"काय करता येईल?"
गेल्या काही महिन्यांपासून जिथे मिपाकर आहेत असे WhatsApp,फेसबुक समुहांवर एक वाक्य हमखास ऐकू येतं,"पूर्वीचं मिपा राहिलं नाही आता!"
याच विषयावर काही मिपाकरांशी बोलताना तीन मुख्य मुद्दे समोर आले ते असे.
१. काही जुने वाचनीय लिहिणारे मिपाकर आता फारसे लिहित नाहीत.या लेखकांचा मिपावर दबदबा होता.त्यामुळे सकस लिखाणात थोडा कमी असणारा मिपाकर लिहिण्यापूर्वी अनेकदा विचार करायचा.आपण यांच्यासारखं दर्जेदार लिहू शकू की नाही याबद्दल धाक असायचा.तो सध्या कमी झालाय.कोणीही,कोणताही विषय आणतं मिपावर!किंवा काहीही प्रतिसाद दिला जातो.लेखनाचा दर्जा सुधारायला हवा;तसाच प्रतिसादांचाही सुधारायला हवा.
आता हे जुने बौध्दीकदृष्ट्या सकस असं लिहिणारे मिपाकर सध्या का लिहित नाहीत? त्यांना काही खटकतंय का? की लिहिण्यासाठी खरंच पूर्वीइतका वेळ नाहीये त्यांच्याकडे?त्यांनी कृपया इथे व्यक्त व्हावं.
किंवा नवीन लेखकांच्या लेखनाचा दर्जा उंचावण्यासाठी मिपा जे प्रयत्न करतं आहे ते कुठे कमी पडताहेत का?
२. मिपाचं डिझाईन बदललंय.पूर्वी प्रत्येक नवीन धाग्याचं संपूर्ण शीर्षक वेबपेजवर दिसायचं.आता तसं होत नाही.यात वेळ जातो.हे स्वरुप थोडं किचकट वाटतं.
पूर्वीचंच सुटसुटीत डिझाईन परत नाही का ठेवता येणार? काय हरकत आहे?
३. काही वेळा अकारण ट्रोलिंग किंवा कंपुबाजी होते.(यामुळे कदाचित नवीन चांगले लेखक मिपाकर अव्यक्त राहू शकतात.)अर्थात ती इतर मराठी संस्थळांवरही कमी- अधिक प्रमाणात होतच असते.पण त्यामुळे इथल्या ट्रोलिंग किंवा कंपुबाजीचा प्रश्न निकालात किमान कमी नाही होऊ शकणार.त्यासाठी इतर संस्थळांचा विचार न करता मिपावर असं होऊ नये म्हणून काय करता येईल?
WhatsApp किंवा अशाच सोशल ग्रुप्सवर मिपाकर गप्पा मारतात,चर्चा करतात.मग त्यांना इकडे यायला वेळच मिळत नाही.लिहिणं होत नाही.सगळं तिथेच बोलून घेतात.असाही एक मतप्रवाह आहे.
तर इथे सांगायला आवडेल की वरील विषयाची चर्चा आधी अशाच एका समुहात झालेली आहे.बरेच मिपाकर तिथे आहेत.त्या चर्चेतूनच हा धागा बनवला आहे.
तर एकंदरीत मिपाचा पूर्वीचा किंबहुना शक्य झाल्यास त्याहूनही अधिक चांगला स्तर,दर्जा निर्माण करण्यासाठी काय करता येईल,काय उपाय करता येतील यावर चर्चा अपेक्षित आहे.
हे सगळं तुम्ही का करताय? मिपाची काळजी घ्यायला मिपाचे चालक,मालक,संपादक मंडळ समर्थ आहे.तुम्ही का काळजी करताय मिपाची? मिपा जसं आहे तसं पुढे जाईल.मिपाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत.असंही विचारलं जाऊ शकतं.
पण मग याला विलंब का लागतो आहे?कि जे आहे जसं आहे तसं स्विकारत पुढे जायचंय? सगळेच काही उत्तम लेखक होऊ शकत नाहीत.पण आताशा मिपावर हे चांगल्या लेखकांचं प्रमाण खुपच कमी झालंय.ही चिंतेची बाब नाही का?
सामान्य मिपाकराने ही चिंता व्यक्त करावी की नाही? तेवढा अधिकार सामान्य मिपाकराला असावा की नाही?
धाग्यावर वरील समस्यांच्या उपायांबद्दल चर्चा अपेक्षित आहे.
याच समस्या परत वेगळ्या शब्दांत मांडून धागा भरकटवू नये ही विनंती!
याद्या
12967
प्रतिक्रिया
55
वर्गीकरण
मिसळपाव
हो
या निमीत्ताने मला माझा जुनाच प्रतिसाद आठवला
जालीय संवाद
In reply to या निमीत्ताने मला माझा जुनाच प्रतिसाद आठवला by दुर्गविहारी
+१००१ अजो...
In reply to जालीय संवाद by arunjoshi123
अजो जी..!!
In reply to जालीय संवाद by arunjoshi123
@ दुर्गविहारी
In reply to या निमीत्ताने मला माझा जुनाच प्रतिसाद आठवला by दुर्गविहारी
मला विषेश करुन खटकतो तो
In reply to या निमीत्ताने मला माझा जुनाच प्रतिसाद आठवला by दुर्गविहारी
सही!
वरील प्रतिसाद हे काथ्याकूट या
सहमत ..!!
In reply to वरील प्रतिसाद हे काथ्याकूट या by खटपट्या
ट्रोल करू नये ठीक आहे. पण
In reply to वरील प्रतिसाद हे काथ्याकूट या by खटपट्या
उपयोगी धागा. धन्यवाद !
