Skip to main content

एवढ्यात काय खरेदी केलंत?- ३

लेखक रेवती यांनी रविवार, 02/04/2017 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझ्या आधीच्या धाग्याला भरपूर प्रतिसाद देऊन, मुख्य म्हणजे फक्त प्रतिसाद देण्यासाठी खरेदी करून तुम्ही मोठे काम केले आहे. "आता पुरे" म्हटल्यानंतरही तुम्ही न थांबण्याचे ठरवले आहे. मग विचार केला की आता तिसरा भाग काढूयात व तोही असाच यशस्वी करुयात. मागीलवेळी ज्यांना काही खरेदी करायची नव्हती त्यांनी मीठ मिरच्या का होईना घेतल्यात व त्याची नोंद इथे केलीत म्हणून आभार. हे धागे जतन केले गेले पाहिजेत म्हणजे अजून धा वीस वर्षांनी अमूक दिवशी तुम्ही भाजी खरेदी केलीत असे सिद्ध करता येईल. पूर्वी भाजीच्या किमती किती होत्या हे आपल्या पुढील पिढ्यांना कळणे सोपे जाईल. या धाग्यावर तुम्ही नवी खरेदी नमूद कराल या आशेसह प्रसिद्ध करीत आहे. माझी आजची अ‍ॅमेझॉन ऑर्डर साधारणपणे अशी असेल- मुलाच्या सेलफोनचा स्क्रीन व केस, माझा लेनोव्हो, ड्रायरच्या व्हेंटमध्ये पक्षी जातात म्हणून बर्ड स्टॉपर, ईअर रिंग्जचे सेफ्टी बॅक्स किंवा फिरक्या, डिशवॉशरचे डोअर सील. धन्यवाद.

वाचने 49179
प्रतिक्रिया 177

प्रतिक्रिया

माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन. आता इतर काही विचित्र पण अावडणार्या वासांविषयी. मला पेट्रोलियम (गॅसोलीन) टाईपचा पर्फ्यूम कुठे मिळेल का? तसंच गॅरेजमधला धातू, ग्रीस, ऑईल्स वगैरेचा मिश्र वास. लाकूड, सनमायका आणि कार्पेटयुक्त थंडगार एसीयुक्त केबिनमधे येणारा वास. सोसायट्यांमधे फिरत फिरत डासप्रतिबंधक शुक्र धूर सोडणारी स्मोक गन. आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का? यापैकी काही वासांचे पर्फ्यूम्स सापडले पण सर्व फॉरेनवाले किंमती २० ते ३५ हजारपर्यंत. :-(

In reply to by सस्नेह

+१.. हा वास फटाके हाताळल्यावर हातांनाही येतो. शिवाय हातात फुलबाजी तडतडत असताना नाकात शिरणारा विशिष्ट तप्त वास.

In reply to by गवि

आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?
बुकबायंडिंग केलेला नव्या नव्या पुस्तकाचा वास, फ्लेक्स मशीन चालू असताना सॉल्व्हंटचा उग्र वास, ऑफसेट मशीन क्लीन करताना थिनर आणि इंकचा मिक्स वास' पेपरचे गट्ठे खोलताना येणारा विशेष वास, गाड्या सर्व्हिसिंग करताना वॉश करतात तेंव्हाचा वास, कीवी शू पॉलिशचा वास, स्वेड लेदरचे शूज नवेनवे असताना येणारा वास. . ह्यातले बरेचसे रोजच्या अनुभवातले आहेत पण मला आवडतात ते.

In reply to by अभ्या..

फ्लेक्स मशीन चालू असताना सॉल्व्हंटचा उग्र वास, ऑफसेट मशीन क्लीन करताना थिनर आणि इंकचा मिक्स वास' कीवी शू पॉलिशचा वास,
हे सगळे नशा आणणारे आहेत, असे नोंदवितो. यादीतले इतर याचेच डायल्यूटेड वास आहेत. वास म्हणजे दुरून घेतलेली चव, हे माझे जुने निरिक्षण / फॅक्ट यानिमित्ताने इथे नोंदवितो.

In reply to by गवि

आपणापैकी कोणाला असे जगावेगळे वास आवडतात का?
नुकतेच गवत कापल्यावरचा वास सकाळी कॅफे मधला कॉफीचा वास ( का कोणास ठाऊक तसा सुगंध घरी कॉफी केली की नाही येत ) माती, खापर, धूळ यांचा पर्फ्यूम झाला घेऊन. आहा! जसमीनचा एक पर्फ्यूम मागवला होता त्याचा वास मात्र अजीबात आवडला नाही. केयो कार्पिन तेल अंगावर फवारल्यासारखे वाटत होते.

JBL C100SI In-Ear Headphones with Mic घेतला एव्हढ्यातच. https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/61S3EAUpK7L._SL1500_.jpg https://images-na.ssl-images-amazon.com/images/I/61-PrxofcPL._SL1500_.jpg कर्णरम्य आवाज आहे.

खरतरं कालच हा धागा काढायचा ठरवलं होतं, पण कंटाळा केला. anyway धागा काढलाच आहे तर.. जुना सॅमसंग S3 वापरून ४ वर्ष झाली, अजून तरी चांगला चालतोय पण जरा स्लोलावलाय.. म्हणून नवीन मोबाईल घ्यायचं ठरवलं. दुबई शॉपिंग फेस्टिवल मध्ये काही विशेष ऑफर्स नव्हत्या. इथं अबूधाबीत GITEX डिजिटल एक्स्पो होतं ४ दिवस. इलेक्ट्रॉनिक्स वर जबरया सेल होता.आयफोन ७ प्लस कि S7 edge ड्युअल सिम मध्ये सॅमसंगने बाजी मारली. बरेच सुपरमार्केट्स आणि इलेक्ट्रॉनिक्स ऑउटलेट्स धुंडल्यानंतर LULU सुपरमार्केटला मस्त ऑफर मिळाली म्हणून S7 edge घेतला. HP च्या जुन्या लॅपटॉपची तीच गत झालीय म्हणून DELL i7 7th generation 8GB रॅम, 15.6" डिस्प्ले लॅपटॉप घेतला. Bose वर काही ऑफर मिळतंय का बघतोय. होम थिएटर सिस्टिम घ्यायचीय.. बघू कधी शक्य होतंय.

In reply to by सावत्या

स्वारी हां, मी नवा धागा काढून ताकल्याबद्दल. आता यापुढील तुम्ही काढा. १०० प्रतिसाद झाले की लगेच! स्लोलावलाय. हा हा हा.

पुढच्या वर्षी नक्की घेऊ असे म्हणत बरीच वर्षे न घेतलेली हेल्थ ईन्शुरन्स पाॅलिसी घेतली. आदिदासचे क्लाउडफाॅम असलेले शूज घेतले. अतिशय आरामदायक आणी वजनाने हलके.

In reply to by अभिजीत अवलिया

क्लाऊड फोम आणि गोगा मॅट टेक्नॉलॉजी सेमच आहे का? स्केचर्स चे हे goga mat शूज पहा https://www.youtube.com/watch?v=VRhGChIo45o

वडलांसाठी असुस झेनफोन मॅक्स २ घेतला. मस्तं आहे. बहुधा मी माझा फोन बदलेन तेव्हा हाचं घ्यायचा विचार आहे.

काही खरेदी केलं नाही. आधी जी खरेदी झालेली त्याचे पैसे फेडले... इन शॉर्ट क्रेडिट कार्डाचे बिल भरले :D

मागच्या आठवड्यात आमच्या नवीन ऑफिससाठी सिम्फनी चा Diet कुलर घेतला. आणि जुन्या बायकोसाठी नवीन Redmi 4A (Gold, 16GB, 2GB ) घेतला ५९९८/- ला ;)

In reply to by उपेक्षित

उद्या रेडमी एमाय नोत४ चा फ्लॅशसेल आहे १२ वाजता. लक्षात ठेवा. चांगला फोन आहे, लय स्वस्तात. मला मिळो अशी सदिच्छा द्या अशी विनंती! (मास्तुरे, तुम्ही देणार नाही हे ठाउकेय :-P)

उकाडा थोडा सुसह्य व्हावा म्हणून गेल्या आठवड्यात हा एअर कूलर घेतला विजय सेल्समधून नऊ हजार तिनशेला. 1

In reply to by अभिजीत अवलिया

चांगला आहे. त्यातही साध्या पाण्यासोबत वरच्या भागात आईस क्युब टाकतो तेव्हा बर्‍यापैकी थंड हवा येते.

