Skip to main content

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शुक्रवार, 21/07/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ?? एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ?? “मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर” अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात. मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा” मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ? मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे) तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल .... समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..

वाचने 144225
प्रतिक्रिया 445

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

हा प्रतिसाद वाचनखुणांमध्ये साठवून ठेवणार आहे. ४. प्रतिवाद्यांच्या माहीतितून आपली मतं सुधारत, रिफाईन आणि डायल्यूट करत जाणे. मंजे शेवटी आपण खूप तिखट भाजी खाऊ शकत असलो तर त्यांना थोडि लींबू पिळून देणे. विशेष आवडलं

In reply to by arunjoshi123

डोल्ट टेक अ‍ॅनिथिंग पर्सनली आणि कोंबडी प्रेमी सारख्या टाळ्यापिटू स्त्रीवादी लोकांना हे एकदा टंकल कि वाटेल ते लिहायला मोकळ असतो. खरे तर सकाळपासून ह्या धाग्याचे भरतवाक्य ऐकू येत होते तथापि तुमचा हा प्रतिसाद वाचून उत्तर देणे भाग आहे. खरे तर पिरा तैंनी अत्यंत समर्पक प्रतिसाद देऊन मूळ धाग्याची भूमिका व्यवस्थित मांडली आहे, तरीही पुन्हा त्या वाचल्यास बरे होइल. पहिल्यांदा ऐकतांना कसलाही पूर्वग्रह नसतोच त्यामुळे अज्ञानाचा वन्ही वगैरे शब्दबंबाळपणा हि हौस असू शकते सत्य नाही. पण पुन्हा ऐकतांना आणि अजून ऐकतांना मुळचा झरा कळतोच त्यातही शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते. असो तर एक बाई २०१७ मध्ये जाहीर रित्या लोकांना विशेषत: स्त्रियांना -चूल आणि मूल हेच प्रायमरी असल्याची शिकवण देतात (बोट्म लाईन तीच) -आईच एकवच लागेल आणि मला प्रश्न विचारू नका अशी भम्पक दादागिरी ची भाषा करतात -नवर्याशी जुळवून घे, पाणी पी असली तद्दन कचखाऊ भूमिका स्वीकारायचा सल्ला देतात -सासूला नवीन सुनेशी बोलतांना खोट बोलायला उद्युक्त करतात -स्वतच्या ४८ व्या वर्षी केलेल्या एल एल बी च कौतुक आपणच गाऊन दाखवतात आणि फालतू गहिवर आणतात -स्वताच्याच मुलाच कौतुक जाहीर पाने करतात का तर त्याने आजीला ज्ञानेश्वरी वाचून दाखवली -स्वताला पुन्हा पुन्हा बोलवा असे आवाहन करतात -सनी लीयोनी बद्दल कुठल्यातरी कोपर्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून त्याचा फोटो छापून आणतात बर्यापैकी वक्तृत्वावर चार मुद्दे मांडता येतात म्हणून जाहीरपाने हे असले कुचकामी सल्ले देत राहायचे आणि काहीतरी जुनाट विचार लोकांवर लादायचा प्रयत्न करायचे. कशाचा कशाला पत्ता नाही. त्यांना मुंबई पुणे दिल्ली बंगलोर आदी महानगरातील आयुष्यातील रोजच्या संघर्षाची , (विशेषत: स्त्रियांच्या आणि त्यातही नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबत च्या समस्या ) आणि काडीमात्र जाणीव दिसत नाही आणि अनुभव तर मुळीच वाटत नाही (नवीन लग्न झालेल्या मुलीकडून सासर्यांच्या श्राद्धाचा साग्रसंगीत स्वयपाक ,तो हि एकहाती बहुतेक, अपेक्षित आहे ह्या बैईना) आणि ग्रामीण स्त्रियांना ह्या जुळवून घेण्याचे जे सांगतात त्यात काहीच नवीन नाही (निदान नसाव). त्यांच्या सामाजिक कार्य आणि तळमळीबद्दल जास्त माहिती नाही पण तरीही असे काही काम करणाऱ्या कुणाचाही करावा तसा मनापासून आदर आहेच. त्यांनी उल्लेख केलेले कायद्याचे गैरवापर हे होत असतीलच पण म्हणून त्याच्या सरसकटीकरण आणि फोफस तत्वज्ञान मांडण्याला आक्षेप आहेत. त्यांची मते आणि विचार ज्यांना मान्य आहेत त्यांनी ते जरूर स्वीकारावेत आणि आपल्या वैयक्तिक परिघात रुजवावेत आणि जमल्यास पुढील पिढीत जोपासावेत. तथापि आपण जरूर अशा क्रॅक बाईंना सपोर्ट करतांना केवळ विरोधासाठी विरोध करावा आणि त्याचे अपर्णातैन्सार्खेच तत्वज्ञान हि बनवावे मधून मधून आपणच आपल्याच पाठीवर कौतुकाची थाप हि मारून घ्यावी (नंतर तो विनोद होता असहि म्हणता येईल).

In reply to by कोंबडी प्रेमी

पहिल्यांदा ऐकतांना कसलाही पूर्वग्रह नसतोच
मान्य. पण बाईंची कोणतीही दोन वाक्ये स्त्रीवाद्यांचे सगळे पूर्वग्रहदोष प्रवण क्षेत्र अ‍ॅक्टिवेट करायला पुरेशी आहेत.
-चूल आणि मूल हेच प्रायमरी असल्याची शिकवण देतात (बोट्म लाईन तीच)
फूड आणि सस्टेनेबिलिटी हे खरंच प्रायमरी इश्श्यूज आहेत.
-आईच एकवच लागेल आणि मला प्रश्न विचारू नका अशी भम्पक दादागिरी ची भाषा करतात
चूक आहे ते. स्त्रीवाद्यांशी वादात हरायची नाचक्की होऊ नये वा वेळ जाऊ नये म्हणून त्या असं करत असाव्यात.
-नवर्याशी जुळवून घे, पाणी पी असली तद्दन कचखाऊ भूमिका स्वीकारायचा सल्ला देतात
स्त्रीशक्ती बद्दलही बरंच बोलल्यात.
-सासूला नवीन सुनेशी बोलतांना खोट बोलायला उद्युक्त करतात
तुमचा आयडी कोंबडि प्रेमी असणं हे माझ्याशी खोटं बोलणं आहे. असो.
-स्वतच्या ४८ व्या वर्षी केलेल्या एल एल बी च कौतुक आपणच गाऊन दाखवतात आणि फालतू गहिवर आणतात
जनरली या वयात कमी लोकं शिकतात. आणि स्वतःचं कौतुक असणं, गहिवर येणं हे सामान्य आहे. बाय द वे, तुम्हाला कशाचा गहिवर आल्ता ते सांगा मी त्याला फालतू म्हणून झीडकारून दाखवतो. मंजे काय तुमची मतं चूक?
-स्वताच्याच मुलाच कौतुक जाहीर पाने करतात का तर त्याने आजीला ज्ञानेश्वरी वाचून दाखवली
मग काय बडवायला पाहिजे होता यासाठि अशी अपेक्षा आहे का?
-स्वताला पुन्हा पुन्हा बोलवा असे आवाहन करतात
कंपन्या जाहिरातिंनी इतक्या पकवतात म्हणून त्यांचे प्रॉडक्त घेत नाही का तुम्ही? असतात पकाऊ लोक. पण टाळता येत नाहीत.
-सनी लीयोनी बद्दल कुठल्यातरी कोपर्यातल्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून त्याचा फोटो छापून आणतात
इस्रोच्या चेअरमने (व्यक्तिगत पातळिवर) प्रक्षेपण निट व्हावे म्हणून (आवश्यक त्या बाबींत काही हलगर्जी न करता) बालाजीची पूजा केली म्हणून देशातल्या अनेक शिकल्या सवरल्या गधड्यांनि रान माजवलं होतं. म्हणून तक्रार कशाची करावी याची अक्कल असण्याचा आग्रह त्यांच्यापासून सुरु करायचं कारण नाही. आणि प्रसिद्धिच्या हौसेत काय चूक आहे? आता तुमच्या मिसइंटरप्रिट करायच्या हौसेत काही चूक नसेल तर त्यांना पण समान अधिकार नको का?

In reply to by कोंबडी प्रेमी

त्यांना मुंबई पुणे दिल्ली बंगलोर आदी महानगरातील आयुष्यातील रोजच्या संघर्षाची , (विशेषत: स्त्रियांच्या आणि त्यातही नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबत च्या समस्या ) आणि काडीमात्र जाणीव दिसत नाही आणि अनुभव तर मुळीच वाटत नाही
त्यांच्या समस्यांचा अनुभव का म्हणे असायला पाहिजे? उद्या असंही म्हणाल की त्यांना लॉस अँजिलिस, टोक्यो, मोसूल, लिमा, इ इ जागच्या स्त्रीयांच्या प्रश्नांची कल्पना नाही. काय संबंध आहे. सोलापूरातल्या कंच्यातरी धांदलगावात भाषण द्यायला, त्यांचे प्रश्न सोडवायला मुंबईच्या अनुभवाची अट कशाला? कौटुंबिक नाती, घरी कष्ट करणे, थोरांचा सम्मान करणे, स्वयंपाक करणे, सांस्कृतिक प्रथा पाळणे (जेणे करून या अपेक्षापूर्तींनंतर संसार नीट चालतील) हे शिकवायला मुंबईची डिग्री कशाला लागते? प्रत्येक ठिकाणि शहरांचा जीडीपी वाढवायचा अट्टाहास झेपण्यापलिकडचा आहे.

In reply to by पिलीयन रायडर

चांगले कार्य केले म्हणुन हे ही ऐकुन घ्यावे अशी कुणाची अपेक्षा नसावी.
अहो, ऐकून घेणे या फ्रेजला त्या मेटॅफोरिक अर्थापूर्वी एक लिटरल अर्थ देखिल आहे. तुम्ही लिटरली घ्या ना हो. ऐकणे म्हणजे कानात वायूच्या मेकॅनिकल वेवज जाणे असे घ्या ना. त्या काय तुमच्या सासू आहेत का कि ध्वनिकंपनंही (इतकी मागास असती तर) सहन न व्हावी? तुम्हाला एक मनःपूर्वक सांगतो, अपर्णाताईंचे व्हिडिओ ऐकताना मला एका गोष्टीचं अतीव दु:ख झालं. काय? ते मंजे मी "वाहिलेला स्त्रीवादी" नाही. असतो तर माझ्यासाठी हा जबर्‍या कॉमेडी प्रकार राहीला असता नि मी पुनःपुनः पाहीला असता. पण मला त्यांच्या विचारांशी बरीच सिंपथी आहे, म्हणून मी असं हसूच शकत नाही. दुसरिकडे युट्यूबवर मी बर्‍याच स्त्रीवाद्यांची पेटलेली भाषणं शांतपणे ऐकतो - त्यांचं विचारप्रसारण आणि माझं मनोरंजन एकत्र होतं. बर्‍याच प्रबोधनही करून जातात. =========================== जर तुम्ही बजरंगदली शिवसैनिक आहात तर अकबरुद्दिन ओवैसीचं भाषण शांतपणे ऐकणं (रक्तदाब, हार्टबिट तिच ठेऊन, कोणतेही स्वगत मधेच चालू न करता, किंवा तोंडातनं कोणता प्रशंसाशब्द न आणता.) एक कला नाही का?

मला काहीही झालं तरी वडीलांच्या मनाप्रमाणेच लग्न करायला हवं. माझं उदाहरण चुकीच्या कारणाने दिलं जायला नको. आणि समाज भाकरीभोवती गोलगोल फिरतोय किंवा फिरवला जातोय. बॅन करायला हवेत असले विडिओ

In reply to by मार्मिक गोडसे

...आणि एकदा बॅन केले की तुम्हीच असहिष्णुता आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे बोलायला मोकळे. ;)

बाकी ह्या धाग्यावर अरुण जोशी साहेबानी फार नेटाने किल्ला लढवला. अगदी संक्षींची आठवण आली. कोंबडी प्रेमी, तुम्हाला कोंबडी आवडते असे तुमच्या आयडीवरून वाटते. त्यामुळे हा धागा काढल्याबद्दल तुम्हाला गावरान कोंबडीचा रस्सा आणि ज्वारीची भाकरी (मी थापलेली नाही नाही बडवलेली) बक्षीस देण्यात येत आहे.

In reply to by अभिजीत अवलिया

ती ज्वारीची भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखी गोल असावी लागते इथे पदर खोचून तर्जनी प्रत्येक वर ठेका देत हलवली आहे अशी कल्पना करावी

In reply to by प्रकाश घाटपांडे

एक विचार -- लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविलेले राज्य तसेच स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीने, स्त्रीची, स्त्रीपासून केलेली मुक्ती

अजून एक व्हिडिओ बघितला. त्यात त्या म्हणाल्या की आजकाल लग्नात वधूला साडी नेसावायला पुरूष असतो. हे त्यांनी कुठे बघितल आहे देव जाणे. माझ्या आणी मित्र मैत्रीणी नातेवाईक ह्या सर्व लोकाकडच्या लग्नात वधूला तयार करणार्या बायकाच होत्या

In reply to by मनिमौ

हे त्यांनी कुठे बघितल आहे देव जाणे.
हाय क्लास सोसायट्यांत. मिडलक्लासांना कशीबशी लग्नाची साडी परवडते, नेसवणारा कसा परवडेल? http://www.beyondthefringe.in/bridal.html

In reply to by मनिमौ

पोलकी शिवणारे टेलर तर वर्षानु वर्षे पुरुषच आहेत. साड्या नेसवल्या किंवा उतरवल्या तर काय बिघडले. ती बाई आणि पुरुष बघून घेतील. अपर्णाताईंचा टेलर स्त्री आहे का ?

