अभिजित अवलिया , कपिलमुनी , अमितदादा ,
तुम्हां महानुभाव लोकांनी विमान शास्त्र , गणपतीचे शीर, १०० कौरव वैगेरे सारख्या कल्पनांवर हसण एकदम मान्य,
पण काही उदाहरण तुमच्या समोर आहेत ज्या वर भारतातील कोणीही महानुभाव आपल तोंड उघडत नाही.
बेलुर कर्नाटकातील होयसाळ मंदिरात १०० च्या आसपास मोठे स्तंभ लावलेले आहेत, जे स्तंभ लेथ मशिनवर मशिनींग केल्याप्रमाणे
दिसतात . १००० वर्षांपुर्वी असे स्तंभ कसे बनवले असतील ह्यावर प्रकाश टाकावा !!
ह्याच मंदिरात काही मुर्त्या आहेत ज्याच्या एका कानातुन धागा टाकला तर तो दुसर्या कानातुन , तोंडातुन बाहेर येऊ शकतो, ह्याचे कारण ह्या मुर्त्या आतुन पोकळ आहेत.
त्या दगडी मुर्त्या आतुन पोकळ कश्या बनवल्या असतील ? आजच्या विज्ञानाला हे शक्य आहे का ?
Hoysala Temples
तुम्ही लिंक दिलेला व्हिडीओ Published on 9 Aug २०१७ म्हणजेच आत्ताच आलेला आहे. त्यामुळे "पण काही उदाहरण तुमच्या समोर आहेत ज्या वर भारतातील कोणीही महानुभाव आपल तोंड उघडत नाही." छाप वाक्ये टाकायचे काहीही कारण नाही.
"अमुक अमुक के बारमे मीडिया कुछ नही बोलता " टाईपची वाक्ये डोक्यात जातात!
थोडे थांबा, याबाबद्दल सुद्धा नेट वर माहिती सापडेल किंवा कोणीतरी एक्सप्लेनेशन देईल.
व्हिडिओ बघितला.
व्हिडिओ मध्ये जे मंदिर आहे ते स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे ह्यात वाद नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे भारतातील स्थापत्य कला ही पूर्वीपासून उत्तम विकसित होती. अगदी पुण्याजवळ सासवड परिसरात २-३ अतिशय पुरातन उत्तम मंदिरे आहेत ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जावीत. ९०० वर्षांपूर्वी मशीन वापरून काम करायला वीजच उपलब्ध न्हवती. त्यामुळे हे सर्व काम हाताने आणि कोणतेही यांत्रिक साधन न वापरताच केले गेले असणार.
माझं मत मांडतो , विस्कळीत असेल कदाचित, असो.
१. मी अध्यात्म आणि विज्ञान ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या हार्डकोर विज्ञानवादी लोकांप्रमाणे (जे अध्यात्म, धर्म, चालीरीती मानत नाहीत अशे लोक ) माझी मते कठोर नाहीत. याला माझी सोय म्हणा हवेतर काही हरकत नाही, याला मी पूर्णपणे नास्तिक नसणे हे कारण आहे, पण नास्तिकवादाकडे झुकलेलो आहे. एखादा अध्यात्मिक मनुष्य जेंव्हा एखादी गोष्ट अध्यात्म किंवा धार्मिक म्हणून प्रेसेंट करतो तेंव्हा मी सहसा त्याला विरोध करत नाही (जो पर्यंत ती गोष्ट कुणाला हानी पोहचवत नाही तोपर्यन्त), मात्र तीच गोष्ट पुरावे नसताना विज्ञान म्हणून जेंव्हा प्रेसेंट केली जाते तेंव्हा मात्र मी विरोध करतो आणि करणारच.
२. आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी थोथांड आहेत आणि खोट्या आहेत असे माझे म्हणणे किंवा विचार अजिबात नाहीत. आपल्या अनेक प्राचीन गोष्टी उदारणार्थ योग विद्या, काही आयुर्वेदिक गोष्टी, शिल्पकला, मंदिरे, प्राचीन लेणी, नालंदा विध्यापिठासारखी महाकाय विद्यापीठे, इत्यादी इत्यादी गोष्टी ह्या खऱ्या आहेत, याला पुरावे आहेत, आणि ह्या मी मान्य करतो. परंतु लक्षात घ्या ह्या गोष्टी मानवनिर्मित आहेत, त्या काळाच्या लोकांच्या तंत्रञान चे प्रतीक आहेत, हे विज्ञान आहे अध्यात्म न्हवे. यावर अधिक संशोधन होऊन गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. तुम्ही दिलेलं उदाहरण ह्या कॅटेगरी मध्ये बसत.
३. आता काही अध्यात्मिक/धार्मिक गोष्टी ज्याला कोणतेही पुरावे उपलब्द नाहीत, उदारणार्थ पुष्पक विमान, जेनेटिक सायन्स, प्लास्टिक सर्जरी ह्या गोष्टी लोक विज्ञान म्हणून प्रेसेंट करणार असतील तर हे साफ चुकीचं आहे. मी मूळ प्रतिसादात उल्लेख केलेली गोष्ट ह्या कॅटेगरी मध्ये बसते. जे लोक प्राचीन भारतीय विमांनाचं design ग्रंथ वाचून सांगतात तस विमान बनवलं तर ते उडणार सुद्धा नाही हे अनेक शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे (मी स्वतः यावरती एक प्रदीर्घ लेख खूप वर्षांपूर्वी वाचला आहे).
४. फक्त ग्रंथात उल्लेख आहे म्हणून ती गोष्ट अस्तित्वात होती असे मानण्याचे काही कारण नाही जोपर्यन्त इतर पुरावे सापडत नाहीत तोपर्यत. उदारणार्थ लिओनार्डो दा विंची ने। हेलिकॉप्टर चे चित्र बनवलेलं म्हणून त्या काळी हेलिकॉप्टर होत किंवा तो हेलिकॉप्टर मधून फिरलेला असें दावे कोण करत नाही.
सरळ रेघ (प्रेरणा:संजय पवार) : सरसकट जून्या गोष्टींना विरोध नाही अध्यात्मातील किंवा धर्मातील काही गोष्टी पुरावे नसताना विज्ञान म्हणून मांडतात त्याला विरोध आहे.
तिरकी रेघ (प्रेरणा:संजय पवार) :जे पुष्पक विमानाचे दावे करतायत त्यांनी ते ग्रंथ वाचून हे विमान बनवून दाखवावं, मी माझा विरोध माघे घेइन. इतकेच काय पुष्पक विमानातून प्रवास सुद्धा कारेन करण शेवटी ते विमान वनस्पती तेल किंवा सूर्यप्रकाश यावर उडणारे असल्यामुळे त्याच तिकिट कमीच असणार.
विशाल सिक्कांनी राजीनामा दिला याबद्दल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी नारायण मूर्तींना दोष दिला आहे.
मूर्तींनी विशाल सिक्कांविरूध्द चालवलेले कॅम्पेन योग्य माहितीवर आधारीत नव्हते (मिसगाईडेड) असे कंपनीच्या बोर्डाने म्हटले आहे. विशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या बोर्डाने खालील पत्रक जारी केले आहे. त्यातील काही निवडक मुद्दे पुढीलप्रमाणे :
१. Mr. Murthy’s letter contains factual inaccuracies, already-disproved rumours, and statements extracted out of context from his conversations with Board members.
२. The Board declines to speculate about Mr. Murthy’s motive for carrying out this campaign, including the latest letter. The Board believes it must set the record straight on the false and misleading charges made by Mr. Murthy because his actions and demands are damaging the Company and misrepresent its commitment to good corporate governance.
