Skip to main content

गणेशोत्सव हायजॅक ?

लेखक पगला गजोधर यांनी शनिवार, 12/08/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
"शिवजयंती सार्वजनिक उत्सव", याचे जनक महात्मा फुले असून, तो उत्सव हायजॅक होऊन, दुसऱ्या कोणाच्या नावे प्रोपागेंडा केला जात असू शकतो काय ?, याबाबत मागे मिपावर मी एक धागा काढला होता. (रेफ: शिवजयंती हायजॅक ) असो आता "सार्वजनिक गणेशोत्सवाचे" जनक कोण ? यासाठी भाऊ रंगारी गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी थेट न्यायालयात याचिका दाखल करुन न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे. इतिहासाचे चुकीचे लेखन करुन, बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे गणेशोत्सव सुरु केल्याचे दाखविण्यात आले असले, तरी वास्तविकता मात्र वेगळीच आहे. गणेशोत्सव कुणी सुरू केला असा प्रश्न आला तर उत्तर तोंडपाठ…लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…हे आपल्याला अगदी शाळेपासून शिकवले गेले. पण गणेशोत्सव टिळकांनी नाही तर भाऊ रंगारी यांनी सुरू केला असा दावा या गणेश मंडळांच्या विश्वस्तांनी केला आहे. गेल्यावर्षी सुध्दा या मंडळाने महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सरकारने त्याकडे कानाडोळा केल्यानेच अखेर भाऊ रंगारी गणपती ट्रस्टने न्यायालयात याचिका दाखल केली. 1892 साली भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. 1892 साली आणखी 3 मंडळांकडून गणेशाची स्थापना झाली. 1893 साली गणेश मंडळांची संख्या वाढून 20-25 वर गेली. 1894 साली विंचूरकर वाड्यात लोकमान्य टिळकांकडून गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली तर लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेश उत्सवाचे जनक कसे? फार फार तर त्यांना प्रचारक म्हटले गेले पाहिजे नाही का ? तुम्हाला काय वाटते ? (जाता जाता अवांतर : नामांकित न्यूज ब्युरो च्या संदर्भाने ... "राज्य शिक्षण मंडळाच्या सातवी व नववीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासच वगळण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या बैठकीनंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे." या बातमी मागच्या बातमीचा वर वरील उल्लेखलेल्या हायजॅकिंगच्या घटनांमागील एम. ओ. मधे काही साम्यस्थळे आढळतात काय ?)

वाचने 29103
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

In reply to by गामा पैलवान

पै, टिळक, कृष्णमूर्ति यांच्या लेखना बाबत, किंवा टिळकांचे प्रचार योगदान नाकारण्याच्या इथ विषयच नाहीये. तुमच्यासाठी पुन्हा विशद करु इच्छितो, की एकंदरीत बनवून देण्यात आलेले पब्लिक परसेप्शन व फॅक्ट, यांच्यात प्रथम दर्शनी तफावत आढळते आहे, आणि काय आहें नै, की पब्लिक परसेप्शनलाच पुढे इतिहास म्हणून ठसवन्यात काही भक्त लोक तरबेज आहेत. आता तरी धाग्यामधले उद्गम, तुम्हाला कळले असेल आशी आशा आहे. पटलं तर पहा, अन्यथा तुमचा अनअपडेटेड प्रचार प्रसार तसाच चालू राहुन द्या.

In reply to by पगला गजोधर

गीतेतली आणि बुद्धाच्या तत्त्वज्ञानातली अहिंसा देखिल लोक आपल्या नावाने चेपतात काय म्हणावं!!

