अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!!
छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य,राजनिती,मुत्सद्दीपणा हे सर्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये बंदिस्त रहाणे शक्यच नाही.महाराजांचे स्वराज्याचे उद्दीष्ट,त्यामागची भुमिका,येथे एतद्देशियांचे समतेचे ,ममतेचे, सुखाचे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही तो प्रभुचीच इच्छा हे महाराजांचे मनोगत महाराष्ट्राबाहेरचे विचारवंतानाहि उमगले होते,आहे.शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नेते नव्हते तर ते सर्व भारताचे आदर्श राष्ट्रपुरुष होते अशी भावना भारतीय विचारवंत अन प्रतिभावंत यांच्या मनात शिवकालात अन नंतरहि निर्माण झाली होती अन आजही ती कायम आहे.म्हणुनच मराठी बरोबरच भारताच्या अनेक भाषांमध्ये त्यांच्यावर खंडकाव्ये,
महाकाव्ये आणि स्फुट काव्ये निर्माण झाली.इतर भाषेमध्ये गध्य अन विवेचक चरित्रेहि लिहिली गेली यात महाराजांचे थोरपण लक्षात येते.
परमानंद नेवासकर हे महाकवि तर महाराजांना समकालीनच होते.त्यानी महाराजांचे चरित्र'शिवभारत"हे संस्क्रूतमध्ये लिहिले आहे.त्याच काळात जयराम पिंडे यांनी"पर्णालपर्वतग्रहणाख्यान"मध्ये पन्हाळा घेतला याचे वर्णन केले आहे.
आणखीहि एक संकर्षण सकळकळे यांचे शिवकाव्य प्रकाशात आले आहे.त्यामध्ये चंद्रराव मोरे यांचे पारिपात्य,कल्याण-भिवंडीची मोहिम, अफझलखान वध हे तीन महत्वाचे प्रसंग त्यात वर्णिले आहेत.समर्थानी तर त्यांच्या वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे,वेगवेगळ्या पैलुंचे सुंदर वर्णन केले आहे.अद्नानदास या शाहिराने अफझलखान वधावर बहाद्दर पोवाडा रचला आहे.रामचंद्रपंत आमात्य हे अष्टप्रधानातील एक प्रधान.त्यानी "आद्न्यापत्रा"मध्ये महाराजांच्या राज्यव्यवस्थेबद्दल अतिशय योग्य शब्दामध्ये वर्णन केले आहे.
वाचने
10812
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 2
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 3
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 4
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 5
खूप महितीपूर्ण
In reply to अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 5 by सुभाष
हेच म्हणते..
In reply to खूप महितीपूर्ण by चकली
वा!
असेच म्हणतो.
In reply to वा! by प्रमोद देव
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 6
धन्यवाद.
वा!!
सुंदर व महत्वाची माहिती
शोध घेत
In reply to सुंदर व महत्वाची माहिती by चैतन्यकुलकर्णी
सुभाषराव, ऊ
खरेच असा
In reply to सुभाषराव, ऊ by विसोबा खेचर
>>
In reply to खरेच असा by सुभाष
छान माहिती
अभिजीत
In reply to छान माहिती by अभिजीत मोटे
अगदी असेच !
आजची सर्वसामान्य जनताच असामान्य इतिहास निर्माण करील.
In reply to अगदी असेच ! by विटेकर
उत्तम..
विस्तृत
In reply to उत्तम.. by लिखाळ
छान
माझा लिहिण्याचा ऊत्साह अजुनच वाढला
In reply to छान by गणपा
आभार
In reply to छान by गणपा
सुभाषकाका!
अपापसातील मतभेध,भांडण बाजुला ठेऊन एकत्र यायला हवे ना?
In reply to सुभाषकाका! by अनामिका
बाबासहेब
अमोल,
In reply to बाबासहेब by अमोल नागपूरकर
सुंदर लेख
भाषा आणि प्रांत यापलिकडचा युगपुरुष!
शिवराज भुषण