पिरा ताईंच्या शब्दा - शब्दाशी सहमत. माझ्या शेजार-पाजारी आणि नातेवाईकांमध्ये टीव्ही वरच्या सासू - सुनांच्या सिरिअल्स वरून सुद्द्धा घरच्या सुनेला बोलत असल्याची उदाहरणं आहेत. आणि आपल्या समाजात (सगळीकडेच खरं तर , त्या ट्रम्प चे वोटर्स, ते विविध बाबा-बापूंचे शिष्य, एमवे मध्ये अडकलेले ) अनेक कारणांनी प्रचंड भारावून जाणारी माणसं भरपूर आहेत. या लोकांना बरेचदा लॉजिकल विचार करता येत नसतो किंवा करायचा नसतो. किती तरी वेळा बाहेरून आलेल्या मुलीने कुठलाही मत मांडलेलं अगदी शिकलेल्या लोकांना पण आवडत नाही. कितीतरी घरांमध्ये लहान मुलं ऐकत नसेल, तर पटकन म्हणतात, तो बघ शेजारचा कसा वागतो / किंवा टीव्ही मधला मुलगा बघ किती शहाणा आहे. त्यामागे लॉजिक नसतं, फक्त त्या मुलाने आपलं ऐकावं हि इचछा असते. आणि त्याच वेळी त्या मुलाने आपलं मनापासून ऐकावं म्हणून प्रयत्न करायची, किंवा त्याला समजून घ्यायची तयारी नसते. किंवा अगदी कितीतरी वेळा बॉस फक्त बॉस आहे म्हणून त्याला / त्याच्या बरोबर सांगण्याला नाव ठेवणारी लोक आसपास असतात. तो सांगतोय त्यात लॉजिक आहे, भले ते आपल्या मना प्रमाणे नसलं / आपल्याला जास्त कष्ट पडणार असलं तरीही बरोबर आहे, एवढा सारासार विचार कोणाला करायची इचछा नसते - खरंतर ते सोयीचं पण नसतं. त्यापेक्षा नावं ठेवणं हा अतिशय सोपा पर्याय उपलब्ध असतो सुनेच्या बाबतीत अगदी शिकलेल्या घरांमध्ये, एरवी स्वभावाला चांगल्या असणाऱ्या माणसांमध्ये सुद्दा हक्क गाजवायची, तिने सगळ्या गोष्टीत आपलं ऐकलं पाहिजे हि वृत्ती उफाळून येते. आणि आजकाल मुलीना माहेरी नीट वागवत असल्यामुळे, अशा वागण्याशी पूर्वी सारखं जुळवून (सोशिक, सहनशील इ इ ) वागण्याची सवय नसते. वेग-वेगळी बघितली तर सासरची माणसं पण वाईट नसतात आणि ती सून पण वाईट नसते. एकूण परिस्तिथि - ज्यात ह्या टीव्ही सिरिअल्स, शेजार पाजारी आणि नात्यातली भोचक मंडळी आणि या अपर्णा ताईंसारखे बाईला आरोपी ठरवणारे (किंवा टोकाचे फेमिनिस्ट ) विडिओ चुकीची मत बनवायला करणीभून बनू शकतात. कारण ते प्रत्येक पार्टी ला स्वतःच्या सोयीने वापरता येतात. एखाद्याला खरंच घर सावरायचं असेल, तर त्या माणसाने घरातल्या प्रत्येक माणसाकडून चूक होऊ शकते आणि त्यामुळे एक संसार मोडू शकतो हे गृहीत धरून असे विडिओ बनवावेत. पण बरेचदा तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कुठलाच मिळत नाही कारण तुम्ही सगळ्यांनाच आरसा दाखवता आणि तो कोणालाच बघायचा नसतो. त्यापेक्षा टोकाचं फेमिनिस्ट होणं किंवा अपर्णा ताईंसारखं दुसरं टोक गाठणं सोयीचं पडत. अवांतर - सासू-सासर्यांना नाव ठेवणाऱ्या / पटत नाही म्हणून घटस्फोट घेणाऱ्या मुलीला (सरसकट) चूक म्हणणाऱ्या पुरुषांपैकी किती लोक स्वतःच्या कंपनीला / बॉस ला शिव्या घालत असतील किंवा छोट्या छोट्या कारणावरून नोकरी सोडत असतील देव जाणे :P .

In reply to by वीणा३

सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद.
एखाद्याला खरंच घर सावरायचं असेल, तर त्या माणसाने घरातल्या प्रत्येक माणसाकडून चूक होऊ शकते आणि त्यामुळे एक संसार मोडू शकतो हे गृहीत धरून असे विडिओ बनवावेत. पण बरेचदा तुम्हाला टार्गेट ऑडियन्स कुठलाच मिळत नाही कारण तुम्ही सगळ्यांनाच आरसा दाखवता आणि तो कोणालाच बघायचा नसतो. त्यापेक्षा टोकाचं फेमिनिस्ट होणं किंवा अपर्णा ताईंसारखं दुसरं टोक गाठणं सोयीचं पडत.
टोकाचे क्रिमिनल पुरुषवादी पुरुष ते पुरूषवादी पुरूष ते साधे पुरुष ते साध्या स्त्रीया ते स्त्रीवादी स्त्रीया ते टोकाच्या क्रिमिनल स्त्रीवादी स्त्रीया हा सगळा स्पेक्ट्रम संख्याशास्त्रातल्या नॉर्मल डिस्ट्रिब्यूशन प्रमाणे समाजात असणार. आणि पर्यायाने या स्पेट्रमच्या प्रत्येक होल किंवा पार्ट भागाची दखल घेणारे सुधारक देखिल असणार असा दृष्टिकोन बरा. असो.

In reply to by वीणा३

सुस्पष्ट, संतुलित प्रतिसाद. +१११११ लहान मुलांचे उदाहरण तंतोतंत पटले. सुनेच्या बाबतीत अगदी शिकलेल्या घरांमध्ये, एरवी स्वभावाला चांगल्या असणाऱ्या माणसांमध्ये सुद्दा हक्क गाजवायची, तिने सगळ्या गोष्टीत आपलं ऐकलं पाहिजे हि वृत्ती उफाळून येते.>>> ==>> मित्राच्या लग्नाला जाऊ नाही शकलो म्हणून काही दिवसांनी त्याला भेटायला घरी गेलो. ओळख करून देता देता त्याने चक्क त्या नवऱ्यामुलीला माझ्या पाया पडायला सांगितलं. मी मित्राला म्हंटले "अरे मी काय एवढा बुजुर्ग व्यक्ती नाही, मी तुझ्या समवयस्क आहे" तर त्याची आई लगबगीने स्वयंपाक घरातून लगबगीने बाहेर आली आणि म्हणाली " संस्कार असतात, केलेच पाहिजे हे"

In reply to by विशुमित

ओळख करून देता देता त्याने चक्क त्या नवऱ्यामुलीला माझ्या पाया पडायला सांगितलं
ही म्हणजे हैट्ट झाली! आमचे लग्न झाल्यावर एकदा माझ्या पाया पडायला कोणीतरी सांगितले होते आमच्या हीला. जाम संतापलो होतो तेव्हा मी. चालणार नाही म्हटले!

In reply to by अत्रे

त्यात काय संतापायचे उगाच ब्वा, चांगला थाटात उभे राहून आशीर्वाद म्हणून दोन गुगलच्या अन विकिपीडियाच्या लिंका द्यायच्या. हाकानाका.

In reply to by विशुमित

अगदी हेच! आमच्यापेक्षा वयाने लहान मित्र भारतातून लग्न करून आला. त्यानंतर दोनेक अठवड्यात उपहारगृहात भेटला असता "भाभीके पैर छुओ" असं म्हटल्यावर ती मुलगी हाटेलातच पन्नास लोकांच्यादेखत पाया पडली. हे अजिबात म्हणाजे अजिबातच एक्सपेक्टेड नव्हते. मला काय करावे समजेना. "अगं, नको नको" वगैरे म्हटलं पण हातभर लाल पांढर्‍या बांगड्या भरलेल्या मुलीने माझ्या गुढग्यांना हात लावून पाय लागू म्हटलेही. नंतर तीनेक वर्षात बाळाला फिरवताना भेटली होती. खूप बदलली होती तेच बरे वाटले.

ईतर सामाजिक सुधारणांबद्दल त्यांची मते काय अाहेत, ते ऐकायला अावडेल. उदा. अांतरजातीय विवाह किंवा अारक्षण (महिला अारक्षण किंवा मागासवर्गियांसाठी सरकार देत असलेले). हे जर त्यांना मान्य असेल, एकूण विचार सुधारणावादी असतील, तर मग त्यांचे भाषण म्हणजे कुटुंबव्यवस्था टिकावी म्हणुन केलेले कदाचित भाबडे प्रबोधन मानता येईल.

In reply to by स्वधर्म

त्यांच्या भाषणात लिव इन चा उल्लेख आहे. एका आंतरजातीय विवाहाचा देखिल आहे. त्यांचं काही "इन-प्रिंसिपल" निगेटिव मत नाही. पण त्या अनुषंगाने येणार्‍या बाबींचे ध्यान ठेवा नि राडा करू नकात असा काहिसा सुर आहे.

मी अगदी खरं खरं सांगू का!!!! अरुण जोशींचं लिखाण वाचायला आवडते. पण मला या धाग्यातील अरुण जोशींचा एकही प्रतिसाद कळलेला नाही. "अरे भाई...आखिर केहना क्या चाहते हो!!!" आज पुछुन्गा खुदा से, थोडासा दिमाग और क्यो नही दे दिया मुझे. अरुणजी की बाते तो समझ में आती.

In reply to by चिनार

इथल्या अलमोस्ट सर्व वाचकांचं मला उत्तम ललित लिहिता येतं (आणि अललित तितकंसं लिहिता येत नाही) असं मत आहे. मला अललित उत्तम लिहिता येतं (शेवटी काय सत्ये आणि भूमिका लिहायच्या. ) आणि लेखकाचा पिंड माझा नाही असं माझं मत आहे (वर मला ललित लिहिता येत असं माझं प्रामाणिक लोकांना विनय वैगेरे वाटतं.). त्यामुळं माझी देखिल अवस्था "ये क्या हो रहा है, भाई?" अशी आहे. सो चिलॅक्स.

In reply to by arunjoshi123

वर मला ललित लिहिता येत असं माझं प्रामाणिक लोकांना विनय वैगेरे वाटतं. हे वर मला ललित लिहिता येत नाही असं माझं प्रामाणिक मत लोकांना विनय वैगेरे वाटतं. असं वाचावं.

In reply to by arunjoshi123

अजो, तुम्ही एक हुशार व्यक्ती आहात. अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने विचार करणं तुम्हाला जमतं. तुम्ही ललित लिहिता तेव्हा ते ललित आहे याचं भान ठेवून नॉन-अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने लिहिता. त्यामुळे माझ्यासारख्या जन्तेला ते समजतं, आवडतं. पण ते तुम्हाला व्यक्तिशः ते रुचत नाही, कारण अ‍ॅबस्ट्रॅक्ट पद्धतीने विचार करण्याची खाज त्यात भागत नाही. उलट, तुम्ही जेव्हा अललित लिहिता, तेव्हा ती भागते, त्यामुळे तुम्ही खूश असता. पण हा अ‍ॅबस्ट्रॅक्ट विचार जन्तेला कळत नाही, त्यामुळे लोक वैतागतात. यावर उपाय म्हणून तुम्ही एकदा ललित पद्धतीने (म्हणजे 'प्लेयिंग टू द ऑडियन्स' पद्धतीने) अललित लिहून बघा. म्हणजे तुमची ललित लेखनातली आणि अललित विचारांतली बलस्थानं एकत्र आणून बघा.

पिराताई,
बायकांना सुखी संसारासाठी इतके उपदेश करत असताना, दोन शब्द पुरुषांनाही सांगायला काय जातं?
अपर्णाबाई पुरुषांना उपदेश का देत नाहीत याचं उत्तर पंधरा सेकंदांत इथे मिळेल : https://youtu.be/HI7GBWFU3Pw?t=7m34s आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ठीक आहे हे १५ सेकंद .... पण पुढच्या काही मिनिटातील उर्वरित क्लिप्स मधल्या मुद्द्यांच काय ? युनिसेक्स सलून बद्दल ह्यांना प्रोब्लेम्स आहेत ५० हजार देऊन अंगभर टाटू वगैरे अतिरंजित आहे ... flat नि सगळ flat केलाय मामा १३व्य मजल्यावर राहायला जाऊन हरवलाय ... पुरुषांनी स्त्रियांच्या हातावर मेंदी काढणे ह्यात ह्यांना प्रचंड भ्रष्टाचार दिसतो .... नवर्या शिवाय कोणत्याही पर पुरुषाचा स्पर्श मला झाला नाही हे त्या अभिमानाने सांगतात .... म्हणजे कॉर्पोरेट विश्वात रोज करायला लागणारा शेक hand म्हणजे ह्यांना डायरेक्ट बदफैलीच वाटत असणार ... ह्या अतिपणाला अंत नाहीये

In reply to by कोंबडी प्रेमी

शिकल्या सवरलेल्या मुलींना मोठ्या शहरातील वास्तव्य, परदेशातील वास्तव्य करायची वेळ आली आणि हे असले बावळट सल्ले घेऊन त्या वावरल्या तर कुत्रे हाल खाणार नाहीत .... म्हणजे ह्या बाईंच्या मते त्या मुलींनी तिथेच संकुचित वातावरणात बुरसटलेले राहावे ...वेल, मुंबई पुण्यात हे ओपन फोरम मध्ये बोलून बघा म्हणावं ...