पण हे काय म्हणतात बघा, Shree Sarvajanik Ganeshotsav Sanstha had also hosted freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak in 1901. Tilak had first started Ganeshotsav celebrations in Maharashtra. The Sanstha is known as the pioneer of Mumbai’s Ganeshotsav. The residents of Keshavji Naik Chawl in Mumbai and Shri Bhau Rangari, Shri Khajgiwale, and Shri Ghotwadekar in Pune had first started celebrating Ganeshotsav publicly in 1893, after an appeal by freedom fighter and statesman Bal Gangadhar Tilak. The celebration was begun to provide a platform for national awakening, uniting people and social education. Lectures by eminent personalities and performances by ‘Mela’, a group of singers, including men and women, were the programmes which used to be organised during the festival.

In reply to by पैसा

सोलापूर चा आजोबा गणपती त्याहून जुना असेल तर या उत्सवाद्वारे लोकांना एकत्र करता येईल ही प्रेरणा लोकमान्यांनी सहज घेतली असेल. निदान शंभर सवाशे वर्षांनी कोणीतरी एखाद्या ट्रोल आयडीप्रमाणे आपण उत्सव हायजॅक केल्याचा आरोप करील हे त्यांना माहीत असते तर बिचारे या लोकजागृती, असंतोष फैलावणे वगैरे भानगडीत पडलेच नसते. गणित आणि खगोलशास्त्र हे त्यांचे पाहिले प्रेम होते. त्याचे अध्ययन अध्यापन करत त्यांनी गप्प बसायला हवे होते. टिळकांचं चुकलंच ते!

In reply to by पैसा

ताई, टिळकांचे योगदान नाकारण्याच्या इथ विषयच नाहीये. तुमच्यासाठी पुन्हा विशद करु इच्छितो, की एकंदरीत बनवून देण्यात आलेले पब्लिक परसेप्शन व फॅक्ट, यांच्यात प्रथम दर्शनी तफावत आढळते आहे.

In reply to by पगला गजोधर

इंटरनेट वर कित्येक समकालीन उल्लेख पुरावे उपलब्ध आहेत. http://changeforbetter.org.in/briefing/413-the-making-of-ganesh-utsav उदा. हा एक लेख. थोडे थांबायची आणि न चिं केळकर यांच्या टिळक चरित्रावर विश्वास ठेवायची तयारी असेल तर त्यातले गणेशोत्सवाबद्दलचे स्क्रीनशॉट्स देऊ शकेल. पण माफ करा, मला असल्या ट्रोल सदृश लिखाण आणि वादात आता काही रस राहिला नाही. तुम्हाला खरा इतिहास जाणून घ्यायचं असेल तर समकालीन चरित्रे, लिखाण यांचा अभ्यास करा ही विनंती. टिळकांनी उत्सव हायजॅक केला वगैरे भाषा मला पेलवणारी नाही तेव्हा मी इथून रजा घेणे योग्य. पुण्यातल्या एका इतिहास संशोधकाने लोकसत्ता ला सांगितले की टिळकांनी सांगितल्यावरून 1893 ला खाजगीवाले घोटवडेकर रंगारी, नातू, पटवर्धन, दगडूशेठ हलवाई यांच्या पुढाकाराने पुण्यात 3 ठिकाणी आणि मुंबईत केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. पण या संशोधकाने आपले नाव घेऊ नका कारण आपण लोकांना भितो असेही म्हटले. आम्ही त्या भिणाऱ्या लोकांपैकीच एक आहोत. तेव्हा गणेशोत्सव ब्रिटिश सरकारने सुरू केला असे म्हटलेत तरी मला काही प्रॉब्लेम नाही. मी तेव्हा नव्हते हे एक आणि आता या उत्खननातून अस्मिता गळवे सुजण्यापालिकडे काहीही साध्य होणार नाही. अजून जरा शोधले तर ग्वाल्हेर येथेही 1891 पूर्वी गणेशोत्सव सुरू होता असे दिसते. तेव्हा असे अजून काय उल्लेख सापडतात ते कृपया शोधा. शुभेच्छा!

In reply to by अभ्या..

धन्यवाद! शक्य असेल तर श्रद्धानंद समाजाच्या सोलापुरातील इतिहासाबद्दल कधीतरी जरूर लिहा.

