✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एका माणसाचा कट्टा - फुडोग्राफी २०१७ भेट

अ
अनुप देशमुख यांनी
Sun, 07/30/2017 - 10:22  ·  लेख
लेख
डिस्क्लेमर – जास्त फोटो नसल्याने जळजळ होण स्वाभाविक आहे पण आयोजन कर्त्यांच्या नियमात बसत नसल्याने फोटो काढता नाही आले. तरी सुद्धा मिपा चे नाव वापरून जाण्याची खुण म्हणून चार दोन फोटो काढले आहेत ते गोड मानून घ्या आणि जमल तर प्रदर्शनाला जाऊनही या. मिपा, फोटोग्राफी आणि खाद्य अस आवडत त्रिकुट केदारभाऊंच्या पोस्ट मध्ये दिसलं आणि लागलीच फुडोग्राफी इव्हेंट फेबु कॅलेंडर मध्ये टाकून ठेवला. एका उनाड दिवस म्हणून ठरवूनच आज सकाळी उठलो आणि इतर काम उरकून भल्या दुपारी बालगंधर्वच्या गेटवर जाऊन थडकलो. balgandharv सगळीकडे नुसती लगबग चालू होती, मनात आल मिपाचा सिक्रेट कट्टा होतोय कि काय ;-) समोर कळाल कि एका शुभारंभाचा प्रयोग चालू होता. त्याची जंगी तयारी बघून पुढे गेलो आणि तिकीट खिडकीच्या पलीकडे कला दालनाचा बोर्ड दिसला. फुडोग्राफी पहिल्या मजल्यावर अत्यंत आटोपशीर अस प्रदर्शन मांडल होत. प्रदर्शन वीकांत असल्याने निवांत होतोच आत जाताच एक एक फोटो मन लावून बघायला सुरुवात केली आणि सुरु झाला एका अप्रतिम विश्वाचा प्रवास. फोटोग्राफीमधल थोडफार कळत असल्याने प्रत्येक फोटोमागे घेतलेली मेहनत दिसायला लागली. पदार्थाची मांडणी, लाईट, त्याला पूरक अशी पार्श्वभूमी, पदार्थाचा पोत, मूळ पदार्थाच्या बाजूला असलेली सामग्री अहाहा जन्नत ! थोड्या वेळापूर्वी नसलेली भूक जागृत झाल्याचा भास झाला आणि पृथ्वीवर आलो. प्रदर्शन ऐन श्रावणात शाकाहारी मांसाहारी पदार्थ मांडीला मांडी लावून पंगतीत (बोर्डावर) बसलेले बघून मन भरून आल. अच्छे दिन अच्छे दिन ते हेच. नावानुसार क्रम असल्याने पहिल्यांदा फोटो होते अंगद जोशी यांचे. जवळ जवळ एक भिंत व्यापून टाकणारा हा माणूस कमाल फोटो काढतो. फाईन डाइन कुझीनचे फोटो निव्वळ लाजवाब. रेलिंग असल्याने नाहीतर हातात घेऊन खाऊन टाकू कि काय असं वाटत होत. बर पदार्थ हि असे कि क्या कहने. चोकलेट, बिस्कीट, पुडिंग, अहाहा! थोड जवळून भरली वांगी आणि पातळ खोबर्याच्या कापाने केलेली सजावट, ठेल्यावरची पानांची आकर्षक मांडणी, चहाच्या पेल्यावर ठेवलेली भजी, कल्याण भेळची पाणीपुरी शेवपुरी, महादेव पॅटीसवाल्याचे कढई भरून गुलाबजाम इंडियाना ग्रील ची मिसळ, मटन धन्सक अशा विविध पदार्थांची लज्जत चाखत चाखत आणि आभासी पोट भरत पुढे आलो ते थेट केदार्भौंच्या फोटोसमोर. ज्जे बात मानल केदार भाऊ. हार्दिक अभिनंदन. हा घ्या फोटो. केदार भाऊंचा फोटो काही फोटोंच्याच्या खाली मूळ छायाचित्रकारांची नाव लावण्याच काम चालू असल्याने नक्की केदार यांचे फोटो किती हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. आशा आहे आज काम पूर्ण झाल असेल. पुढे फिरताना आयोजकांपैकी मंदार कोल्हापुरे या इसमाशी ओळख झाली. फ्लाय सोलो कंपनीचा हा मालक. हि कंपनी टी शर्ट बनवते. मूळ सिविल इंजिनिअर असून छंद म्हणून फोटोग्राफी करतो. लागलीच त्याचाही फोटो घेतला आणि आपसूक अजून काही फोटो काढायची परवानगी मिळवली आणि पुढे सरकलो. आयोजक आता जवळपास सर्व फोटो दोनदा पाहून झाल्याने मूळ खादाडीच्या उद्देशाकडे मोर्चा वळवला. आमच्याच गावचे मोदी पेढेवाल्यांच्या स्टॉलवर पेढ्यांची फ्री सॅम्पल चाखले आणि एक नवीनच पदार्थ बघितला. रातराणीची बर्फी. पण रातराणी आणि साप यांचा संबंध असल्याने हात आखडता घेतला. पुढे मालपाणी यांचे क्रीमरोल, बाकरवडी ठेवले होते पण खाण्याची इच्छा संपल्याने इलुसा टुकडा खाऊन माझी भेट संपवली. पेढा आणि बर्फी जाता जाता प्रथेप्रमाणे कॅफे गुडलकला भेट दिली आणि दारातच हि गर्दी पाहून थबकलो. थोडे अपमान पदरात पाडून घेत चहा आणि बनमस्का मागवला आणि आमचेही चार आणे म्हणून फोटोग्राफी ट्राय केली. गुडलक बन मस्का आणि चहा जाता जाता वाटतंय कि मिपाकरांना अचानक कट्टा करण्यासाठी ब्येष्ट ठिकाण आहे. पुण्यातल्या मिपाकारांनी जरूर लाभ घ्यावा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
आस्वाद
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
11743 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

छान लिहिलंय

पैसा
Sun, 07/30/2017 - 11:34 नवीन
मला फोटो दिसत नाहीयेत पण! :(
  • Log in or register to post comments

धन्यवाद पैसा ताई

अनुप देशमुख
Mon, 07/31/2017 - 06:55 नवीन
मला फोटो दिसत आहेत, आणि बरीच काथ्याकूट करून टाकलेत फोटो. सं मं मदत करेल काय?
  • Log in or register to post comments

फक्त पहिला फोटो दिसत आहे. इतर

एस
Mon, 07/31/2017 - 12:31 नवीन
फक्त पहिला फोटो दिसत आहे. इतर फोटोंना तुम्ही पब्लिक शेअर केलेलं नाहीये बहुतेक. गुगल फोटोंचा हा प्रॉब्लेम नेहमीचाच आहे. दुसऱ्या ब्राऊजरमधून गुगल मधून साइन आउट करून फोटो दिसायला पाहिजेत. दिसत नसतील तर ते पब्लिक शेअर नाहीयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप देशमुख

ओक्के

अनुप देशमुख
Mon, 07/31/2017 - 12:49 नवीन
प्रयत्न करतोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

धन्यवाद..

केडी
Mon, 07/31/2017 - 11:09 नवीन
प्रदर्शनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद. मला देखील तुमची लेखातले फोटो दिसत नाहीयेत. माझ्या ह्या पाककृतीचा फोटो प्रदर्शनात होता. कोकोनट बियर ब्याटर श्रिम्प/प्रांन्स
  • Log in or register to post comments

फक्त पहिला फोटो दिसतोय.

सूड
Mon, 07/31/2017 - 18:34 नवीन
फक्त पहिला फोटो दिसतोय.
  • Log in or register to post comments

मलाही.

यशोधरा
Tue, 08/01/2017 - 18:10 नवीन
मलाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

कालच जाऊन आले प्रदर्शनाला.

अजया
Mon, 07/31/2017 - 19:32 नवीन
कालच जाऊन आले प्रदर्शनाला. छानच होते. सर्व फोटो बघताना मिपावर सुंदर फुड फोटो टाकून पाकृ पेश करणाऱ्या सानिकाची अतिशय आठवण येत होती. तिचे एकसे एक फोटो या प्रदर्शनात बघायला आवडले असते. * प्रदर्शनकर्त्यांचे फोटो वर्कशाॅप विकांताला असणार आहे. * तिथे मस्त मिसळ आणि मॅड ओव्हर डोनट्सचे डिस्काउंट कुपन्स अगदी आग्रहाने आणुन दिले! * मोदींची पान फ्लेव्हर मिठाई छान होती!
  • Log in or register to post comments

अरे हो! केडीचा हा फोटो पाहिला

अजया
Mon, 07/31/2017 - 19:34 नवीन
अरे हो! केडीचा हा फोटो पाहिला पण तो केडीचा आहे लक्षात आले नाही तिथे. हा धागा आधी वाचला असता तर आधी मिपावर पाहिलाय हा फोटो म्हणून लेकासमोर मिरवले असते ;)
  • Log in or register to post comments

हुश्श . हे घ्या फोटो.