In reply to by किसन शिंदे

मी फॅन च्या आवाजा मूळे कुलर वापरात नव्हतो , महाराष्ट्र टाइम्स मधील लेख वाचून मी 250 mm चा प्लास्टिक ची पाती असलेला एक्झॉस्ट फॅन ( रु 1150 फक्त ) खिडकी मध्ये उलट्या दिशेने लावला . संध्याकाळी 8 वाजे पर्यंत खिडकी बाहेर ची हवा घरातील हवे पेक्षा थंड झालेली असते पण घरातील गरम हवे मुळे बाहेर ची थंड हवा आत येत नाही पण एक्झॉस्ट फॅन उलट्या दिशेने लावल्या मुळे आत मध्ये मस्त थंड हवा येते , कधी कधी रात्री थंडी वाजल्या मुळे एक्झॉस्ट फॅन बंद करायची वेळ येते . प्रयोग 100 % टक्के सक्सेस झाला आहे , सिलिंग फॅन 25 वॅट ते 75 वॅट व एक्झॉस्ट फॅन 40 वॅट ची वीज वापरणारे असतात .

उद्याच्या श्रीरामनवमीनिमित्त ३० रूपये देऊन ३ हार घेतले. ५० रूपयाला १ डझन गुलाबाची फुले घेतली. त्याचबरोबर १० रूपयांची ३ केळी, ८० रूपयांची अर्धा किलो डाळिंबे, ८० रूपयांची अर्धा किलो सफरचंदे व ८० रूपयांचे पट्टेवाले कलिंगड घेतले.

In reply to by किसन शिंदे

मला वाटंत सर्व प्रकारच्या कलिंगडांना (काळ्या पाठीचे किंवा पट्टेवाले) हिंदीत टरबूज म्हणतात. हिंदीत कलिंगड असा शब्दच नाही. (चूभूदेघे)

In reply to by श्रीगुरुजी

एक शंका आहे. आजकाल जी कलिंगडं खातोय ती सगळी अगदी गोड असतात. कधी फार जास्तं गोड. कंलिगडांमध्येही झोल करतात काय आजकाल? प्रत्येक कलिंगड एकदम लालबुंद आणि गोग्गोड हे कसं शक्यय?

In reply to by अनुप ढेरे

कलिंगडातच काय त्या वर्गीय सर्व फळात कृत्रिम रंग आणि स्वीटनर इंजेक्ट करुन ती लालबुंद्/गोड बनवली जातात. अगदी खात्रीच्या विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत ही फळे. सगळ्या नैसर्गिक गोष्टींची वाट कशी लावावी हे माणसाकडूनच शिकावे! :(

In reply to by अनुप ढेरे

अगदी चांगलं दिसलं की भेसळ आहे अशी शंका येणे सहाजिक आहे. If its too good to be true, it probably is. कसंय ना, गावातले "भोई" लोक पारंपारिक "डांगरवाड्या" नदीच्या पात्रातल्या वाळूत पेरत असत. उन्हाळा सुरू होतानाच्या यात्रेत ही डांगरं/टरबूजं/खरबुजं/फुटकाकड्या विकायला येत.यापैकी काहीच तितकं गोड नसे, पण तहान भागवणारं फळ असे, थोड मधुरही लागे. आजकालच्या बिटी जमान्यात, (बायोटेक्नॉलॉजी=बीटी) उदा. शुगरबेबी नामक टरबूज, (आपल्या सर्वज्ञ गुरुजींच्या भाषेत तरबूजा/खरबूजा) मस्त गोड लागते, व ते नदीकाठच्या वाळूत पेरावे लागत नाही, नॉर्मल शेतात पेरतात, लवकर उगवतेही. मार्केटात ट्रका भरून येतात ती टरबूजं रस्त्यात पिकतील म्हणून फार कच्ची तोडलेली असतात. अन भारताच्या एका टोकापासून दुसरीकडे जातात. सबब लाल दिसलीत तरी बेचव लागतात. इंजेक्शन मिथ बद्दल : एक ड्रंकन वॉटरमेलन नामक प्रकार असतो. व्होडका टरबूजात इन्फ्यूज करणे. सिरिंज व्होडका अन टरबूज फुकट देतो, त्या टरबूजाच्या प्रत्येक फोडीत व्होडका पोचवणे महा कर्म कठीण. तस्मात सॅक्रीनचे इंजेक्शन हजार टरबूजांना देऊन मग ते ३०-५०-६० रुपये किलोने विकणार्‍याला सलाम!

काही महिन्यांपूर्वी थेट कलोनमधल्या दुकानातून यु डी कलोन (४७११ वरिजनल) आणलं होतं. बेहद्द आवडलं. खिशात छोटी ३ मिलीची काचकुपी बाळगून कधीही वास घ्यावा. मूडमधे अत्यंत सुधारणा होते. आता स्टॉक संपत आला. पण अमेझॉनवर दिसलं हेच वरिजिनल ४७११ नंबरचं.. आणि तेही मी जर्मनीत घेतलं त्याहून कमी किंमतीत. B

या धाग्याचं आरोग्य फिटनेसच्या धाग्यापेक्षा जास्त आहे !

साधारण दीडेक वर्षापूर्वी घेतलेला Puma चा स्विमिंग गॉगल मागल्या आठवड्यात तुटला, त्यामुळे Speedo चा स्विमिंग गॉगल घेण्यात आला. झालंच तर एक Jockey चा पुलोव्हर्/झिपर पण घेतला.

पुढील दोन गोष्टी खरेदी करण्याअगोदर तुमचा मोलाचा सल्ला हवा आहे... १) पोर्टेबल एअर कंडीशनर - बाजारात Llyod, Croma यांचे पोर्टेबल एअर कंडीशनर मिळतात. मुंबईमध्ये रहात असल्याने कुलरचा उपयोग होत नाही. तुमच्या पैकी कोणी पोर्टेबल एअर कंडीशनर वापरते का ? परफॉर्मन्स कसा आहे? नॉर्मल AC (window or split) लावण्यासाठी खूप खर्च आणि तसेच खूपच infrastructural changes असल्याने portable AC चा विचार करत आहे. २) car seat massager कोणी वापरते का? १६००-२५०० च्या रेंजमध्ये ऑनलाईन मिळत आहे. अनुभव कसा आहे?

मला एक ब्लु टुथ स्पिकर हवा आहे. त्यातला ब्लुटुथचाच भाग वापरायचा आहे, स्पिकर दहा वाटचा घरातला जोडणार आहे.

In reply to by कंजूस

कंजूस काका असे काही तरी वापरा. हे जुन्या कार मध्ये ब्लूटूथने स्पीकरला जोडायला वापरतात. https://www.amazon.com/iClever-Bluetooth-Hands-Free-Multi-Point-Activat…

आमच्या जुळ्यांनी धुमाकूळ घालायला सुरूवात केल्यामुळे नविन बुकशेल्फ कम लाॅक कॅबिनेट घेतले. अॅपलचे नवे झाड नुकतेच बागेत लावले. बागेत नव्या फेन्स लावल्या काँक्ररीटचे पोस्ट घालून. स्विंगची आॅर्डर दिलिये. मराठी पुस्तकांची खरेदी केली.

कुत्र्याचं / मांजराचं / पाळीव प्राण्यांचं अन्न आणि एकूण सप्लीमेंट्स अमेझॉनवरुन फार स्वस्त मिळतात असा अनुभव आहे. A

या महिन्यातली खरेदी- पॉवरबॅन्क, पोन्चो, ट्रेकींग सॅक, ट्रेकींग शूज, वॉटरप्रूफ ग्लोव्हज, वेस्ट पाऊच, ट्रॅक पॅन्ट, थर्मलवेअर, आणी बरच काही.

In reply to by यसवायजी

डोक्यावर/हेल्मेटवर लावायचा दिवा हेडलॅम्प ( चार्जिंगवाला) रस्त्यावर चायनिज एक घेतला आहे २५०/- रुपयाला. १००मिटरस फोकस मारतो,एक तास चार्जवर चार तास जेमतेम वापरता येतो. जरा भारी भरोसेमंद लँपचे रेटिंग काय असते ,कितीला मिळतो ते सांगा।

मधून रोझ वाईन घेतली बायको बोल्ली असं काहीतरी सात्विक पीत जा रविवारी . बाजूलाच चर्चगेट च्या आर्मी कॅन्टीन मधून अमृत नावाची व्हिस्की घेतली १ लिटर ची रविवार ला . किंवा पाहुणे आले कि . बायकोला अमृत आणि रोझ हि नावं आवडल्याने ती पण खुश मी पण खुश . किंमत ६५०० दोन्हीची मिळून .

वमो, अमृत.. जबर्या सिंगल माल्ट!!! अमृत कितीला पडलं हो!! सालं मुंबई एअरपोर्ट आणि यूएई च्या कोणत्याही एअरपोर्टवर मिळत नाही. पुढच्या मुंबई वारीत चर्चगेटला फेरी मारायला हवी....

अमृत ३-४ च्या आसपास किती वर्ष जुनी आहे त्यावर . पण चांगल्या मोठ्या शॉपलाच मिळतेय सध्या .

In reply to by वरुण मोहिते

अमेरिकेत सॅन होजेसारख्या देशाळलेल्या भागांतल्या कॉस्को, बेव्हमोतही मिळते ;)

In reply to by वेदांत

ओ, ओ वेदांतसाहेब. प्लीजच ना एक सांगाल काय? आयफोनच का घ्यायचा? म्हण्जे तुम्ही तो का घेतला? लै जण इचारतेत, मी बी लै जणांना इचारलो पण प्रॉपर उत्तर काय गावलेले नाही. सांगा ना.

बाईकचे चांगल्या प्रतीचे पंक्चर रिपेयर किट आणि हवा भरायचा पंप पुण्यात कुठे मिळेल? फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर बघितलं...पण रिव्ह्यूज...लय बेक्कार आहेत.

In reply to by पाटीलभाऊ

लाल महालाकडून फडके हौदाकडे जाताना डावीकडे (सरदार सायकल्स समोर) चावला सायकल नावाचे एक लहानसे दुकान आहे, त्याच्याकडे फुट दीड फुटाचा एक पंप मिळतो. तो पंप सायकल, फुटबॉल, गाड्या सर्वांना चालतो. किंमत २०० रू. हा पंप कामचलाऊ प्रकारचा आहे व टायरमध्ये अगदीच हवा नसताना हवा भरण्यासाठी योग्य आहे, किंवा जवळच्या पंक्चरवाल्याकडे जाईपर्यंत वापरावा. जर घरच्या घरी टायरमध्ये टामटुम हवा भरायची असेल तर डेकॅथलॉन मध्ये फूटपंप मिळेल. किंमत २००० रू. . पंक्चरकीटपेक्षा सोबत एक वेगळी ट्युब ठेवा. पंक्चर झाले की सरळ ट्युब बदला आणि नवीन ट्युबवर गाडी चालवा. जुनी ट्युब सावकाशीने टायरवाल्याकडे नेऊन पंक्चर काढा.

खादी भांडारातून लंगोटाचं कापड घेतलं, फडात ती गुळमुळीत सपोर्टरं कुचकामी असत्याती. उत्तम कसलेला लंगोट हाच निश्चिन्त मनाने अन पूर्ण एकाग्रतेने कुस्ती खेळायचा हमखास उपाय होय, हे सांगून मी माझी ज्ञानदानाची हौस पुरवून घेतो..

इको नॉन एसी! टुरिस्ट परमिट, आज घेतली. उत्तम गाडी आहे, पुण्यातून कोणास रेंटवर हवी असेल तर मला सांगा ;)

अनेक ब्रँडेड टेल लँप हरवून / पाडून आणि अनेक स्वस्तातले टेललँप वापरून शेवटी हा एक दिवा घेतलाच. . हाताच्या बोटांच्या दोन पेरांइतकी लांबी आहे. मोबाईल चार्जरने चार्ज होतो आणि सायकल, सॅक, शर्टाची कॉलर, बॅक पॉकेट कुठेही बसवता येतो. पांढरा आणि लाल - टॉर्च आणि ब्लिंकर असे मोड आहेत. एकदम छोटूकला असल्याने खिशात वगैरे आरामात बसतो. किंमत - ७००/- रू.

मला घरच्यांना अन शेजार्यांना पिडायला एक कॅरावके सिस्टीम घ्यायची आहे. उत्तम ऑप्शन कोणता? इनबिल्ट हिंदी आणि इंग्लिश गाणी जास्तीतजास्त (हजारो) असली पाहिजेत आणि नंतर नेमकी हवी ती गाणी (सशुल्क अथवा निःशुल्क) मिळवण्याची सुलभ (यक्क!!) सोय हवी.

हे विकत घेणं नाही, पण तरी ... पुण्यात ९ ते ९ इतकी ड्यूटी असणारा ड्रायवर केवढ्यात मिळेल? १. त्याचं सहसा काम फक्त ऑफिसमधे सोडणे आणि आणणे इतकंच असेल. मधे सगळा विराम. २. मार्केटच्या हिशेबाने जे ओवरहेड आहेत ते सगळे मिळून महिन्याला पगारावर २००० ते ३००० होतात. (जास्तिचे तास, सुट्टीच्या दिवशी येणे, आउटस्टेशन ड्यूटी). ३. एजन्सीच्या ड्रायवर ८ तासांच्या ड्यूटिची बेसीक कॉस्ट १६००० पासून सुरु होते. वर हे २-३०००. त्यामुळे कंपन्यांना लावलेले रेट पर्सनली परवडत नाहीत. ४. ड्रायवरकडून गाडीचं नुकसान झालं तर विम्याव्यतिरिक्तच्या पैशाचं काय करायचं असतं? ======================================================================= मी गेले एक वर्ष सरासरी १७००० रु. प्रतिमाह ड्रायवरवर खर्च करत आहे (एजंसीकडून घेतला तर किमान २०,००० होइल) आणि त्याच्या सर्विसेस अजिबात प्रोफेशनल नाहीत (मंजे शहर माहित असणं, पत्ता शोधता येणं, गाडी वेळेवर साफ असणं, इ इ). तो भरोसेमंद आणि सज्जन आहे इतकं मात्र आहे.

In reply to by arunjoshi123

महिन्याकाठी गाडीचा ईएमाय १५,००० + पेट्रोल ४००० + ड्रायव्हर १७,००० = महिन्याचे रु. ३६,००० झाले. (देखभालखर्च, टोलं/दंड, विमा, वगैरे धरलं नाही.) तुम्ही हापिसात २२ दिवस जाता असं समजू. म्हणजे दिवसाचे रु. १६३६ झाले. इज इट रियली वर्थ इट? याच अंतरासाठी उबेरचा सगळ्यात मोठ्ठा प्राईस क्वोट रु. ४५८ (वन वे) आहे. अगदी दोन्ही धरून रु. १००० पकडा. #हात_दाखवा_उबेर_थांबवा

In reply to by आदूबाळ

पर्सनल सेवेची आणि उबेरची तुलना करता येते काय? रोज कोण बोलवणार उबेर? रोज अ‍ॅड्रेस सांगा... ते असो. ===================== माझं म्हणणं असं आहे कि एवी तेवी प्रोफेशनल सर्विस नसेलच तर ड्रायवर अनऑर्ग्यनाइज्ड मर्केट मधे जो रेट आहे तोच द्यावा.

हे विकत घेणे नाही पण कुणाला विकत घ्यायचे असेल तर छोट्या ऑफिसांत, घरी प्रिंटर गरजेचा झाला आहे. डेस्कजेट घेतला तर स्वस्त पडतो पण रिफिलमधे फार कमी प्रिंट निघतात. न वापरता पडून राहिला तर खराब होतो.पण कलर प्रिंटर , स्कॅनर ई. चा पर्याय स्वस्तात मिळून जातो. लेजर ची क्वालिटि उत्तम पण किंमत महाग. कलर असेल तर अजुनच जास्त. दोघांचा मध्य काढायचा तर ईप्सन चे इंक टँक प्रिंटर घेणे. जास्त प्रिंटस, प्रति पान किंमत कमी, लवकर खराब होत नाही. प्रिंट, कॉपी, स्कॅन सगळं मिळतं. साधारण १०,००० पासुन किंमत आहे.