Skip to main content

एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३

लेखक रेवती यांनी रविवार, 02/04/2017 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अ‍ॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील. धन्यवाद.

वाचने 49277
प्रतिक्रिया 177

प्रतिक्रिया

दोन वांगी, एक राजम्याचं पाकिट, म्यागीचा पास्ता. त्यात राजमे भिजत घालायला विसरलो आहे. सुदैवाने म्यागी आहे. उद्या वांग्याची थालीपीटं होतील. रैवारी दिव्यांच्या अवसेला आणलेला आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये आहे. आता तो संपवायचा म्हणजे उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. बरं या आठवड्यात कोणी मित्रमंडळ पण येणार नाहीये. संपवता आला असता. सध्या व्हॅक्क्यूम क्लीनरच्या शोधात आहे. बघू कस्काय जमतोय तो.

In reply to by सूड

आम्रखंडाचा डबा फ्रीझर मध्ये आहे. आता तो संपवायचा म्हणजे उगाच मूठभर मास चढल्यासारखं वाटतं. बरं या आठवड्यात कोणी मित्रमंडळ पण येणार नाहीये. संपवता आला असता. सध्या व्हॅक्क्यूम क्लीनरच्या शोधात आहे.
येऊ काय क्लीनर घेऊन एक दिवसापुरता. तू क्लीनींग आटप, मी डबा संपवतो, भेटणेही होईल.

कॅप्टन कूक मीठ एक किलो आणले. टोमॅटोचा भाव विचारला मग पाव किलो हिरवी वांगी आणि भारंगीची फुले घेतली. इंद्रायणी तांदूळ तुकडा 32 रुपये किलो हा भाव बरोबर आहे का? माहिती नसल्याने घेतले नाहीत.

In reply to by दशानन

उद्या आणते. रत्नाग्री भयंकर महागडे शहर आहे, आणि इंद्रायणी तांदूळ इकडे होत नाही त्यामुळे दर माहीत नव्हते. अर्थात तांदूळ अस्सल इंद्रायणी असावेत असे समजून घेईन. साध्या तांदुळावर बासमतीचा वास येणारे गवत टाकून फसवतात असे ऐकिवात आहे. तसेच बेळगावातून येणाऱ्या एका दुकानदाराने पूर्वी काहीवेळा आपल्याकडे होणारा बासमतीसारखा वास येणारा दुसऱ्या कोणत्यातरी जातीचा तांदूळ (खरे सांगूनच) बराच स्वस्त दिला होता. इंद्रायणी तांदुळाच्या बाबत असे प्रकार कधी ऐकले नाहीत.

In reply to by पैसा

होय, हा भाव बरोबर आहे. म्हणजे चुकिचा असल्यास मलाही फसवले आहे म्हणता येईल. ;) पण मिपाकरांनी इंद्रायणी भात शिजल्यानंतर दरवळणार्‍या वासाचं जे वर्णन केलय ते काही लागू पडलं नाही. मग दुसरीकडे जाऊन तपासले तर तांदूळ दिसायला तसाच होता. पुन्हा भात करून पाहिला. पार नाक भातात खुपसून पाहिले पण कसलाही वास आला नाही.

In reply to by दशानन

हे असलं अर्धवट बोलू नकोस. नक्की कुठे फशिवलय ते सांग. दोन्ही दुकानात तांदूळ दिसायला सारखाच होता. दोन्ही भातांचा शिजल्यावर वास येत नव्हता. लहान दुकानात फसवले की काय असे वाटले म्हणून मोअरमध्ये गेले. म्हणजे सग्ळीकडे फसवतात का?

In reply to by रेवती

५० रुपये भाव आहे सध्या आणि वासाचं म्हणाल तर मला हि कधी आला नाही त्या भाताचा वास

In reply to by रेवती

इंद्रायणीच्या बाबतीत मीदेखील सहमत आहे. आम्ही पार राजगडाच्या पायथ्याशी ज्यांच्याकडे पिकतो त्यांच्या घरातून विकत घेतला होता, अजिबात काही दरवळ वैगरे आला नाही. भाताच्या खाचरात मात्र घमघमाट होता. आंबेमोहराच्या तोडीचा भात मिळणे आहे अजून.

In reply to by आदूबाळ

नाही हो, सर्दी कुठली, पण किलोभर आणलेला प्रकार इडली करून वगैरे खपवला.

In reply to by रेवती

इंद्रायणी भाताचा वास चांगला येतो. आंबेमोहोर सारखा. इथे मागे चर्चा वाचूनच तांदुळ घेतले. आधी 32 वाले 30 किलो घेतले. आता 35 वाले 30 किलो घेतले. आता परत हाच तांदुळ घ्यायचा विचार आहे.

In reply to by पैसा

इंद्रायणी तांदूळ तुकडा 32 रुपये किलो हा भाव बरोबर आहे का?
प्रचंड स्वस्त आहे.

In reply to by पैसा

मागे कुणी मिपाकराने लिहिले होते ना त्यांच्याकडे इंद्रायणी तांदूळ होतो म्हणून?

In reply to by रुपी

मी!! माझ्याकडे मित्राच्या शेतातुन येतो. भाव ३२ च्या आसपासच असेल. आणि त्याचा शिजल्यावर सुंदर वास दरवळतो.

In reply to by पिलीयन रायडर

मला आठवत होता तो हा अजून एक प्रतिसाद सापडला.. सध्या ते मिपावर येतात की नाही माहीत नाही. पण तो धागाही मस्त आहे :)

In reply to by रुपी

अगदी सत्यवचन आहे ते! मऊ गुरगुट्या भात होतो तो. जगात तसला सुंदर भात नाही. शेतातुन मिळत असेल तर लगेच घ्यावा.

रुंबा नामक अ‍ॅटोमॅटिक फिरणारा वॅक्युम क्लिनर कोणी वापरला आहे काय? उपयोगी आहे का हा प्रकार?

मी वापरलाय. तसा सोयीचा आहे पण कानाकोपर्‍यांमधली धूळ साफ करायला त्याचा फारसा उपयोग नाही. पण मोठी मोकळी जागा असेल तर रूंबा आपले काम व्यवस्थीत करतं. अडीअडचणीला उपयोगी आहे पण रोजचे क्लीनिंग मला तरी नीट नाही जमलं. अर्थात रूंबा मी शेवटचे ट्राय केले त्यालाही आठ दहा वर्षे झाली आहेत. आता त्याचं तंत्रज्ञान अजुन यूज़र फ्रेण्डली झाले असावे अशी आशा आहे.

रुम्बा वापरतिये त्याला तीन वर्षे होत आली. फार्फार मदत करतोय. उदा. पद्मावथी म्हणतेय तसा अगदी कोपर्‍यातला केर काढला जात नाही म्हणून तेवढे झाडून घ्यायचे, म्हणजे मध्ये आणून ठेवायचे. जी खोली साफ करून हविये त्यातील वायरी, अध्येमध्ये पडलेल्या वस्तू उचलायच्या. जसे, मुलांची खेळणी, बॉल्स वगैरे. व्हर्चुअल वॉल स्विच ऑन करून ठेवायची म्हणजे त्यापुढे तो जात नाही. त्याचे डॉकिंग स्टेशन त्या खोलीतच नेऊन ठेवायचे म्हणजे डिस्चार्ज होण्याची वेळ येतात आपला आपण चार्ज होईल व आपण बाहेर जायचे असल्यात चालेल. स्वच्छतेसाठी त्यात पर्याय उपलब्ध आहेत. उदा. स्पॉट क्लिनिंग, अठवड्याचे वार, वेळेनुसार सफाई करणे. जे मी करत नाही. एकदा तो बेडखाली जाऊन अडकला व सूचना देऊन गप्प बसला. मी घरात नव्हते. काही नुकसान झाले नाही. काल एक कॉर्ड उचलायला विसरले तर त्यात गुंतून पडला. आणखी एक प्रकार म्हणजे गालीच्यावर जर खूप गडद रंग असेल तर त्याला तो टाळून जायला बघतो. त्याला ते होल आहे असे वाटते. माझ्याकडील गालिच्यावर जिथे काळे त्रिकोण आहेत ते काही दिवसांनी मळाकट दिसू लागले. तेवढेच हँडी क्लिनरने साफ करावे लागतात. एका मैत्रिणीला तिचा गडद गालिचा बदलावा लागला. माझ्याकडील मॉडेल नव्यातले नाही. यंत्राखाली ब्रिसल्स आहेत व एक रबरी रोटर आहे. यंत्राच्या सर्कम्फरन्सला एक ब्रश आहे. नव्या सिरीजचा मैत्रिणीने घेतल्यावर पाहिला त्याला ब्रिसल्स नाहीतच. दोन रबरी रोटर्स आहेत. त्यात केस अडकत नाहीत. माझ्याकडील रुम्बाचे ब्रिसल्स दर वापरानंतर साफ करावे लागतात. पण मला या यंत्राचा खूप उपयोग होतो. पूर्वी मी त्याच्या मागेमागे जाऊन सफाई करतोय का हे पहात असे. कालांतराने लक्षात आलेय की तो आपल्याला वाटतो त्यापेक्षा जास्तवेळ फिरवावा लागतो. मग व्हर्च्युअल वॉल लावून दुर्लक्ष करते. रुम्बाचे केर काढण्याचे काम होताच आपण मॉप करून घेतल्यास झटकन काम होते. पण रुम्बाचा जमीन पुसणारा प्रकार आहे तोही मैत्रिण वापरते. तिला आवडलाय. घरात कमी सामान असल्यास खूप सोयिचे पडते.