अनुप देशमुख
Mon, 07/31/2017 - 22:55 नवीन
Image removed. प्रदर्शन १ Image removed. प्रदर्शन २ Image removed. अंगद जोशी यांचे फोटो Image removed. केदार भाऊंचा फोटो Image removed. आयोजक मंदार आणि त्याचे सहकारी Image removed. फ्री फ्री Image removed. बन मस्का - कॅफे गुडलक Image removed.
  • Log in or register to post comments

हे पण

रुस्तम
Mon, 07/31/2017 - 23:58 नवीन
नाही दिसत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप देशमुख

हुश्श .

चांदणे संदीप
Tue, 08/01/2017 - 18:54 नवीन
हुश्श . हे पण दिसले नाहीत. (तेवढंच आजच इनो उद्यावर!) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप देशमुख

असे करून पहा...

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 08/01/2017 - 21:32 नवीन
असे करून पहा... १. प्रथम ज्या अल्बममध्ये फोटो आहेत त्याला पब्लिक अ‍ॅक्सेस द्या. २. नंतर फोटो पूर्ण आकारात उघडून (थंबनेल नव्हे) मग मिळणारा कोड तो फोटो इथे टाकण्यासाठी वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप देशमुख

छान.. इथे शेअर केल्याबद्दल

रुपी
Mon, 07/31/2017 - 23:28 नवीन
छान.. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत

पिलीयन रायडर
Tue, 08/01/2017 - 01:28 नवीन
बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत नाही. प्रतिसादातलेही.
  • Log in or register to post comments

धागा अप्रकाशित

अनुप देशमुख
Tue, 08/01/2017 - 07:29 नवीन
करून परत प्रकाशित करता येईल का?
  • Log in or register to post comments

तुम्ही फोटो इथे प्रतिसादात टाका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 08/01/2017 - 07:55 नवीन
मूळ धाग्यात ते फोटो संपादक टाकतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप देशमुख

धन्यवाद डॉकटर साहेब

अनुप देशमुख
Tue, 08/01/2017 - 17:41 नवीन
परत प्रतिसाद देतो
  • Log in or register to post comments

अनुप देशमुख, पहिला फोटो 530

कंजूस
Tue, 08/01/2017 - 18:54 नवीन
अनुप देशमुख, पहिला फोटो 530 kBचा आहे म्हणून दिसतो आहे. परंतू इतर फोटोंच्या लिंक्स थंबनेलच्या आहेत! ( 1 ,1.5kB size !)
  • Log in or register to post comments

फक्त पहीला फोटो दिसतो

मराठी_माणूस
Tue, 08/01/2017 - 20:37 नवीन
फक्त पहीला फोटो दिसतो
  • Log in or register to post comments

आधी फोटो दिसत होते.

उदय
Tue, 08/01/2017 - 21:31 नवीन
एकदम सुरुवातीला हा धागा टाकला होता तेव्हा सगळे फोटो दिसत होते, मी स्वतः बघितले आहेत. 'फ्लाय सोलो'चा टी-शर्ट घातलेला + तुमचा फोटो आणि चहा-बन चा फोटो आठवतोय.
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाहीयेत.

प्रणित
गुरुवार, 08/03/2017 - 03:40 नवीन
बालगंधर्वचा सोडुन एकही दिसत नाही.
  • Log in or register to post comments

प्रतिसादातील फोटो,

नीलमोहर
गुरुवार, 08/03/2017 - 12:54 नवीन
प्रतिसादातील फोटो आधी दिसत होते. त्यांची लिंक घेऊन धाग्यात टाकणारही होते, पण ते परत दिसेनासे झाले. इमेजेसना पब्लिक अ‍ॅक्सेस दिलायत का परत तपासून पहा. फोटोंच्या लिंक्स सा.सं आयडीला व्यनि अथवा खरडीने पाठवा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा