Skip to main content

अंत आणि आरंभ

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 14/08/2017 18:49 या दिवशी प्रकाशित केले.

जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे...

जीर्ण-शीर्ण कातडी
शेषाने टाकली.

प्रलय अमृतात
धरती न्हाली.

हिरव्या शालूत
नववधू लाजली.

प्रीतीचे गाणे
नभी गुंजले.

अंकुर चैतन्याचे
पुन्हा प्रगटले.

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 991
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया