Skip to main content

ताज्या घडामोडी - १०

लेखक गामा पैलवान यांनी शुक्रवार, 18/08/2017 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
ता.घ. - ९ चे १५० प्रतिसाद झाले म्हणून नवीन धागा. -गा.पै.

वाचने 85648
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

राणे भाजप मध्ये येणार ही अगदी चांगली बातमी आहे. माझ्या मते राणेंचे दात पडून गेले आहेत. त्यामुळे जे पदरात पडत आहे ते घ्यावे असा त्यांचा दॄष्टीकोन आहे. ते मुखयमंत्री होऊ शकत नाहीत हे त्यांना माहीती असावे. रावसाहेब दानवे सारख्या फालतू माणसांचे महत्व जरा कमी होईल. हे चांगलेच आहे. फडणवीस सोडले तर महाराष्ट्र भाजप मधे वकूबाचा नेताच नाही. याचा ताण फडणवीसांवर येत असणार. राणे हे प्रभावी आणि अभ्यासू नेते आहेत. याचा फायदाच होईल. त्यांचे डोळे बघून आणि बोलणे पाहून पूर्वी 'याला काल जरा जास्त झाली आहे' असे वाटायचे. आता बरीच वर्षे तसे वाटत नाही. मध्यंतरी एकदा मोदीलाटेमधे नीतेश राणे निवडणूक हरले तेंव्हा जे स्टेटमेंट दिले त्यानंतर एकदाच तसे वाटले होते.

मीरा-भाईंदर मधील महापालिका निवडणुकीत भाजपने ९५ पैकी ५४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. शिवसेना व काँग्रेस भाजपच्या खूपच मागे आहेत. महाराष्ट्रात मागील ६ महिन्यात एकूण १७ महापालिकांची निवडणुक झाली. त्यापैकी १२ महापालिकेत भाजप, ३ मध्ये काँग्रेस व २ मध्ये शिवसेनेला सत्ता मिळाली आहे. शिवसेना स्वबळावर मुंबई-ठाण्याच्या काही मोजक्या प्रभागांच्या बाहेर कधीच नव्हती आणि नाही हे वास्तव आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी, एक कट्टर शिवसैनिक म्हणून मीराभाईंदरात शिवसेना हरल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. उद्धौजी बाळाजी भाजपला नेस्तनाबूत करू पहात होते, त्यात काही चुकीचं नाही. मात्र गिल्बर्ट मेंडोसा या भ्रष्ट नेत्याला हाताशी धरलेलं मला अजिबात आवडलं नव्हतं. मीराभाईंदराच्या जनतेनेही भ्रष्टांना दूर सारलं हे स्तुत्य आहे. यापुढे शिवसेनेस स्वच्छ माणसेच उभी करावी लागतील. म्हणून माझ्यातला कट्टर शिवसैनिक सुखावला आहे. आ.न., -गा.पै.

लोकहो, ऐन बैलपोळ्याच्या सुमुहूर्तावर बैलासारखी बडबड केली आहे श्री. जावेद अख्तर यांनी. पाकिस्तानचं रडगाणं भारतात गाणारा इसम शुद्ध नंदीबैलच आहे. अधिक माहिती : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/javed-akht… तर बैलपोळ्याच्या निमित्ताने या नंदीबैलास वर्षभर कम्युनिस्ट (अ)विचारांचे ओझे वाहून नेण्यास शुभेच्छा. आ.न., -गा.पै. जाताजाता : बैलपोळ्यानिमित्त खरंतर ही बातमी द्यायचं मनी योजलं होतं : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/shripal-sa… पण सबनीसांच्या वर्णनासाठी कुत्रा हा प्राणी अधिक समर्पक वाटतो. का ते इथे जाणून घ्या : http://dakhalpatra.blogspot.co.uk/2016/01/blog-post.html

In reply to by गामा पैलवान

जावेदजींना समर्थन.. ते बोलत आहेत त्यात गैर काहीच नाही. बाकी, सबनीसबद्दल मात्र तुम्ही योग्य आहात..

मानहानि मामले में केजरीवाल ने लिखकर मांगी माफी, कहा-बहकावे में आ गया था

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने बीजेपी नेता और पूर्व सांसद अवतार सिंह भड़ाना से पटियाला हाउस कोर्ट में माफी मांग ली है। गौरतलब है कि भड़ाना ने केजरीवाल के खिलाफ मानहानि का मुकदमा दायर किया था और एक करोड़ की क्षतिपूर्ति रकम की मांग की थी। भड़ाना का आरोप है कि केजरीवाल ने उनके संबंध में 31 जनवरी 2014 को एक आपत्तिजनक बयान देते हुए कहा था कि वे देश के सबसे भ्रष्ट व्यक्तियों में से एक हैं। अब कोर्ट में केजरीवाल ने भड़ाना से लिखित मे माफी मांगी है कि अपने सहयोगी के बहकावे मे आकर उन्होंने भड़ाना पर आरोप लगा दिए थे। बाद में पता चला कि वो आरोप सही नहीं हैं, इसलिए वो माफ़ी मांग रहे है। http://www.amarujala.com/delhi-ncr/.WZq19NeeLL0.facebook

In reply to by मोदक

दुव्यातील बातमी अमर उजालाने काढुन टाकलेली दिसतेय. -- 44 ओए होए !! लगता है आप गलत निकल लिए हैं। कोई बात नहीं सबके साथ होता है। आप दुबारा कोशिश कर सकते हैं या फ़िर नीचे अपना पसंदीदा पेज खोज सकते हैं। -- त्या दुव्यावर गेल्यास वरिल मेसेज येतोय.

Still the big game is waiting ;) साला बिच्छु का मंतर जानता नहि और साप के बिल मे हाथ डालरा....अन्ना नै रे ये तेरे कु माफ कर देंगे. अब किया है तो भरो तब तो कै रहे तो और करो और करो.

तिहेरी तलाक संबंधात सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्पष्ट भूमिका न घेता चेंडू संसदेकडे ढकलून अत्यंत निराशाजनक निर्णय दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

माझ्या मते, योग्य निर्णय. करोडो लोकांच्या जीवनावर परिणाम करणारे असे कायदे एका फटकार्‍यात कोर्टाने करणे अयोग्य आहे. साधक बाधक चर्चा करून, संसदेतच हा कायदा व्हायला हवा. शेवटी लोकांना समान नागरी कायदा हवा आहे असाच त्यांचा कौल आहे. तेव्हा, जनतेच्या मनात असणारा कायदा करण्याची संधी लोकांच्या प्रतिनिधींना मिळालीच पाहिजे. अर्थात आता जबाबदारी सरकारची. त्यांनी सर्व पैलू विचारात घेऊन पूर्णपणे जेंडर न्युट्रल कायदा बनवावा. (संसदेत हा विषय पोहोचला तर सर्वच पक्षांचे स्त्रिप्रश्नावर नेमकी काय भुमिका आहे हेदेखिल स्पष्ट होईल.) ट्रिपल तलाक मधील अन्याय्य, लिंगभेदभावाबद्दल कोर्ट काय म्हणालेय ते बघावे लागेल.