३. Mr. Murthy has demanded that the Board adopt certain changes in policy, else he will attack board members in the public, which threat was carried out when the Board did not acquiesce;
४. He has demanded that the Board appoint specific individuals onto the Board under similar threat, without appropriate disclosure and without regard to basic determinants of appropriateness or fit of the candidate for the role as a Board member;
५. He has demanded operational and management changes under the threat of media attacks;
६. Notwithstanding that the remuneration package of senior management was approved overwhelmingly by shareholders (including members of the promoter group), Mr. Murthy preferred his dictat to prevail with no place or tolerance for the outcomes of shareholder democracy.
यातील सहावा मुद्दा महत्वाचा आहे. विशाल सिक्का आणि टॉप मॅनेजमेन्टला वाजवीपेक्षा जास्त पॅकेज मिळते अशी टिका नारायणमूर्तींनी केली होती. तर त्यांना मिळणारे पॅकेज हे या क्षेत्रातील या आकारमानाच्या कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेन्टला इतर कंपन्यांमध्ये मिळते तेवढेच पॅकेज आहे असे कंपनीचे म्हणणे होते. आणि अर्थातच असे लठ्ठ पॅकेज सुखासुखी मिळणार्यातले नव्हते तर विशाल सिक्कांना तशीच टारगेट दिली होती असे हीकंपनीचे म्हणणे आहे. तसेच विशाल सिक्कांचे फेब्रुवारी २०१७ मध्ये पॅकेज वाढविले ते शेअरधारकांनी मान्यता दिल्यावरच वाढविले होते. असे असताना 'मी म्हणेन तेच खरे' असे नारायणमूर्तींनी म्हणणे म्हणजे दुराग्रह झाला.
एकूणच नारायणमूर्तींची अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी झालेली दिसते. मी अगदी पहिल्या दिवसापासून पक्षाला वाढविले आहे म्हणून मी म्हणतो तसेच व्हायला हवे असे अडवाणी म्हणतात . तर या म्हणण्यातत पक्षाऐवजी कंपनी लिहिले तर ते म्हणणे नारायणमूर्तींचे आहे असे दिसते.
एकूणच नारायणमूर्तींची अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी झालेली दिसते. मी अगदी पहिल्या दिवसापासून पक्षाला वाढविले आहे म्हणून मी म्हणतो तसेच व्हायला हवे असे अडवाणी म्हणतात . तर या म्हणण्यातत पक्षाऐवजी कंपनी लिहिले तर ते म्हणणे नारायणमूर्तींचे आहे असे दिसते.
या दोन्ही परिस्थितीत थोडा फरक आहे. अडवाणी शेवटपर्यंत पक्षाच्या व्यवस्थापनात होते. अगदी २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले तेव्हा सुद्धा ते पक्षाच्या कार्यकारीणीत होते. त्यामुळे आपले मत मांडण्याचा त्यांना अधिकृत अधिकार होता. त्यावेळी त्यांनी पूर्वानभावरून काही मते मांडली व काही सावधगिरीचे इशारे दिले, त्यात तसे काही चुकीचे नव्हते.
मूर्तींची परिस्थिती वेगळी आहे. ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत. त्यांनी स्वतःहून अध्यक्षपद सोडून आपले पद सिक्कांना दिले होते. त्यामुळे सिक्कांनी कंपनी कशी चालवावी हे त्यांनी बाहेरून सांगणे चुकीचे होते. भागधारक या नात्याने इतर भागधारकांना जेवढे अधिकार असतात तेवढे त्यांना आहेतच. परंतु भागधारकांना कंपनीची धोरणे ठरविण्याचा अधिकार नसतो. मूर्तींना आपले आक्षेप मांडण्यासाठी भागधारकांची वार्षिक सभा उपलब्ध होती. स्वतः कंपनीच्या कोणत्याही पदावर नसताना बाहेरून सल्ले देणे हे चुकीचे होते. यालाच "उंटावरून शेळ्या हाकणे" असे म्हणतात. एकतर तुम्ही कंपनीत एखादे पद स्वीकारा व ते स्वीकारून आपल्या मताप्रमाणे कंपनी चालवा किंवा जर तुम्ही कंपनी स्वत:हून सोडली आहे तर कंपनीच्या कारभारात बाहेरून हस्तक्षेप करू नका. त्यांचे वागणे हे सोनिया गांधींसारखे होते. सरकारमध्ये जायचे नाही पण पंतप्रधानांना स्वतः सांगेल ते करायला लावायचे.
मूर्ती व इतर संस्थापक-संचालक हे फारशी उधळपट्टी करणारे नव्हते. परंतु सर्व संस्थापक-संचालकांनी कंपनी सोडल्यानंतर सिक्का व जे इतर नवीन संचालक आले ते बर्यापैकी खर्चिक आहेत. सिक्का काही वेळा चार्टर्ड विमानाने हिंडायचे. कायम सप्ततारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य असायचे. हे मूर्तींना खटकत होते. एक वरीष्ठ अधिकारी राजीव बन्सल मागील वर्षी सोडून जाताना सिक्कांनी त्याला ३० कोटी रूपयांचे सिव्हिअरन्स पॅकेज दिले होते ज्याला मूर्तींनी आक्षेप घेतला होता. त्यांच्यातील बर्याच मतभेदांचा आज कळस झाला. त्यातूनच सिक्कांनी राजीनामा दिला. सिक्का बरोबर वागत होते असे मी म्हणत नाही. परंतु एकदा कंपनीतून पूर्णपणे बाहेर आल्यानंतरसुद्धा आपल्या मताप्रमाणेच इतरांनी वागावे ही मूर्तींची अपेक्षा योग्य नव्हती. त्यांचा सिक्कांबद्दल इतका आक्षेप होता तर वार्षिक बैठकीत त्यांनी नवीन अध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते किंवा पुन्हा एकदा स्वतः अध्यक्षपदाची धुरा स्वतःच्या खांद्यांवर घ्यायला हवी होती.
आजच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालक मंडळ मूर्तींविरोधात एक झाले होते. काही वर्षांपूर्वी अॅपलचा संस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्जची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी झाली होती. आजची परिस्थिती साधारणपणे तशीच आहे.
सिक्कांच्या जागी कोण येईल हे सांगता येणे अवघड आहे. त्यांच्या जागी पुन्हा एकदा नंदन निलेकणी यावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांचे वयही फार जास्त नाही (मूर्ती ७१ वर्षांचे आहेत तर नंदनचे वय ६२ आहे). २०१४ पासून नंदनकडे फारशी नवीन जबाबदारी नाही. त्यामुळे ते परत आल्यास चांगले होईल.
आज इन्फोसिसच्या समभागाची किंमत १०% अधिक किंमतीने घसरली आहे. कालचा बंद भाव १०२० होता. आज तो ९०३ पर्यंत खाली जाऊन पुन्हा ९२० पर्यंत आला आहे. ९२० ला हा समभाग अत्यंत आकर्षक किंमतीत आहे.
उद्या इन्फोसिसचे समभाग बायबॅक करण्याबद्दल संचालक मंडळाची सभा होणार आहे. आजच्या घडामोडींमुळे ती सभा कदाचित पुढे ढकलली जाईल.
इन्फोसिसमध्ये ७-८ वर्षे काम केल्याने व इन्फोसिसचा समभागधारक असल्याने या घडामोडींमध्ये खूप रस आहे.
ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत
मूर्ती Additional Director ह्या पदावर आहेत ना. AD ला किती अधिकार असतात हे माहित नाही.
आज इसरोने अंतराळात मंगळयान सोडलं आहे. कोणतंही एक पुस्तक वा चित्रं (=ड्रॉईंग) वाचून मंगळयान बनवणं शक्य नाही. म्हणून मंगळयान अस्तित्वातच नाही असं म्हणणार का?