इंद्रायणी भात मऊ चिकटपणा आणि चवीसाठी लोकप्रिय आहे. घमघमाटासाठी नव्हे. त्याचा वास तसा मंदच असतो. वर चर्चेत बहुधा एकाच पट्ट्यात होणार्या जिरगा, घनसाळ आणि इंद्रायणी यांविषयक मिसळण झालेली दिसते.

In reply to by गवि

मी कधी अस्सल आंबेमोहराचा वास घेतलेला नाही. तेव्हा कदाचित त्या तुलनेत हा मंद वाटत असावा. पण त्याचा अगदी कुकर झाल्या झाल्या कळेल असा वास दरवळतो खरा.

In reply to by पिलीयन रायडर

आंबेमोहोर ला एकदम सुपर्ब वास असतो पण 95 रुपये किलोचे तांदूळ घेऊन रोजचा भात घशाखाली कसा उतरेल!

काळेवाडी डीमार्ट मधून 43.5 ₹ किलो दराने इंद्रायणी तांदूळ आणला. कच्चा आणि शिजवलेला दोनही चा मस्त वास येतो. कुकर लावला कि घरभर वास दरवळतो. आंबेमोहोर आणि बासमती दोन्ही पचायला फार जड असतात. रोज वापरला इंद्रायणी किंवा कोलम चांगला. कोलम बीनवासाचा. एन्जॉय मुरमुरा आणला. एकवर एक फ्री 45 ₹ किलो.

In reply to by एमी

वरती इतकेजण इंद्रायणी तांदळाचा वास येत नाही म्हणतायत.. मग आम्ही डीमार्टमधून आणतो काय असतं?? इंद्रायणी नावानेच विकताय्त ते....

"Yonex Sunr 1004-PRM Badminton Kit Bag (Black)" ही किट बॅग खरेदी केली. एक रॅकेट, शूज, पाण्याची बाटली, एक ड्रेस आणि नॅपकिन इतके सामान आरामात बसते. मोबाईल आणि पाकिटासाठी वेगळा कप्पा आहे. . . . दोन किंवा तीन रॅकेट ठेवायच्या असतील तर मोठी बॅग घ्यावी लागेल.

फिट्बीट चार्ज -२, फिलाचे खेळजोडे घेतले. https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSMRPoz68oINnJYH4u… https://www.google.co.in/imgres?imgurl=http%3A%2F%2Fecx.images-amazon.c… दादरहुन मराठी बुके ८/१० आणी बीसीटी वरुन २/३ बुके.