In reply to by श्रीगुरुजी

कसा काय निराशाजनक निर्णय? उलट त्यांच्या अखत्यारीत न येणाऱ्या गोष्टीवर त्यांनी योग्य तो संदेश देण्याची व्यवस्था केल्याचे दिसते. सहा महिने बंदी घालून तेवढ्या काळात कायदा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकार (खरंतर संसद) या बाबतीत किती गंभीर आहे हेही कळेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पूर्ण समहत. हे कायदे संसदेनेच बनवले पाहिजेत. कोर्टाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नाही. कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. मोदी सरकार या मुद्द्याबद्द्ल किती सिरियस आहे ते समजेल आता.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात काहीतरी गोंधळ आहे. ज्यांना हा निकाल नीट समजला आहे त्यांनी कृपया शंकानिरसन करावे. १) तिहेरी तलाक हा घटनाबाह्य आहे असा निर्णय ३-२ अशा फरकाने सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे असे सांगण्यात येत आहे. २) तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने आजपासून ६ महिने बंदी घातलेली आहे असेही सांगण्यात येत आहे. जर तिहेरी तलाक हा घटनाबाह्य आहे असा निर्णय आहे तर त्यावर कायमस्वरूपी बंदी बाय डिफॉल्ट येते. जी प्रक्रिया घटनाबाह्य आहे त्यावर एका ठराविक अल्पकालासाठी बंदी कशासाठी? ६ महिन्यांनंतर ही बंदी संपून तिहेरी तलाक पुन्हा एकदा सुरू होणार का? ३) संसदेने तिहेरी तलाक संबंधात ६ महिन्यात कायदा करावा असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे असे ऐकले. हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की फक्त सूचना आहे? सूचना असेल तर तसा कायदा करणे संसदेसाठी अजिबात बंधनकारक नाही. तसा आदेश असेल आणि जर ६ महिन्यात तसा कायदा तयार होऊ शकला नाही किंवा कायद्याचे विधेयक संसदेत नामंजूर झाले तर त्या परिस्थितीत तिहेरी तलाक पुढे सुरू राहणार का? ४) "तिहेरी तलाक हा महिलांवर अन्यायकारक असून तो घटनाबाह्य आहे व त्यामुळे तिहेरी तलाकनुसार दिलेला घटस्फोट कायदेशीर मानला जाणार नाही" किंवा "तिहेरी तलाक इस्लामच्या परंपरेनुसार कायदेशीर आहे" असा अगदी थोडक्यात निसंदिग्ध निर्णय सर्वोच्च न्यायालयाला देता आला असता. त्याऐवजी एक संदिग्ध निर्णय देऊन चेंडू संसदेकडे ढकलून न्यायालयाने याविषयीची जबाबदारी टाळली आहे असे प्रथमदर्शनी वाटत आहे. ५) याविषयी संसदेत कायदा करणे हे सोपे नाही. प्रथम कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती नेमावी लागेल. त्यात इतर अनेकांना व मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यावे लागेल. समितीच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत व्हावे लागेल. तिहेरी तलाकबद्दल ५ न्यायाधीशांमध्येच एकमत झालेले नाही (तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे हा निर्णय ३ विरूद्ध २ या अल्पफरकाने आलेला आहे). समितीच्या सदस्यांमध्येही एकमत होईल याची खात्री नाही. समजा एकमत होऊन कायद्याचा मसुदा तयार झाला तर त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमताने मंजुरी मिळावी लागेल. मागील ७० वर्षात पूर्वाश्रमीचा जनसंघ म्हणजेच आताचा भाजप व शिवसेना वगळता इतर बहुतेक सर्व पक्षांनी तिहेरी तलाक व महिलांवर अन्याय होणार्‍या इतर कोणत्याही प्रकरणात (बहुपत्नीत्व, पोटगी इ.) हस्तक्षेप करण्यास सातत्याने विरोध केला आहे. १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांना पोटगी देण्यासंबंधी दिलेला ऐतिहासिक निर्णय तत्कालीन राजीव गांधींच्या सरकारने मुस्लिम मौलवींसमोर लोटांगण घालून नवीन कायदा आणून रद्द केला. जेव्हा जेव्हा भाजप समान नागरी कायद्याबद्दल बोलतो तेव्हा तेव्हा जातीयवादी काँग्रेस व जातीयवादी काँग्रेसी विचारांचे इतर सर्व पक्ष भाजपला हिंदुत्व इतरांवर लादायचे आहे, समान नागरी कायद्यासंबंधी मुस्लिमांनाच ठरवू द्या अशी भूमिका घेऊन त्यात हस्तक्षेप करण्याचे टाळत आले आहेत. यावेळी सुद्धा ते वेगळी भूमिका घेण्याची सुतराम शक्यता नाही. तिहेरी तलाक खटल्यात मुस्लिम व्यक्तिगत कायदे मंडळाचा वकील काँग्रेसचा खासदार कपिल सिब्बल होता ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर जेव्हा हा नवीन कायदा संसदेत मतदानासाठी येईल तेव्हा काँग्रेस व काँग्रेसी पक्ष काय भूमिका घेतील हे उघड गुपित आहे. एकीकडे सातत्याने मुस्लिम व्यकिगत कायद्यात बदल करायला विरोध करायचा, दुसरीकडे समान नागरी कायद्याची मागणी करणार्‍या भाजपवर इतरांवर हिंदुत्व लादण्याचा आरोप करायचा, तिसरीकडे आजच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करायचे व त्याचवेळी तिहेरी तलाक रद्द करायला विरोध करणार्‍या मुस्लिम व्यक्तिगत कायदे मंडळाचे वकीलपत्र आपल्याच पक्षाच्या खासदाराकडे द्यायचे असे एकाचवेळी अनेक दगडांवर पाय ठेवून कसरत करण्याचे काम काँग्रेस ७० वर्षे करीत आली आहे. या भूमिकेत यापुढे बदल होण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. त्यामुळे हा नवीन कायदा संसदेत चर्चेसाठी येऊच नये यासाठी काँग्रेस, डावे पक्ष व इतर जातीयवादी पक्ष आटोकाट प्रयत्न करतील. या प्रश्नावर व्यापक चर्चा होऊ देत, कायदा करण्याची घाई नको, सुधारणा सक्ती करून होत नाहीत, त्यासाठी समाजप्रबोधन करणे आवश्यक आहे, भाजपने इतर धर्मांवर हिंदुत्व लादू नये अशी शहाजोग भूमिका घेऊन काहीतरी करून हा विषय संसदेत येऊनच द्यायचा नाही असाच या नालायकांचा प्रयत्न राहील. एवढे करूनही जर या नवीन कायद्याचे विधेयक संसदेत मतदानासाठी आले तर भाजप व शिवसेना वगळता इतर बहुतेक सर्व पक्ष मुस्लिम मतपेढी गमावण्याच्या भीतिने विधेयकाच्या विरोधात मतदान करतील. लोकसभेत भाजपकडे बहुमत असल्याने फार फरक पडणार नाही. परंतु राज्यसभेत भाजप व सेनेचे मिळून २४३ पैकी जेमतेम ६३ खासदार आहेत. त्यामुळे तिथे हे विधेयक नक्कीच नामंजूर होईल. अशा परिस्थितीत तिहेरी तलाकवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काय होईल? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तिहेरी तलाक घटनाबाह्य आहे, परंतु तिहेरी तलाकवर बंदी घालण्याचे विधेयक संसदेने नामंजूर केले तर तिहेरी तलाकचे नक्की काय होणार हा प्रश्न आजतरी अनुत्तरीत आहे. मुळात संसदेने या प्रश्नात मागील ७० वर्षे लक्ष घालण्याचे टाळल्यानेच मुस्लिम महिलांना न्यायालयाकडे दाद मागावी लागली आहे. परंतु न्यायालयाने स्वतः निसंदिग्ध निर्णय न घेता याविषयीचा निर्णय संसदेच्या सभागृहातच ढकलून दिला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

दोन गोष्टी (माझे वैयक्तिक मत) - १. घटनेनुसार कुराण ने संमत केलेल्या गोष्टी ह्या धर्माचरणाच्या घटनेने दिलेल्या मूलभूत हक्कात येतात. तिहेरी तलाक हा कुराणनेच संमत केलेला नाही आणि म्हणून पर्यायाने तो घटनाबाह्य आहे असं मत बहुतेक तीन न्यायाधीशांनी मांडलेले दिसते. २. सहा महिन्यात नुसते विधेयक मांडण्याचा आदेश/सल्ला न्यायालयाने दिलेला दिसतो. एकदा विधेयक संसदेसमोर आले कि संसद ते पास करेपर्यंत/फेटाळेपर्यंत बंदी लागू राहील असे नमूद केल्याचे दिसते. म्हणजे विधेयक लांबणीवर टाकून विन विन सिच्युएशन करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे माझे अंदाज आहेत. चू..भू. द्या. घ्या.

मुळात संसदेने या प्रश्नात मागील ७० वर्षे लक्ष घालण्याचे टाळल्यानेच मुस्लिम महिलांना न्यायालयाकडे दाद मागावी लागली आहे. परंतु न्यायालयाने स्वतः निसंदिग्ध निर्णय न घेता याविषयीचा निर्णय संसदेच्या सभागृहातच ढकलून दिला आहे. == अगदी हाच विचार, न्यायालयाचा निर्णय येताच मनात आला होता.

सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयाविषयी अधिक माहीती खालील लेखात आहे. Supreme Court has banned instant triple talaq, not triple talaq वरील लेखानुसार न्यायालयाने तिहेरी तलाकवर कोणत्याही स्वरूपाची बंदी घातलेली नसून 'तात्काळ तिहेरी तलाक'वर फक्त ६ महिन्यांची बंदी घातलेली आहे. Instant triple talaq (or talaq-e-biddat) happens when the husband spells out the word 'talaq' (divorce) three times in one instance - either in a single sitting, or through phone, email, or text messages. परंतु तीन चांद्रमासात देण्यात येणार्‍या तोंडी तलाकवर न्यायालयाने बंदी घातलेली नाही. On the other hand, the more accepted form of divorce is how the religion has mandated it: the triple talaq (or talaq-ul sunnat). Under this form of triple talaq, the husband says the first 'talaq' and can only say the second time in the next lunar cycle. The wife, meanwhile, has to prepare herself for the three-month 'iddat' period, covering three mestrual cycles. In this duration, the husband can rethink over his decision and re-conciliate with the wife. When the period of iddat expires and the husband does not revoke the talaq either expressly or by consummation, the divorce is considered irrevocable and final. तसेच घटस्फोटानंतर नवर्‍याने पत्नीला किती पोटगी द्यायची, किती काळ पोटगी द्यायची याविषयात न्यायालयाने लक्षच घातलेले नाही. त्यामुळे राजीव गांधींनी १९८६ मध्ये शहाबानो खटल्याचा निर्णय फिरवून जो नवीन कायदा आणला (ज्यानुसार मुस्लिम नवर्‍याने घटस्फोटानंतर पत्नीला फक्त ३ चांद्रमास इतक्या काळासाठीच पोटगी देणे बंधनकारक आहे) तो अजूनही अबाधित आहे. म्हणजे आजच्या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना फारसे काही मिळालेले नाही. तात्काळ तलाकवर ६ महिने बंदी एवढी एक गोष्ट सोडली तर बाकी सर्व जैसे थे आहे. तोंडी तलाकवर बंदी नाही, तात्काळ तलाकवरील बंदी फक्त ६ महिने आणि पोटगीविषयी कोणताही निर्णय नाही असे आजच्या निकालाचे स्वरूप आहे. बहुपत्नीत्वाचा मुद्दा तर न्यायालयाने विचारात सुद्धा घेतलेला नाही. म्हणूनच आजच्या निकालाचे वर्णन 'ऐतिहासिक निकाल', 'मुस्लिम स्त्रियांची जोखडातून सुटका' इ. शब्दात करून मिठाई वाटून आनंद करण्यासारखे काहीही घडलेले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

बहुपत्नीत्वाचा मुद्दा तर न्यायालयाने विचारात सुद्धा घेतलेला नाही.
बहुपत्नित्वाचा मुद्दा या याचिकेत होता?

In reply to by श्रीगुरुजी

श्री गुरुजी श्री राजीव गांधींनी जरी शहाबानो केस नंतर कायदा बदलला तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने त्या कायद्याला छेद देणारा ऐतिहासिक निर्णय डॅनियल लतिफी केस मध्ये दिला त्या प्रमाणे मुसलमान महिलांना पोटगी देणे हे हि अनिवार्य आहे. हि एक ऐतिहासिक केस आहे ज्यात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. कायद्याच्या अभ्यासकांनी केस मुळातून वाचावी. https://indiankanoon.org/doc/410660/ डॅनियल लतिफी केसचा सारांश While upholding the validity of the Act, we may sum up our conclusions: 1) a Muslim husband is liable to make reasonable and fair provision for the future of the divorced wife which obviously includes her maintenance as well. Such a reasonable and fair provision extending beyond the iddat period must be made by the husband within the iddat period in terms of Section 3(1)(a) of the Act. 2) Liability of Muslim husband to his divorced wife arising under Section 3(1)(a) of the Act to pay maintenance is not confined to iddat period. 3) A divorced Muslim woman who has not remarried and who is not able to maintain herself after iddat period can proceed as provided under Section 4 of the Act against her relatives who are liable to maintain her in proportion to the properties which they inherit on her death according to Muslim law from such divorced woman including her children and parents. If any of the relatives being unable to pay maintenance, the Magistrate may direct the State Wakf Board established under the Act to pay such maintenance. 4) The provisions of the Act do not offend Articles 14, 15 and 21 of the Constitution of India. In the result, the writ petition Nos. 868/86, 996/86, 1001/86, 1055/86, 1062/86, 1236/86, 1259/86 and 1281/86 challenging the validity of the provisions of the Act are dismissed. All other matters where there are other questions raised, the same shall stand relegated for consideration by appropriate Benches of this Court. J. [ G.B. PATTANAIK ] J. [ S. RAJENDRA BABU ] J. [ D.P. MOHAPATRA ] J. [ DORAISWAMY RAJU ] J. [ SHIVARAJ V. PATIL ] SEPTEMBER 28, 2001. बाकी तीन एकत्र तलाकला कायमची बंदी आली आहे कारण ३ न्यायाधीशानी तो घटनाबाह्य आहे असा निस्संदिग्ध निर्वाळा दिला आहे. (इतर दोन न्यायाधीशांनी बोटचेपेपणा केला होता कि सहा महिनेपर्यंत आम्ही त्याला स्थगिती देतो आहोत तोवर सरकारने कायदा आणावा.) एकत्र तीन तलाक --तलाक ए बिद्दत फक्त रद्द झाला आहे बाकी तलाक ए सुनाह अजून शाबूत आहे. याचे दोन प्रकार तलाक ए एहसान आणि तलाक ए हसन अजून अस्तित्वात आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Divorce_in_Islam

आज तीन राज्यांमधील चार विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या जागा आहेत गोव्यात पणजी आणि वाळपोई, दिल्लीत बवाना आणि आंध्र प्रदेशात नंद्याल. गोव्यात पणजीमधून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर निवडणुक लढवत आहेत तर वाळपोईमधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांचे चिरंजीव विश्वजीत राणे हे भाजपच्या तिकिटावर निवडणुक लढवत आहेत. दिल्लीतील बवानामधून २०१५ मध्ये विधानसभेवर निवडून गेलेले वेदप्रकाश यांनी दिल्ली महापालिका निवडणुकांआधी आआपचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. आता ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. आआपसाठी बवानाची पोटनिवडणुक महत्वाची आहे. या वर्षात सुरवातीला पंजाब आणि गोव्यात पक्षाने मार खाल्ला. त्यानंतर राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये डिपॉझिट गमावायची वेळ पक्षावर आली. त्यानंतर दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाने मार खाल्ला. या तीन धक्क्यांमधून पक्ष सावरतो न सावरतो तोच माजी मंत्री कपिल मिश्रांनी केजरीवालांविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप केले. पूर्वी झाडाचे पान पडल्यावरही 'मोदीजी मोदीजी' म्हणून टिवटिवाट करणारे केजरीवाल या लागोपाठच्या बसलेल्या धक्क्यांनंतर गप्पच झाले. असे म्हटले जात आहे की केजरीवाल अती बडबड करणे बंद करून कामावर लक्ष देऊन पक्षाची दिल्लीमध्ये पुनर्बांधणी करत आहेत. दिल्लीत ७० पैकी ६७ जागा जिंकल्यावर आपण जाऊ तिथे ९५% जागा जिंकू आणि पंतप्रधानपद आपल्या अगदी आवाक्यात आले आहे आणि जणू काही आपण ७, रेस कोर्सच्या कॉरीडॉरमध्येच पोहोचलो आहोत अशी धारणा केजरीवालांची झाली होती आणि त्यातून त्यांनी अतीबडबडीला सुरवात केली होती. पण तो प्रकार आपल्यावरच उलटत आहे हे बहुदा त्यांच्या लक्षात आलेले दिसते. त्यातूनही ते आपली चूक लक्षात येऊन कामावर लक्ष देऊन दिल्लीमध्ये चांगले प्रशासन द्यायचा प्रयत्न करणार असतील तर ते स्वागतार्ह आहे. या केजरीवाल-२.० व्हर्जनसाठी ही पोटनिवडणुक महत्वाची आहे. राजौरी गार्डनप्रमाणे बवानामध्येही मार खाल्ला तर मात्र केजरीवालांपुढच्या अडचणी अजून वाढतील. या पोटनिवडणुकांची मतमोजणी २८ ऑगस्ट रोजी आहे. निकाल येताच ते इथे पोस्ट करेनच. उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि दोन उपमुख्यमंत्री-- केशवचंद्र मौर्य आणि दिनेश शर्मा यांचा उत्तर प्रदेश विधीमंडळावर निवडून जायचा नक्की बेत आहे याविषयी अजूनही पुरेशी स्पष्टता नाही हे धक्कादायक आहे. त्यांना १९ सप्टेंबरपूर्वी विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावे लागेल. अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल. आता विधानसभेवर निवडून जाता येणार नाही कारण माझ्या माहितीत पुढील दोन आठवड्यात कुठलीही पोटनिवडणुक होणार नाही. विधानपरिषदेवर निवडून जायचा काय बेत आहे याची कल्पना नाही. जुलै १९९३ मध्ये नरसिंह राव सरकारमधील एका मंत्र्याला (बहुदा प्रणव मुखर्जींना-- नक्की तपासून बघावे लागेल) मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांत संसदेच्या कोणत्याही सभागृहावर निवडून जाण्यात अपयश आले म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. जर उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला तर त्यानंतर ही घडलेली पहिली घटना असेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

