Skip to main content

चलन

चलनाचे मूल्य कायमचे स्थिर केले तर?

लेखक संदीप-लेले यांनी रविवार, 23/07/2017 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न मिळवावे लागते. हा जगण्यासाठीचा झगडा जन्मल्यापासून सुरु होतो तो मरेपर्यंत सुरूच राहतो. हा झगडा कमी करण्याच्या प्रयत्नातून मानवाने शेती, शेतीतून सहकार, सहकारातून व्यापार आणि व्यापारातून पैसा [चलन या अर्थाने] असे शोध लावले. ही साखळी इथे थांबली नाही. त्या पैशावर व्याज असाही शोध लागला.