In reply to by कोंबडी प्रेमी

तिथेच संकुचित वातावरणात बुरसटलेले राहावे
बळंच...काहीही
मुंबई पुण्यात हे ओपन फोरम मध्ये बोलून बघा म्हणावं ...
जरा उलट करुयात काय? हीच आपली मते उर्वरीत आक्ख्या महाराष्ट्रात आपण कीती जोरात बोलू शकाल?

In reply to by अभ्या..

कुणाला दुखवायचे नाही, पण लहान गावातून आलेल्या (महाराष्ट्र आणि बाहेरील सुद्धा) मुलींची सोडा मुलांची देखील मोठ्या शहरात रूलतांना जी फे फे उडते सुरुवातीला ती आठवून लिहिलं आहे ... उर्वरित महाराष्ट्रात हि मते बोलायचं म्हणताय तर जरूर बोलता येईल, वेळ आली पाहिजे आणि संधी मिळायला हवी .... पुन्हा एकदा : पुणे मुंबई म्हणजे जग नाही हे माहिती आहे आणि इतरांना काही वेगळ लेखून दुखवायचा हेतू नाही पण तरीही काही त्या दृष्टीने खटकल तर प्लीज माफ करा

In reply to by कोंबडी प्रेमी

मुलांची देखील मोठ्या शहरात रूलतांना जी फे फे उडते सुरुवातीला
हे सगळीकडे असते. मग पुणे मुंबईकर काय न्युयॉर्क वॉशिंग्टनात पेठेत/चौपाटीवर फिरल्यासारखे फिरतात काय सुरुवातीला?
उर्वरित महाराष्ट्रात हि मते बोलायचं म्हणताय तर जरूर बोलता येईल, वेळ आली पाहिजे आणि संधी मिळायला हवी ....
लवकर बघा संधीचं, सोलापुरात काही करायचे अस्ल्यास अवश्य कळवा. मी असतो इथेच.

In reply to by अभ्या..

हे सगळीकडे असते. मग पुणे मुंबईकर काय न्युयॉर्क वॉशिंग्टनात पेठेत/चौपाटीवर फिरल्यासारखे फिरतात काय
नै नाहो दादा ...पण म्हणूनच इंडक्शन मध्ये आवश्यक माहिती देतात कि नै ...तिथ्ले डूज आणि donts सांगतात
लवकर बघा संधीचं, सोलापुरात काही करायचे अस्ल्यास अवश्य कळवा. मी असतो इथेच.
अवो आमच कै मेन काम ते नै पण तुमी शिरीयस असाल तर बोलवा आमास्नी येऊ आम्ही ...

चुना घुसळून लोणी निघत नसतं! हे गावठी ज्ञान पुन्हा एकदा रोकडे असल्याची जिवंत प्रचिती आली हा धागा वाचून, मेगाफायटी लोक एकमेकांना बडवत बसली अन कीबोर्ड चेपत बसली, कोणी एक पाऊल पुढं घ्यायला तयार नाही का बारक्या बापाचा व्हायला तयार नाही. इतकं कसं लोक कळफलक बडवतात देव जाणे, मानवाधिकार आयोग असतो तसा कळफलक बडवणे बंदी आयोग निघेल अश्याने एखादा. एवढ्या राड्यात अपर्णा रामतीर्थकर ताईंची भाषणे समक्ष ऐकलेला अभ्याच एकटा बोंबलभिक्या ठरला! त्याचे अनुभव तर कोण रुजू बी करून घेईना.

In reply to by जेम्स वांड

चुना कुठला जेम्सराव, पब्लिक पाण्यावर लोणी काढाया बघतेय. असो. सिलेक्टिव्ह रीडिंग प्रमाणे सिलेक्टिव्ह लिसनिंग पण असतेच म्हणा. आम्हाला जे पटलं, आवडलं ते घेतलं. बाकी कुणाविषयीच बोलायची आमची औकात नाहीये. धन्यवाद.

कोंबडी प्रेमी,
पुरुषांनी स्त्रियांच्या हातावर मेंदी काढणे ह्यात ह्यांना प्रचंड भ्रष्टाचार दिसतो .... नवर्या शिवाय कोणत्याही पर पुरुषाचा स्पर्श मला झाला नाही हे त्या अभिमानाने सांगतात .... म्हणजे कॉर्पोरेट विश्वात रोज करायला लागणारा शेक hand म्हणजे ह्यांना डायरेक्ट बदफैलीच वाटत असणार ...
हस्तांदोलन करतांना हात उघडावा लागतो. अंगभर मेंदी काढायला कपडे उघडून बसावं लागतं. (संपादित) (लेखनात वैयक्तिक उल्लेख अथवा टिप्पणी टाळावी.) अपर्णाबाईंचा प्रश्न 'मुलीच्या आईला काहीच कसं वाटंत नाही मुलीला परपुरुषासमोर उघडं बसवायला' असा होता. म्हंटलं कुण्या मुलाच्या जवळच्या स्त्रीला लक्ष्य करून हा प्रश्न करून बघूया. एखाद्या मुलीला केला तर अनाहितांची नसती आफत यायची. म्हणून तुम्हांस प्रश्न करतो आहे. कृपया सांभाळून घेणे. तुमची आई मलाही आईसारखीच आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

अंगभर मेंदी अथवा टाटू हे जरा अति वाटतय अस मी म्हटलंय ... त्यामुळे तो मुद्दा बाद एखादी स्त्रीला पुरुष किंवा स्त्री कुणाकडूनही मेंदी काढून घेतांना बघून ज्याला त्यात लैंगिकता दिसते त्याने स्वत:च मानसोपचार घ्यावे असे वाटते ... तुमच्या एखाद्या पुरुषाला कुणा स्त्रीबरोबर हस्तांदोलन करताना त्यांच्याही चारित्र्यावर तुम्ही आक्षेप घेत असाल ह्या न्यायाने .. तुमच्या इतक्क्या खालच्या पातळीला उतरून मी बोलू शकत नाही पण वरच्या स्त्री किंवा पुरुष ह्यामध्ये तुमच्या घरातले किंवा निकटचे किंवा तुम्ही स्वत: ह्यांचे नाव घालून बघायला हरकत नाही ... असो निदान तुमच्यापुरते मी तुमच्याशी संवाद थांबवतो आहे; तुमचे तुम्ही बघा ...

In reply to by कोंबडी प्रेमी

कोंबडी प्रेमी, माझ्याशी संवाद थांबवल्याबद्दल अभिनंदन. असे सुस्पष्ट विचार पाहिजेत. नेमकं इथंच त्या मुलीच्या आईचं घोडं पेंड खातंय. अंगभर गोंदवण्यासाठी कुणासमोर उघडं बसावं आणि कुणासमोर उघडं बसू नये याचे काही सुस्पष्ट निकष असतात. हे त्या माऊलीच्या गावी नाही. हातभर मेंदी आणि अंगभर मेंदी यांत तुम्हाला जशी सीमारेषा आखंता येते, तशीच त्या माऊलीसही येवो. इतकंच. आ.न., -गा.पै.

मला ते ट्याटूचं जरा वाढवून सांगितल्यासारखं वाटलं. लग्नाची मेंदी फारतर हात भरून व कोपरापर्यंत काढण्याची पद्धत आहे. आता कोणी खांद्यापर्यंत मेंदी काढून घेतली असेल तर आभावाने आढणारी गोष्ट म्हणून सोडून द्यायला हवे. पायावरही जास्तीतजास्त गुढग्यापर्यंत! उगीच त्या काहीही सांगतात. आणि पन्नास हजार वगैरे मेंदीला देणारे किती श्रीमंत असतील पहा म्हणजे झालं! अश्यांच्या लेकीसुनांकडे डोळे वाकडे करून पाहताना त्या मनुष्याला स्वत:च्या जिवाची पर्वा सोडून द्यावी लागेल. अंगभर मेंदी काढणारे लोक्स असतील पण तयार ट्याटूज मिळतात ते काही मिनिटात चिकटवून होतात. आजचे पुण्यातले मेंदीचे दर सांगते. एका हाताला मनगटापर्यंत काढताना १५० रुपये साधी मेंदी (काही ठिकाणी दोनशे रु.). अरेबिक मेंदी हातावर थोडीच असते म्हणून १०० रुपये. त्यावर चकमक चिकटवायचे आणखी थोडे पैसे. प्र्त्यक्षात एक गोष्ट होणे आणि ती आपल्यापर्यंत येताना वाढवलेली असण्याची शक्यता असते. राजस्थानी कारागीरांकडून काढून घेण्याबद्दलही त्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. अरेच्च्या! ती कला आहे, ज्यावर ते पोट भरतात. चावटपणा करून पाहू देत की! उलट इथे नटणे मुरडणे या बायकांच्या प्रांतात खूप कमी टक्के पुरुष चावटपणा करण्याची शक्यता आहे. नवरीची मेंदी काढायला दसपटीपेक्षा पैसे जास्त घेतले तरी पाच हजार दोन्ही हात व आणखी पाच हजार पायांवर काढायचे! आता एरवीपेक्षा पाचपट जास्त पैसे वरील उदाहरणात दिले आहेत जे एरवी समान्य मनुष्य देणार नाही. व्हिडिओत ते पुरुषांनी बायकांना साडी नेसवण्याचे ऐकले. मेक अप करण्याचेही. आजकाल मेकअप आर्टीस्ट असे असतात. तसं पहायला गेलं तर पुरुष डॉक्तरांकडे कितीतरी महिला जाऊन आपली खासजी दुखणी सांगून औषधे घेतात, तपासून घेतात. तसेच हे आहे असे वाटते. हा त्या त्या मनुष्याचा व्यवसाय आहे. मग यात वाईट वागणारे कोणी नसतीलच असे कसे सांगणार? पुरुष मेकअप आर्टीस्ट व साडी नेसवणारे परवडतील इतकी मध्यमवर्गीय लग्ने अजून खर्चीक व्हायचियेत. आणि ज्यांना हे परवडते त्यांच्याकडे शुद्ध व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता येणारे कोणी चालणार नाही हे सरळ आहे. आमची आख्खी फ्यामिली जवळच्या सलोनमध्ये जाऊन केस कापून घेते. तिथे बायका आहेत. माझ्या नवर्‍याचे केसही बाईच कापते. आता यात जर कोणी तिरकी बात शोधायचा प्रयत्न केला तर मलाच हसू येईल. उद्या एखाद्या उपहारगृहात पुरुष शेफच्या हातचं बनवलेलं खाल्लंत म्हणतील पण आपल्याकडे वर्षानुवर्षे महाराज, आचारी असतात. महाभारतापासून भीमाने बल्लवगिरी केल्याचे दाखले असताना उगीच या गोष्टींवर वाद घालणे कितपत व्यवहार्य आहे?

In reply to by रेवती

तुला एक गंमत सांगु?! पुण्यात बरं का, पाश्चात्य देशात वगैरेही नाही... बायकांचे आतले कपडे डिझाईन करणारे आणि हे कपडे घेताना बायकांना सल्ला देणारे "पुरुष" अस्तित्वात आहेत. अनेकांना अनेक अश्लील विचार ह्यातुन सुचतील (ज्याची त्याची लेव्हल!), धर्म वगैरे बुडाला असेही वाटेल. पण हे अगदी खरंय. हे पुरुष प्रोफेशनली मदत करतात, तशी मदत करण्याच्या "सभ्य" पद्धती आहेत. बायका आधी बिचकायच्या, पण आता असा प्रोफेशनल सल्ला घेतल्याने आपण योग्य मापाचे कपडे वापरत आहोत (ही एक आवश्यक बाब आहे, अनेकांना माहिती नसते) हे ही मान्य केलेल्या बायका मला पर्सनली माहिती आहेत. अत्यंत चांगल्या घरातल्या ह्या स्त्रिया आहेत. आणि ते ही चांगल्या घरातले पुरुष आहेत. प्रोफेशनल सोड, गल्ली बोळातले टेलर्स सुद्धा बायकांची मापं घेताना अगदी सभ्यपणे घेतात. एक सेकंदही अवघडलेपणा येत नाही. जगात बायकांच्या म्हणुन ओळखल्या जाणार्‍या सर्व क्षेत्रात पुरुष आहेत आणि त्यांना बायकांना अवघडलेपणा न आणता आपलं काम करता येतं. त्याचं पोट पाणी त्यावर आहे.