बवाना पोटनिवडणुकीसाठी केजरीवालांचे मंत्री इम्रान हुसैन यांनी मुस्लिम समुदायाला आआपला मत द्यावे असे 'धर्माच्या नावाने' आवाहन केले आहे. तसे त्यांनी पोस्टरच जारी केले आहे. 1 १९८७ च्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीतून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेनेचे रमेश प्रभू, १९९० च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये विधानसभेवर निवडून गेलेले शिवसेना-भाजपचे अनेक आमदार, १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेलेले ठाण्याचे राम कापसे आणि औरंगाबादचे मोरेश्वर सावे हे खासदार यांची निवडणुक उच्च न्यायालयाने 'धर्माच्या नावावर मते मागितली' म्हणून रद्दबादल केली होती. (त्यानंतर डिसेंबर १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात मनोहर जोशी आणि राम कापसे यांची निवडणुक वैध ठरली-- इतरांचे माहित नाही). त्यानंतर १९९५ च्या विधानसभा निवडणुकांपासून शिवसेना आणि महाराष्ट्रात भाजपने उघडपणे धर्माच्या नावावर मते मागणे बंद केले. बवानात आम आदमी पक्षाचा विजय झाला तरी या प्रकारामुळे त्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देता येईल आणि ती निवडणुक न्यायालय रद्दबादल ठरवेल हीच शक्यता जास्त.

In reply to by गॅरी ट्रुमन

या पत्रकाविरुद्ध तेथील विरोधी पक्षांनी ताबडतोब निवडणूक आयोगाकडे तक्रार आणि पोलीस स्थानकात इम्रान हुसेन यांच्या आणि आप च्या विरोधात "एफ आय आर" दाखल करणे आवश्यक आहे. जर आप "हरले" तर पुढे काहीच करायला लागणार नाही आणि आप जिंकले तर उच्च न्यायालयात रीट अर्ज दाखल करून त्याची निवडणूक रद्दबातल करता येईल.

In reply to by गॅरी ट्रुमन


In reply to by प्रसाद_१९८२

अजूनपर्यंत तरी त्याने पोलिसात तक्रार दाखल केली आहे अशी बातमी वाचलेली नाही. कुणी वाचली असल्यास ती इथे जरूर द्यावी ही विनंती. हा दोन्ही डगरींवर पाय ठेवायचा प्रयत्न आहे का? एकीकडे पोस्टर जारी करायचे आणि दुसरीकडे ते अंगावर शेकायची वेळ आली की म्हणायचे दुसर्‍या कोणीतरी माझ्या नावाने ते पोस्टर छापले आहे?

In reply to by गॅरी ट्रुमन

उत्तर प्रदेशात मात्र मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि दोन उपमुख्यमंत्री-- केशवचंद्र मौर्य आणि दिनेश शर्मा यांचा उत्तर प्रदेश विधीमंडळावर निवडून जायचा नक्की बेत आहे याविषयी अजूनही पुरेशी स्पष्टता नाही हे धक्कादायक आहे. त्यांना १९ सप्टेंबरपूर्वी विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून जावे लागेल. अन्यथा त्यांना राजीनामा द्यावा लागेल. १९ सप्टेंबरपूर्वी कोणतीही पोटनिवडणुक नसल्याने आता तीन शक्यता आहेत. १) विधानपरीषदेतील दोन आमदारांनी राजीनामा द्यायचा व त्यांच्या जागी या दोघांना निवडून द्यायचे. परंतु इतक्या लगेच पोटनिवडणुक होईल असे वाटत नाही. २) १८ सप्टेंबरला या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा व १९ सप्टेंबरला पुन्हा नव्याने शपथ घ्यायची. परंतु असे करणे हा अत्यंत चुकीचा पायंडा ठरेल कारण भविष्यात कोणतीही व्यक्ती कधीही कोणत्याही सभागृहात निवडून न येता दर सहा महिन्यांनी नव्याने शपथ घेऊन पदावर कायम राहू शकेल. ३) १८ सप्टेंबरला या दोघांनी राजीनामा द्यायचा व त्यांच्या जागी नवीन व्यक्ती निवडायच्या. मोदी/शहा आदित्यनाथांना हटवून त्यांच्या जागी नवीन व्यक्ती आणण्याचा धक्का देऊ शकतील का हे सांगता येणे अवघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

२) १८ सप्टेंबरला या दोघांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा व १९ सप्टेंबरला पुन्हा नव्याने शपथ घ्यायची. परंतु असे करणे हा अत्यंत चुकीचा पायंडा ठरेल कारण भविष्यात कोणतीही व्यक्ती कधीही कोणत्याही सभागृहात निवडून न येता दर सहा महिन्यांनी नव्याने शपथ घेऊन पदावर कायम राहू शकेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या २००१ मधील एका निर्णयानुसार असे करता येणार नाही. पंजाबचे मुख्यमंत्री बियंतसिंग यांची ३१ ऑगस्ट १९९५ रोजी हत्या झाली. त्यानंतर हरचरणसिंग ब्रार मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रीमंडळात ९ सप्टेंबर १९९५ रोजी बियंतसिंग यांचे पुत्र तेजप्रकाशसिंग यांचा समावेश झाला. मंत्रीपदाची शपथ घेताना तेजप्रकाशसिंग पंजाब विधानसभेचे सदस्य नव्हते. त्यांना ६ महिन्यात (९ मार्च १९९६ पर्यंत) पंजाब विधानसभेवर निवडून जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी ८ मार्च १९९६ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर हरचरणसिंग ब्रार यांच्याजागी राजिंदर कौर भट्टल मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या मंत्रीमंडळात २३ नोव्हेंबर १९९६ रोजी तेजप्रकाशसिंग यांचा परत मंत्री म्हणून समावेश झाला. मधल्या काळात ते पंजाब विधानसभेवर निवडून गेले नव्हते. त्यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाला कुणा एस.आर.चौधरी यांनी आव्हान दिले. हे आव्हान उच्चन्यायालयाने फेटाळले पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र हे आव्हान ग्राह्य धरले. त्यावेळी सर्वोच्च न्यायलयाने म्हटले होते: "`it would be subverting the Constitution to permit an individual, who is not a member of the Legislature, to be appointed a Minister repeatedly for a term of six consecutive months, without him getting himself elected in the meanwhile......``the practice would be clearly derogatory to the constitutional scheme, improper, undemocratic and invalid." न्यायालयाचा हा निर्णय योग्यच होता हे म्हणायला हरकत नसावी. अन्यथा एखादा राजकारणी एकदाही निवडून न येता पाच वर्षे मंत्री/मुख्यमंत्री राहू शकेल.

In reply to by गॅरी ट्रुमन

ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे विधानपरीषदेवर निवडून जाणे किंवा नवीन मुख्यमंत्री व मंत्री निवडणे हे दोनच पर्याय शिल्ल्क राहतात. मला असं वाटतंय की मोदी/शहा पूर्णपणे नवीन व्यक्ती निवडून धक्का देतील.