विकांतामुळे!
In reply to उपयोगी धागा. धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
अतिशय हास्यास्पद प्रतिसाद!
In reply to उपयोगी धागा. धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
वरचा प्रतिसाद सुद्धा पटतोय, व
In reply to अतिशय हास्यास्पद प्रतिसाद! by संदीप डांगे
आताशा तर संदीप यांचा प्रतिसाद
In reply to वरचा प्रतिसाद सुद्धा पटतोय, व by पगला गजोधर
दुसऱ्या धाग्यावरची धुणी...
In reply to आताशा तर संदीप यांचा प्रतिसाद by पगला गजोधर
+१११
In reply to दुसऱ्या धाग्यावरची धुणी... by mayu4u
पटतंय. झुंड दिसतेय...
In reply to अतिशय हास्यास्पद प्रतिसाद! by संदीप डांगे
सहमत. :))
In reply to पटतंय. झुंड दिसतेय... by एमी
काय करता येईल ?
काय करता येईल ?
In reply to काय करता येईल ? by धर्मराजमुटके
त्यामुळे आता राजकीय धाग्यांवर
In reply to काय करता येईल ? by धर्मराजमुटके
केअशु
थंब्स अप केअशुजी
मोहितेंचे ट्रक फिरायला लागले
In reply to थंब्स अप केअशुजी by जेम्स वांड
ओके,
In reply to मोहितेंचे ट्रक फिरायला लागले by मोदक
1. जुने, चांगले धागे, एखाद्या
यातले सुरुवातीचे प्रतिसाद वाचा
मला वाटतं
असहमत
In reply to मला वाटतं by धर्मराजमुटके
आपल्याला पटतात तेव्हढेच
In reply to असहमत by mayu4u
असहमत!
In reply to आपल्याला पटतात तेव्हढेच by अभ्या..
अभ्या..
In reply to आपल्याला पटतात तेव्हढेच by अभ्या..
+1
In reply to अभ्या.. by कपिलमुनी
कप्या, विशुपाटील, मापं नै
In reply to +1 by विशुमित
धाग्याचं काष्मीर होणं थांबवण्यासाठी...
लिहायला वेळ मिळत नाही?
त्या ऐवजी...
In reply to लिहायला वेळ मिळत नाही? by उपयोजक
धाग्यासाठी अभिनंदन!
समर्पक प्रतिसाद!
In reply to धाग्यासाठी अभिनंदन! by पैसा
मात्र खूप दिवस झाले एक गोष्ट
In reply to धाग्यासाठी अभिनंदन! by पैसा
मात्र खूप दिवस झाले एक गोष्ट पहते आहे की राजकीय विचारसरणीमुळेलोकात उभी दुफळी पडली आहे. मतभेद असतानाही सकस, निकोप चर्चा करणे शक्य असते पण लोक भांडताना अगदी नको इतके घसरतात आणि तेढ वाढत जाते. इंटरनेट म्हणजे आयुष्य नव्हे. एका धाग्यावरचे भांडण इतर धाग्यांवर घेऊन जाऊ नये हा साधा संकेत आहे. पण तो पाळावा इतके कोणीच भानावर नसते. एखादा माणूस समजा तुम्हालाआवडत नसेल पण म्हणून त्याने मिपा सोडून निघून जावे इतका त्याला त्रास देऊ नये. सगळ्या मतभेदासकट लोक राहिले तरच मिपाचे बहुरंगी रूप कायम राहील.माझा अनुभव असा आहे की, राजकीय चर्चांमध्ये स्वतःला सोयीस्कर भूमीका घेऊन ट्रोलिंग करणारे आणि दुसर्या बाजूकडे कै च्या कै लॉजिक लाऊन उत्तर मागणारे लोक एखादी बाजू त्याच प्रकारे त्यांच्यावर उलटवली की प्रचंड आकांडतांडव करतात आणि विनाकारण प्रशासन, संपादक मंडळावर चिखलफेक करून सरतेशेवटी मिपा सोडून जातात.. अरे भाऊ.. तुच सुरूवात केलीस ना..? मग आता बुमरँग उलटले तर रडारड करण्यात काय अर्थ आहे..? तसेच राजकीय धाग्यांच्याच बाबतीत बोलायचे झाले तर, "आपण वापरू ती भाषा समोरच्याने चालवून घ्यावी मात्र समोरच्याने एकही वावगा शब्द उच्चारू नये" ही विलक्षण अपेक्षा अनेकांची असते. एकूण काय.. राजकीय चर्चांमुळे परस्पर संबंधांचे नुकसान होते आहेच आणि ते कसे टाळायचे ते कळत असूनही वळत का नांही हा सोपा प्रश्न विनाकारण अनुत्तरीत राहतो.एक कारण
In reply to मात्र खूप दिवस झाले एक गोष्ट by मोदक
तर तर... i miss संक्षी
In reply to धाग्यासाठी अभिनंदन! by पैसा
युझर एक्सपेरियन्स
+1
In reply to युझर एक्सपेरियन्स by अत्रे
मला आठवते तसे
In reply to युझर एक्सपेरियन्स by अत्रे
ट्रेनमधल्या शंभर लोकांना
मी नेहमीच मिपावर सकस लेखन
प्रतिसाद आवडला. ;)
In reply to मी नेहमीच मिपावर सकस लेखन by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
वॉव!
In reply to मी नेहमीच मिपावर सकस लेखन by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
प्रतिसाद सुद्धा सकारात्मक
असे प्रश्न उपस्थित करणार्यांना,
एकदा तुमचे लिखाण मिपावर
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा..!!