून अनेक वर्षे झाली. लोकल ट्रेन मधून मुंब्रा पार करतांना देखील असह्य दुर्गंधी येत असे.... (वर्षाचे बाराही महिने... केवळ ईदच्या दिवसांमध्ये नव्हे).

हे सगळं वाचल्यावर वाटतं की जनावरांना माणसासारखा बुध्दीमान मेंदू असता आणि त्यांना हत्यारं चालवता येत असती तर त्यांनी काय काय केलं असतं!

In reply to by उपयोजक

जनावरांना माणसासारखा बुध्दीमान मेंदू असता आणि त्यांना हत्यारं चालवता येत असती तर त्यांनी काय काय केलं असतं! त्यांनी पण अंतर्जाल तयार करून इतर प्राण्यांबद्दल असेच मत मांडले असते. ;)

जेम्स वांड,
मात्र, ज्यूईश आणि मुस्लिम कसाईकर्मविधीत कावडीचाही फरक नाहीये, हे मात्र नक्की आहे, जवळपास सगळेच स्त्रोत तेच सुचवतात. उदाहरणार्थ खालील वाक्य Ritual slaughter as a mandatory method of slaughter for food production is practiced by Muslim and Jewish communities totaling nearly 25% of the world population. Both communities have similar religious philosophies in this regard.[1]
यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी पंथांचं मूळ अरबस्थानात आहे. त्यामुळे त्यांच्या परंपरा व हेतू साधारणत: एकसारख्या अरबी पार्श्वभूमीच्या असणं साहजिकच आहे. परंतु प्रत्येक पंथाने आपलं वेगळेपण जपण्यासाठी वेगळी कृती अवलंबलेली असू शकते. इथे उपरोल्लेखित ठिकाणी similar religious philosophies असं म्हंटलं आहे. म्हणजे प्राणीहत्येमागील हेतू सारखेच असावेत. ते मारण्याची पद्धत वेगळी असू शकते, एव्हढंच मला सुचवायचं आहे. मी या विषयातला तत्ज्ञ नसल्यामुळे ठाम मत प्रदर्शित करू शकंत नाही. आ.न., -गा.पै.

मी स्वतः प्राणीप्रेमी आहे आणि मांसाहारीसुद्धा.विरोधाभास आहे खरा. मुस्लिम धर्म क्रुरपणे प्राण्यांच्या हत्येला संमती देतो याचा निषेध करावा तितका कमीच आहे.हलाल करणे गैर आहे आणि झटकापण.ज्यांना शक्य आहे त्यांनी शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करावा.

जेम्स वांड, रक्त नुसते नाही त्यात मीठ मसाले घालून वाळवतात अन मग त्याच्या वड्या पाडतात, जेवताना साईड डिश म्हणून पापड कुरडई प्रमाणे तळून ते वाढले जाते. अतिशय चविष्ट प्रकार. सहमत आहे. रक्ती अतिशय चवदार असते असं ऐकून आहे. मी खाल्लेली तेव्हा ताजी होती आणि त्यात व्यवस्थित मसाले घातलेले नव्हते. त्यामुळे की काय चव फारशी आकर्षक वाटली नाही. इथे इंग्लंडमध्ये कापलेल्या डुकराच्या रक्तीपासून पूड बनवतात. ती ख्रिसमस केकमध्ये घालतात. त्यास ब्लॅक पुडिंग म्हणतात. आ.न., -गा.पै.

झटका मध्ये प्राण्याला वेदना होत नाहीत कशावरुन? हलाल मध्ये रक्त संपूर्ण शरीरातुन वेगात बाहेर फेकले जाते व मेंदू बधिर होउन वेदना होण्याची संभावना नसते असं अस मी एके ठिकणी वाचलं आहे..