In reply to by श्रीगुरुजी

मे २००१ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या वेळी त्यापूर्वी जयललितांना एका खटल्यात दोन वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा झाली असल्यामुळे त्या निवडणुक लढवायला पात्र नव्हत्या. अण्णा द्रमुकने निवडणुक जिंकली. त्यानंतर राज्यपाल मीर साहेबा फातिमा बिबी यांनी अण्णा द्रमुक विधीमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून जयललितांनाच मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली (१४ मे २००१ रोजी). तेव्हा जयललितांना १४ नोव्हेंबर २००१ पूर्वी तामिळनाडू विधानसभेवर निवडून जाणे भाग होते. सुरवातीला अण्णा द्रमुक कॅम्पमध्ये म्हटले जात होते की सहा महिन्यात सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय फिरवून पोटनिवडणुक वेळेत झाली तर ठिकच. अन्यथा १३ नोव्हेंबर रोजी जयललितांनी राजीनामा द्यायचा आणि लगेच दुसर्‍या दिवशी मुख्यमंत्रीपदाची परत शपथ घ्यायची. पण ऑगस्ट २००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तेजप्रकाशसिंग प्रकरणात हा निर्णय दिल्यामुळे जयललितांच्या त्या बेतावर पाणी पडले. विधानसभा निवडणुक लढवायला अपात्र असलेल्या जयललितांना मुख्यमंत्री नेमायच्या राज्यपालांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले गेले. ३० सप्टेंबर २००१ रोजी न्यायालयाने जयललितांची मुख्यमंत्रीपदावरील निवड अवैध ठरवली आणि त्यांच्या जागी ओ.पन्नीरसेल्वम पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. शरद पवार केंद्रातून महाराष्ट्रात परत आले तेव्हाही शरद पवारांनी सहा महिने पूर्ण व्हायच्या आत राजीनामा द्यायचा आणि परत मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची हा प्रकार व्हायची शक्यता निर्माण झाली होती. पवारांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ६ मार्च १९९३ रोजी. म्हणजे त्यांना ६ सप्टेंबर १९९३ पूर्वी महाराष्ट्र विधानसभेवर किंवा विधानपरिषदेवर निवडून जाणे भाग होते. त्यांनी पुणे विभागातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेसाठी निवडणुक होणार होती त्यासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी मतदान होणार होते ३ ऑगस्ट १९९३ रोजी. तेव्हा मुख्य निवडणुक आयुक्त होते टी.एन.शेषन. निवडणुकांच्या कामासाठी जे सरकारी कर्मचारी आणि पोलिस नेमले जातील त्यावर निवडणुक आयोगाचेच नियंत्रण असावे की सरकारचे यावरून त्यांचे नरसिंहराव सरकारशी मतभेद झाले होते. नरसिंहराव सरकार शेषन यांची ही मागणी मान्य करायला तयार नव्हते. तेव्हा २ ऑगस्ट १९९३ रोजी (मतदानाच्या आधल्या दिवशी) सर्व पोटनिवडणुका बेमुदत स्थगित करायचा अनाकलनीय आदेश शेषन यांनी काढला. ते त्यांच्या काहीशा चक्रम स्वभावाला अनुसरूनच होते. पण त्यामुळे पवारांची पंचाईत झाली. घाईघाईने पवारांनी कोर्टात धाव घेऊन या आदेशाला स्थगिती मिळवली. दुसर्‍या दिवशी ठरल्याप्रमाणे मतदान झाले. पण नंतर शेषन यांनी मतमोजणी करून निकाल जाहिर करायची प्रक्रीया सुरू करायलाच नकार दिला. परत पवार कोर्टात गेले होते. कोर्ट नक्की निकाल कधी देईल याविषयी अनिश्चितता होती. जास्त उशीर लागल्यास पवारांनी ५ सप्टेंबर १९९३ रोजी राजीनामा देऊन ६ सप्टेंबरला परत मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी असे दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या गोटातून म्हटले जात होते. पण कोर्टाने वेळेत आदेश दिला आणि मतमोजणी होऊन पवार विजयी झाले. म्हणून ही वेळ आली नाही.

गोपनीयतेचा हक्क हा मूलभूत हक्क आहे असे सर्वोच्च न्यायालयाने जाहिर केले आहे. या निकालाचे काय परिणाम होतील याविषयी कोणाला काही माहिती आहे का? जर का कोणी संशयित दहशतवाद्यावर सरकारी यंत्रणांचे लक्ष असेल आणि त्याची प्रायव्हसी भंग केली तर तो या कारणावरून आकांडतांडव करू शकेल का? या प्रकरणात अरूणा रॉय या 'पुरोगामी' चळवळीतल्या कार्यकर्तीने न्यायालयात धाव घेतली होती त्यावरून असे काही व्हायची शक्यता नक्कीच वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

जर का कोणी संशयित दहशतवाद्यावर सरकारी यंत्रणांचे लक्ष असेल आणि त्याची प्रायव्हसी भंग केली तर तो या कारणावरून आकांडतांडव करू शकेल का?
All Fundamental Rights are subject to reasonable restrictions म्हणून त्याने आकांडतांडव केला तर कोर्ट त्या प्रकरणाची माहिती घेऊन त्याचा मूलभूत अधिकार (विनाकारण) भंग झालाय का याची शहानिशा करू शकते (असे वाटते).

शिवसेनेचा मूर्खपणा अजिबात थांबायला तयार नाही. मीरा-भाईंदर निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविल्यानंतर आपला पराभव मान्य न करता संजय राऊतने थयथयाट सुरू केला आहे. भाजपला मते द्या असे तावातावाने सांगणार्‍या पद्मसागर या जैन मुनींची चित्रफीत प्रसिद्ध झाली आहे. या मुनींनी धर्माच्या आधारावर प्रचार केला, त्यामुळे ही निवडणुक रद्द करावी अशी शिवसेनेने मागणी केली आहे. भाजपने मनी आणि मुनी यांच्या जीवावर विजय मिळविला असा शिवसेनेने शोध लावला आहे. इतर पक्षांनी कशामुळे विजय मिळविला हे शिवसेनेला चांगले समजते, परंतु आपल्याला जनता सातत्याने का नाकारते याचा शोध अजून त्यांना लागलेला नाही. या मुनींची संभावना राऊतने गुंड, अतिरेकी, झाकीर नाईक अशी केली. परत शिवसेनेच्या विरूद्ध बोललात आम्ही शिवसेनेच्या पद्धतीने त्यांना धडा शिकवू अशीही जाहीर धमकी त्यांनी दिली गेली. गंमत म्हणजे याच मुनींनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा प्रचार केला होता. ते शिवसेनेला मते द्या असे सांगताना व्यासपीठावर उधोजी व इतर सेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुनींनी भाषण करताना अनेकदा मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. परंतु उधोजी किंवा इतरांनी त्याला काहीही आक्षेप घेतला नव्हता. आता हेच मुनी गुंड, अतिरेकी, झाकीर नाईक वगैरे झालेले आहेत. राऊतने केलेल्या आगपाखडीमुळे जैन मंडळी चिडलेली असून आज राऊतविरूद्ध नगरमध्ये जैनांनी मोर्चा काढला. राऊतच्या बरळण्यामुळे अजून एक समाजघटक शिवसेनेच्या विरोधात गेला आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुर्जी भाजपा मुर्ख पणा करण्यात भारी पडेल बघा चिऊसेनेला जर राणे ला भाजपा ने घेतल तर. हे म्हणजे श्रीगुरुजीं नी मोगा खान च्या हागणदारी धाग्याला प्रास्ताविक लिहील्यासारखे होईल.

