सकाळीच घंटानाद, नेहमीचे वर्तमानपत्र, कचरा, दुध हे घंटानाद झाल्यावर चा हा चौथा. स्वनिर्मित नाष्ट्याचा आस्वाद आई सोबत घेत होतो, थोड्याशा नाराजीनेच दरवाजा उघडला. दारात शेजारच्या घरातील नवी सून उभी, “अंकल आपको सिलेंडर चेंज करने आता है क्या” हां आता है, आता हुं असे म्हणून आत वळलो टी शर्ट अडकवून गेलो. सिलेंडर बदलला, घरात फक्त नवी जोडी. सासूबाई, स्मिताची मैत्रीण बाहेरगावी गेलेली.
मुलगा व सून दोन्ही ही छोटीशी कृती कशी करावी याबाबत पूर्ण अशिक्षित. दुसरा सिलेंडर सील सकट होता बाजूला , म्हणजे प्रयत्न ही केलेला नव्हता. मोबाईल, गाड्या, नवी नवी उपकरणे यात भलतीच स्मार्ट असलेली ही पिढी.
मन सहज मागे गेले. शाळेतले दिवस आठवले व कार्यानुभवाचा तास घेणारे राजवाडकर सर आठवले. पोस्टात जाऊन मनी ओर्डर कशी करावी, अर्ज कसा भरावा याचे प्रशिक्षण सर्व वर्गाला पोस्ट कार्यालयात नेऊन दिलेलं.
अर्ज चुकीचा भरला म्हणून ओरडा ही खाल्लेला. त्याकाळी टेलिफोन ही नवीनच. त्या कार्यालयात नेऊन फोन कसा करावा याचे प्रात्यक्षिक ही दाखवलेलं. गावात मोजके फोन, काळा जाड फोन उचलायचा कि पलीकडून टेलिफोन कर्मचार्याचा halo ऐकू आला कि गावच नाव सांगून क्रमांक सांगायचा. मग तो जोडून देणार, दोघांतल बोलण त्या कर्मचार्याला ही ऐकू जाऊ शकायच हे सर्व करून घेतलेलं
शाळेशी बालक व पालक म्हणूनही संबंध संपून बरीच वर्ष झाली. आता असा तास असतो कि नाही ते ही माहित नाही, व असला तरी सध्याचा अभ्यासक्रम काय आहे ते ही माहित नाही, आजच्या स्मार्ट पिढीला काही शिकवण हे ही एक आव्हानच असणार बहुधा .
आमच्या कार्यानुभव तासाला, वर्तमान पत्र वाचावे, आवडत्या विषयाची कात्रण काढावीत, कात्रण वही ठेवावी अशी एक नाही अनेक कामे शाळेत या तासालाच करायची माहिती झालेली.
बाकी सर्व बाबतीत गुगल बाबा वर अवलंबित रहायची सवय आता सर्वांनाच होउ लागल्ये, सहज बघितलं तर हे द्यान ही बाबा कडे व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध आहे, गुगल बाबा कि जय हो.
भटक्या खेडवाला.
वर्गीकरण
वाचने
4754
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्टोव ची दुरुस्ती
एक शंका आहे - स्टोव्हला पिन
In reply to स्टोव ची दुरुस्ती by रघुनाथ.केरकर
स्टोव्ह मध्ये केरोसिन भरतात.
In reply to एक शंका आहे - स्टोव्हला पिन by आदूबाळ
+१
In reply to स्टोव्ह मध्ये केरोसिन भरतात. by उदय
मस्त मांडलय हो....
right new generation does not
लेख काही पटला नाही.
ह्यात प्राविण्य
In reply to लेख काही पटला नाही. by विशुमित
एक बोट आपल्याकडे ही
In reply to लेख काही पटला नाही. by विशुमित
कार्यानुभावाच्या त्रासाला हे
खरंच गॅस लावणे, गाडीचे चाक बदलणे.....
In reply to कार्यानुभावाच्या त्रासाला हे by पिलीयन रायडर
आम्ही कार्यानुभव च्या तासाला
लेखाशी सहमत. गॅस न बदलता
चांगला लेख !
गेलाबाजार ....
In reply to चांगला लेख ! by धर्मराजमुटके
ज्यांना बर्याचदा लहान मूल