४. बायकोच्या पाचव्या बाळंतपणाला
मी तिच्याजवळ नव्हतो
कारण तेव्हा वाढत्या लोकसंख्येवर
मी भाषण झोडत होतो...
हा: हा: हा: एकदम "ढि॑च्याक" आहे हे!
६. बोन्साय केलेल्या झाडालाही
एकदा पालवी फुटली
त्यालाही कळेना,
ही `वाढायची' जिद्द कुठली?
वा !
७. भर दुपारी
बाहुली
बाहुल्यालाच
चावली
हे काय झेपल॑ नाय बॉ. सा॑गता का जsssरा इस्कटून ???
२. गावाबाहेर आडोशाला
एक पडका वाडा आहे
तिथेच भरलेला माझ्या
तारुण्यातल्या पापांचा घडा आहे
७. भर दुपारी
बाहुली
बाहुल्यालाच
चावली
अभिजितकाका, या दोन चारोळ्या मस्त! अजूनही येऊ द्या.. :)
तात्या.
आधीच्या चारोळ्या मी कॉलेजात असताना केलेल्या आहेत. सुमारे ९६-९७ साली.
सातवी काल टाइप करत असताना अचानक सुचली.
भर दुपारी
सावली
वडाखाली
धावली
ही चारोळी माहितेय ना?
त्याचंच हे विडंबन.
फार अर्थ-बिर्थ शोधत बसू नका.
-अभिजित.
८. ठाऊक असतं, तुझं येणं अशक्य आहे
तरी मन पॉइंटवर जाणं सोडत नाही
तुला शोधताना मग नजर
एकही `पाखरू' सोडत नाही..
९. मरताना वाटलं,
आयुष्य नुसतंच वाहून गेलं
करायचंय, करायचंय म्हणताना
लग्न करायचंच राहून गेलं....
१०. ज्या दिवशी तू माझा
अलगद हात धरलास
खरं सांग, त्या दिवशी
गालाला कोणता `पेन-बाम' चोळलास?
११. मी बुडताना गाव माझा
डोळे भरून पाहिला होता
`दिवाळी' साजरी करायला अख्खा गाव
किनार्यावर उभा राहिला होता....
१२. तू जळत असताना
मी तुझ्याभोवती ओंजळ धरली
तू जळालीस नि माझी ओंजळ
विम्याच्या पैशाने भरली...
----------------------
चारोळ्या
:))
मला हे आवडलं :)
मस्त! :)
चारोळ्या आवडल्या !!!
मस्त चारोळ्या
कळल्या त्या मस्त!
छान आहेत सगळ्याच
आवडले
सातवी चारोळी
आणखी (काहीच्या) काही...