Skip to main content

कार्यानुभवाचा तास

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 01/08/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच घंटानाद, नेहमीचे वर्तमानपत्र, कचरा, दुध हे घंटानाद झाल्यावर चा हा चौथा. स्वनिर्मित नाष्ट्याचा आस्वाद आई सोबत घेत होतो, थोड्याशा नाराजीनेच दरवाजा उघडला. दारात शेजारच्या घरातील नवी सून उभी, “अंकल आपको सिलेंडर चेंज करने आता है क्या” हां आता है, आता हुं असे म्हणून आत वळलो टी शर्ट अडकवून गेलो. सिलेंडर बदलला, घरात फक्त नवी जोडी. सासूबाई, स्मिताची मैत्रीण बाहेरगावी गेलेली. मुलगा व सून दोन्ही ही छोटीशी कृती कशी करावी याबाबत पूर्ण अशिक्षित. दुसरा सिलेंडर सील सकट होता बाजूला , म्हणजे प्रयत्न ही केलेला नव्हता. मोबाईल, गाड्या, नवी नवी उपकरणे यात भलतीच स्मार्ट असलेली ही पिढी. मन सहज मागे गेले. शाळेतले दिवस आठवले व कार्यानुभवाचा तास घेणारे राजवाडकर सर आठवले. पोस्टात जाऊन मनी ओर्डर कशी करावी, अर्ज कसा भरावा याचे प्रशिक्षण सर्व वर्गाला पोस्ट कार्यालयात नेऊन दिलेलं. अर्ज चुकीचा भरला म्हणून ओरडा ही खाल्लेला. त्याकाळी टेलिफोन ही नवीनच. त्या कार्यालयात नेऊन फोन कसा करावा याचे प्रात्यक्षिक ही दाखवलेलं. गावात मोजके फोन, काळा जाड फोन उचलायचा कि पलीकडून टेलिफोन कर्मचार्याचा halo ऐकू आला कि गावच नाव सांगून क्रमांक सांगायचा. मग तो जोडून देणार, दोघांतल बोलण त्या कर्मचार्याला ही ऐकू जाऊ शकायच हे सर्व करून घेतलेलं शाळेशी बालक व पालक म्हणूनही संबंध संपून बरीच वर्ष झाली. आता असा तास असतो कि नाही ते ही माहित नाही, व असला तरी सध्याचा अभ्यासक्रम काय आहे ते ही माहित नाही, आजच्या स्मार्ट पिढीला काही शिकवण हे ही एक आव्हानच असणार बहुधा . आमच्या कार्यानुभव तासाला, वर्तमान पत्र वाचावे, आवडत्या विषयाची कात्रण काढावीत, कात्रण वही ठेवावी अशी एक नाही अनेक कामे शाळेत या तासालाच करायची माहिती झालेली. बाकी सर्व बाबतीत गुगल बाबा वर अवलंबित रहायची सवय आता सर्वांनाच होउ लागल्ये, सहज बघितलं तर हे द्यान ही बाबा कडे व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध आहे, गुगल बाबा कि जय हो. भटक्या खेडवाला.

वाचने 4767
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आम्हाल स्टोव चि दुरुस्ती होता. कार्यानुभवाच्या तासाला एकदा सर फरफरणारा बरनर स्टोव, पिन काकडा, बाटलीभर रॉकेल, आणी पाना घेउन वर्गात आले होते. त्यानंतर पुढचा अर्धा तास वर्गात धुरच होता. आम्ही मुलं उगाचच खोकायची एक्टींग करत राहीलो. मग पुढचा सगळा कार्यानुभव चित्रातुनच घ्यावा लागला.

In reply to by आदूबाळ

स्टोव्ह मध्ये केरोसिन भरतात. त्याला पंप मारला की प्रेशरने ते एका सूक्ष्म छिद्रातून बाहेर येते जिथे ज्योत लावली की स्टोव्ह पेटतो. थोड्या वेळाने तिथे काजळी जमून त्या छिद्रात जमा होऊ लागते. त्या छिद्राचा पॅसेज मोकळा करण्यासाठी पिनचा वापर करतात. म्हणजे हार्ट अँजिओप्लॅस्टी करताना कॅथेटर वापरतात ना, काहीसे तसेच.

In reply to by उदय

+१ आमच्या कॉलेजसमोरचा चहावाला ही 'स्टोव ची पिन' एरवी उलटी बर्नरजवळ तापलेली ठेवून दुधाच्या पिशवीवर अश्या सराईतपणे फिरवीत असे, की पिशवी पूर्ण उघडून दूध चहाच्या पातेल्यात मोकळे होई. हा उत्सव पहाण्यासारखा असे. :)

ज्या घरांमध्ये कामाला माणसं असतात त्यांच्याकडे ह्यॅ गोष्टी घडतातच ..... पण वेळ पडली तर कोणाकडून हे काम शिकून घेऊन केलं तर चांगलच !!

लेख काही पटला नाही. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीत प्राविण्य मिळवलेच पाहिजे असे काही नाही. आठवडी बाजार, सामाजिक बाबींचा सर्व्हे आणि इतर तत्सम कार्य उद्योग आताच्या शाळा पण राबवतात.

In reply to by विशुमित

चा प्रश्नच नाही. साध्या छोट्या गोष्टी सुद्धा माहीत नसतात , प्रश्न तो आहे.

In reply to by विशुमित

खरतर हे सर्व शाळेत शिकवावे अशी अपेक्षा ठेवणे ही बरोबर नाही आता ,पुर्वी अशिक्षित आई बाबांची मूले शाळेत जात असत , आता सुशिक्षित आई बाबांची जातात .. जीवन सुकर व्हावे या साठी पक्षी , प्राणी जसे आपल्या पिल्लाना आवश्यक गोष्टी शिकवतात (काही प्रजाती ) तसे जबाबदार पालकत्व म्हणून मानवाने ते शिकवावे आपल्या पिल्लाना .. इतर बाबतीत प्रगत देशांचे अनुकरण करताना आपली पुढील पिढी , अशा अनेक गोष्टी स्वतः करण्याच्या , त्या प्रगत देशातील जनतेचे अनुकरण करत नाहीत .. याच लेखावर मला दुसऱ्या ठिकाणी आलेली एक प्रतिक्रिया " सीए च्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या मुलीने चप्पल तुटली रस्त्यात तेव्हा आई ला विचारले आई चप्पल तुटल्ये आता काय करु ..?" अशाच एक दोन आल्या .. सर्व दोष त्या नवीन जोडी चाच नाही .. त्याना हे योग्य वयात अजिबात न करु न देणाऱ्या पालकांचा ही आहे .म्हणूनच एक बोट आपल्याकडे ...

कार्यानुभावाच्या त्रासाला हे शिकवतात? आम्हाला घोटीव पेपरच्या निरूपयोगी वस्तु, काही तरी लोकरीचं वगैरे शिकवायचे. म्हणजे ते ही आवश्यक आहे पण सोबतच अशा जीवनावश्यक गोष्टी सुद्धा शिकवायला हरकत नव्हती. मलाही गॅस लावता येत नाही. म्हणजे मी प्रयत्न केलाय, पण मला नेहमी असं वाटतं की मी चुकीचा लावला आणि आता तो लीक होतोय. खरंच गॅस लावणे, गाडीचे चाक बदलणे, गाडी मेन स्टॅण्डवर लावणे, बल्ब बदलणे, ट्युब लावणे, बॅंकेत चेक भरणे इ साध्या गोष्टी सगळ्यांना यायलाच हव्यात.