१ पुण्यात बहुतेक लोकांना भाऊ रंगारी मंडळ माहिती आहे. पहिले पाच मानाचे गणपती आहेत तसे शेवटी तीन आहेत भाऊ रंगारी, मंडई आणि दगडूशेठ. हे कित्येक दशके चालू आहे.आणि हा मान असतो. २. गणेशोत्सवाला शंभर वर्षे झाली तेव्हा मी एका उपक्रमात सहभागी होतो. केसरी वाड्यात मोठे ग्रंथालय आहे तिथे बसून माहिती शोधली होती. जुनी वृत्तपत्रे आणि पुस्तके होती. तेव्हा स्मरणिकेत स्पष्ट लिहिले होते की भाऊ रंगारी यांनी प्रथम गणपती बसवला. पुढच्या वर्षी टिळकांनी विंचूरकर वाड्यात गणपती बसवला आणि त्याला उत्सवी स्वरूप दिले. मग त्यांच्या पुढाकाराने मंडळे वाढली. ही माहिती केसरी वाड्यात मिळाली. म्हणजे इतिहास बदलला वगैरे धादांत खोटा कांगावा आहे. पुण्यात बहुतेक लोकांना हे माहिती आहे. नवीन शोध काही नाही. गणपती बघत फिरताना असंख्य लोक आवर्जून भाऊ रंगारी मंडळाची मूर्ती बघायला जात असत. तरीही गणेशोत्सवाचे प्रणेते टिळक मानले जात, त्यांच्या भूमिका आणि उद्देशामुळे. शतक महोत्सवात काही वाद झाला नव्हता. मग आता काय कारण? तेव्हा कारभारी कलमाडी होते. आता मुक्ता टिळक आहेत. टिळक परिवार यापूर्वी कायम कॉंग्रेस मध्येच आणि तेही मोठ्या पदावर राहिला आहे. त्यामुळे टिळक, गणेशोत्सव याचा आणि धाग्यावर बळंच ओढून आणलेल्या नागपूरचा काहीही संबंध नाही. टिळकांनी उत्सव सुरू केला नाही असे ठाम मत असेल तर पुरावे द्यावेत. १८९३-९४ चे पुरावे आहेत.

In reply to by मैत्र

धन्यवाद, अतिशय मुद्देसुद, विषयला धरुन, मला ब्रिगेड़ी/ट्रोल, अशी दूषणे न देता, मिळालेला प्रतिसाद आहे हा. दूसरी बाजू समजावून सांगितल्या बद्दल बिग थैंक्स.

In reply to by मैत्र

तुमच्या वरील प्रतिक्रीयेनुसार
स्मरणिकेत स्पष्ट लिहिले होते की भाऊ रंगारी यांनी प्रथम गणपती बसवला..............
परंतु वृत्तपत्रातील बातमी नुसार , महापौरांचे वेगळेच मत आहे ...
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेच सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत. त्यासाठी ऐतिहासिक पुस्तकात असलेले संदर्भ श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने तपासून पहावे, असे मत महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यंदाचे सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125 वे वर्ष नसून 126 वे वर्ष असल्याचे सरकारी कागदपत्रांमध्येच नमूद असताना शासन 125 वे वर्ष साजरे करत आहे, हा विरोधाभास असल्याचे ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. त्या पार्श्‍वभूमीवर बोलताना महापौर म्हणाल्या, लोकमान्य टिळक हेच निःसंशय सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आहेत.
महापौरांनी कदाचित केसरी वाड्यात असलेली (जिचा उल्लेखास आपण वरील प्रतिक्रियेत केलाय) कागदपत्रे अभ्यासली नसावीत. त्या समोरच्याच पार्टीला कागदपत्रे तपासा असा जाहीर सल्ला देत आहेत. आणि आम्ही मिपावर हे नम्रपणे सांगू इच्छितो, कि तरीही त्यांना कोणी ट्रोल वैगरे संबोधू नये...

In reply to by पगला गजोधर

भाऊ रंगारी, खाजगीवाले आणि तिसरे नाव घोटावडेकर (तिसरे नीट लक्षात नाही. कर होते नक्की) ही नावे आहेत . पण त्याला सार्वजनिक स्वरूप नव्हते. ते टिळकांनी दिले. हेही स्मरणिकेत लिहिले होते. टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक किंवा प्रणेते आहेत. पहिला गणपती बसवणारे नाहीत. ही दोन्ही विधाने खरी आहेत. त्यामुळे वाद नाहीये. उकरून काढू नका. हवे असल्यास केसरी वाड्यात जाऊन शोध घ्यावा. मुक्त प्रवेश असतो.

संपादक महाशय, या असल्या धाग्यांनी मिपावरचा वावर कमी झाला आहे. ज्या गोष्टींची समाजाला गरज नाही असे वाद उकरून समाज प्रबोधन करतोय असे भासवून इतरांच्या डोक्याला ताप द्यायचा या वृत्तीला काय म्हणतात हे माहीत नाही पण हा नतद्रष्टपणा आहे हे निश्चित. काव्य शास्त्र विनोदेन हा मिपाचा उद्देश असफल होतो आहे की काय असा मला आता संशय येऊ लागला आहे. मला वाटते काथ्याकूट हा विभाग बंद केला तरी चालण्यासारखं आहे. संपादक मंडळांनी हे असले खोडसाळ धागे त्वरित उडवावेत. एक दोन सभासद कमी झाले तरी हरकत नाही. कारण मी अनुभवले आहे या असल्या धागाकर्त्यांच्या सगळ्या प्रश्नाला पुराव्यासकट उत्तरे दिली तरी ते मान्य करत नाहीत कारण त्यांचा छुपा हेतू वेगळाच असतो. या धाग्यावर तो साध्य झालाय असे मला वाटते.

In reply to by जयंत कुलकर्णी

संपादक महाशय, जुने पुराणे झडून जावे,
ही वाटे पानझड जरी,ती असते चाहूल वसंताची, बहरणे आणिक झडणे,ही तर रीत निसर्गाची चुकला कुणास नियम निसर्गाचा सांगावे अन,पुन्हा बहरण्यासाठी झाडाने झडून जावे @कवयित्री -मंजिरी पाटील,पुणे
या ओळींतून प्रेरणा घेऊन मी तर असे म्हणीन की अन,पुन्हा बहरण्यासाठी मिपाझाडाने झडून जावे, जख्ख पिकली, जुनी पुराणी, पाने ही झाडून जावो, नवयुगाच्या नवं विचारांनी मिपा पुन्हा बहरो ...

In reply to by पगला गजोधर

संक्षींसोबत जशी कठोर पण गरजेची कार्यवाही केली गेली तशी करायची गरज पुन्हा निर्माण झालीये असे वाटते.

In reply to by जयंत कुलकर्णी

शिवाजी महाराज - काही रेखाटने या धाग्यात मी खालील प्रतिक्रिया लिहिली आहे तीच इथे देत आहे. "आज जातीजातीत द्वेष आहे. संधीसाधू पुढारी त्यात तेल ओतत आहेत. मेडिया फालतू पुढाऱ्यांना आणून आगीत तेल ओतणाऱ्या चर्चा घडवून आणत आहेत. समाजाला योग्य दिशा दाखवणारा आज कुणीच दिसत नाही. मिपावर देखील चांगले , कसदार साहित्य, कला फार कमी बघायला मिळायला लागलेय. त्याऐवजी द्वेषमुलक चर्चा जास्त दिसतात."

In reply to by पगला गजोधर

शंभर सव्वाशे , दोनशे ,तीनशे वर्षांपूरवीचं काहीतरी खोदून काढायचं आणि समाजमने कलुषित करायची हे उपदव्याप महाराष्ट्रात खूप वाढलेत हल्ली. फेसबुकवर नितेश राणेंचे भाषण पाहिले. वा वा, काय ते विचार आणि काय ती प्रगल्भता! हे असले पुढारी महाराष्ट्राला भविष्यात कुठे नेऊन ठेवणार आहेत हे खरोखर काळजीचे कारण आहे.

In reply to by बबन ताम्बे

सहमत, नितेश राणे, कोकाटे, प्रवीण तोगडिया, अभय वर्तक, झाकीर नाईक, नथुराम इ इ सर्वच एका माळेचे मणी.

In reply to by जयंत कुलकर्णी

जयंतरावांशी मी पूर्ण सहमत आहे. या धाग्याचा मूळ हेतू काय आणि शेवटी निष्कर्ष काय निघाला हे पहा. सर्वात पहिला गणेशेत्सव लोकमान्य टिळकांनी चालू केला असे कुणाचेही म्हणणे नव्हते तर त्यांनी उत्सवाला "लोकजागृतीसाठी" सार्वजनिक स्वरूप दिले असाच इतिहास आहे आणि तोच शिकवला गेला होता किंवा जात आहे. केवळ खोडसाळ पण किंवा दुसराच अंतर्गत हेतू ठेवून धागा काढला गेला असेच वाटते.

... केवळ गणपतीची आरती रचली; कारण त्यात स्पष्ट लिहिलंय, रघुकुलटिळक रामदासा अंतरी... असं नवसंशोधन लौकरच प्रसिद्ध होऊ शकेल, अशी शंका आहे.

In reply to by mayu4u

कारण त्यात टिळक आणि रामदास अशी दोन त्याज्य नावे आहेत. इतिहासाबरोबरच इतर सर्व साहित्याचे शुद्धीकरन ही काळाची गरज आहे.

In reply to by पैसा

ताई,
इतिहासाबरोबरच इतर सर्व साहित्याचे शुद्धीकरन ही काळाची गरज आहे
अवांतर :- "शुद्धीकरण करणे " अशी मानसिकता ठेवणाऱ्या लोकांना, उदा. मौजीबंधनावरून छोट्या लेकरांची, शुद्धीपत्रके मागणारी मनोवृत्ती, टिळकांनी दुसऱ्या धर्मीय व्यक्तीच्या घरी चहा प्यायला, म्हणून प्रायश्चित शुद्धी मागणारी जमात, यांना शुद्धीकरणाचे अप्रूप, तसल्या लोकांना सान्गा कृपया.

In reply to by पगला गजोधर

पगला गजोधर तुमचा मूळ चेहरा आता समोर येत आहे असेच मी म्हणेन

In reply to by सुबोध खरे

सर, हा धागा आला तेव्हाच कळायला हवं होतं...

In reply to by पगला गजोधर

मी सिरीयस आहे. माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. कारण तुम्ही इतिहास वाचला आहे हे या प्रतिसादावरून दिसतंय. मग जी माहिती सहज उपलब्ध आहे तिचा शोध न घेता "टिळकांनी उत्सव हायजॅक केला" वगैरे भडकाऊ भाषा का वापरावीत? प्रामाणिकपणे उत्तर द्या. जर तुम्हाला खरोखर मिपाकरांकडून निकोप चर्चा हवी होती तर हा चर्चा प्रस्ताव नीट भाषेत लिहिता आला असता ना? असली भाषा वापरणाऱ्या लोकांच्या दाहशतीपुढे आम्ही सपशेल लोटांगण घालतो कारण आम्हाला हुतात्मा व्हायचे नसते. थोडक्यात म्हणजे "तू मोठा, तू बरोबर" म्हणून बाजूला होणे मला तरी शहाणपणाचे वाटते. मी जरा कडक भाषेत लिहीत आहे तरी अजून ताई म्हणता आहात, म्हणून जाहीर रीत्या हे सांगितले. नाहीतर दुर्लक्ष करून गेले असते. जयंत कुलकर्णी यांच्यासारखे अभ्यासू सदस्य जेव्हा काहीतरी सांगतात तेव्हा ते सकारात्मक घ्या. मिपाची काळजी खरोखर असेल तर असली भाषा यापुढे टाळा. दुसरा काही अजेंडा असेल तर मात्र हे सगळे सांगणे फुकट आहे. अधिक उणे बोलल्याबद्दल क्षमा असावी.

In reply to by पैसा

अहो ताई, "टिळकांनी उत्सव हायजॅक केला" असे मी लिहिलंय हा पूर्वग्रह जरा बाजूला ठेवून, "टिळकांच्या नावाखाली कोणी, त्यांच्या पश्चात, उत्सव हायजॅक केला असू शकतो का ?" (कारण त्यांना तसं करायचं असतं तर मैत्र म्हणतायेत त्या प्रमाणे स्मरणिकेत फेरफार आढळला असता, नाही का ?) असं लिहिलंय समजून परत व्यक्त व्हा बरे. कुठलेही कारण नसताना मी कोणाशीही अभद्र शब्दात प्रत्युत्तर दिलेलं नाही, परंतु माझ्यावर विनापुरावा ब्रिगेडी किंवा आणखी बरंच फैरी झडतात, त्याबद्दल मात्र शांतता दिसतेय इथे. असो, तुम्ही क्षमा मागण्याचा संबंध नाही, कारण तुम्ही कठोर शब्दात तुमचं मत व्यक्त केलंय. उलट अजाणता हिट ऑफ मोमेन्टमधे माझी चॉईस ऑफ वर्ड चुकली असेल, तर मला क्षमा करा

In reply to by पगला गजोधर

या शब्दाच्या अर्थापासून सुरुवात करा बघू. आपण शाळेत जे शिकलो, या धाग्यावर अनेकजण जे सांगत आहेत, तत्कालीन लिखाणात जे अनेकांनी निसंदिग्ध लिहून ठेवले आहे की लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबई आणि पुण्यात 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. रंगारी गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य हजर होते आणि ते लोकांना कळताच तिथे मोठ्या संख्येने लोक जमा झाले इत्यादी उल्लेखही आहेत; या सगळ्याचा अर्थ काय? स्वतः लोकमान्यांनी लोकांना सांगितले का माझ्या नावावर खपवा? का ब्रिटिशांचाही हायजॅक च्या कटात भाग होता? जर सुरुवातीपासून हे लिखित उल्लेख आहेत, आणि सोलापूरच्या उल्लेखवरून दिसते की ती लोकमान्यांची प्रेरणा आहे, तर हा वाद आता उकरायचे कारण काय? तुम्ही इथे बाबरी वगैरे संबंध नसलेले लिहिले त्याबद्दल तर मी बोलताच नाहीये. हायजॅक चे उदाहरण पाहिजे असेल तर संभाजी राजांची प्रतिमा त्यांच्या मृत्यूनंतर लोकात बिघडवणे हे त्यांच्या विरोधक लोकांकडून इतिहासाचे हायजॅक होते. जी घटना घडली त्या दिवसापासून जे वर्णन समकालीन लिखाणात दहा लोकांकडून आले आहे ते स्वीकारले पाहिजे. त्याला तुम्ही हायजॅक म्हणून नाकारत असाल तर त्यामागे इतर काही कारण असणार हा साधा हिशेब आहे.

In reply to by पैसा

हायजॅक म्हणजे जे आपलं नाही त्याचे हरण करणे. आता तुम्ही कसे बघताय धाग्याकडे त्यावर अवलंबून आहे, अभ्या यांनी सांगितले सोलापूरचा गणपती पहिला, व त्या संधर्भात त्यांनी काही मटेरियल ही पुरवले, या धाग्यावर अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया मला अपेक्षित होत्या. आता राहिलं बाबरी वैगरे चा उल्लेख, तो मी काही शून्यातून केलेल नाही, त्या आधीच्या प्रतिक्रिया कश्या होत्या त्यानुसार मी दिलेलं उत्तर होत. जिथे मला प्रतिक्रिया (माझ्या मता विपरीत असली तरीही ) योग्य वाटली, तिथे मी धन्यवाद सुद्धा दिलेले आहे, याकडे सोईस्कर रित्या दुर्लक्ष होऊ नये. जर हागणदारी वैगरे शब्दयुक्त प्रतिक्रिया आल्या तर, मी बौद्धिक चिंतन वैगरेला फाटा देऊन उत्तर दिलेल आहे, देत राहीन, आरेला कारे मी करणारच, पण त्याच बरोबर आपल्या सारख्या वडीलधाऱ्या मेम्बरांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्या, तरीही मला तुमच्या बद्दल कुठलेही मनात कलुषितपणा नाही, याची मी आपल्याला ग्वाही देतो. वाद मी उकरून काढला नसून, न्यायप्रविष्ट वादाबद्दल माझ्या कुतूहलापोटी हा धागा काढलाय. हा धागा मी काढला नसता तर मला अभ्या यांनी दिलेली माहिती, कि जी मला पूर्वी अज्ञात होती, माहिती झाली नसती. माझा साधा थीओरम होता, वर्ग संघर्षामध्ये ज्या वर्गाच्या हाती सत्ता असते, तो आपल्यास अनुकूल इतिहास ठेवतो, प्रतिकूल इतिहास बदलण्याचा प्रयत्न करतो किंवा इतिहास दाखले नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, उदा. आयसिस सीरियामधील सर्व ग्रंथगृहें म्युसिअम नष्ट केली प्लास्टिक एक्सप्लोसिव्ह वापरून. आणि हो संभाजी राजांच्या चरित्र कलुषित करणाऱ्या मास्टर माईंड शक्तींचा चेहेरा खरंच जगापुढे येवो अशी माझीही विश्व चरणी प्रार्थना आहेच.

In reply to by पगला गजोधर

सार्वजनिक गणेशोत्सव हायजॅक झाला नाही. अशी चर्चासुद्धा पहिल्या ११० -२०वर्षात झाली नाही आणि टिळकांच्या पश्चात नव्हे तर त्यांच्या हयातीत पुणे आणि मुंबईच्या अगदी पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणा म्हणून श्रेय त्यांच्या विरोधकांनी सुद्धा त्यांना दिले होते. इथे वर्गाकलह वगैरे कुठे आला?

In reply to by पैसा

तेच तर म्हणणे आहे, सत्ता व परिघातील वर्ग , हा त्यापरिघाबाहेरील वर्गावर नियंत्रण राहावे म्हणून, (नेहमीच नाही पण बहुतेक वेळा )प्रतिकूल इतिहास बदलतो किंवा नष्ट करतो किंवा तसा प्रयत्न करतो, असं मला वाटतं (मी चूकही असू शकेन). आता नका याच वेळी हा विवाद का उपस्थित व्हावा , आधी का नाही झाला ? मला दोन शक्यता वाटतात (इथेही मी चूकही असू शकेन) शक्यता १. आत्ता जनमानसात जे चित्र आहे ते ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर आहे, पण आता काही नतद्रष्ट लोक इतिहास अपडेट करण्याचा प्रयत्न करा आहे . किंवा शक्यता २. खरंच इतिहासात फेरफार झालेला आहे, व पूर्वी काही कारणामुळे तो उघडकीस नाही आला, किंवा पूर्वी त्याला दाबून ठेवण्यात, दाबून ठेवणाऱ्याला यश आले, पण सध्या सत्ता समीकरण बदलल्यामुळे, आता ह्या गोष्टींना त्यांना नियंत्रणात ठेवता आल्या नसल्यामुळे, सध्या हा प्रश्न उपस्थित झाला / करता येऊ शकला असेल.

In reply to by पगला गजोधर

अजून फुकट घालवायला माझ्याकडे वेळ नाही. तुमचे चालू द्या. इतिहासात फेरफार या केसमध्ये झालेला नाही. आरडाओरडा करून तुम्ही लोकांना तसे कबूल करायला भाग पाडू शकाल कदाचित पण जगात सगळीकडे विखुरलेले पुरावे कोणालाही नाहीसे करता येणार नाहीत.

In reply to by पैसा

"आरड़ा ओरडा" या तुमच्या शब्दला माझा आक्षेप असला तरी, एक गोष्ट सखेद नमूद करतो, की जर पुन्हा पुन्हा तेच मान्य करायला सांगणे, हे एका बाजून होताना दिसत नाहीये. असोच

In reply to by पैसा

हायजॅक शब्दाला माझा अजूनही आक्षेप आहे. जी गोष्ट आहे की नाही हे तुम्हाला माहिती नाही त्याबद्दल पूर्वग्रह ठेवून लिहिणे थांबवा.

In reply to by पगला गजोधर

अहो तुम्हाला माहिती सह नीट सांगितलं की केसरी वाड्यासह कोणी ही फेरफार, तुमच्या भाषेत हायजॅक केले नाहीये. पुण्यात लोकांना भाऊ रंगारी माहिती आहेत. तुम्ही हे मान्य करायचे सोडून त्या माहितीचा मुद्दाम विपर्यास करताय. परत लिहिले की रंगारी गणपती आधी होता तरी * सार्वजनिक * उत्सव प्रणेते टिळक होते आणि हेही शतक महोत्सवात मांडले होते. तेव्हा वाद झाला नाही. आता उकरून वाद निर्माण केला जातो आहे. मग तुम्हाला म्हणायचे का की ब्रिगेड तेव्हा नव्हती म्हणून वाद नाही झाला. बहुधा बोलविता धनी राष्ट्रवादी पण नव्हती. राजकारण म्हटले तर टिळक कुटुंब कॉंग्रेस चे, तेव्हा पंचवीस वर्षे पूर्वी सत्ता कॉंग्रेस ची. ना त्यांना अडचण आली, ना विरोधी भाजपला, ना राज्य सत्ता असलेल्या पवारांना. मग आत्ता हा मुद्दा करून काय साध्य केले जात आहे? तुमचा चॉईस ऑफ वर्ड समजून उमजून वाटतो आहे. 125 वर्षे जुने संदर्भ आत्ता कोणी पाच दहा वर्षांत हायजॅक केले असे म्हणणे हास्यास्पद आहे. वातावरण मुद्दाम कलूषित करणे टाळा

In reply to by पगला गजोधर

पग, "तसल्या लोकांना सांगा कृपया...'' तसले लोक म्हणजे कोणते आणि कसले? आणि तसले लोक आता तसे वागतात का ? मग तिनशे वर्षापूर्वीचा उदा. आत्ता देऊन तुम्ही काय साधत आहात हे कळेल का? ही जमात कुठली?

In reply to by पगला गजोधर

पगसाहेब, तुमचा पूर्ण प्रतिसाद वाचा आणि मग उत्तर द्या. वेळ घेतला तरी चालेल. कारण ते कळल्याशिवाय तुम्ही कोण आहात हे कळणार नाही. तुम्हाला येथील बहुसंख्य लोक ब्रिगेडी समजत नाहीत पण तुमचे धागे वाचून आता सगळ्यांना तसा संशय येत चालला आहे हे मात्र खरं... :-) बरं असो. हा शेवटचा प्रतिसाद कारण जमात इ. हे शब्द वाचणे माझ्या कुवतीपलीकडे आहे.... तुमच्याच भाषेत सांगायचे झाल्यास, " असोच". :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

पैसा ताई आणि जयंतराव पहिल्यांदा हा धागा यांनीखोडसाळपणे काढला आणि त्यानंतर खरा चेहरा समोर आल्यावर ते सोलापूर आणि अभ्याच्या मागे लपण्याच्या प्रयत्न चालू आहे.आणि आव मात्र गंभीर इतिहास संशोधकाचा आहे. यांचे वितंडवाद श्री केजरीवालांची आठवण करून देणारे आहेत. उगाच यांच्या नादाला लागणे हा कालापव्यय आहे.