In reply to by श्रीगुरुजी

राऊतने केलेल्या आगपाखडीमुळे जैन मंडळी चिडलेली असून आज राऊतविरूद्ध नगरमध्ये जैनांनी मोर्चा काढला. राऊतच्या बरळण्यामुळे अजून एक समाजघटक शिवसेनेच्या विरोधात गेला आहे.
बाकी ठीक आहे पण कोणत्याही मुनी/बाबाच्या समर्थकांनी मोर्चा काढला म्हणून त्यांच्या विरोधात काही बोलू नये ही अपेक्षा चुकीची आहे. याच प्रकारच्या मानसिकतेमुळे आज हरियाणामध्ये त्या बाबा रामरहीम विरुद्ध कोणी राजकीय नेता बोलायला तयार नाही. शिवसेनेचा इतर बावळटपणा जरी असला तरीही त्यांनी केलेली
या मुनींनी धर्माच्या आधारावर प्रचार केला, त्यामुळे ही निवडणुक रद्द करावी अशी शिवसेनेने मागणी केली आहे.
मागणी नैतिक दृष्ट्या योग्य आहे (कमीतकमी "धर्माच्या आधारावर प्रचार " या विरोधात बोलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

In reply to by अत्रे

बाकी ठीक आहे पण कोणत्याही मुनी/बाबाच्या समर्थकांनी मोर्चा काढला म्हणून त्यांच्या विरोधात काही बोलू नये ही अपेक्षा चुकीची आहे. जैन मुनींच्या समर्थकांनी मोर्चा काढला म्हणून त्यांच्या विरोधात राऊत बरळलेला नसून तो मुनींविरूद्ध अर्वाच्य बरळल्याने त्याच्याविरूद्ध मोर्चा काढलेला होता. मागणी नैतिक दृष्ट्या योग्य आहे (कमीतकमी "धर्माच्या आधारावर प्रचार " या विरोधात बोलल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. शिवसेना धर्माच्या आधारावर मते मागत नाही का? जर मुनींनी कायदेभंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई होईलच. त्यासाठी गुंड, अतिरेकी, झाकीर नाईक अशी टीका करायची आणि धमक्या द्यायच्या? सेनेने एखाद्याला गुंड म्हणणे हे अत्यंत हास्यास्पद आहे.

In reply to by श्रीगुरुजी

दुरुस्ती - मोर्चा काढतील म्हणून असे वाचावे, काढला म्हणून असे चुकून लिहिले.
शिवसेना धर्माच्या आधारावर मते मागत नाही का?
मागत असले तरी यानिमित्ताने त्यांनी नैतिक दृष्ट्या योग्य मागणी केली आहे असे वाटते. तत्व महत्वाचे असे वाटते. ऑफकोर्स उद्या त्यांच्यावर तीच टीका होऊ शकते आणि व्हावी सुद्धा!

लोकहो, लागोपाठ दोन अपघात झाल्याने व्यथित होऊन रेल्वेमंत्री श्री. विनायक प्रभूंनी आपला राजीनामा सादर केल्याचं वृत्त आहे. विनायक प्रभू स्वच्छ कार्भारेणी अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत. लल्लूप्रसाद यादवांनी खड्ड्यात घातलेल्या रेल्वेस उर्जितावस्था आणण्यात प्रभूंचा सिंहाचा वाटा आहे. अशा वेळेस प्रभूंना नैतिक जबाबदारीचा नियम लागू करण्यात येऊ नये असं माझं मत आहे. त्यांच्यापेक्षा अधिक चांगला रेल्वेमंत्री मिळणे शक्य नाही. म्हणून माझं पंतप्रधान श्री. मोदींना आणि श्री. प्रभूंना आवाहन आहे की श्री. प्रभूंवरची रेल्वेखात्याची जबाबदारी तशीच चालू राहावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, अर्रर्र ! हमारा चुक्याच !! चूक लक्षात आणवून दिल्याबद्दल धन्यवाद ! आ.न., -गा.पै.

सुरेश प्रभू नि राजीनामा दिला हि योग्य गोष्ट केली, आजकाल एव्हडी उच्च नीतिमत्ता असलेला माणूस शोधणे दुर्मिळच. सुरेश प्रभू अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि कर्तबगार माणूस. अटलबिहारी वाजपेयी च्या काळात ऊर्जा मंत्री म्हणून अत्यंत उत्तम भूमिका निभावली होती, खुद्द अटल बिहारी वाजपेयींना त्यांचे कौतुक होते (बाळासाहेबांना नव्हते हि गोष्ट वेगळी). परंतु प्रत्येक हुशार माणसाला प्रत्येक काम जमतेच असे नाही, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात त्याची कामगिरी दमदार होईल याची खात्री नाही. सुरेश प्रभू बाबतीत हेच झाले. रेल्वे आणि त्यांचं सूत काही जुळून नाही आले. प्रभूच्या काळात रेल्वेत म्हणावे अशे मूलभूत बदल नाही झाले. प्रभू यांच्या कामाचा आढावा खाली घेतला आहे. Suresh Prabhu as Railway Minister: Indian Railways under his tenure यामध्ये कोणतेही काम डोळ्यात भरण्यासारखे नाही. प्रभूच्या काळात रेल्वेने स्वच्छता, तत्परता आणि ग्राहक केंद्रित सेवा यावर भर दिला खरा पण रेल्वेत आमूलाग्र बदल करण्यात प्रभू अयशस्वी झाले जरी त्यांनी त्यांचं १०० % दिले असले तरी. मला सुरेश प्रभू रेल्वे मंत्री झाल्यानंतर पायाभूत सुविधा, तंत्रांज्ञान यावर भर देतील असे वाटले होते पण तसे काही झाले नाही. मुंबई चेन्नई सारख्या शहरातील लोकल रेल्वे मध्ये कोणतीच मोठी सुधारणा झाली नाही. खालील लेख सुद्धा छान आहे Suresh Prabhu: The blue-eyed boy finds himself in the dock सुरेश प्रभू याना मोदी त्यांचा आवडीचे आणि योग्यतेचे काम देतील हि अपेक्षा. रेल्वे मंत्री म्हणून दुसऱ्या कर्तबगार व्यक्तीची नेमणूक करतील हि सुद्धा अपेक्षा. सुरेश प्रभू नि राजीनामा दिल्यामुळे नवीन मंत्र्यावर नक्कीच दबाव असणार परफॉर्म करण्याचा. रेल्वे ने आता गरीबाच कल्याण हे तुणतुणं बंद करावे आणि infrastructure, safety, technology अश्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. दरवाढ करण्यास मागेपुढे पाहू नये.

In reply to by अमितदादा

अमितदादा, तुम्ही दिलेला पहिला दुवा वाचला : http://indianexpress.com/article/india/indian-railways-under-railway-mi… त्यातले पहिले दोन मुद्दे त्रुटीसंबंधी आहेत. उरलेले सर्व मुद्दे प्रभूंच्या नव्या कल्पनांचे आहेत. पहिले दोन मुद्दे आमलांत आणण्यासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त इतका प्रचंड पैसा लागेल. हा पैसा या वर्षीच उपलब्ध झाला आहे. शिवाय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही. त्यामुळे पहिल्या दोन बाबींसाठी सुरेश प्रभूंना जबाबदार धरणं योग्य नाही. त्यांच्यापेक्षा अधिक चांगलं कोणी असेल तर माझ्या मते नितीन गडकरीच. मात्र त्याचं रस्त्यांचं काम जोरात चालू आहे. त्यांना तिथून हटवण्यात अर्थ नाही. तर प्रभूंना त्यांचं काम करू द्यावं. अपघातांची जबाबदारी फक्त प्रभूंचीच नाही. इतर अधिकाऱ्यांचीही आहे. त्यांना कोणीच जबाबदार धरलेलं दिसंत नाही. रेल्वे मुख्यपीठ (बोर्ड) अध्यक्ष श्री. मित्तल यांनी राजीनामा प्रस्तुत केला आहे. हा अपवाद वगळता इतरत्र आनंदीआनंदच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

. पहिले दोन मुद्दे आमलांत आणण्यासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त इतका प्रचंड पैसा लागेल. हा पैसा या वर्षीच उपलब्ध झाला आहे. शिवाय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प नाही. त्यामुळे पहिल्या दोन बाबींसाठी सुरेश प्रभूंना जबाबदार धरणं योग्य नाही.
मुळात पैशासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने काही महत्वाचा गोष्टी दुर्लक्षित (ज्याने लोकांचे जीव जातील) राहणार असतील तर प्रभू आणि मोदी हे दोघे जबाबदार आहेत. हे जबाबदार नाहीत तर काय देव जबाबदार आहे काय?
अपघातांची जबाबदारी फक्त प्रभूंचीच नाही. इतर अधिकाऱ्यांचीही आहे. त्यांना कोणीच जबाबदार धरलेलं दिसंत नाही. रेल्वे मुख्यपीठ (बोर्ड) अध्यक्ष श्री. मित्तल यांनी राजीनामा प्रस्तुत केला आहे. हा अपवाद वगळता इतरत्र आनंदीआनंदच आहे.
अगदी बरोबर पहिल्यांदा अधिकाऱयांना हाकलून लावलं पाहिजे. पण फक्त रेल्वे बोर्ड अध्यक्षांना हटवले नाही तर इतर लोकांवर कारवाई सुरू झालीय पण अधिकारी अश्या कारवाई ना भीक घालत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालंय. रेल्वेचं स्पीड वाढवणे, बुलेट ट्रेन, रेल्वे स्थानक साठी सरकारी खासगी भागीदारी, ईशान्य भारत आणि काश्मीर रेल्वे अश्या अनेक महत्वाचा कामात वेग दिसत नाही , नेहमीच्या धीम्या गतीने कामे चालू आहेत हे प्रभू कडून अपेक्षित न्हवत. गडकरी, पियुष गोयल, सुषमा स्वराज, इत्यादी हातावर मोजण्यासारख्या कामवाल्या लोकांना ही नवीन कामगिरी मिळावी असे वाटते.

In reply to by अमितदादा

अमितदादा, १.
मुळात पैशासाठी किंवा इतर कोणत्याही कारणाने काही महत्वाचा गोष्टी दुर्लक्षित (ज्याने लोकांचे जीव जातील) राहणार असतील तर प्रभू आणि मोदी हे दोघे जबाबदार आहेत. हे जबाबदार नाहीत तर काय देव जबाबदार आहे काय?
यांस लालूप्रसाद यादव जबाबदार आहे. रेल्वेच्या तिजोरीत पैशाचा खडखडाट का झाला ते बघायला पाहिजे. लालूप्रसाद यांनी रेल्वेचा देखभालीची कामं थांबवून पैसा वाचवला आणि रेल्वे नफ्यात आणून दाखवली. परंतु त्यामुळे सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष झालं. हे दुर्लक्ष दूर करेपर्यंत पुढील पाच वर्षे (२००९ ते २०१४) गेली. मात्र या पाच वर्षांत सात रेल्वेमंत्री झाले. हे वातावरण स्थैर्यास पोषक नाही. याचा भार आणि पैशाची विवंचना मोदी सरकारवर पडली. पहिली दोन वर्षे तर आढावा घेण्यात आणि पैसा उभारण्यात गेली. आताशा कुठे काम सुरू होतंय. याचे निकाल दिसायला आजून काही वेळ द्यावा लागेल. आज ट्विटर वर तक्रार केली की लगेच पुढील स्थानकावर कारवाई होते. अशी स्थिती पूर्वी कधीतरी होती काय? २.
रेल्वेचं स्पीड वाढवणे, बुलेट ट्रेन, रेल्वे स्थानक साठी सरकारी खासगी भागीदारी, ईशान्य भारत आणि काश्मीर रेल्वे अश्या अनेक महत्वाचा कामात वेग दिसत नाही , नेहमीच्या धीम्या गतीने कामे चालू आहेत हे प्रभू कडून अपेक्षित न्हवत.
त्यासाठी पायाभूत सुविधा हव्यात. एक तथ्य इथे सांगायला हवं. ते म्हणजे रेल्वे कधीच प्रवासी वाहतुकीवर चालंत नसते. तिला पैसा मिळतो तो मालवाहतुकीतून. अर्थात प्रवाशांची आबाल करावी असा अर्थ निघंत नाही. मात्र सांगायचा मुद्दा असा की मालवाहतुकीसाठी ज्या पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) लागतं ते वाढवण्याची कामं जोरात चालू आहेत. प्रवाशांच्या सुविधा सगळ्यात शेवटी ऐरणीवर घेतल्या जातात. तितका वाव सुरेश प्रभूंना द्यायला हवा. ३.
गडकरी, पियुष गोयल, सुषमा स्वराज, इत्यादी हातावर मोजण्यासारख्या कामवाल्या लोकांना ही नवीन कामगिरी मिळावी असे वाटते.
सुरेश प्रभूंचा रेल्वेचा अभ्यास दांडगा आहे. त्या मानाने इतरांचा रेल्वेची जबाबदारी उचलण्यात बराच वेळ जाईल. शिवाय खांदेपालटामुळे अपघात थांबतीलच याची खात्री देता येत नाही. तसाच गडकरी वा स्वराज यांची खास कौशल्याची खाती दुसऱ्या कोणाकडे द्यायची असाही प्रश्न उद्भवतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

एका ट्विटवर रेल्वेमंत्र्यांना तक्रार करा आणि लगेच काम होते ही चांगली गोष्ट असली तरी ती एका systemic weakness चे उदाहरण आहे. अनेकदा लोक फालतू गोष्टींची तक्रार थेट रेल्वेमंत्र्याना करतात. या गोष्टी स्थानिक अधिकारी पूर्ण करू शकतील. त्यासाठी थेट रेल्वेमंत्र्याना कामाला लावायची गरज नाही. मागे एकदा वाशी स्टेशनवर फलाट क्रमांक ३ वर पंखा बंद होता तर 'इसका प्रभू को ट्विट कर देते है वो फटाकसे काम करेगा' असे एका प्रवाशाने म्हटले होते ते मी स्वतः ऐकले आहे. असल्या फालतू गोष्टींची तक्रार थेट मंत्र्यांना करणे आणि मंत्रयांनी त्यावर स्वतः लक्ष देणे म्हणजे मधले सगळे लोक अत्यन्त अकार्यक्षम आहेत याची कबुली देण्यासारखे आहे. रेल्वेमंत्र्यांनी त्यापेक्षा बऱ्याच मोठ्या लेव्हलवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. प्रभू तसे निर्णय घेऊ शकतात आणि घेतही आहेतच. पण त्यांना कुठल्या कामासाठी ट्विट करावे याचे भान अनेकांना नसते.

In reply to by गॅरी ट्रुमन

एका ट्विटवर रेल्वेमंत्र्यांना तक्रार करा आणि लगेच काम होते ही चांगली गोष्ट असली तरी ती एका systemic weakness चे उदाहरण आहे.
+१००

In reply to by गामा पैलवान

गॅरी ट्रुमन यांचा मताशी सहमत. मुळात ट्विट करून मुलाला diaper दे दूध दे कुणाला सीट मिळवून दे हि काय मंत्र्यांची कामे नाहीत, अपवादात्मक वेळी ठीक आहे पण सतत ह्या गोष्टी मंत्र्याने करू नयेत. @गामा पैलवान
तसाच गडकरी वा स्वराज यांची खास कौशल्याची खाती दुसऱ्या कोणाकडे द्यायची असाही प्रश्न उद्भवतो.
मोदींनी सुषमा स्वराज याना काय काम ठेवलंय काय ? परराष्ट्रीय संबंध हे PMO, मोदी आणि अजित डोवाल च बघतात, सुषमा स्वराज खूप कमी वेळा मोदी बरोबर दौऱयावर जातात. मोदींनी सुषमा स्वराज याना फक्त ट्विटर वरून व्हिसा आणि पासपोर्ट देण्याचं काम ठेवलं आहे.(थोडीफार अतिशोयक्ती, मतितार्थ समजून घ्यावा). खरे तर मोदींनी परराष्ट्र, गृह, संरक्षण आणि अर्थ खाती स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत ,त्या त्या खात्याचे मंत्री फक्त दुय्यम कामे करण्यासाठी आहेत. त्यामुळे स्वराज यांच्या कर्तबगारीला न्याय द्यायचा असेल तर त्यांना वेगळं ढवळाढवळ न होणार खात दिल पाहिजे.