In reply to by पिलीयन रायडर

अगदी सहमत ........ मी लग्न झाल्यावर बायकोला सांगितल तुला जेवण ( स्वयंपाक ) छान जमला नाही तरी चालेल मला , मी मदत करेन वेळ पडली कि पण , सिलेंडर वाला आला कि त्याच्या कडून सिलेंडर नीट तपासून घेऊन , रिकामा सिलेंडर बाहेर आणून देता आला पाहिजे ,( त्या साठीच्या सर्व ट्रिक्स आणि सोपे उपाय तिला शिकवले ) त्या माणसाला सिलेंडर लावे पर्यंत थांबवून , शिवाय त्याच माणसाकडून बरोबर जोडला याची खात्री करून घेता आली पाहिजे किचन वर मालकी गाजवायची असेल तर किचन मधील ज्या ज्या गोष्टी जुन्या / नवीन तंत्रज्ञाना वर आधारित आहेत त्याची संपूर्ण माहिती असायलाच हवी ....तरच मी तुला किचन क़्विन म्हणेन वर सांगितल्या प्रमाणे बायका घरात एकट्या असताना जर वरील कोणतेही अडचणी आल्या तर निदान प्राथमिक माहिती असेल तर त्या डेरिंग करून निदान त्या सोप्या करू शकतात / त्यातून मार्ग काढू शकतात ........हे पुरुषांचे काम आहे असे म्हणून चालत नाही.... कारण फालतू कामासाठी पुरुषांवर अवलंबून रहावे लागते आणि मग विनाकारण हातातील कामास उशीर होतो .. गाडी फक्त भरधाव चालवणे म्हणजे झाले असे नाही .........गाडीब्द्द्लची जुजबी माहिती हि असायलाच हवी ..........अचानक रस्त्यात गाडी बंद पडली तर काही बायकांना आकाश कोसळले असे वाटू लागते .... तेव्हा प्रथम काय चेक पोइंट आहेत त्याची एक यादी कागदावर लिहून ति डिकी मध्ये असायला हवीच .... एकदा ते सगळे पोइंत्स स्वतः चेक केले आणि तरीही प्रोब्लेम सोल्व नाही झाला तर .... त्याच कागदावर सर्विस सेंटर / नेहमीचा मेकानिक चा फोन नंबर असायला हवा .....( बरेच वेळेस मी पाहतो रस्त्यावर गाडी बंद झाली कि बायका अंगात आल्यासारखं करतात ..... त्यात उन डोक्यावर असेल तर काय विचारू नका .... स्मार्ट फोन ची स्क्रीन दिसत नाही ( कारण डोळ्यावरचा काला चष्मा काढायचं विसरतात ) शिवाय रस्त्यावरची प्या.... प्या.... पु.... पू..... चालूच असते , अशा वेळी सुपर कुल राहून सर्वात आधी इंडिकेटर देऊन गाडी बाजूला करून सावली मध्ये उभी करावी आणि कम्फर्टेबल मोड मध्ये दिक्कीतली यादी काढून टिक करत जावे. या सर्व गोष्टी अवघड नसतात पण प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्या समोर केले नाही तर त्या बद्दल ची कल्पना नसते ..... म्हणून कार्यानुभव चा तास हा प्रत्येक घरात घेणे अतिशय गरजेचे आहे.

आम्ही कार्यानुभव च्या तासाला भूगोल, भूमिती असल्या गोष्टी शिकलो कायम. नंतर कधीतरी मुल्यशिक्षण वगैरे प्रकार सुरू झाले तेव्हा त्या तासाला मराठी, संस्कृत इत्यादी भाषा शिकवल्या गेल्या. :)

लेखाशी सहमत. गॅस न बदलता येणार्‍या बर्‍याच जणी पाहिल्यात. तसेच घरचा इलेक्ट्रिक चा फ्युज ही बदलता आला पाहिजे. म्हणून कार्यानुभव चा तास हा प्रत्येक घरात घेणे अतिशय गरजेचे आहे. > +१०००

यात झुरळ पाल दिसल्यावर फेफरे आल्यागत उड्या न मारता शांतपणे त्या कीटकांना कसे हुसकावून लावायचे ह्याचे शिक्षण पहिले दिले पाहिजे.

In reply to by धर्मराजमुटके

गेलाबाजार खेकडा दिसला की न बिचकता त्याचं कालवण करायचं कसब अंगी बाळगलेलं हवं. -गा.पै.

ज्यांना बर्याचदा लहान मूल घेऊन एकटे राहायची वेळ येते तेव्हा गरज पडल्यावर आपोआप ही सगळी कामं कधीनाकधी करायची वेळ येऊन यायला लागतात असा अनुभव आहे! गॅस कधीही जाऊ शकतो. तुम्ही सोसायटीत राहत असाल तर कोणाला बोलावता येईल. आजुबाजुला अंतर ठेवुन बंगले आहेत अशा ठिकाणी राहिले की पहिल्या वेळच्या गडबडीनंतर आपोआप किंवा नाईलाजाने शिकले जातेच आणि जावे. व्यवस्थित गॅसवाल्याला बोलावून शिकुन घ्यावे हे उत्तम. ते लिकेज तपासायलाही शिकवतात. तसेच फ्युज ट्यूब चाक आदि गोष्टी. त्या त्या विषयातल्या एक्सपर्टकडून शिकुन घेतले प्रसंग आल्यावर की निदान पुढे अडत नाही हे गेल्या सात आठ वर्षात ज्ञान प्राप्त झाले आहे. हाच तो कार्यानुभव म्हणायचा! बाकी शाळेत कार्यानुभव म्हणून कुंडीतील लागवड असा विषय होता. तेव्हा प्लॅस्टिकच्या डब्यात गाजराला आलेला तुरा न्यायचा असे. एवढाच प्रकार होता :)