In reply to by इरसाल

फिटबिट चार्ज २ घेताना नक्की काय काय बघितले..? आणि MI बँड 2 पेक्षा काय वेगळे आहे..? (तुमच्यासाठी "चेहरे" घेतले आहे.. या आठवड्यात हातात येईल.)

In reply to by मोदक

https://s3-us-west-1.amazonaws.com/wearablezone/uploads/posts/September… तुमच्या दोघांकडे पाहुन पोट जरा आत घ्यावं असा हुरुप आलेला होत तो टिकलाय ;)

In reply to by इरसाल

इरसाल बुवा.. हेच सगळे MI-2 पण मोजतो. आता तर नवीन अपडेट प्रमाणे सायकलिंगचेही डिटेल्स मोजले जातात.. मग त्याच सोयींसाठी १४ हजार कशाला घालवायचे..? २००० मध्ये MI-2 मिळतो आहे की..

In reply to by कपिलमुनी

तुम्हाला कशाला बूट हवेत? तुमच्यासारख्यांसाठी पतंजलीचं जळजळशामक चूर्ण उपलब्ध आहे. ते गट्टम् करावे.

In reply to by मोदक

हो. माझ्या पूर्वीच्या नाईके बुटांच्या तुलनेत खूपच हलके आहेत. टेनिस बर्‍याच वर्षात खेळलेलो नाही. परंतु टेनिस शूज टेनिससाठीच वापरले पाहिजेत असे नाही. मी हे शूज जलद चालण्यासाठी व नेहमीच्या वापरासाठी घेतले आहेत.

शप्पत! मी मित्राकडून आणि आदिवासींचे बूट वाचलं! :) सारखं पेपर अन बातम्या वाचण्याचा परिणाम..दुसरं काय!

दोन दिवसांपूर्वी आई फोन ७+ (३२ GB) घेतला रु. ५५०००, पण फार जड फोन यजास्त दिवस वापरेन असा वाटत नाही, अशाही मंडळी आशेवर आहेत बहुदा त्यांच्यावरच कृपा होईल

लोकांना भाताची एक व्हरायटी खात्रीलायक रित्या ओळखता येत नाही ही आधुनिक शिक्षणाची देणगी म्हणायची का? तांदूळ इतका नियमीत खाल्ला जातो त्याची ही गत आहे तर बाकी तर आनंदच असेल.

मोबाइल फोन ते थेट टिव्ही(एलइडी) वर फोटो व्हिडिओ दाखवणारी केबल कुणी वापरली आहे का? माइक्रो युएसबी - एचडिएमआइ केबल. सध्या किंमत ५००रु सांगत आहेत. ( क्रोमकास्ट वगैरे मध्ये न वापरता थेट कनेक्ट होते असे कळले म्हणून )

In reply to by कंजूस

केबल लाउन मोबाइल टीव्हीवर बघण्या साठी मोबाईल मधे काहीतरी एमएचएल ( किंवा असे काहीतरी ) असायला लागते. तसे नसेल तर केबल वाया जाइल. हे एमएचएल बर्‍याच फोन मधे नसते. दुसरा उपाय म्हणजे टिव्ही सार्ट असेल आणि फोन मधे स्मार्ट व्हियु सारखी सोय असेल तर केबल पण लागणार नाही.

अ‍ॅमेझॉनची डिलिव्हरी आली. वस्तू पुढीलप्रमाणे- रिमोटच्या ब्याटर्‍या, पाणी पिण्याचे ग्लासेस सहा. ग्लास प्लेन आहे पण तळात वेगवेगळे रंग आहेत. लगेज स्केल, लेझी सुझन, मुलाचा धनुष्यबाण, डोअरम्याट, व्यायाम शॉर्ट्स, खेळाचे साहित्य नेण्याचे ब्याकप्याक.

नुकताच एच पी १ टीबी / ४ जीबी / आय ३ लॅप्पी घेतला . अमेझॉन सेल ला २५ सहस्र रुप्यकाणि अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १० बाहेरून बसवाव्या लागल्या . डॉस येते कम्पनीकडून

In reply to by मंदार कात्रे

अतिसूक्ष्म-मुलायम खिडक्या १० साठी किती रुप्यकाणि आणि कुठुन?