In reply to by अमितदादा

थोडक्यात काय कि प्रभू आपला मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात आणि ट्विट दिसला की कामाला लागतात असे आपले मत आहे. सिस्टिमॅटिक विकनेस आहेच रेल्वेखात्यात आणि तो मुख्यत्वे कर्मचाऱ्यांच्या/अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे आहे. ट्विटचा पर्याय हा त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पुढे आला असेल असे आपल्याला वाटते का? मला तसे वाटत नाही. अधिकाऱ्यांना जरब बसण्यासाठी आणि कामाला लावण्यासाठी ट्विट कामाला येत असेल तर त्यात वाईट काय? बाकी ते सुषमा स्वराजना काय कामाला वगैरे (मतितार्थ समजून घेतला तरी) हास्यास्पद आहे. एका देशाचा मुख्य दुसऱ्या देशाच्या मुख्यांना भेटणं एवढंच काय ते परराष्ट्र धोरण असतं असं म्हणण्यासारखं आहे हे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मुळात ट्विट करून 4-5 लोकांना मदत करणे हा एक सवंग लोकप्रियता, PR आणि feel good वातावरण तयार करण्याचा प्रकार आहे. याने ग्राउंड वरच्या गोष्टी बदलत नाहीत इथे निलंबन करून चौकशी करून अधिकारी सहजासहजी बदलत नाहीत तिथं त्यांना प्रभू च्या ट्विट ने शिस्त लागणार आहे काय? ट्विट इफेक्ट खूप क्षणिक आहे. लोकांना मदत करायची आहे तर सिस्टिम बदला, सेफ्टी साठी काकोडकर समितीने दिलेला अहवाल जो धूळ खात पडलाय तो अमलात आना, आज त्याने कितीतरी जीव वाचले असते. आणि तसेही ट्विट करून लोकांना मदत करणे हे PR ऑफिसर किंवा CC ऑफिसर च काम आहे, आता प्रभू गेल्यावर लोक कोणाला ट्विट करणार? ऑफिसर ला ना. सुषमा स्वराज मुळात मोदींच कामाची पद्दत पहिली असता काय दिसून येत मोदी हे अत्यंत व्यक्तिकेंद्रित आहेत, ते एकटे निर्णय घेतात आणि बाकीचे त्याची अंमलबजावणी करतात. कोणतेही परदेश दौरे पहा मोदींच मोदी दिसतील, सगळे निर्णय PMO ने घेतलेले दिसतील. सुषमा स्वराज एक तर मोदी च्या दौऱ्यात नसतात किंवा त्यांनी एकट्याने दौरा केला तर त्यात महत्वाचे करार होत नाहीत. त्यामुळं मोदींनी त्यांचा अधिकारावर संक्रांत आणून त्यांचं महत्व खूपच कमी केलंय. मध्यंतरी राजनाथ सिंग यांनी सरसंघचालक यांच्याकडे मंत्री पद मध्ये रस नसून पक्षासाठी काम करायचं आहे अशी नाराजी व्यक्त केली होती असे एका पत्रकाराने लोकसत्ता मध्ये लिहलं होत (संतोष कुलकर्णी बहुतेक). ठीक आहे एक वेळ गृहीत धरू पत्रकाराची माहिती खरी नाही पण मोदी किती एककल्ली आहेत आणि मंत्र्यांना त्यांनी किती कमी स्पेस ठेवलाय हे लोक जाणून आहेत. बाकी तुमची मत वेगळी असू शकतात .

In reply to by अमितदादा

मुद्दा १. जर चार पाच लोकांनाच मदत करून त्याचा लोकप्रियतेसाठी वापर होत असेल तर मग मंत्र्याने ते करत बसून नये हा मुद्दा गैर लागू आहे. अवांतर : ट्विट करून मदत मिळालेल्या सगळ्यांनी सरसकट प्रभूंना ट्विट केले असेल हे झाले गृहीतक! रेल्वेने त्यांचे अनेक अधिकृत ट्विटर हॅंडल्स घोषित केलेले आहेत. राहता राहिला मुद्दा सुषमा स्वराज यांचा तर मोदी व्यक्तिकेंद्रित वगैरे वैयक्तिक मते आहेत. खरंच सुषमा कशाला आहेत हा प्रश्न पडला असता तर सोपा मार्ग परराष्ट्रमंत्रालयाची वेबसाईट पाहणे आहे. २०१४ पासून त्यांनी केलेले परदेश दौरे आणि निर्णय यांची माहिती मिळेल. बाकी मते आणि वस्तुस्थिती यात फरक नक्कीच असतो. मते वस्तुस्थिती बाजूला सारत असतील तर त्याला पर्याय नाही.

In reply to by अत्रे

ध्वनी प्रदूषणावरच्या खंडपीठात न्या.अभय ओक यांचा पुन्हा समावेश. अॅडव्हकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संघटनेनं यासंदर्भात तीव्र शब्दांत मुख्य न्यायमूर्तींकडे आपला आक्षेप नोंदवला होता. अशा प्रकारे एका ज्येष्ठ आणि निष्ठावान न्यायमूर्तींवर राज्य सरकारकडून आरोप करणं आणि त्यानंतर त्यांच्याकडून याचिकेची सुनावणी काढून घेणं हे न्यायव्यवस्थेवरच अविश्वास दाखवण्यासारखं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे न्यायमूर्ती अभय ओकांवर पक्षपातीपणाचा गंभीर आरोप करणाऱ्या राज्य सरकारवर आता पुन्हा एकदा त्यांच्याचसमोर आपली बाजू मांडाण्याची वेळ आलीय. ध्वनी प्रदूषणाची सगळी प्रकरणं मुख्य न्यायमूर्ती अभय ओक आणि रियाज छागला यांच्या खंडपीठाकडून आता दुसऱ्या खंडपीठाकडे देण्यात आली होती. राज्य सरकारच्या अर्जावर मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चेल्लूर यांनी हा निर्णय घेतला होता. आपला निकाल मुख्य न्यायामूर्तींपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रजिस्ट्रारनं खंडपीठ बदलण्यात आलं असल्याचं आपणांस कळवलं असल्याचं न्यायमूर्ती अभय ओक यांनी याचिकाकर्त्यांना कोर्टात सांगितलं होतं.

रेल्वेमंत्र्यांनी एक ट्विटर अकाऊंट चालु केले ते प्रवाशांच्या सोयीसाठी, एका ट्विटवर रेल्वेमंत्र्यांना तक्रार करा आणि लगेच काम होते ही चांगली गोष्ट असली तरी ती एका systemic weakness चे उदाहरण आहे हे संपुर्णपणे मान्य. पण प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे झोन / डिव्हिजन / सेक्टर यांनी ट्विटर अकाऊंट / मोबाईल अ‍ॅप हेल्पलाईन प्रवाशांच्या सोयीसाठी ( शुल्लक तक्रार असेल तरी पण ) चालु केली आहे का ?? जेणेकरुन प्रवास चांगला व्हावा ?? एक मंत्री जो systemic weakness मान्य करुन काम करत आहे हे काय कमी आहे काय ? गठबंधन / आघाडी सरकार असताना जर लालुसारख्या मंत्र्याला जर मनमोहनसिंगानी सहनशीलता दाखवली तर पुर्ण बहुमत असलेल्या मोदींना सुरेश प्रभुंना मंत्रीमंडळात ठेवण्यासाठी सुरेश प्रभुंचा राजीनामा नाकारण्याची हींमत दाखवायला काही हरकत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

गाढव लोक आहेत. काश्मीरमध्ये संचारबंदी करता येते तर मग इथे का नाही करता येत त्यांना? हिंदी एबीपी ने खूप छान रिपोर्टींग केले आहे.

गॅरी ट्रुमन,
एका ट्विटवर रेल्वेमंत्र्यांना तक्रार करा आणि लगेच काम होते ही चांगली गोष्ट असली तरी ती एका systemic weakness चे उदाहरण आहे.
सुरेश प्रभूंना हटवून इतर कोणास आणावे का असा प्रश्न आहे. तसं केल्याने दुर्बळ व्यवस्था सबळ बनण्याची शक्यता नाही. शिवाय हे दौर्बल्य सरसकट सर्व सरकारी खात्यांत दिसून येतं. त्यामुळे अपघातांची जबाबदारी सुरेश प्रभूंची असली तरी त्यांचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये. आ.न., -गा.पै.

आमदार अनिल गोटे यांचे बंधू व वहिनी कार अपघातात ठार : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/aurangabad-marathwad… आमदार अनिल गोटे हे तेलगी प्रकरणांत गुंतल्याने काही वर्षे खडी फोडायला गेले होते. त्याबद्दल त्यांची अशी धारणा होत की या लफड्यात छगन भुजबळ व राधेश्याम मोपलवार आपल्या इतकेच दोषी असूनही उजळ माथ्याने बाहेर हिंडत होते. त्यामुळे या दोघांना आत पाठवायचा विडा अनिल गोट्यांनी उचलला आहे. ( संदर्भ : http://www.vikrantjoshi.com/2017/08/blog-post_4.html ) त्यामुळे अनिल गोट्यांचे बंधू श्री. ज्ञानेश्वर गोटे यांचा सपत्नीक मृत्यू हा हत्येचा प्रयास वाटतो. हे प्रकरण मोपलवार व भुजबळांच्या यांच्या पलीकडे गेल्याचं दिसतंय. अनिल गोट्यांना फार सावधपणे पावलं टाकी लागतील. -गा.पै.