इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी
इंदूर - भाग २ - रावेरखेडी
>>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....
या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो.
भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले.
रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता..
सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात
आम्ही सुरूवात गराडू पासून केली
हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता.
भुट्टे का कीस..
गुलाबजाम
"मालपुये"
मूंग दाल हलवा..
"लच्छेवाली रबडी"
हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता.
इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार...
थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला..
या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच..
चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे..
तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते.
सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो..
"भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली.
घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली.
संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले..
नमकीन्सच्या दुकानात गिर्हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार.
आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!)
इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले.
एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता.
(क्रमशः)

वाचने
35419
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
इंदौर
In reply to इंदोरला चार वर्ष राहिलेय by भाग्यश्री कुलकर्णी
हो. भोचकरावांचा ब्लॉग अनेकदा
In reply to इंदौर by स्वाती दिनेश
लच्छेवाली रबडी आणि जलेबी दुधाचा नास्ता.
इंदूर विषयी
जळवाजळवीसाठी
कस खायच म्हणते मी इतक? बर
माहोल
दुष्ट मोदक... इंदूरची आठवण काढायला लावतोयस !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shakalaka Baby... ;)गणेश नमकिन?
नमन स्वीट्स अँड नमकीन्स.
In reply to गणेश नमकिन? by किरण रवंदळे
जीवघेणा धागा आहे हा!
वाह ! लैच्च चटपटीत तोपासु
सर्व प्रतिसादकांचे भरपूर
एक प्रश्न - गुजरात मध्ये
मस्त वर्णन आणि फोटो.जुने दिवस
मस्तच..!
काय हे...हपिसात हे तीन्ही भाग
इंदुरास्नी खादाडी करायला २