सांगायचा मुद्दा काये की प्राचीन पुस्तक ही पहिली पायरी आहे. तिथपासून सुरुवात करून गाळलेल्या जागा स्वत:च्या बुद्धीने भरून काढून प्रत्यक्ष निर्मिती केली पाहिजे. तुमच्यासारख्या विज्ञानाविषयी सजग असलेल्या माणसाने विनोदी व्याख्यान वगैरे शेरे मारू नयेत, असं मलातरी वाटतं.
आता विषय निघालाच आहे तर प्राचीन भारतीय विमानविद्येविषयी एक निरीक्षण नोंदवावतो. यासंबंधी जिज्ञासूंना सर्वात जास्त रस विमानं उडवण्यात नसून तदानुषंगिक धातुशास्त्रात आहे (संदर्भास इंग्रजी दुवा : http://vaimanika.com/VymanikaShastraRediscovered/VSR.html#CHAPTER14 ). माझ्या मते प्राचीन विमानं उडवण्यात बाह्याकारापेक्षा धातुसिद्धी अधिक महत्त्वाची आहे. याउलट आजच्या विमानात बाह्याकार जास्त महत्वाचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
रशियन नृत्यांगनांचे 'सात्विक' नृत्य....
In reply to निर्बंध हटूनही दहीहंडी आयोजनातील आर्थिक चढाओढ कमी by तेजस आठवले
अभिजित अवलिया , कपिलमुनी ,
तुम्ही लिंक दिलेला व्हिडीओ
In reply to अभिजित अवलिया , कपिलमुनी , by डँबिस००७
व्हिडिओ बघितला.
In reply to अभिजित अवलिया , कपिलमुनी , by डँबिस००७
माझं मत मांडतो , विस्कळीत
In reply to अभिजित अवलिया , कपिलमुनी , by डँबिस००७
विशाल सिक्कांनी राजीनामा दिला
इन्फोसिसचे अडवाणी?
In reply to विशाल सिक्कांनी राजीनामा दिला by श्रीगुरुजी
हेच म्हणणार होतो.
In reply to इन्फोसिसचे अडवाणी? by गॅरी ट्रुमन
कम्पन्या आपली धुणी
In reply to इन्फोसिसचे अडवाणी? by गॅरी ट्रुमन
एकूणच नारायणमूर्तींची अवस्था
In reply to इन्फोसिसचे अडवाणी? by गॅरी ट्रुमन
एकूणच नारायणमूर्तींची अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी झालेली दिसते. मी अगदी पहिल्या दिवसापासून पक्षाला वाढविले आहे म्हणून मी म्हणतो तसेच व्हायला हवे असे अडवाणी म्हणतात . तर या म्हणण्यातत पक्षाऐवजी कंपनी लिहिले तर ते म्हणणे नारायणमूर्तींचे आहे असे दिसते.या दोन्ही परिस्थितीत थोडा फरक आहे. अडवाणी शेवटपर्यंत पक्षाच्या व्यवस्थापनात होते. अगदी २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले तेव्हा सुद्धा ते पक्षाच्या कार्यकारीणीत होते. त्यामुळे आपले मत मांडण्याचा त्यांना अधिकृत अधिकार होता. त्यावेळी त्यांनी पूर्वानभावरून काही मते मांडली व काही सावधगिरीचे इशारे दिले, त्यात तसे काही चुकीचे नव्हते. मूर्तींची परिस्थिती वेगळी आहे. ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत. त्यांनी स्वतःहून अध्यक्षपद सोडून आपले पद सिक्कांना दिले होते. त्यामुळे सिक्कांनी कंपनी कशी चालवावी हे त्यांनी बाहेरून सांगणे चुकीचे होते. भागधारक या नात्याने इतर भागधारकांना जेवढे अधिकार असतात तेवढे त्यांना आहेतच. परंतु भागधारकांना कंपनीची धोरणे ठरविण्याचा अधिकार नसतो. मूर्तींना आपले आक्षेप मांडण्यासाठी भागधारकांची वार्षिक सभा उपलब्ध होती. स्वतः