In reply to by पिलीयन रायडर

बायका आधी बिचकायच्या
यातनं आधी म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणायचं असेल तर विधान चूक आहे असं मी वाचलं आहे.

In reply to by रेवती

तसं पहायला गेलं तर पुरुष डॉक्तरांकडे कितीतरी महिला जाऊन आपली खासजी दुखणी सांगून औषधे घेतात, तपासून घेतात. तसेच हे आहे असे वाटते.
हा दृष्टिकोन बरोबर आहे असं वाटतं. अपर्णाताइंना मात्र केवळ पारंपारिक पुरुषी सेवा मान्य आहेत नि नविन प्रोफेशन्स बद्दल त्यांना बायस आहे असं दिसतं.
लग्नाची मेंदी फारतर हात भरून व कोपरापर्यंत काढण्याची पद्धत आहे.
त्या लग्नाच्या मेंदिचं उदाहरण देत नव्हत्या. त्यापूर्विच्या टॅटूच्या फॅडचं देत होत्या.
अश्यांच्या लेकीसुनांकडे डोळे वाकडे करून पाहताना त्या मनुष्याला स्वत:च्या जिवाची पर्वा सोडून द्यावी लागेल.
हे काही पटलं नाही. प्रत्येक वेळी मुलगी तक्रार करतेच, किंवा तिला वाकड्या डोळ्यांचा अपराध सिद्ध करता येतोच किंवा त्याकडे ती लक्ष देत असेल इ इ नसतं. प्रत्येक श्रीमंत का क्रूर अस्तोच? कायदेशीर नसतोच? बाईंचा आक्षेप नको तिथे पुरुषांकडून टॅटू बनवण्याकडे असावा. आणि आजकाल टॅटू कुठे काढावा त्याच्या कौतुकाचं काय सांगावं!
माझ्या नवर्‍याचे केसही बाईच कापते. आता यात जर कोणी तिरकी बात शोधायचा प्रयत्न केला तर मलाच हसू येईल.
या उदाहरणात काही दम नाही. बायकांनी पुरूषांच्या केलेल्या विनयभंगांच्या केसेस ना के बराबर आहेत. म्हणून तुम्ही कोणती स्त्री पुरुषांबरोबर कशी मिसळली वा सेवा घेतली असं उदाहरण द्यायला हवं. ऑन अ लायटर नोट - इथे तिरकि बात शोधायला तुम्हालाच सर्वाधिक स्कोप आहे.
उद्या एखाद्या उपहारगृहात पुरुष शेफच्या हातचं बनवलेलं खाल्लंत म्हणतील.
विषय अंगप्रदर्शन आहे. खाताना बायका कपडे काढून खात नाही. सबब उदाहरण गैरलागू आहे. =================================================================== एकूण काहीही असो, आपली मतं प्रामाणिक वाटतात. त्यात तुम्ही तुम्हाला पटलेली रास्त टिका करता. असा संवाद उत्तम.

In reply to by रेवती

डॉक्टर आणि टेलर बद्दलचे मुद्दे पटले. प्रामाणिकपणे सांगतो सुरवाती सुरुवातीला मलाच खूप अवघडल्यासारखे वाटत होते. पण कालांतराने नाते घट्ट झाल्यानं ह्या गोष्टी गौण ठरल्या. आम्हा भावंडाना बहिणी नव्हत्या म्हणून असेल कदाचित. बिग बाजार/ विशाल मेगामार्ट समोर राजस्थानी मेहेंदी काढणारे पोरं ठीकठाक वाटली. महिलांचे विश्व पुरुषांपेक्षा खूप वेगळे असते पण त्याला पुरुषांच्या विश्वात संरेखन करण्याच्या नादात गुंतागुंत वाढते.

बाकी या धाग्यात अपर्णाताईना पाठिंबा देणाऱयांत ९९.5% पुरुषच दिसत आहेत. असे का बुवा? म्हणजे त्यांची बाजू बरोबर असती तर स्त्रियांनीही सपोर्ट नसता केला का .. ?

In reply to by अत्रे

मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि सक्रीय असणार्‍या स्त्रीया (लेखनशील स्त्रीया) झाडून स्त्रीवादी आहेत. माझा ऐसी नि मिसळपाव वरचा अनुभव असे सांगतो कि जर एखाद्या स्त्रीने पारंपारिक, धार्मिक, रुढिवादी, पुरुषप्रधानतावादी, इ इ किल्ला जरी नाही लढवला पण नुसती अभिव्यक्ति केली (जसे एखादीने वटपौणिमेला मी किती छान पूजा केली असा सर्वांगसुंदर लेख लिहिला) तर या बायका तिला फाडून खातील. त्यावरचे आक्षेप इतके असतील कि पुन्हा कोणी हींमतच नाही करणार. हे मी पाहिलेलं आहे. त्याउलट याच बायका एखादीने "मूल (उणे ९ ते) ५ वर्षांचे होईपर्यंत त्याला कधीही मारून टाकायचा अबसॉल्यूट अधिकार स्त्रीस हवा" असे मत मांडले तर अजिबात काहीच म्हणत नाहीत (२०० प्रतिसाद झाले तरी!!!). यावरून ब्रेनवॉशिंगची आणि एकजुटीची पातळी लक्षात यावी. बाकी व्यक्तिगत आयुष्यात स्त्रीयांना अक्कल नसते असे मानणारे (आणि अशा बर्‍याच गोष्टी मानणारे) आणि थेट म्हणणारे बरेच महाभाग भेटले आहेत. मी त्यांना परवडले तर तिथेच धुणे पसंद करतो. कोणाचं समर्थन करायचं हे ठरवायला त्याचं जेंडर कसा क्रायटेरिआ असू शकतो?

In reply to by arunjoshi123

विस्तृत प्रतिसादासाठी धन्यवाद.
कोणाचं समर्थन करायचं हे ठरवायला त्याचं जेंडर कसा क्रायटेरिआ असू शकतो?
अनबायस्ड सॅम्पलिंग असेल दोन्ही जेंडर कडून सारख्या प्रमाणात सपोर्ट / विरोध असायला हवा, हे गृहीतक समोर ठेऊन प्रश्न विचारला होता.

In reply to by arunjoshi123

मिसळपाव किंवा तत्सम ठीकाणि सक्रीय असणार्‍या स्त्रीया (लेखनशील स्त्रीया) झाडून स्त्रीवादी आहेत. असे आहे की टोकाचे स्त्रीवादी असणे जालावरच परवडते. प्रत्यक्षात नाही.

