चलनाचे मूल्य कायमचे स्थिर केले तर?
सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न मिळवावे लागते. हा जगण्यासाठीचा झगडा जन्मल्यापासून सुरु होतो तो मरेपर्यंत सुरूच राहतो. हा झगडा कमी करण्याच्या प्रयत्नातून मानवाने शेती, शेतीतून सहकार, सहकारातून व्यापार आणि व्यापारातून पैसा [चलन या अर्थाने] असे शोध लावले. ही साखळी इथे थांबली नाही. त्या पैशावर व्याज असाही शोध लागला. आणि त्यातून पुढे भांडवल आणि भांडवलशाही अशी साखळी तयार झाली.
अशा तऱ्हेने अन्न मिळण्याची शाश्वती मिळवताना अन्नाइतकेच पैशाला आणि त्याचे मूल्य जपण्याला [म्हणजेच एका अर्थाने व्याजाला] आपल्या आयुष्यात इतके महत्वाचे स्थान आले की पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता रुपयाभोवतीही फिरू लागली.
कोणत्याही वस्तूला स्वतःचे अंगभूत आर्थिक मूल्य नसते. हे मूल्य बाजारातील मागणी / पुरावठ्याप्रमाणे वेळोवेळी ठरत असते. ते एकाच संज्ञेत / एककात [चलनात] बसवल्यामुळे, कोणत्याही वस्तूचा व्यवहार करणे अतिशय सोपे झाले. पण तरीही आपल्या जगण्याचा झगडा मात्र पूर्वी होता तेवढाच आहे. अन्नाऐवजी तो आता पैशासाठी असतो, हाच काय तो फरक! शाश्वतीची शाश्वती काही झाली नाही !
त्यामुळे पैसा [चलन] च नसेल तर किती छान होईल असा विचार बरेच वेळा मनात डोकावतो. आणि जर पैसा राहणारच असेल तर निदान त्याचे मूल्य स्थिर करून टाकले तर? [i.e. fix time value of money]. असे केले की प्रत्येक गोष्टीचे मूल्य ही कायम राहील [किंवा कायम करता येईल]. उदा. एखाद्या घराची आज जी किंमत आहे तीच अजून १०० वर्षांनी असेल. असे केल्याने सामान्य माणसाचे आयुष्य किती सोपे होऊन जाईल असेही वाटत राहते.
तर या दोन दृष्टीने अर्थशास्त्रात किंवा इतरत्र कुठे काही विचार झाला आहे किंवा काही माहिती -- सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत -- उपलब्ध आहे का? असल्यास कळवावे. English मध्ये असल्यास उत्तम.
मानवी व्यवहार आता चलनावर एवढा अवलंबून आहे, की चलन एकाएकी बाद करणे हे अर्थातच व्यावहारीक होणार नाही याची कल्पना आहे. तसेच चलनाचे मूल्य कायम केले तर त्यानेही काही समस्या निर्माण होऊ शकतील याची कल्पना आहे. पण हे परिणाम प्रामुख्याने प्रचलित अर्थव्यवस्थेवर होतील.
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील यात रस नसून, असे केल्याने सामान्य माणसाला नक्की काय फायदा होईल आणि असे केल्याने वेगळी काही अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते का हे समजण्याचा हा प्रयत्न आहे. थोडक्यात, अर्थव्यवस्थेला मध्यभागी न ठेवता, सामान्य माणसाला मध्यभागी ठेवून यावर काय विचार झाला आहे हे समजून घ्यायचे आहे.
प्रचलित अर्थव्यवस्था ही सामान्य माणसाच्या भल्यासाठी आहे असे कोणी सांगायच्या आधीच सांगतो की मी या विचाराशी सहमत नाही.
Google काकांना वेगवेगळ्या प्रकारे विचारून झाले. पण त्यांच्याकडून याविषयी काहीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर थोडा कमी झाला आहे हे नमूद करत प्रश्र्न पुनः मांडतो.
१. चलनातून चलन काढून टाकले तर?
२. हे शक्य नसेल तर, चलनाचे मूल्य कायमचे स्थिर केले तर?
३. अशी अर्थव्यवस्था शक्य आहे का?
याद्या
9945
प्रतिक्रिया
39
वर्गीकरण
मिसळपाव
समजा एका घराची किंमत स्थिर
घराची किंमत स्थिर नसताना
In reply to समजा एका घराची किंमत स्थिर by अमरेंद्र बाहुबली
अस्सावा सुंदर चाकलेटचा बंगला
काही प्रश्न
English मध्ये असल्यास उत्तम
टाइम व्हॅल्यू ऑफ मनी नको
मस्त समजावून सांगितलेत!
In reply to टाइम व्हॅल्यू ऑफ मनी नको by नितिन थत्ते
खरे तर ..
मागणी-पुरवठा
वेगळ काही तरी..........
यात आळशी , वशील्याचे तट्टू ,
In reply to वेगळ काही तरी.......... by दीपक११७७
उद्देश कळला नाही प्रतिक्रीयेचा
In reply to यात आळशी , वशील्याचे तट्टू , by विजुभाऊ
फुत्कार, मला काही विशेष समजलं
आत्तापर्यंत च्या
त्याच्या बाहेर काहीच उपाय
In reply to आत्तापर्यंत च्या by संदीप-लेले
"'... दुसऱ्या कल्पना सध्य
In reply to त्याच्या बाहेर काहीच उपाय by अत्रे
जर
In reply to आत्तापर्यंत च्या by संदीप-लेले
??
In reply to आत्तापर्यंत च्या by संदीप-लेले
" ..... लोकांच्या काय गरजेचे
बोकील काकांना विचारा.
In reply to " ..... लोकांच्या काय गरजेचे by संदीप-लेले
अव्यवहार्य
In reply to " ..... लोकांच्या काय गरजेचे by संदीप-लेले
तुम्ही रस घेऊन प्रतिसाद दिलेत
In reply to अव्यवहार्य by मिल्टन
धागा आणि प्रतिसाद पुन्हा
तसच समजा.
In reply to धागा आणि प्रतिसाद पुन्हा by नितिन थत्ते
चलनाची क्रयशक्ती ही एकूण
In reply to तसच समजा. by संदीप-लेले
बरोबर आहे. हे मी मूळ भागात
In reply to चलनाची क्रयशक्ती ही एकूण by नितिन थत्ते
हे तत्त्वतः शक्य आहे.
सर्वात प्रथम धन्यवाद. माझ्या
In reply to हे तत्त्वतः शक्य आहे. by arunjoshi123
इतका असह्य अर्थघन प्रतिसादही
In reply to सर्वात प्रथम धन्यवाद. माझ्या by संदीप-लेले
असे जर आहे, तर आहे तीच
In reply to इतका असह्य अर्थघन प्रतिसादही by arunjoshi123
जर
In reply to असे जर आहे, तर आहे तीच by संदीप-लेले
अवांतर
In reply to सर्वात प्रथम धन्यवाद. माझ्या by संदीप-लेले
हे पुरते डोक्यावरून गेले.
In reply to अवांतर by arunjoshi123
ते एकाच संज्ञेत / एककात
किंमत
अर्थव्यवस्थेवर काय परिणाम
एकूण तुमची मते माझ्या मतांशी
In reply to अर्थव्यवस्थेवर काय परिणाम by arunjoshi123
या विषयावर फ्रेडरीक हायेक साहेबांचे एक पुस्तक
पुस्तक वाचून कसे वाटले ते
In reply to या विषयावर फ्रेडरीक हायेक साहेबांचे एक पुस्तक by मिल्टन