१. शास्त्रिय पद्धतीने चालविल्या जाणार्‍या खाटिकखान्यांत सर्वसामान्यपणे, (अ) इलेक्ट्रिकल स्टनिंग उर्फ विजेचा झटका देऊन तत्क्षणी बेशुद्ध करून किंवा (आ) CO2 स्टनिंग म्हणजे प्राण्यांना विजेचा श्वसनातले CO2चे प्रमाण वाढवून त्यांना बेशुद्ध केले जाते आणि, नंतर त्यांना मारणे व इतर कापाकापी होते. अर्थातच या पद्धतीत प्राण्याच्या शरिरावर शस्त्र चालताना तो शुद्धीत नसल्याने त्याला वेदना होण्याचा प्रश्नच नसतो. किंबहुना, मरताना वेदना होऊ नये हाच मुख्य विचार कोणत्याही आधुनिक शास्त्रिय पद्धतीमागे असतो. २. इस्लामिक हलाल पद्धतीत खालील गोष्टी अपरिवर्तनिय आहेत, (अ) इस्लामला खाण्यासाठी मान्य असलेला प्राणी (उदा. डुक्कर निषिद्ध आहे, इतर बरीच उदाहरणे आहेत) हवा. (आ) प्राणी पूर्णपणे शुद्धीवर असणे अत्यावश्यक आहे (कोणत्याही प्रकारचे स्टनिंग निषिद्ध आहे). (इ) मारताना किबला (मक्का शहरातील काबा) च्या दिशेने प्राण्याचे तोंड असायला हवे. (ई) मारणार्‍याने मारताना "बिसमिल्ला (अल्लाच्या/देवाच्या नावे), अल्लाहू अकबर (अल्ला सर्वश्रेष्ठ आहे)" असे म्हणायचे असते. (उ) मारण्याचे हत्त्यार धारदार असावे व त्याने गळ्यावर एकच वार करून, शस्त्र मधेच न उचलता, श्वासनलिका, कॅरॉटिड आर्टरी, ज्युगुलर व्हेन आणि अन्ननलिका एकत्रपणे कापल्या गेल्या पाहिजेत. मात्र हे करताना डोके धडावेगळे होता कामा नये, हे फार महत्वाचे. (ऊ) गळा कापल्यावर प्राण्याला मोकळे सोडून त्याचे रक्त मोकळेपणे बाहेर उडाले पाहिजे, अर्थातच प्राण्याची तडफड होणे महत्वाचे आहे. किंबहुना, प्राण्याच्या तडफडीने स्नायू आकुंचन पाऊन शरिरातील जास्तित जास्त रक्त बाहेर पडेल, असा विचार यामागे आहे. (ए) अश्या रितीने जास्तित जास्त रक्त वाहून, प्राण्याची तडफड थांबून तो मृत झाल्यावरच इतर कापाकाप करायची असते. या पद्धतिचे धार्मिक समर्थन होऊ शकले तरी, प्राण्याला वेदना न होता इस्लामिक हलाल शक्य नाही. तसा दावा इस्लामिक स्कॉलर्सही करत नाहीत. या विषयांच्या चर्चेत, केवळ स्वत:च्या (गैर)समजूतींवर आधारीत काही अंदाजपंचे विधाने केली जातात. त्यामुळे, इतरांचा गैरसमज होऊ नये यासाठीच केवळ ही माहिती दिली आहे. बाकी चालू द्या.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत! माझ्या एका मुस्लिम मित्राने वेगळीच गोष्ट सांगितली. तो म्हणाला की जनावराने आयुष्य भर देवाचे नाव घेतले नाही. म्हणून त्याला ही शिक्षा दिली जाते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही म्हणाले तसे स्टनिंग फक्त युरोपातल्या काही देशात करणे बंधनकारक असते, सगळीकडे नाही. शिवाय, इस्लामीक हलाल मध्ये ज्यूईश कोशर मध्ये साम्य असल्यामुळे जवळपास सगळ्याच अपरिवर्तनीय बाबी सारख्या आहेत, त्यांची (ज्यूईश लोकांची) पण एक खाण्यालायक प्राणी वगैरे लिस्ट आहेच, वराह, ससा वगैरे त्यात बऱ्याच प्राण्यांची जंत्री आहे. मुसलमान जसं किबल्याकडे तोंड करून कुर्बान करतात तसं ज्यू लोकांत पण कोशर नुसारच म्हणजे उभे जनावर किंवा पाठीवर निजवलेले जनावर विशिष्ट कोनातूनच मानेवर सूरी फिरवणे वगैरे असते. तुमचे बरोबर आहे, प्राण्याला वेदना न होऊ देता हलाल/कोशर शक्यच नाही. ज्यूईश पद्धत सुद्धा समानच आहे, इतकेच म्हणणे होते, जनावराला वेदना वगैरे तर होतातच. आपण हिंदू माणूस त्या बोकडाच्या पूर्वजन्मीच्या पापांची फळं म्हणावी ती तडफड अन आत्मीयतेने मटण चेपावे म्हणतो, अन तुम्हाला समर्थन जाहीर करतो मी :) .

शमीम - भाईजान बकरीद आने वाली है और आपको हमारे घर पर होने वाली दावत में शरीक होना ही पड़ेगा कोई बहाना नहीं चलेगा। योगी - वो सब तो ठीक है मियां पर यह तो बताओ कि बकरीद मनाते क्यों हैं ? शमीम - भाईजान बहुत पहले एक हजरत ईब्राहिम हुए थे जिनका अल्लाह पर ईमान बहुत पुख्ता था और जिन्होंने अल्लाह के कहने पर अपनी सबसे प्यारी चीज़ यानि अपने बेटे की कुर्बानी दी थी और अल्लाह ने खुश होके उनके बेटे को फिर ज़िंदा कर दिया था। तो उसी की याद में हम भी अपनी सबसे प्यारी चीज़ की कुर्बानी देते हैं। योगी - अच्छा मतलब आप भीअपने बेटे या किसी और करीबी की कुर्बानी देते हो इस दिन? शमीम - लाहौल विला कुव्वत कैसी बातें करते हो भाईजान बेटे की कुर्बानी कैसे दे दें हम ? हम तो किसी जानवर की कुर्बानी देते हैं इस दिन। योगी - क्यों समस्या क्या है इसमें? अगर आपका ईमान पुख्ता है तो अल्लाह आपके बेटे को फिर ज़िंदा कर देगा। शमीम - अरे ऐसा कोई होता है भाईजान। योगी - क्यों आपका ईमान पुख्ता नहीं है क्या? शमीम - अरे नहीं भाईजान हमारा ईमान तो एकदम पुख्ता है। योगी - तो फिर क्या अल्लाह के इंसाफ पर शुबहा है कि वो बाद में मुकर जाएगा और बेटे को ज़िंदा नहीं करेगा? शमीम - तौबा तौबा हम अल्लाह पर शुबहा कैसे कर सकते हैं ? योगी - अल्लाह पर भी भरोसा है। ईमान भी पुख्ता है। फिर बेटे की कुर्बानी क्यों नहीं देते ? या फिर आपको सबसे प्यारा वो जानवर है जिसकी कुर्बानी देते हो ? शमीम - नहीं नहीं भाईजान हमें सबसे प्यारा हमारा बेटा ही है। भला बकरीद से कुछ दिन पहले बाजार से खरीदा कोई जानवर कैसे हमें हमारे बेटे से ज्यादा प्यारा हो जाएगा आप ही बताओ ? योगी -तो मतलब आप अल्लाह से भी फरेब कर रहे हो। पैसे देकर खरीदे जानवर को औलाद से भी प्यारा बताकर अल्लाह को उसकी कुर्बानी दे रहे हो। यह तो बड़ी शर्म की बात है । शमीम - छोड़ें जनाब यह आपकी समझ में नहीं आएगा क्योंकि आप काफिर हो। चलते हैं हमारी नमाज़ का वक्त हो गया। __________________________________ कायाप्पा ढकलपत्र

च्यायला पोस्ट च टायटल वाचून हलीम ,दालचा ,फिरनी ,रान गोश्त ,बिर्याणी चे फोटो बघायला मिळतील या आशेने आलो होतो...असो अशी दृश्ये मांढरदेवी येथेही दिसत असत किंवा अनेक तत्सम हिंदू ठिकाणी अजून दिसतात,जत्रेला सुद्धा असाच सीन असतो ... बाकी जत्रेच्या मटणाची चवच झकास. पूर्वपुण्याईमुळेच मी एका मांसाहारी कुटुंबात जन्माला आलो !

In reply to by मालोजीराव

कंदुरीत वाढल्यालं पालातलं मटण! सोबत भाकरी. आरारा लैच झक्कास!!!! किंवा चुलीवरचं मटण अन सोबत मटण लोणचे/सुक्क मटण/वजडी फ्राय अन मटण पुलाव मगा भरून रस्सा!! खरंच आमची पूर्वपुण्याई.... :)

In reply to by जेम्स वांड

मटन सुक्क, (उक्कड) रस्सा चवीने खाणारे त्या सोबत ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी खाणारे, रसा चुरुन खाणारे नीट नर्कात जातात. करिता माहितीस्तव....! ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रसा चुरुन खाणारे नीट नर्कात जातात
असू देत ... हिंदू धर्मात नर्कामध्ये ७२ सुंदरी असतात

In reply to by मालोजीराव

गरीब बिचार्‍या प्राण्यांची हत्या करणारे सगळे खाटीक तर नक्कीच नरकात जातील नाही का ? मग तर, मटण आवडणार्‍याला नरकापेक्षा स्वर्गातच जास्त प्रॉब्लेम असेल ! =)) *********** अवांतर : एका गुत्त्याच्या बाहेर एक धर्मगुरू पिताड लोकांचे मतपरिवर्तन करण्याच्या प्रयत्नात असतो. धर्मगुरू (धगु) : बेटा, अती दारू पिऊन तू नरकात जाशील ना. पिताड (पि) : बरं. मग हा दारू विकणारा कोठे जाईल ? धगु : नरकात. पि : आणि गुत्त्यात दारू सर्व करणारा ? धगु : नरकात. पि : आणि तो पलिकडचा चखणा देणारा. धगु : अर्थातच, नरकात ! पि : मग, चालतंय की :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एकदम आम्हा मटणखायांचा मॉरल कंपास हाय वर गेल्याची भावना आली तुम्हाला कायम उत्तम कलेजी फ्राय अन पाया मिळो, तुमचा खाटीक तुम्हाला ताजं मटण देओ, तुम्हाला आयुष्यात कधीही फ्रोजन मटण न खायला लागो, ह्या शुभेच्छा. :D:D:D:D:D

अरे मटण खाके तो देखो . ते शाकाहार पूर्व पुण्याई वैग्रे फालतू कमेंट उत्तर न दिलेलेच बरे . कोण कोणाच्या खाण्यात ढवळाढवळ करत नाही . शाकाहारी का बरे आमचे बेष्ट असे टाहो फोडून सांगतात . वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी . त्यामुळे बोलूच नका . सोज्वळ आणि ऑल .

In reply to by वरुण मोहिते

वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी . त्यामुळे बोलूच नका असहिष्णुता असहिष्णुता बोलते वो येईच्च हय..

In reply to by वरुण मोहिते

वास्तविक जगात अल्पसंख्यांक आहेत हे शाकाहारी . हे वाचून "बेंबट्या, जगात कुंभार कमी आणि गाढवे फार. तस्मात् कुंभार हो, गाढवांस तोटा नाही." हे वाक्य आठवलं.

खाण्यासाठी प्राण्यांची हत्या करणे हा एक भाग आहे आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असणे हा दुसरा भाग आहे. १९९३-९४ च्या सुमारास पुण्याच्या कॅम्पात शिवाजी मंडईत मध्ये असणाऱ्या असह्य अस्वच्छतेमुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रमुख अधिकारी ब्रिगेडियर अप्पाचू यांनी तेथील सर्व मांस मटणाच्या दुकानांवर स्वच्छतेचे निकष पूर्ण होईपर्यंत बंदी आणली होती. यावर राजकारणी लोकानी मोठा आरडा ओरडा केला. निधर्मांध लोकांनी धर्मावर घाला झाल्याची कोल्हेकुई केली. हे प्रकरण न्यायालयात गेले असताना मुंबई उच्च न्यायालयाने निःसंदिग्ध शब्दात ब्रिगेडियर अप्पाचूंची बाजू उचलून धरली आणि जोवर स्वच्छतेचे सर्व नियम कसोशीने पाळले जात नाहीत तोवर सर्वच्या सर्व खाटिकांच्या दुकानावर बंदी घातली . शेवटी नाईलाजाने सर्व खाटीक लोकांनी आपल्या दुकानांमध्ये टाईल्स लावून घेतल्या व सिमेंट काँक्रीटची दुरुस्ती केली रक्त आणि मांस धुण्यासाठी भरपूर पाण्याची सोय केली मांस कापण्यासाठी लाकडाचा ओंडका आणून त्यावर रोजच्या रोज मीठ पसरणे माशा होऊ नयेत म्हणून खिडक्यांना जाळ्या आणि तसेच कीटक नाशक द्रव्यांचा रोजच्या रोज वापर.उरलेले मटण टांगून ठेवण्याच्या जागेवर कीटक येऊ नयेत म्हणून मोठे पंखे किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी आणि मोठी कोल्ड स्टोरेजची यंत्रे असे अत्यावश्यक उपचार चालू केले आणि पुणे शहराला स्वच्छ मांसाचा पुरवठा सुरु झाला. काही दिवसांनी याच खाटीक लोकांनी( यात एक माझा रुग्ण होता) जे झाले ते चांगल्यासाठी हे मान्य केले. अशाच तर्हेने जसे गणपती विसर्जनासाठी तलाव बांधतात तशाच तर्हेचे जनावरांच्या कुर्बानी साठी स्वच्छ खाटीकखाने शहरात काही ठिकाणी बांधून द्यावेत तेथे स्वच्छतेचे सर्व नियम पाळले जातील आणि जनतेला उपद्रव होणार नाही हि काळजी घेतली जाईल यावर करडी नजर ठेवली गेली पाहिजे. अशा ठिकाण व्यतिरिक्त इतर सर्व ठिकाणी जनावरांच्या कत्तलीला पूर्ण बंदी घातली पाहिजे आणि तिची करड्या शिस्तीने अंमलबजावणी केली पाहिजे. प्राणिजन्य पदार्थांवर जिवाणू फार लवकर वाढतात आणि रक्त हा तर जिवाणू वाढीसाठी सर्वात चांगला पदार्थ आहे. प्राणिजन्य पदार्थामुळे होणारी अन्नविषबाधा हि फारच गंभीर स्वरूपाची असते त्याबद्दल हयगय अजिबात कामाची नाही. अशा ठिकाणहून केस कातडी हाडे सारखे टाकाऊ पदार्थ साठवणे आणि वाहून नेण्यासाठी बंद झाकणाच्या डबे इ ची सोय झाली पाहिजे. असे स्वच्छ खाटीकखाने सोडून इतर कुठेही कत्तलीस परवानगी देऊ नये.