कंपनीच्या कोणत्याही पदावर नसताना बाहेरून सल्ले देणे हे चुकीचे होते. यालाच "उंटावरून शेळ्या हाकणे" असे म्हणतात. एकतर तुम्ही कंपनीत एखादे पद स्वीकारा व ते स्वीकारून आपल्या मताप्रमाणे कंपनी चालवा किंवा जर तुम्ही कंपनी स्वत:हून सोडली आहे तर कंपनीच्या कारभारात बाहेरून हस्तक्षेप करू नका. त्यांचे वागणे हे सोनिया गांधींसारखे होते. सरकारमध्ये जायचे नाही पण पंतप्रधानांना स्वतः सांगेल ते करायला लावायचे. मूर्ती व इतर संस्थापक-संचालक हे फारशी उधळपट्टी करणारे नव्हते. परंतु सर्व संस्थापक-संचालकांनी कंपनी सोडल्यानंतर सिक्का व जे इतर नवीन संचालक आले ते बर्यापैकी खर्चिक आहेत. सिक्का काही वेळा चार्टर्ड विमानाने हिंडायचे. कायम सप्ततारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य असायचे. हे मूर्तींना खटकत होते. एक वरीष्ठ अधिकारी राजीव बन्सल मागील वर्षी सोडून जाताना सिक्कांनी त्याला ३० कोटी रूपयांचे सिव्हिअरन्स पॅकेज दिले होते ज्याला मूर्तींनी आक्षेप घेतला होता. त्यांच्यातील बर्याच मतभेदांचा आज कळस झाला. त्यातूनच सिक्कांनी राजीनामा दिला. सिक्का बरोबर वागत होते असे मी म्हणत नाही. परंतु एकदा कंपनीतून पूर्णपणे बाहेर आल्यानंतरसुद्धा आपल्या मताप्रमाणेच इतरांनी वागावे ही मूर्तींची अपेक्षा योग्य नव्हती. त्यांचा सिक्कांबद्दल इतका आक्षेप होता तर वार्षिक बैठकीत त्यांनी नवीन अध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते किंवा पुन्हा एकदा स्वतः अध्यक्षपदाची धुरा स्वतःच्या खांद्यांवर घ्यायला हवी होती. आजच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालक मंडळ मूर्तींविरोधात एक झाले होते. काही वर्षांपूर्वी अॅपलचा संस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्जची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी झाली होती. आजची परिस्थिती साधारणपणे तशीच आहे. सिक्कांच्या जागी कोण येईल हे सांगता येणे अवघड आहे. त्यांच्या जागी पुन्हा एकदा नंदन निलेकणी यावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांचे वयही फार जास्त नाही (मूर्ती ७१ वर्षांचे आहेत तर नंदनचे वय ६२ आहे). २०१४ पासून नंदनकडे फारशी नवीन जबाबदारी नाही. त्यामुळे ते परत आल्यास चांगले होईल. आज इन्फोसिसच्या समभागाची किंमत १०% अधिक किंमतीने घसरली आहे. कालचा बंद भाव १०२० होता. आज तो ९०३ पर्यंत खाली जाऊन पुन्हा ९२० पर्यंत आला आहे. ९२० ला हा समभाग अत्यंत आकर्षक किंमतीत आहे. उद्या इन्फोसिसचे समभाग बायबॅक करण्याबद्दल संचालक मंडळाची सभा होणार आहे. आजच्या घडामोडींमुळे ती सभा कदाचित पुढे ढकलली जाईल. इन्फोसिसमध्ये ७-८ वर्षे काम केल्याने व इन्फोसिसचा समभागधारक असल्याने या घडामोडींमध्ये खूप रस आहे.ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४
In reply to एकूणच नारायणमूर्तींची अवस्था by श्रीगुरुजी
पुष्पक विमान निर्मिती
ता.घ. - १०
मुंबईत पाऊस