ऐका ! ती सध्या काय करते
उठल्या उठल्या वाय- फाय करते
सकाळ पासून खाय खाय करते
तिखट खाऊन हाय हाय करते
बिल आले की नाय नाय करते
रोज नव्या मित्राला 'हाय' करते
संध्याकाळी त्याला 'बाय' करते
रोज नवा ड्रेस 'ट्राय' करते
वय लपावे म्ह्णून 'डाय' करते
खोटं खोटंच 'शाय' करते
दुसऱ्याचा भेजा 'फ्राय' करते
स्वतः मस्त 'एन्जॉय' करते
तीच जाणे कसे काय करते
कळलं ? ती सध्या काय करते ?
------ बाळ ठोम्बरे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2089
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ती सध्या काय करते
अभिप्राय अपेक्षित आहे - धन्यवाद !
अप्रतिम कविता
अप्रतिम कविता
व्वा खूप छान कविता केली आहे.
व्वा खूप छान कविता केली आहे. मला हि कविता फार आवडली आहे.तुम्ही पण माझी कविता वाचा आणि तुमचा प्रतिसाद दया.
Marathi kavita
मस्तच कविता. एकच लंबर. प्रचंड
In reply to व्वा खूप छान कविता केली आहे. by तृप्ति २३
मस्तच कविता. एकच लंबर. प्रचंड प्रतिभा दडलीय तुमच्यात. येऊ द्या एकेक.
आणि ही प्रतिसादातली "इस हातसे लेव दुसरे हातसे घेव" सिस्टिम लै आवडली आहे.
कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल
In reply to मस्तच कविता. एकच लंबर. प्रचंड by अभ्या..
कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल नि गार्टरू | मिपा केले चार्टरू | काव्ययोगे ||
ग
In reply to कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल by आदूबाळ
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय
माझ्या पिरतीची रानी तू व्हशील काय
-गा.पै.
ग
In reply to कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल by आदूबाळ
गोमू संगतीला माझ्या तू येशील काय
माझ्या पिरतीची रानी तू व्हशील काय
-गा.पै.
आहाहाहा, अमृतानुभव अगदी
In reply to कवितेचा बार्टरू | जैसे बक्कल by आदूबाळ
आहाहाहा, अमृतानुभव अगदी
काव्याबाजाराची स्कीमु । जैसे सेल्सप्रमोशनु । बायवने गेटवनू । मिपाकौंटरे ।।
टुकार.
टुकार.