In reply to by arunjoshi123

=)) "तीसरादेखील मुलगाच आहे हे कळल्यावर माझ्या आईने पपई खाऊन मला अबोर्टायचा प्रयत्न केला म्हणून जगातल्या कुठल्याच स्त्रीने गर्भपात करायचा नाही" म्हणून थयथयाट करणार्या पुरुषलादेखील कोणी अजिबात काहीच म्हणत नाहीत (२०० प्रतिसाद झाले तरी!!!). यावरून ब्रेनवॉशिंगची आणि एकजुटीची पातळी लक्षात यावी.

In reply to by arunjoshi123

किंवा माझ्या फिट येणाऱ्या मुलाला माझी बायको मारून टाकेल अशी मला भीती वाटते म्हणून चार्ली गार्डच्या RTL चे ओझे अख्ख्या जगाने वागवलेच पाहिजे म्हणून थयथयाट करणारे....

In reply to by arunjoshi123

'काहीही हं' प्रकारातला प्रतिसाद आहे. मला हवी तर मी वडाची पूजा करीन, नाहीतर पिंपळाची करीन व कोण फाडून खातय ते बघते. आता उद्या श्रावणी शुक्रवारची सवाष्ण आहे माझ्याकडे. कोणाला वाद घालायचेत त्यांना येऊ द्या. "मूल (उणे ९ ते) ५ वर्षांचे होईपर्यंत त्याला कधीही मारून टाकायचा अबसॉल्यूट अधिकार स्त्रीस हवा" असे मत मांडले तर अजिबात काहीच म्हणत नाहीत हे तर काही म्हणण्याच्या पलिकडे आहे. स्त्री च असे नव्हे तर पुरुषांनाही चटका लागेल असलं काही म्हणाताना. अबॉर्शनवाल्या स्रियांचा निर्णय पेनफुल असणार. उगीच नको त्या वाटेनं संभाषण नेण्यात अर्थ नाही अजो. तसं तर पोटची पोरे विकणार्‍या महिला व पुरुषही आहेत. याने विषय भरकटणार.

In reply to by अत्रे

बाकी या धाग्यात अपर्णाताईना पाठिंबा देणाऱयांत ९९.5% पुरुषच दिसत आहेत. असे का बुवा? म्हणजे त्यांची बाजू बरोबर असती तर स्त्रियांनीही सपोर्ट नसता केला का .. ? त्यांना विरोध करणार्‍या ९९.५ % बायकाच दिसत आहेत. असे का बुवा? म्हणजे त्यांची बाजू चूक असती तर बाप्यांनीही विरोध नसता केला का .. ?

In reply to by अत्रे

Ensuring diversity of the sample is a tall order, as reaching some portions of the population and convincing them to participate in the survey could be difficult. But to be truly representative of the population, a sample must be as diverse as the population itself and sensitive to the local differences that are unavoidable as we move across the population. population चे खरे रिप्रेझेन्टेशन मिपा व अन्य साईट वर होऊ शकत नाही. उदा. समान नागरी कायदा असावा का ? या विषयी धागा टाकल्यास (माझ्या मते) मोठ्या बहुमतासह उत्तर "हो" असे मिळेल. पण भारताच्या लोकसंख्येने मतदान केल्यास हे बहुमत राहील अथवा तेवढे मोठे असेल असे वाटत नाही. तसेच पूर्ण भारताने मतदान केल्यास कदाचित या बाईंच्या बाजूने (अथवा इथे जशा मांडल्या गेल्यात त्या बाजूने) फार मोठे बहुमत असू शकेल (किमान ग्रामीण भागातून) अर्थात याचा अर्थ असाही होत नाही कि समान नागरी कायदा अयोग्य आहे वा या बाई सर्व काही योग्य बोलत आहेत. लोकशाही कायमच बरोबर असते असेही नाही. टीप : या सांख्यिकीने असे म्हणावे का या बाई २०-३० % बरोबर आहेत ? अजून वेगळे संख्याबळ मांडून असेही काही म्हणता येईल कि युनिक आयडी पाहिल्यास बाईंच्या बाजूने अगदी मोजके आयडी आहेत तर विरुद्ध खूप. वेगळे काहीतरी म्हणून - वेगवेगळी मुद्द्यांसोबत अजोनि प्रतिवाद केला आहे तर विरुद्ध बाजूने भाकरी, पोशाख असे तेच तेच मुद्दे येत आहेत. Torture numbers, and they'll confess to anything. Gregg Easterbrook टीप2 : या धाग्याशी काही घेणे-देणे नाही. कितीही चर्चा केली तरी कोणी मत बदलणार नाहीये. पण सांख्यिकीचा मुद्दा इथे गौण आहे / त्यातून काहीच सिद्ध होत नाही. परत वाचनमात्र होत आहे

In reply to by sagarpdy

कितीही चर्चा केली तरी कोणी मत बदलणार नाहीये.
माणसानं मतं आपल्या अनेक वर्षांच्या आयुष्यात अनेक विचाराअंती बनवलेली असतात. त्यामुळे ती चूक आहेत वा असू शकतात असला विचार कोणी मनातही करत नाही. कोणी प्रभवनशील प्रतिमेचा मनुष्य आयुष्यात असेल तर त्याच्यापुढे वागताना बोलताना मन आपसूक परिवर्तनशील होतं. मात्र ज्यांचेशी काही संबंधच नाही वा ज्याचा नि आपला इगो क्लॅश अजून चालू झालेला नाही वा सेटल झालेला नाही अशांसोबत का मन परिवर्तनशील ठेवायचं? मन परिवर्तनशील नसेल तरच आपण स्थिर आयुष्य जगू शकतो. जिथे वैचारिक देवाणघेवाणीला द्वंद्वाचे स्वरुप येते तिथे परिवर्तनशीलता अजूनच थिजून जाते. आणि कहर म्हणून कि काय बर्‍याच सदस्यांच्या मते आंतरजाल ही वैचारिक आदानप्रदानाची नसून वैचारिक द्वंद्वाचीच जागा आहे जिथे परिवर्तनशीलता हे पराभवाचे प्रतिक मानले जाते. ============================= पण म्हणून विरुद्ध भूमिकेचं तुमच्यासमोर झालेलं प्रतिपादन पूर्णतः वाया जात नाही. त्या भूमिकेतली सत्यं मनात घर करतात, आपण लक्षात न घेतलेले बिंदू लक्षात येतातच आणि अजून अभ्यासावयाच्या गोष्टी पूर्वग्रह खिळखिळे करतात. विरोधक तुमच्या मेंदूत एक किडा टाकून गेलेला असतो आणि आपल्या भूमिकेतला बदल आपण आपल्या आत्मसन्मानाची आब राखून विरोधकासमोर कबूल करायचाच नसतो. मात्र विरोधकाने टाकलेल्या मेंदूतल्या किड्याला मालकाच्या कार्याचा भरपूर आनंद मिळत असतो.