टांगून ठेवलेले बोकड्याचे मटन खराब होते का ? खाटीक त्यावर कपडे गुंडाळून ठेवतात. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राडॉ, माझ्या अंदाजाप्रमाणे बाष्पीभवन कमी करण्यासाठी कापड गुंडाळत असावेत. कलेवरातलं पाणी कमी झालं की वजन कमी भरतं. सारखं पाणी मारण्यापेक्षा कापड गुंडाळलेलं बरं. आ.न., -गा.पै.

वाघ सिंह लांडगे कसे प्राणी मारतात , खटका कि हलाल की अजुन तिसरेच काय बेशुद्ध वैगेरे

In reply to by समाधान राऊत

समाधान राऊत, वाघ सिंह वगैरे मांसाहारी प्राणी म्हातारे झाल्यावर त्यांना भक्ष्य पकडता येत नाही. या प्राण्यांचा नैसर्गिक मृत्यू भुकेने तडफडून किंवा न तडफडता म्हणजे बेशुद्ध होऊन होतो. आ.न., -गा.पै.

मुसलमान मंडळी मासे, खेकडे, कासव, साप, बेडूक, वाघ सिंह, अस्वल इ. सजीव मारून खातात का? खायच्या आधी त्यांना हलाल पद्धतीने सुरी मानेवर फिरवून तडफडत ठेवून मारतात का?

In reply to by श्रीगुरुजी

सूरी फिरवण्यासाठी खेकड्याला मान नसते. साधारणतः नांग्या तोडून त्याचे पेकाट फोडले जाते. भाजी उशिरा करायची असेल तर नांग्या तोडून तसेच ठेवले जातात. मुस्लिमांची पद्धत या पेक्षा काही वेगळी असावी असे वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मुस्लिम खेकडे कसे मारतात ते माहीत नाही , पण माशाबद्दल एका मुस्लिम स्कॉलरकडून गमतीदार माहिती मिळाली होती, ती अशी, माशाना कल्ले असतात, ते कल्ले म्हणजेच अल्हाहने केलेली व्यवस्था आहे, त्याची गळफडे चिरलेली दिसतात म्हणजे ते हलाल आहे. खेकड्याच्या बाबतीत मात्र स्कॉलरकडे उत्तर नव्हते , त्यामुळं दुसरा स्कॉलर भेटला की विचारीन पण पुष्कळदा इस्लामी ज्ञान असलेला काही प्रश्नावर सपशेल उताणी पडतो

भरपूर माहिती मिळाली या धाग्यावर.. प्राण्यांना वेदना होत रहावी अशी काळजी घ्या ही धर्माज्ञा अन ती पाळणारे लोक विचित्र वाटले. अवांतरः लवकरात लवकर प्रयोगशाळेत तयार होऊ शकेल असे कृत्रीम मांस स्वस्तात उपलब्ध होवो अशी इच्छा आहे. खाण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सर्व प्राण्यांचे आता केवळ मशिन्समध्ये रूपांतर झाले आहे. त्यांचा सर्वांचा अवतार कायमचा संपावा असे वाटते.

एकदा Farm to Fridge असा शोध घेऊन समोर येणारा विडिओ नक्की बघावा. हैदराबादेत काय धुडगूस असेल इतका किळसवाणा प्रकार समोर येईल (तो सुद्धा अत्यंत सुसंस्कृत(?) आणि पुढारलेल्या (कशात?) समजल्या जाणाऱ्या पाश्चात्य देशांतून)!